निसर्गाच्या गप्पा (भाग २५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 21 March, 2015 - 09:43


(निसर्गाची नैसर्गिक गुढी/तोरणे)

सर्व निसर्गप्रेमींना सप्रेम
नमस्कार,

गोनीदां, डॉ. शरदिनी डहाणूकर, दुर्गाबाई यांजसारखे जे निसर्गप्रेमी आहेत ते सतत आठवणीत असतातच पण त्यांचा विशेष आठव होतो ऋतूबदल होतो तेव्हा - काय सुरेखरित्या या नैसर्गिक गोष्टीला ते शब्दबद्ध करु शकतात !!

गोनीदांनी " माचीवरला बुधा" या कादंबरीत लिहिलेले हे वर्णन का पहाना ...
"फाल्गुन लागला. अन चाफ्याची सगळी पानं गळून पडली. त्यांच्या टोकाला बारीक बारीक कळ्या धुमारल्या. ती टोकं तांबूस चकचकीत दिसू लागली. होता होता कळ्या फुलल्या. सगळं टेमलाईचं पठार चाफ्याच्या वासानं घमघमायला लागलं.उंबराचीही पानावळ पार झडून
गेली होती. पण फाल्गुन लागताच त्या झाडाच्या अंगी चैतन्य रसरसलेलं दिसू लागलं. त्याच्याच अंगी का, सगळ्याच झाडांची तीच गत झाली. रानची सगळीच झाडं नव्हाळली, देखणी दिसायला लागली. त्यांच्या फांद्याच्या हातांना जणू कोवळी तांबूस नखं फुटली. त्या कोवळ्या झळाळीनं सगळं रान श्रीमंत झालं."
(साभार - माचीवरला बुधा - गोनीदा - मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस)

जरी आपण सगळे शहरी असलो तरी आपल्या आसपासच्या झाडापानात जो बदल होत असतो तो पाहून आपण
आंत कुठेतरी सुखावतो, श्रीमंत होत असतो. या निसर्गाची विविध रुपे पहाताना त्यातून जी निर्मळ प्रसन्नता, शांति व सौंदर्य यांची लयलूट केली जाते त्याची साठवण आपल्या मनात कशी करता येईल हे जरुर
पहावे.

सार्‍या झाडांसारखेच या नव्या वर्षाचे आपण उत्फुल्ल मनाने स्वागत करु या, कोवळ्या पालवीसारखी एक सुंदरशी सतेज गुढी आपल्याही मनात उभारुयात - चैतन्यमय होऊया, अमृतमय होऊया
....

असतो ऽमा सद्गमय |
तमसोऽमा ज्योतिर्गमय |
मृत्योर्मा अमृतं गमय |
ॐ शांति: शांति: शांति: ||

सर्वांना नववर्षाच्या
अनेकानेक हार्दिक शुभेच्छा ....

वरील प्रस्तावना मायबोलीकर शशांक पुरंदरे यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली. आज २५ वा धागा गुढी पाढव्याचा मुहुर्त साधून मराठी नविन वर्षाच्या प्रारंभदिनी सुरू करताना आनंद होत आहे.

मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टीना - काय सुंदर फुलंलय मे फ्लॉवर ...
त्याच्यापलिकडे फर्न /नेचे दिस्ते आहे, त्यापलिकडच्या कुंडीत काय आहे ??
तसेच मे फ्लॉवरच्या वरती वेगळीच पाने लोंबताना दिस्ताहेत - ते काय आहे ??
आगाऊपणाबद्दल क्षमस्व .... Happy

पुरंदरे शशांक Lol

मे फ्लॉवर च्या वरती असणारी पान म्हणजे शतावरी चा वेल .. बाजुला पारिजातकाच्या खोडावरुन चढलाय तो. काटे अस्तात या वेलीला . छोटे छोटे आणि अणकुचिदार . कितीही तोडला तरी एखाद मुळाची काडी राहिली तरी उगवतो . महिन्याभरापुर्वीच काढला त्याला तरी आत्ता हा एवढा झालाच परत .

आणि हेच ते नेच्याच्या बाजुच .. नाव काय ते नै माहिती.. याच्या हरेक पानात खुप सारे तंतु असतात .. हळूवार पने त्याच पान तोडल तरी ते तंतु त्या पानाला कै पटकन सोडत नै. कधीकाळी ते पान तस तोडून त्याच अद्दर लटकन बघायला मजा यायची . अर्थातच हे लहानपणी चालायच Wink

DSC05755.JPG

आणि हा कुंडीत लावलेला छोट्या छोट्या फुलांचा स्वस्तिक Happy

DSC05756.JPG

मागे एका भागात मी दिन का राजा या झुडुपाची माहिती दिली होती. ( http://www.maayboli.com/node/45755?page=3 ) (यात दिलेले सर्व फोटो आंतरजालावरुन घेतले होते ... Happy )

640px-Cestrum_diurnum_-_Simurali_2011-10-05_050363.JPG

त्याच झुडुपाला लागलेली ही इटुकली फळे .... (हा फोटो मात्र मी घेतलेला ... Happy

c d.jpg

शतावरी हे मुलींसाठी उत्तं टॉनिक आहे. अर्धा चमचा पावडर दूधातून रोज घेतली पाहिजे. बाजारी शतावरी कल्पात भरपूर साखर असते.

तभी मै सोचु के कुछ तो बी मिसींग है.. सगळे लोक निव्वळ पान फुल के बारेमेच बोलरेले है , और फळ मे खाली आम काच उदोउदो होरेला है. पर उन्हाळेमे आम के व्यतिरिक्त और भी फळ रेहेते है ना . उनके बारेमेभी तो सोचो जर्रास्सा.

तो आम के खालोखाल उन्हाळेकी पहचान वाला फळ जो मेरेकु भी भोत आवडता . टरबुज .

फोटू डालरी .. येन्जॉय Wink

tarabuj.JPG

चेकूर मणीस फळ व फूल दोन्ही काय मस्त नाजूक!
आणि वटवाघळांवरची चर्चा जोरात. आमच्या इथल्या स्वीमिन्ग पूलशेजारच्या उंच झाडांवर त्यांचा मुक्काम असतो.
सायली .......अंजिरं कधी पिकणार?
टिना मे फ्लॉवर मस्त फुललंय! और तुमको क्या लगा...तुम अकेलीच हय क्या टरबूज आवडनेवाली?
हम बी ऐसाइच गोळे निकालके ज्यूसमे डाल्ते! ज्यूस मात्र यकदम चिल्ल्ड होना मंगता. येकेक गल्लासात येक दोन सोडनेकु मंगता!

काल चालायला गेले असताना क्लबच्या कंपाउंडच्या बाहेर दाट झाडीत चक्क मोरांची जोडी दिसली. खूप सुंदर होते दोघे.

आज माझ्या स्व. मावशी कडे गेली होती .. तिनं हयात असताना लावलेल्या झाडांनी छान बाळसे धरले आहेत ..
काही प्रचि शेअर करतेय Happy

हा अंगुर चा वेल :

angur.jpg

अंजीर :

anjir.jpg

चिकु :

chiku (1).jpgchiku (2).jpg

ख्रिसमस ट्री :

christmus tree.jpg

मे मधे फुललेलं डिसेंबर फ्लॉवर :

dec flo.jpg

हे विद्येच झाड :

vidya.jpg

टीना, सगळे मस्त फोटो.

सायली, तुळस काय डवरलीय ग ! मी चंडीगढ ला गेले होते तेव्हा तिथे एके ठिकाणी जवळ जवळ पुरूषभर उंचीची तुळस पहायला मिळाली.
हा फोटो

From mayboli

दिन का राजा चे झाड असते,झुडूप नाही.माझ्या भावाच्या घरी चांगले ५ ..६ फुटा पेक्षा मोठे आहे झाड.फुलले कि सारे घर घमघमून जाते.अन दुसर्या दिवशी खाली सुंदर सडा पाकळ्या चा.

मस्त फोटो सगळेच Happy
but I hate वटवाघुळ Sad

जिप्सी, आता वाटतेय निग पान क्रमांक १७ वरच्या तुमच्या फोटोतले फूल हे मी पाहिलेले तेच असावे. या फुलाचे नाव काय ?>>>>>चंद्रा, त्याचे नाव मॅग्नोलिया Happy

https://www.google.co.in/search?q=magnolia&biw=1360&bih=653&source=lnms&...

काही फळे स्थानिक पातळीवरच राहतात. जागतिक बाजारपेठेत कधीच येत नाहीत. इथे आफ्रिकेत अशी बरीच फळे मी खातो. ती फार गोड असतात असेही नाही, काही आंबट तर काही कडवटही असतात. तरीपण त्यांची अशी एक खास चव आणि स्वाद आहेच.

आजच्या चतुरंग पुरवणीत इस्रायली शेतीबद्दल एक छान लेख आहे.

त्याचे नाव मॅग्नोलिया>>>>>>>>>>>>>> येस्स्स्स्स. मी म्हटलंच होतं. कारण उसगावात माझ्या लेकीच्या घरासमोर होतं हे मॅग्नोलिया.

हो दिनेश...आजच वाचला तो लेख आणि वाटलं एकदा खरंच इस्राएल ला जाऊन यायला हवं.
मी मागंही एकदा उल्लेख केला होता की "इस्राएल दुधामधाचा देश" नावाचं एक अप्रतीम पुस्तक मी शाळेत असतानाच वडिलांनी आणून दिलं होतं. तेव्हापासूनच हा देश पहावासं मनात आहे. लेखक बहुतेक वि.स.वाळिंबे. पण नॉट शुअर.
टिना...तुझ्या मावशीची बाग मस्त!

फोटो सर्वच मस्त, मस्त, मस्त.

टीना मज्जा आहे बुवा.

ते वरती टरबूज टाकलंय. असं टरबूज मी पहिल्यांदाच बघतेय.

जिप्सी मीबी वटवाघूळ हेट क्लबमध्ये Lol

टिन khup mast baag aahe tuzhyaa maavshi chi ..
Maansa ashich algad phulpakharan sarkhi udun jaatat.. Aaply tal haatawar smrutin che rang sodun....

by d way te tarbuzache scoop khup bhaari distayet... Happy

Hema tai kevdhi unch aani baharleli tulas. Wa..

Da kharach kai phalanchi chav pan mahiti naste, ti sthanikach astat....

हा सायली , स्थानिक पातळीवरच्या फळांवरन आठवलं ,आमच्या भागात काळी काळी मैना उर्फ करवन्दानच्या जाळ्यांनी कास , जानाई मळाई चे डोंगर उतार बहरून गेले असतील य़ा दिवसात मी खास वाट बघत असते ती चिकू सारख्या दिसणारया आळूंची . शिवाय रानमेवा म्हट्ल तर ही यादी आणखीच लांबत जाईल .तोरणं , भोकरं, मेक्या किंवा साखरकाकड्या वगैरे वगैरे …….

पुन्हा मॅग्नोलिआ.
जिप्सीनी टाकलेला फोटो मॅग्नोलिआ ग्रँडिफ्लोरा वाटतोय. मानुषीचा कदाचित वर्जिनिआना. (अर्थात नक्की माहीत नाही. नुसता अंदाज) की सेमच आहे?

मानुषी प्रचि मस्तच Happy

दिनेशदा अगदि खरयं .. पण असा रानमेवा जरा जास्तच चवदार लागतो अस माझं आपलं एक ऑबझर्वेशन आहे Happy

मनीमोहोर तुळशीच झुडुप नै झाडे हे Wink

आभार सर्वांचेच पण फोटो काढले नै बस क्लिक केले आहे .. दाखवायला Happy

Pages