निसर्गाच्या गप्पा (भाग २५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 21 March, 2015 - 09:43


(निसर्गाची नैसर्गिक गुढी/तोरणे)

सर्व निसर्गप्रेमींना सप्रेम
नमस्कार,

गोनीदां, डॉ. शरदिनी डहाणूकर, दुर्गाबाई यांजसारखे जे निसर्गप्रेमी आहेत ते सतत आठवणीत असतातच पण त्यांचा विशेष आठव होतो ऋतूबदल होतो तेव्हा - काय सुरेखरित्या या नैसर्गिक गोष्टीला ते शब्दबद्ध करु शकतात !!

गोनीदांनी " माचीवरला बुधा" या कादंबरीत लिहिलेले हे वर्णन का पहाना ...
"फाल्गुन लागला. अन चाफ्याची सगळी पानं गळून पडली. त्यांच्या टोकाला बारीक बारीक कळ्या धुमारल्या. ती टोकं तांबूस चकचकीत दिसू लागली. होता होता कळ्या फुलल्या. सगळं टेमलाईचं पठार चाफ्याच्या वासानं घमघमायला लागलं.उंबराचीही पानावळ पार झडून
गेली होती. पण फाल्गुन लागताच त्या झाडाच्या अंगी चैतन्य रसरसलेलं दिसू लागलं. त्याच्याच अंगी का, सगळ्याच झाडांची तीच गत झाली. रानची सगळीच झाडं नव्हाळली, देखणी दिसायला लागली. त्यांच्या फांद्याच्या हातांना जणू कोवळी तांबूस नखं फुटली. त्या कोवळ्या झळाळीनं सगळं रान श्रीमंत झालं."
(साभार - माचीवरला बुधा - गोनीदा - मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस)

जरी आपण सगळे शहरी असलो तरी आपल्या आसपासच्या झाडापानात जो बदल होत असतो तो पाहून आपण
आंत कुठेतरी सुखावतो, श्रीमंत होत असतो. या निसर्गाची विविध रुपे पहाताना त्यातून जी निर्मळ प्रसन्नता, शांति व सौंदर्य यांची लयलूट केली जाते त्याची साठवण आपल्या मनात कशी करता येईल हे जरुर
पहावे.

सार्‍या झाडांसारखेच या नव्या वर्षाचे आपण उत्फुल्ल मनाने स्वागत करु या, कोवळ्या पालवीसारखी एक सुंदरशी सतेज गुढी आपल्याही मनात उभारुयात - चैतन्यमय होऊया, अमृतमय होऊया
....

असतो ऽमा सद्गमय |
तमसोऽमा ज्योतिर्गमय |
मृत्योर्मा अमृतं गमय |
ॐ शांति: शांति: शांति: ||

सर्वांना नववर्षाच्या
अनेकानेक हार्दिक शुभेच्छा ....

वरील प्रस्तावना मायबोलीकर शशांक पुरंदरे यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली. आज २५ वा धागा गुढी पाढव्याचा मुहुर्त साधून मराठी नविन वर्षाच्या प्रारंभदिनी सुरू करताना आनंद होत आहे.

मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बर्षू... चिल वरून च चिलगोजा.. शब्द आलाय का ? विचारून बघ.

जागू, हा वरच्या फोटोतला प्रेईंग मँटीस किती लांब होता ? इथे अगदी १०/१२ सेमी लांब दिसतात. बराच वेळ स्तब्ध बसलेले असतात.

राणीच्या बागेत कॉफिचे झाड नाही.. !

कॉफीवरून चिकोरी आठवले. चिकोरीची निळी फुले मस्त दिसतात. आणि त्याहून सुंदर असतात ती अळशीची फुले. आकाशी रंगाची फुले असतात. हे झाड शोभेचे म्हणूनही लावता येईल.

म स्त गप्पा.. प्र ची...
ब्राम्ही मका वेग वे गळे...
माझ्या कडे आ हे ब्राम्ही.. उद्या फोटो टाकते..
हे घरटे आज स काळी नेहमी च्या वाटे व र दि स ले... छान गोल चुट्टुक, मऊ मऊ...:) भोवती दोन बुलबुल ये जा क र त होते....
Photo3730.jpg
घ रा च्या मागे अंजीरा चे झाड आहे...:)
Photo3731.jpg

हे घरटे आज स काळी नेहमी च्या वाटे व र दि स ले... छान गोल चुट्टुक, मऊ मऊ... भोवती दोन बुलबुल ये जा क र त होते.... >>>>> बुलबुलाचे घरटे असे मऊ मऊ ???? फक्त काड्याकाड्यांनी बनवलेले वाटीसारखे असते ना बुलबुलाचे घरटे ???

कासवाच्या पाठीचा तलवारीला धार काढण्यासाठी उपयोग करत असत ते आपण वाचलेच आहे.

त्याबद्दल आणखी एक एक माहिती.. गालापागोस ही पॅसिफिक समुद्रातली बेटे आहेत. कुठल्याही जमीनीपासून ती खुपच लांब आहेत. पहिल्यांदा तिथे भटके पोहोचले तेव्हा त्यांनी भरपूर कासवं पकडून नेली.. कारण दिर्घकाळ, अन्न पाण्यावाचून जगणारी ती कासवं त्यांच्या त्या दीर्घ प्रवासात, भूक भागवायच्या कामी आली.

चितमपल्लींनी असे लिहिले आहे, कि जंगलातल्या गायी अगदी आवडीने कासवे खातात. ती खायची पद्धतही त्यांनी लिहिली आहे.

धन्स सायली...
छान माहिती दिनेशदा.
इतका निकोप आणि स्पर्धाविरहित धागा सलग २५ भाग परस्पर सहकार्याने चालविल्याबद्दल सर्व निगकरांचे अभिनंदन.

तशी ती दिवसा झोपलेली असतात पण काही कारणांनी जर त्यांची झोपमोड झाली तर प्रचंड कलकलाट करतात.

मला नवल वाटते, एवढ्या वटवाघळांना खाद्य पुरवतील एवढी फळझाडे, फुलझाडे मुंबईत कुठे आहेत ? काही वटवाघळे गुरांचे रक्तही पितात, त्यापैकी आहेत का ही ?

दिनेशदा त्यांचा कलकलाट चालू होता शिवाय तिथून जाताना दुर्गंधीही खुप येत होती त्यामुळे तिथून कधी एकदा जातोय असे झाले होते.

खरच कुठून एवढ्यांना खाद्य मिळत असेल? गुरे तरी कुठे आहेत जास्त मुंबईत?

काही वटवाघळे गुरांचे रक्तही पितात, त्यापैकी आहेत का ही ? >>>>>
real vampire bats are found only in Central and South America. - त्यामुळे मुंबईकरांना (माणसे आणि गुरे दोघांनाही ) काळजी नसावी ..... Happy Wink

खुप वर्षांपुर्वी नंदन कलबाग यांनी चेकूर मणीस या झाडाबद्दल लिहिले होते. हे एक मल्टी व्हीटॅमीन प्लांट आहे. त्या लेखात बरेच वाचले होते पण तिथे फोटो नव्हता... आणि आज शोधता शोधता सापडले कि हे झाड मी बघितलेय. ( बालि वरच्या लेखातले फोटो इथे परत टाकतोय )

२३)

तिथेच एक वेगळे झाड दिसले... आधी वाटले झाडाला चिमुकल्या छत्र्याच लागल्या आहेत.

२४) मग त्याच झाडाला एक फळही दिसले.. ( तोंडात टाकायचा मोह आवरला Happy ) हे मी त्या लेखात लिहिलेले वाक्य. आता वाटतंय फळ चाखायला हवे होते... ( जरा बाळसे धरले असते मी Happy )

Sauropus androgynus, हे शास्त्रीय नाव. केरळमधे मधुरा जीरा असे नाव आहे.

http://en.wikipedia.org/wiki/Sauropus_androgynus इथे आणखी माहिती आहे, अवश्य वाचा.

अभिरुप... छान वाटलं.. तूम्हीही येत जा इथे.

अन्जू.. एखाद्या मुंबईकराने घराच्या मागे नाला आहे असे जितक्या सहजपणे सांगावे तितक्या सहजपणे, सायली घरामागे अंजीर आहे, मैत्रिणीकडे मोसंबी आहे.. असे सांगतात.

बापरे मला त्या वटवाघळान्ची भीती वाटते.

कोकणात माहेरी, शेजारच्या चुलतकाकांच्या माडीवर भरपूर वटवाघळे होती. लहानपणापासून भीतीच वाटते.

अंजू, आपल्या इथल्या वाड्यातल्या विमलेश्वराच्या देवळात किती वट वाघ़ळ आहेत ? देवळाच्या सभामंडपात आणि गाभार्‍यात फिरत असतात नुसती आणि घाण तरी किती करतात ना? तू गेली आहेस की नाही कधी तिकडे?
तसेच सातार्‍याजवळ बामणोली म्हणून एक खेडेगाव आहे तिथे तर जवळ्पास एक लाख तरी वट्वाघळ असावीत. मी पहिल्यांदा पाहिली तेव्हा मला तर उडून प्लॅस्टिकच्या पिशव्या लटकतायत असचं वाटलं पण जवळ गेले तर त्यांचा कलकलाट आला ऐकु आणि त्या झाडांखाली उभ रहायची सोय नव्हती सारखा वरुन प्रसाद मिळत होता.
हा फोटो

From mayboli

व्वा म स्त धावतोय धागा...:)
दा राय आवळे आहेत का ते ?
शशांक जी खरच आत्ता तुम्ही सांगीतल्या व र ल क्षात आले... उद्या जाऊन ब घ ते... कोणाचे घ र टे आहे ते....
अ न्जु ता ई Happy
जागु प र त पाठवते पि.लीली च्या बीया...
हे मा ताई, बापरे कीती ही वाघळ!

हो हेमाताई, करेक्ट विमलेश्वर देवळात पण आहेत. त्यांचा एक प्रकारचा घाण वासही येतो.

हो गेलेय ना बरेच वेळा पण जास्त ती काकांच्या घरातलीच डोळ्यासमोर येतात.

जिप्सी, आता वाटतेय निग पान क्रमांक १७ वरच्या तुमच्या फोटोतले फूल हे मी पाहिलेले तेच असावे. या फुलाचे नाव काय ?

बाप्रे.. केव्हढी ववा... मी क्वचित एखाद दोन पाहिली असतील जबलपूर मधील जुनी लेणी पाहायला गेले होते तेंव्हा.. त्यांच्या वास्तव्यामुळे लेण्यांना , रामसे पिक्चर्स च्या सेट सारखे गूढ ,भीतीदायक रूप आले होते..

एका रेस्ट हाऊस च्या आचार्‍या ने मला हे मशरूम आणून दिलं.. त्याने सांगितले की ही जात खूप रेअर आहे आणी जंगलातच कुठे कुठे उगवते.. सहजासहजी सापडत नाही त्यामुळे दुर्मिळ आहे. १० ते १२ हजार रु. / किलो ने विकले जाणारे हे मशरूम सर्व निर्यात केले जातात. बाहेर च्या देशांत त्या पासून औषधे तयार करण्यात येतात.. ते ,'बाहेर चे देश' कोणते याबद्दल मात्र त्याला काही माहिती नव्हती,..

दिनेश, ते झुडुप व्हीट्यामीनचं झाड असेच ओळखतात. चक्रमुनी नावाने पण ओळखले जाते. माझ्याकडे उडुपीवरुन आणलेले आहे. लावलेले झाड अजून लहान आहे, फळं आली तर फोटो टाकेन

दिनेशदा, चेकूर मणीसचे फोटो छान.
पण विकिपीडियावर vitamins च्या दृष्टीने विशेषतः जून पाने उपयुक्त सांगितली आहेत, त्यामुळे जीवनसत्वांची सतत उपलब्धता हा मोठाच फायदा!

अशीच भरपूर वटवाघळे आमच्या येथील सलीमअली सरोवराच्या उद्यानातही आहेत.

आमच्या टेरेसमध्ये एकदा चुकून आलेले हे पिल्लू वटवाघळ!

Pages