निसर्गाच्या गप्पा (भाग २५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 21 March, 2015 - 09:43


(निसर्गाची नैसर्गिक गुढी/तोरणे)

सर्व निसर्गप्रेमींना सप्रेम
नमस्कार,

गोनीदां, डॉ. शरदिनी डहाणूकर, दुर्गाबाई यांजसारखे जे निसर्गप्रेमी आहेत ते सतत आठवणीत असतातच पण त्यांचा विशेष आठव होतो ऋतूबदल होतो तेव्हा - काय सुरेखरित्या या नैसर्गिक गोष्टीला ते शब्दबद्ध करु शकतात !!

गोनीदांनी " माचीवरला बुधा" या कादंबरीत लिहिलेले हे वर्णन का पहाना ...
"फाल्गुन लागला. अन चाफ्याची सगळी पानं गळून पडली. त्यांच्या टोकाला बारीक बारीक कळ्या धुमारल्या. ती टोकं तांबूस चकचकीत दिसू लागली. होता होता कळ्या फुलल्या. सगळं टेमलाईचं पठार चाफ्याच्या वासानं घमघमायला लागलं.उंबराचीही पानावळ पार झडून
गेली होती. पण फाल्गुन लागताच त्या झाडाच्या अंगी चैतन्य रसरसलेलं दिसू लागलं. त्याच्याच अंगी का, सगळ्याच झाडांची तीच गत झाली. रानची सगळीच झाडं नव्हाळली, देखणी दिसायला लागली. त्यांच्या फांद्याच्या हातांना जणू कोवळी तांबूस नखं फुटली. त्या कोवळ्या झळाळीनं सगळं रान श्रीमंत झालं."
(साभार - माचीवरला बुधा - गोनीदा - मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस)

जरी आपण सगळे शहरी असलो तरी आपल्या आसपासच्या झाडापानात जो बदल होत असतो तो पाहून आपण
आंत कुठेतरी सुखावतो, श्रीमंत होत असतो. या निसर्गाची विविध रुपे पहाताना त्यातून जी निर्मळ प्रसन्नता, शांति व सौंदर्य यांची लयलूट केली जाते त्याची साठवण आपल्या मनात कशी करता येईल हे जरुर
पहावे.

सार्‍या झाडांसारखेच या नव्या वर्षाचे आपण उत्फुल्ल मनाने स्वागत करु या, कोवळ्या पालवीसारखी एक सुंदरशी सतेज गुढी आपल्याही मनात उभारुयात - चैतन्यमय होऊया, अमृतमय होऊया
....

असतो ऽमा सद्गमय |
तमसोऽमा ज्योतिर्गमय |
मृत्योर्मा अमृतं गमय |
ॐ शांति: शांति: शांति: ||

सर्वांना नववर्षाच्या
अनेकानेक हार्दिक शुभेच्छा ....

वरील प्रस्तावना मायबोलीकर शशांक पुरंदरे यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली. आज २५ वा धागा गुढी पाढव्याचा मुहुर्त साधून मराठी नविन वर्षाच्या प्रारंभदिनी सुरू करताना आनंद होत आहे.

मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टीना आजीबात नाही वानरांची बाजू घेणार.
तुझ्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.

त्या प्रदर्शनाला खुप गर्दी असते हेच मी ते लागल्यापासून ऐकतेय त्यामुळे जायचे धाडसच करत नाही.

जागू जाऊ नकोसच. तु ३ तास खर्च करुन येणारेस हे विसरु नकोस. मुलांना कदाचित बरे वाटेल पण आपण वैतागतो. मीही वैतागले..

अग नाही शक्य नाही. एकतर दोनच दिवस झाले मी ऑफिसला हजर होऊन त्यात आज राधाची तब्बेतही बरोबर नाही.

उन्हाळाही इतका वाढला आहे की कुठे जाऊ नये अस वाटत.

खूप दिवसांनी आले. वाचत होते सगळं पण पीसी चा प्रॉब्लेम असल्याने लिहीणं कठीण जात होतं .

जागु, अडेनियम मस्त .शेडेड पहिल्यांदाच पाहिलं

टीना, जिथे जिथे वानरे आहेत तिथे तिथे हा उच्छाद आहे. नॅशनल जीओग्रफिक च्या एका फिल्ममधे तर ती दारू प्यायला सोकावलीत असेही दाखवलेय.

त्यांचा अधिवास आपण बिघडवलेला नाही, त्यांचा नैसर्गिक शत्रु म्हणजे वाघ कमी झालाय.

शिवाय माणसांनी केलेल्या लाडानेच सोकावलीत ती.

साधना शनिवार रविवारी गर्दी असणे सहाजिक आहे. मला जायचे होते आज शेवटचा दिवस असल्याने पण बाहेरचे ऊन बघुन आळशीपणा केला व गेलेच नाही. फोटो काढले असतील तर टाक ना इथे जमल्यास. Happy

काल एकांकडे हे अतिशय सुवासिक आणि भले मोठे फुल पहायला मिळाले - हे रात्री फुलते असे त्यांनी सांगितले
Brugmansia किंवा Angel's Trumpet असे याचे नाव आणि Solanaceae कुळातले -

(All parts of Brugmansia are poisonous, with the seeds and leaves being especially dangerous.)

brugm.jpgAngel_Trumpet,_Angel's_Trumpet_'Frosty_Pink'_(Brugmansia_).jpg

मस्त शेडेड एडेनियम. माझ्याकडचेही एडेनियम (साधे लाल) फुलले आहे सध्या.
शशांक मस्त आहेत फोटो. अशी उलटी लटकलेली फुलं प्रथमच पहातेय.

अय्यो.. काल रात्री पाहिले ते हे आहे काय?????????????????????????????????????????????

काखेत कळसा आणि गावाला वळसा या म्हणीचे यापेक्षा जास्त सुयोजित उदाहरण सापडणार नाही असे वाटतेय आता. मी कित्ती कित्ती हुश्शार आहे रे देवा........... Sad Sad

माझ्या गावी ढिगानी पडलीत ही फुले. सध्या इतकी फुललीत सगळीकडे की झाडे फुलांच्या भारांनी वाकुन पडायचा धोका निर्माण झालाय. पांढरी आणि गुलाबी दोन्ही.

माझ्या डोक्यात कसला ब्लॉक आहे माहित नाही पण गावी ह्या फुलांच्या मी जवळही गेले नाही. कारण ही फुले पाहल्यावर माझ्या सब्कॉन्सस माईंडने मला या फुलांपासुन लांब राहाय्चा सल्ला दिला. का ते तेव्हा अजिबात माहित नव्हते. आता आठवतेय की यांना पाहुन बहुतेक मेंदुने धोत्र्याची फुलांशी यांची सांगड घातली आणि मग धोत्रा म्हटला की त्यापासुन जरा लांबच राहिले जाते. म्हणुन यांच्यापासुनही मी लांब राहिले. नाहीतर नक्कीच हातात घेऊन पाहिले असते. खुप मोठ्ठी फुले आहेत ही. खालचा फुललेला भाग आपल्या पंजाएवढा किंवा त्यापेक्षाही थोडा जास्त मोठा पाहिला गावी.

हे रात्रीच फुलते का ते माहित नाही पण एकदा फुलले की मग ते फुललेच. मावळायचे नाव घेतच नाही. फुले तशीच राहतात दोन तिन दिवस तरी. अर्थात हा माझा अंदाज कारण झुडपे इतकी प्रचंड बहरलेली होती त्यामुळे ती सगळी फुले एकाच दिवशी नक्कीच फुललेली नसणार असे वाटले.

सध्या कॉम्प उघडत नाही त्यामुळे इथे फोटो टाकले जात नाहीत. आता एक्दा बैठक मारुन बसतेच.

आता आठवतेय की यांना पाहुन बहुतेक मेंदुने धोत्र्याची फुलांशी यांची सांगड घातली आणि मग धोत्रा म्हटला की त्यापासुन जरा लांबच राहिले जाते. >>>>> बरोबर आहे तुझे साधना - ही फुले धोत्र्याच्या फुलासारखीच - त्याच कुळातील आणि तेवढीच विषारीही ....

Datura is a genus of nine species of poisonous vespertine flowering plants belonging to the family Solanaceae. They are known as angel's trumpets, sometimes sharing that name with the closely related genus Brugmansia, and commonly known as daturas. They are also sometimes called moonflowers, one of several plant species to be so. (विकिपीडीयावरुन साभार ...)

(All parts of Brugmansia are poisonous, with the seeds and leaves being especially dangerous.)

हे नंतर वाचले. वाचुन खुपच आनंद झाला. मी मुर्ख असले तरी माझा मेंदू शहाणा आहे याची खात्री पटली. उगीच नाही त्याने मला दुर ठेवले या झाडापासुन. नाहीतर फुल दिसले की मी वास घ्यायला धावते लगेच. Happy

नाहीतर फुल दिसले की मी वास घ्यायला धावते लगेच. >>>> एवढेही विषारी नसते की वास घेतला की लगेच विषबाधा झालीच त्या व्यक्तिला .... Happy Wink
आणि या सगळ्या वनस्पतींमधे औषधी गुणधर्मही असतातच - फरक एवढाच की योग्य मात्रा माहित पाहिजे तसेच औषध तोंडावाटे घ्यायचे की त्वचेला बाहेरुन लावायचे हे माहित पाहिजे ..
(साधे प्यायचे पाणी जरी अति घेतले तरी ते बाधकच की .... Happy Wink )

अमंत्रमक्षरं नास्ति वनस्पतिरनौषधम् ।
अयोग्यः पुरुषो नास्ति योजकस्तत्र दुर्लभः ॥
(There is no letter in the alphabet that never occurs in any verse. No herb exists that is not part of some medicine. Likewise, no person is completely useless. It is however difficult to find a manager who can use him appropriately.)

हो. तेही आहेच. पण विषारी असेल तर गावी बहुतेक कुंपणाला कसे काय? थेट विष बाधत नसणार. किंवा थोडेफार विषारी आहे म्हणुन कुंपणाला लावलेले असावे. म्हणजे गुराढोरांनी तोंड नको घालायला आत.

वा लागोपाठ सात आठ धागे आणि वेगवेगळी फुले आणि सुंगधित गप्पा वाचून फुलांच्या बागेतून आल्यासारखे वाटत आहे.

सध्या बहावा मस्त फुलला आहे. Happy नळ स्टॉप चोकातून म्हात्रे पुलाकडे जातान रस्ता दुभाजकावर बहावा लावला आहे. सगळी झाडे बहरली आहेत त्यामुळे तो रस्ता मस्तच दिसत आहे.

पण मला एक शंका आहे. बहावा हे काही छोटे झुडूप नाही. चांगले मोठे झाड असते. मग रस्ता दुभाजकावर ते लावणे किती योग्य आहे? पुढे ते पडण्याची भीती नाही का Uhoh

व्वा मस्त गप्पा...
Angels Trumplet ब द्द्ल भन्नाट माहिती....

आमच्या घ राच्या मागे ब हावा/ अमलताश असा काही नटला आहे की येता जाता लक्ष वे धुन घेतोय.....:)

Photo3673.jpgPhoto3673.jpgPhoto3668.jpgPhoto3675.jpg

vattakaka volubilis वट्टाकाका व्हाॅल्युबिलीस असं नाव आहे ह्या वेलीचं !!! कसलं अगडबंब नाव आहे ना!!! मराठीत हरणदोडी म्हणतात. ही खरंतर दूधवेलच! आपल्याकडे मराठीत इतक्या सुंदर फुलांना अशी का नावं ठेवलियेत देव जाणे!!!

वाह............आत्ता वाचून संपली ..किती माहिती.. किती फुलं... नवीन नावं कळली..

ओह टीना... सो सॅड!!!!

सर्व फुलं खूपच सुरेख आहेत..

एंजल्स ट्रंपेट... सो क्यूट..
ह्म्म्म!!.. लहानपणी धतूरा बघितलाय .. घरासमोरच्या मोकळ्या मैदानात कुणीही न लावता
भरघोस धतूरा फुलायचा.. तेंव्हा आसपास ची गरीब गुरीब जनता येऊन घेऊन जायची , नशा करण्याकरता..
कधी डोस जास्त झाला तर एखादा जीव ही गमवायचा

धोत्रा, किती सहज सगळीकडे माजतो ना ? केनयातही आहे. तिथेही तो शंकराला वाहतात. इथे अंगोलातल्या वाळूतही माजलेला दिसतो सगळीकडे.

मी कार पार्क करायला ऑफिसातल्या ज्या जंगलात जायचे त्या तिथे ही वेल होती. गेल्या वर्षी फोटो टाकलेले इथे. या वर्षी ते जंगल साफ करुन तिथे अजुन एक मोठा कार पार्क बांधताहेत, त्यामुळे वेल गडप.

आता ही वेल बहुतेक माझ्या टेकडीवर कुठेतरी आहे. फळे येऊन गेल्यावर जे त्रिकोणी रिकामे कोन उरतात ते हल्ली खुप दिसताहेत रस्त्यावर एका ठिकाणी पडलेले.

Pages