दिल्लीमध्ये आज आपच्या सरकारची दुसरी इनिंग चालू झाली आहे. योगायोगाने मायबोलीवरच्या धाग्याचाही दुसरा भाग आज चालू होतो आहे. गेले वर्षभर अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही अरविंद केजरीवाल आणि आपने दिल्ली विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवून ज्या दिमाखात पुनरागमन केलं आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे.
सर्वात महत्वाची आणि पक्षनिरपेक्ष अशी गोष्ट म्हणजे देशातील सर्वांत स्वच्छ, सर्वात तरूण आणि सर्वात जास्त शिक्षित विधानसभा आपच्या निमित्ताने दिल्लीकरांना आणि पर्यायाने देशाला मिळाली आहे. राजकारणामध्ये चालू असणार्या ह्या सकारात्मक बदलाकडे लक्ष ठेवून आपली मते इथे मांडूया.
* टीप - इथे विरोधी मतांचंही स्वागत आहे. वैयक्तिक शेरेबाजी टाळण्याची आणि सभ्य भाषा वापरण्याची सर्वांना विनंती.
** पहिला भाग इथे वाचता येईल.
पान १७ - योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण ह्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून काढल्याबद्दलची चर्चा
पान २४ - योगेंद्र यादव बोलले ते खरं की खोटं?
पान ३१ - आपमधील नेत्यांच्या ट्वीटर हॅण्डल्सची यादी
पान ५५ - दिल्लीतील नगरपालिका आणि कचर्याचं राजकारण
.
<<तुम्हाला विनोद कळतो?>> छे,
<<तुम्हाला विनोद कळतो?>>
छे, नाही ब्वॉ. मी एकदम गंभीर स्वभावाची व्यक्ती आहे.
मग आप सारख्यांच्या समर्थक कशा
मग आप सारख्यांच्या समर्थक कशा आहात तुम्ही??
आपसरकारने दिल्लीच्या जनतेला
आपसरकारने दिल्लीच्या जनतेला दिलेलं अजून एक आश्वासन पाळलं. शाब्बास.
बारावीनंतर शिक्षण घेऊ इच्छिणार्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज देण्यासाठीची योजना यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच सुरू केली जात आहे.
पढेगा इंडिया, तभी तो बढेगा इंडिया !
चुकिच करत आहे 'आप' सरकार
चुकिच करत आहे 'आप' सरकार १४-१५ वर्षाच्या रोजगार द्यायच १२वी पर्यत कशाला शिकु द्यायच.
<<मग आप सारख्यांच्या समर्थक
<<मग आप सारख्यांच्या समर्थक कशा आहात तुम्ही??>>
कारण आपसरकार आपल्या कामाप्रती गंभीर आहे. दाखल्यासाठी वरची पोस्ट वाचा.
अहो मिर्ची तै खरच तुम्हाला
अहो मिर्ची तै खरच तुम्हाला कळत नाही. ते कुणाला होते.
कप्पाळ कसे बडवुन घ्यायचे?
सुरेख, ते देशमुखसाहेबांना
सुरेख, ते देशमुखसाहेबांना लिहिलंय.
<<हे वरिल पोस्टर आजकाल
<<हे वरिल पोस्टर आजकाल दिल्लीत सर्व ठिकाणी पहायला मिळतायत. नावे का नाही जाहीर करत दिल्लीसरकार त्या अटक केलेल्या ३५ भ्रष्ट अधिकांर्याची?>>>>>>>
मिर्ची ताई, हे खरे आहे का?>>
हो, खरं आहे. बग्गाचं काम असणार. परवा एका शोमध्ये राघव चड्ढा म्हटला होता तसं "दिल्ली भाजपा राजनैतिक बेरोजगारी के दौर से गुजर रही है"
त्यामुळे त्यांचं चालू द्या. खरंतर केजरीवालांनी घरासमोर एक मांडव टाकून तिथे चहापाण्याची सोय करून द्यायला हवी. तीन महिन्यांत तीस वेळा तरी भाजपाचे लोक तिथे निदर्शनं करायला गेले होते. त्यांना कुठल्या जंगलात पाठवायचं ह्यावर मोदी लवकरच एक चर्चासत्र घेणार आहेत !
मी मागे एसीबीचे प्रेस रिलीज टाकले होते. त्यावरून २०-२५ नावं तर कोणीही काढू शकतो. उगी आपलं कैच्याकै. नाहीतर सरळ एक आरटीआय टाकावी. ही काय 'नौटंकी' ?
त्या-त्या तारखेला जाऊन शोधलं तर नावेसुद्धा मिळतील.
जस्ट इन - अजून तीन भ्रष्ट मोहरे गळाले.
हे आजचं प्रेस रिलीज. त्याच्यात पकडलेल्या अधिकार्यांची नावं आहेत. ते पोस्टर लावणार्याने स्वतःचं नाव लिहिण्याची हिंमत दाखवली असती तर स्वखर्चाने त्याला टपाल पाठवलं असतं.
अजून एक बातमी . दिल्ली ला ४
अजून एक बातमी . दिल्ली ला ४ वर्षात सुरक्षित शहर बनवणार. चुनावी जुमला नाही.
http://indianexpress.com/article/cities/delhi/cm-arvind-kejriwal-promise....
मिर्ची , सलाम तुम्हाला. इतका संयम्.उफ्फ
चुनावपश्चात जुमला आहे की कसे
चुनावपश्चात जुमला आहे की कसे ते ४ वर्षानंतच कळेल, नै?
सरकार हमीदार म्हणून राहणार?
सरकार हमीदार म्हणून राहणार? आपवर विश्वास असला तरी लोकांवर नाही! रिकव्हरी महत्वाची.
जस्ट इन - अजून तीन भ्रष्ट
जस्ट इन - अजून तीन भ्रष्ट मोहरे गळाले.
हे आजचं प्रेस रिलीज. त्याच्यात पकडलेल्या अधिकार्यांची नावं आहेत. ते पोस्टर लावणार्याने स्वतःचं नाव लिहिण्याची हिंमत दाखवली असती तर स्वखर्चाने त्याला टपाल पाठवलं असतं.>>>>>>
मस्तच मिर्ची ताई
200 घर गरिबांसाठी 1000 करोड
200 घर गरिबांसाठी 1000 करोड मधे मोदी बनवणार आहे म्हणे
हिशोब करा
<<मिर्ची , सलाम तुम्हाला.
<<मिर्ची , सलाम तुम्हाला. इतका संयम्.उफ्फ>>
रेशमडोर, घनघोर 'तपश्चर्येअंती' आलेला संयम आहे हा
अडीच माणसे (मी, नवरा, मुलगा) सोडली तर माझ्या सासर,माहेरची समस्त मंडळी आणि शाळा, पदवी, पदयुत्तर शिक्षण सगळे दोस्त मोदीसमर्थक आहेत/होते.
(त्यातील एक-दोन अजूनही 'आप ने प्रधानमंत्री चुना है, जादूगर नहीं' किंवा 'आम्ही मुळी स्वस्ताईसाठी मोदींना मत दिलंच नव्हतं' च्या मोडमध्ये आहेत. पण बाकी सगळे स्तब्ध झालेत. आपल्याला टोपी घातली गेलीये हे लक्षात यायला लागलंय.)
<<सरकार हमीदार म्हणून राहणार? आपवर विश्वास असला तरी लोकांवर नाही! रिकव्हरी महत्वाची.>>
तशी व्यवस्था केलेलीच असणार.
रिकव्हरी महत्वाची हे खरंच. पण पैशाअभावी कोणाचं शिक्षण थांबू नये हे जास्त महत्वाचं. वीजकंपन्यांकडे सरकारचे ५००० कोटी रूपये उधार आहेत. तरी अजून ११००० कोटीचं हमीपत्र वीजकंपनीला देण्याची तयारी बाबूलोकांनी चालवली होती. त्यांची हमी घेण्यापेक्षा शिकणार्या मुलांची हमी घेणं केव्हाही चांगलं.
ह्यात मला आवडलेली अजून एक गोष्ट म्हणजे हा लाभ कुठल्याही मुलाला मिळणार आहे. जात-पात, अल्पसंख्यांक, आर्थिक दुर्बल वगैरे निकष ठेवलेले नाहीत. त्यामुळे टॅक्सपेअर्सना आपले पैसे Freebies वर उधळले जातात वगैरे वाईट वाटणार नाही.
नवीन शाळांसाठीही वेगाने काम सुरू आहे. ४५ नवीन शाळा बांधणार आहेत. त्यातील ३० शाळांच्या फाइल्स क्लिअर झाल्या आहेत, लवकरच काम चालू होईल असं ऐकलं.
<<200 घर गरिबांसाठी 1000 करोड
<<200 घर गरिबांसाठी 1000 करोड मधे मोदी बनवणार आहे म्हणे>>
परमनंट शेल्टर होम (मराठी नाव?) बद्दल म्हणत आहात का तुम्ही?
एप्रिल महिन्यात ह्या योजनेबद्दल सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं आहे वाचा -
"It is a scam. Take for example Maharashtra. It received Rs 170 crore and the state has no new construction and it has not a single operational shelter home," the social justice bench of justices Madan B Lokur and U U Lalit said.
"There is not a single operational shelter home in the state (Maharashtra). Where has the money gone,?"
मोठ्ठा प्रश्न - पैसा गेला कुठे?
मिडियाने चर्चा केली का ह्या प्रकारावर?
मुख्यमंत्री झाल्यानंतर काल
मुख्यमंत्री झाल्यानंतर काल पहिल्यांदाच अकेंनी मेनस्ट्रीममिडियाला मुलाखत दिली. (ह्याआधी JKR वेबपोर्टलच्या उद्घाटनाच्या वेळी दिली होती)
पूर्ण मुलाखत इथे पाहता येईल. मस्ट वॉच. एकदम खतरा
आप्टर्डसका दिल खुष कर दिया ! नेहमीसारखीच रोखठोक पद्धत. सीधी बात नो बकवास.
"नरेंद्र मोदी ये समझ ले के मैं राहुल गांधी नहीं हूं" हे त्यांचं वाक्य कालपासून ट्विटरवर धुमाकूळ घालतंय. ह्यामुळे नागालँडनंतर बहुतेक पहिल्यांदाच काँग्रेस-भाजपा एकत्र आले आहेत. फुल्ल टु जुंपली आहे.
व्यक्तिश: मला मुलाखतीतलं एक वाक्य आवडलं नाही.
"आज अमित शाह का चौकीदार भी फोन करें तो LG पेट के बल रेंगते हुए चले जाएंगे" (लेकिन हमारे मिनिस्टर्स को अपाँईंटमेंट नहीं देंगे)
ते वाक्य LG च्या वागण्याच्या संतापातून आलं असावं किंवा मग LG आणि भाजपाला आणखी डिवचण्याच्या आणि अजून चुका करायला लावण्याच्या हेतूने मुद्दाम बोलले असावेत असा मला संशय आहे. तसं असेल तर LG चं कठीण आहे.
"नरेंद्र मोदी ये समझ ले के
"नरेंद्र मोदी ये समझ ले के मैं राहुल गांधी नहीं हूं" हे त्यांचं वाक्य कालपासून ट्विटरवर धुमाकूळ घालतंय. ह्यामुळे नागालँडनंतर बहुतेक पहिल्यांदाच काँग्रेस-भाजपा एकत्र आले आहेत. फुल्ल टु जुंपली आहे.
<<
>>
अरेरे, ह्या राहुल गांधीची तर लायकीच काढुन टाकली या केजरिवालनी.
<<अरेरे, ह्या राहुल गांधीची
<<अरेरे, ह्या राहुल गांधीची तर लायकीच काढुन टाकली या केजरिवालनी.>>
फार खुष होऊ नका, मोदी आणि एलजीला पण व्यवस्थित धारेवर धरलंय
मी मायबोलीवर नविन सदस्य आहे
मी मायबोलीवर नविन सदस्य आहे पण संपुर्ण धागा वाचल्यावर अत्यंत वाईट वाटले. दुसर्या राजकीय चर्चेच्या धाग्यावर एकमेकांवर अत्यंत शिवराळ आणि हिणकस भाषेत टिपण्या पाहिल्या त्याचे काहीच वाटले नाही कारण आजकाल अनेक सोशल साईटसवर हा प्रघातच पडला आहे.
पण इथे जरी आपल्या पक्षाची बाजू चांगल्या शब्दात मांडण्याचा आणि विरोधकांना चांगल्या भाषेत अथवा दुर्लक्षून प्रतिसाद दिलेले असले. तरी अंधभक्तीचा अप्रतिम नमुना म्हणून मी ह्या धाग्याचा उल्लेख करीन. त्यामुळेच येथे "आपला तो बाब्या आणि दुसर्याचे ते कार्टे" ही म्हण तंतोतंत लागू ठरते.
शेवटी खेदाने म्हणावे लागते की सर्वच राजकीय पक्षाचे अनुयायी किंवा समर्थक फक्त अंधभक्तीवर विश्वास ठेवतात. जो मुळात घातक आहे.
"नरेंद्र मोदी ये समझ ले के
"नरेंद्र मोदी ये समझ ले के मैं राहुल गांधी नहीं हूं">>>
मुख्यमंत्र्याच्या तोंडी नाही शोभत.
मुख्यमंत्र्याच्या तोंडी नाही
मुख्यमंत्र्याच्या तोंडी नाही शोभत.>>>>> श्शुSSSSS, ह्या धाग्यावर असं इथे नाही बोलायचं. जे काही केजरीवाल म्हणतील आणि करतील ते सर्व बरोबर. हो की नाही मिर्चीताई..;)
बरोबर सुनटून्या मोदी अशी भाषा
बरोबर सुनटून्या
मोदी अशी भाषा वापरतात त्यांना पदाची गरिमा राखणे कदापी जमले नाही. केजरीवालने तसे करू नये
धन्यवाद
जो पर्यन्त केजरीवाल जनतेला
जो पर्यन्त केजरीवाल जनतेला दिलेल्या वाद्यांना जुमला म्हणत नाहित तो पर्यन्त त्यांना सगळे शोभनार आहे.
<<दुसर्या राजकीय चर्चेच्या
<<दुसर्या राजकीय चर्चेच्या धाग्यावर एकमेकांवर अत्यंत शिवराळ आणि हिणकस भाषेत टिपण्या पाहिल्या त्याचे काहीच वाटले नाही कारण आजकाल अनेक सोशल साईटसवर हा प्रघातच पडला आहे..
छान
अंधभक्ती करणं म्हणजे चुकीच्या गोष्टींवर पांघरूण घालून त्याचं समर्थन करणं. हो ना?
१,२,३....अशा पद्धतीने यादी करून अकेंच्या चुकीच्या गोष्टी लिहा. मग चर्चा करू. 'तुम्ही अंधभक्त आहात' असा नुसता निकाल ऐकवायचा असेल तर चालू द्या.
सुनटून्या,महादेव,
त्या वाक्यात काय आहे खटकण्यासारखं?
दुसरं वाक्य (एलजीवालं) मला खरंच नाही आवडलं. तसं लिहिलंय.
मिर्ची, मी काही तुमचे मत बदलू
मिर्ची, मी काही तुमचे मत बदलू शकत नाही, कारण केजरीवाल यांनी केलेल्या कोणत्याही चुकीला तुम्ही नाही त्यांनी केले ते बरोबरच असेच म्हणणार. आतासुध्दा तुम्ही माझ्या प्रतिसादामधील ठराविक भाग ठळक करूनच तुमचा मुद्दा रेटत आहात हा प्रकार मला हा धागा वाचताना पदोपदी जाणवतच होता. तुमची अंधभक्ती तेव्हाही संपणार नाही जेव्हा दिल्ली सरकारकडून लोकांच्या अपेक्षांची पुर्ती होणार नाही किंवा निवडणुकीपुर्वी दिलेली वचने ते पुर्ण करू शकणार नाहीत. त्यावेळी सुध्दा तुम्ही केजरीवाल यांना क्लिन चिट देऊन त्याचे खापर इतर कोणावर तरी फोडणार ह्याची मला पुर्ण खात्री आहे.
राहता राहिला मुद्दा केजरीवाल यांच्या चुका दाखवून देण्याचा तर तसा प्रयत्न अनेकांनी ह्या धाग्यावर सुध्दा केलेला आहे आणि तुम्ही त्याचा प्रतिवाद करताना केजरीवाल बरोबरच आहेत किंवा हे तुमचे मत असु शकते मला ते पटत नाही असा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे तो प्रर्याय तुम्ही स्वतःच बाद केलेला आहे त्यावर कसली चर्चा करणार म्हणा.
मिर्ची ताइ, तुम्चे कौतुक आहे.
मिर्ची ताइ, तुम्चे कौतुक आहे. अतिशय चांगल्या भाषेत आणी संयमितपणे तुम्हि उत्तरे देत आहात.
मिर्ची तै मी तुमची खुप जुना
मिर्ची तै मी तुमची खुप जुना पंखा आहे.धागा १००००० वर पोहचावा अशा शुभेच्छा!
माणुस आणि सुरेख, धन्यवाद
माणुस आणि सुरेख, धन्यवाद
<<मिर्ची, मी काही तुमचे मत बदलू शकत नाही, कारण केजरीवाल यांनी केलेल्या कोणत्याही चुकीला तुम्ही नाही त्यांनी केले ते बरोबरच असेच म्हणणार.>>
मत कोणीच कोणाचं बदलवू शकत नाही. चर्चेत तसा प्रयत्नही करू नये असं वाटतं. आपापले मुद्दे लिहावेत. पटले तर घ्यायचे नाहीतर सोडून द्यायचे. हाकानाका.
<<राहता राहिला मुद्दा केजरीवाल यांच्या चुका दाखवून देण्याचा तर तसा प्रयत्न अनेकांनी ह्या धाग्यावर सुध्दा केलेला आहे आणि तुम्ही त्याचा प्रतिवाद करताना केजरीवाल बरोबरच आहेत किंवा हे तुमचे मत असु शकते मला ते पटत नाही असा पवित्रा घेतला आहे. >>
मी फक्त केजरीवालांची आणि आपची माझ्या वाचनात येणारी बाजू मांडत आहे (जी बाजू मिडिया दाखवत नाही...for obvious reasons)
ठळक केलेल्या भागातील पवित्रा हा कुठल्याही व्हर्चुअल किंवा प्रत्यक्ष चर्चेत/वादात घेतला जाणारा योग्य पवित्रा नाही का? तुम्हाला नाही पटत? माझी मते जशी मी तुमच्यावर लादू शकत नाही तशी मी दुसर्यांची मते स्वतःवर लादूनही घेऊ शकत नाही. अॅण्ड दॅट्स फाइन.
त्यामुळे तुम्ही लिहिणार असाल तर बिनधास्त लिहा. नुसतं वाचणार असाल तरी हरकत नाही.
<<तुमची अंधभक्ती तेव्हाही संपणार नाही जेव्हा दिल्ली सरकारकडून लोकांच्या अपेक्षांची पुर्ती होणार नाही किंवा निवडणुकीपुर्वी दिलेली वचने ते पुर्ण करू शकणार नाहीत.>>
केजरीवाल सरकार आश्वासने पूर्ण करणार ह्याची पूर्ण खात्री आहे. प्रामाणिक प्रयत्न चालु असल्याचे धडधडीतपणे दिसत आहे.
फक्त NDTV चा रविशकुमार म्हणतो तसं "टीव्ही कम देखिए" !
खरच टिव्ही कमी बघा एका बाजूला
खरच टिव्ही कमी बघा
एका बाजूला maggi वर निर्बंध आली दुसर्या बाजूला पंतजलिने maggi सारखे product बाजारात उतरवले
जय मोदी
फक्त NDTV चा रविशकुमार म्हणतो
फक्त NDTV चा रविशकुमार म्हणतो तसं "टीव्ही कम देखिए" >> मला मायबोलीवर फिरकायला बंदी घालताय कां??
Pages