(निसर्गाची नैसर्गिक गुढी/तोरणे)
सर्व निसर्गप्रेमींना सप्रेम
नमस्कार,
गोनीदां, डॉ. शरदिनी डहाणूकर, दुर्गाबाई यांजसारखे जे निसर्गप्रेमी आहेत ते सतत आठवणीत असतातच पण त्यांचा विशेष आठव होतो ऋतूबदल होतो तेव्हा - काय सुरेखरित्या या नैसर्गिक गोष्टीला ते शब्दबद्ध करु शकतात !!
गोनीदांनी " माचीवरला बुधा" या कादंबरीत लिहिलेले हे वर्णन का पहाना ...
"फाल्गुन लागला. अन चाफ्याची सगळी पानं गळून पडली. त्यांच्या टोकाला बारीक बारीक कळ्या धुमारल्या. ती टोकं तांबूस चकचकीत दिसू लागली. होता होता कळ्या फुलल्या. सगळं टेमलाईचं पठार चाफ्याच्या वासानं घमघमायला लागलं.उंबराचीही पानावळ पार झडून
गेली होती. पण फाल्गुन लागताच त्या झाडाच्या अंगी चैतन्य रसरसलेलं दिसू लागलं. त्याच्याच अंगी का, सगळ्याच झाडांची तीच गत झाली. रानची सगळीच झाडं नव्हाळली, देखणी दिसायला लागली. त्यांच्या फांद्याच्या हातांना जणू कोवळी तांबूस नखं फुटली. त्या कोवळ्या झळाळीनं सगळं रान श्रीमंत झालं." (साभार - माचीवरला बुधा - गोनीदा - मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस)
जरी आपण सगळे शहरी असलो तरी आपल्या आसपासच्या झाडापानात जो बदल होत असतो तो पाहून आपण
आंत कुठेतरी सुखावतो, श्रीमंत होत असतो. या निसर्गाची विविध रुपे पहाताना त्यातून जी निर्मळ प्रसन्नता, शांति व सौंदर्य यांची लयलूट केली जाते त्याची साठवण आपल्या मनात कशी करता येईल हे जरुर
पहावे.
सार्या झाडांसारखेच या नव्या वर्षाचे आपण उत्फुल्ल मनाने स्वागत करु या, कोवळ्या पालवीसारखी एक सुंदरशी सतेज गुढी आपल्याही मनात उभारुयात - चैतन्यमय होऊया, अमृतमय होऊया
....
असतो ऽमा सद्गमय |
तमसोऽमा ज्योतिर्गमय |
मृत्योर्मा अमृतं गमय |
ॐ शांति: शांति: शांति: ||
सर्वांना नववर्षाच्या
अनेकानेक हार्दिक शुभेच्छा ....
वरील प्रस्तावना मायबोलीकर शशांक पुरंदरे यांच्याकडून.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली. आज २५ वा धागा गुढी पाढव्याचा मुहुर्त साधून मराठी नविन वर्षाच्या प्रारंभदिनी सुरू करताना आनंद होत आहे.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
व्वा काय मस्त वाटतय आज...
व्वा काय मस्त वाटतय आज... जागु त झे फोटो खुप मी स क र त होते...... क्लास टिपलेस...
वि चिंचेला इ क्डे चीज बिलाई आणि गुजराथीत जंगली जलेबी म्ह् ण ता त.....
सोन चाफ्याला कळ्या आल्यात
सोन चाफ्याला कळ्या आल्यात परतः)

म सुर धुतांना त्यचे पाणी एका
म सुर धुतांना त्यचे पाणी एका कुंडीत घातले होते. . ही त्यातुन ही अशी मसुर उ ग व ली...


राय आवळे, माझ्या काकुनी
राय आवळे, माझ्या काकुनी पाठवले...

अ प्र तिम आहेत चविला...
दह्याची फुलं, खोब र्याची
दह्याची फुलं, खोब र्याची फुलं, गुल मेहंदी काय म स्त म स्त नाव क ळ्लीत...
>>> आम्ही त्यांना आइसक्रीमची फुलं म्हणतो.
वाह.. सुंदर सुंदर फुलं..आणी
वाह.. सुंदर सुंदर फुलं..आणी गोड गोड नावं...मस्त एकदम!!
वा मसुर मस्त एकदम..
वा मसुर मस्त एकदम..
सुप्र निगकर्स हे फूल कोणते?
सुप्र निगकर्स

हे फूल कोणते? काल मनोहर मंगल कार्यालयाच्या (पुणे) आवारात मस्त फुललेलं हे झाड.
आणि हा लांबून घेतलेला फोटो.
आणि हो..............आम्ही शिरीष फुलांना आईसक्रीमची फुलं म्हणतो.
किती सुरेख आहे हे पुष्पभंडार.
किती सुरेख आहे हे पुष्पभंडार. अप्रतिम रचना आणि रंग.
पण मामी या फुलाचं नाव काय?
पण मामी या फुलाचं नाव काय?
मानुषी ताई हा गुलाबी
मानुषी ताई
हा गुलाबी कॅशिया
फोटो बघूनच डोळे निवले.
राणीच्या बागेतला कॅशिआ फुललेला नव्हता.
पुण्यातला फुललाय आत्ताच.
उजू थॅन्क्स! मराठीत काही नाव
उजू थॅन्क्स!
मराठीत काही नाव आहे का याला?
किति सुंदर फोटो.. मराठीत
किति सुंदर फोटो..
मराठीत नाव नसावे बहुतेक. गुलाबी बहावा म्हणता येईल.
cassia fistula - बहावा, अमलताश, golden shower tree, indian laburnum
cassia javanica - pink shower tree, apple blossom tree, rainbow shower tree.
हे राम... एक्दा क्लिक केले
हे राम... एक्दा क्लिक केले तरि दोनदा प्रतिसाद.
मनोहर मंगल कार्यालय कुठे आहे पुण्यात? नारायण पेठेत आहे का? शनवारी पाहता येईल मग.
Survey No. 31/1, Mehendale
Survey No. 31/1, Mehendale Garage Compound, Karve Road, Erandwane, Pune - 411004
Land Mark: Near Mehendale Garage
साधना पत्ता घे म.मं. का. चा.
मानुषी, धन्स गं... एरंडवने ला
मानुषी, धन्स गं...
एरंडवने ला एरंड आहेत काय??
अगं पूर्वी खरंच एरंडाचं वन
अगं पूर्वी खरंच एरंडाचं वन होतं तिथं असं म्हणतात.
असणारच.. त्याशिवाय काय असले
असणारच.. त्याशिवाय काय असले अरसिक नाव.....
सायली:स्मितः: मानुषीताई मस्त
सायली:स्मितः:
मानुषीताई मस्त फोटो.
कॅशिया.. मुंबईच्या हवेतही छान
कॅशिया.. मुंबईच्या हवेतही छान फुलतो हा ! पार्ले स्टेशनजवळ रेल्वेलाईनजवळच मोठे झाड आहे.
जावा कॅशिया बघायला यावसं
जावा कॅशिया बघायला यावसं वाटते!!
मस्त फोटो!
चर्चगेटला योगक्षेम, मंत्रालय कडून मरीन ड्राईव्हला जाणार्या रस्त्यावर बर्मीज पिंक कॅशिया आहे. (http://www.flowersofindia.net/catalog/slides/Burmese Pink Cassia.html")
गोरेगावला पश्चिम द्रुतगती मार्गाच्या बाजूने ओबेरॉय माल कडे जाणार्या सर्विस रोडवर बरेच तामण लावले आहेत आणि सध्या सगळ्यांना फुले आलीत.
कडू मेहेंदी ह्याचे नाव
कडू मेहेंदी

ह्याचे नाव विसरले.

ह्याचे नाव विसरले--- golden
ह्याचे नाव विसरले--- golden duranta ??
हो हा गोल्डन ड्युरांटा..
हो हा गोल्डन ड्युरांटा.. फुले काय गोड असतात याची.
मा नु षी ताई, पैकी च्या पैकी
मा नु षी ताई, पैकी च्या पैकी मार्क्स तुला , कसले फोटो टाकलेस व्वा.... पु ण्यात गेल्या व र्षी मी दे खील पाहिला हो ता गुलाबी ब हावा ....
नागपूरला मला नाही दिसला गुलाबी बहावा .. पिव ळा बraaच दिसतो... पुण्याहुन शेंगा आणुन नागपूर ला वे ग वे ग ळ्या ठीकाणी लावल्या त र?
साधना साधारण ह रब र्या शी मिळती जुळ ती च पान आहेत मसु री ची..
कडु मेन्दी मस्तच... ह्यालाच बागड म्हणतात का?
गोल्डन ड्युरांटा मस्त् च..
ब कु ळ... सोसाईटीच्य अगदी बाहेरच बहरलीये....

चार फुलं मिळालीत पुजेला:)
आ ईस्क्रीम ची फुलं म स्त च
आ ईस्क्रीम ची फुलं म स्त च नाव आहे....
गुलाबी बहावा मस्तच. दुर्मिळ
गुलाबी बहावा मस्तच.

दुर्मिळ आणि घरगुती पक्ष्यांच्या प्रदर्शन ५ मे पर्यंत आहे.
जा बा जागुतै .. आंबे बघुन
जा बा जागुतै .. आंबे बघुन असला हेवा वाटतोय तुझा

माझ्याकडले आंबे अवकाळी पाऊस, वादळाने अगदी मोठे असलेले सुद्धा पडले .. ते काय कमी होत कि दोन दिवसाआड माकडांची टोळी येते जाते आणि जे २ ४ शिल्लक आहेत त्याचा पन फन्ना उडवून जाते..
आत्ताच एक मोठा जवळपास १७ * १२ सेमी चा आंबा तोडून गेले.. असला लचका तोडून फेकुन गेले त्या आंब्याला .
या वर्षीचा एक तरी आंबा नशीबात आहे कि नै का !
इथ प्लीज कुणी त्या मर्कटांची बाजु घेऊ नये.. मानवांनी त्यांचा नैसर्गिक अधिवास उध्वस्त केला वगेरे सांगु नये..
मी जाम दु:खात आहे सो शेअर करतेय
टिना मी समजू शकते! अॅम विथ
टिना मी समजू शकते! अॅम विथ यू! टेक केअर!
टीना सॅड. मी सावंतवाडीला
टीना सॅड. मी सावंतवाडीला होते राहायला तेव्हा तिथे मोठे वानर येऊन असेच बाग उद्वस्थ करुन जायचे. तिथे ही माकडे वांडर म्हणुन प्रसिद्ध होती. एक वांडरमारी म्हणुन जमात होती, त्यांना या दिवसात खुप भाव असायचा. ते लोक बंदूकींनी त्या वानरांना मारायचे. हे वानर म्हणजे अगदी सहा फुटी माणसेच जणु. आणि इतके हुशार.. आपल्याला झाडावरचा नारळ खाली पाडून् मग तो खुप कसरत करुन त्याचे वरचे साल काढावे लागते, तरच तो आपल्या वापरण्यासारखा होतो. हे वानर त्या नारळाला झाडावरतीच कुठेतरी भोक पाडायचे आणि त्यातुन पाणी आणि खोबरे दोन्ही गुल करायचे.... माझी आई झाडांवर सिताफळांना कापडी फडक्यांत लपवुन ठेवायची. ती फडकी तशीच ठेऊन आतली सिताफळे गडप...
आता हसायला येते हे लिहिताना, पण ज्यांची फळे अशी हातातोंडाशी येऊन जातात ( literally
) त्यांनाच माहित आहे त्याचे दु:ख.
केशर, आम्ही गेलेलो रविवारी. एकतर गाडी घेऊन जायचा शानपणा केला, त्यामुळे पार्किंगची बोंब. नशिबाने पार्किंग मिळाले. आत जेमतेम ३०-३५ पक्षी होते, सगळे पॅरकिट, पॅरट आणि कोकाटू जातीचे. यातले काही खुप मोठे होते. लाईन खुप होती. नशिबाने आत मोठे फॅन्स लावलेले. त्यामुळे जरा बरे होते. पिंजरे अगदी १ इंच बाय १ इंच जाळीचे, त्यामुळे पक्षी नीट दिसत नाहीत. आत फक्त मोबाईलने फोटो काढायची सोय आहे. वरच्या फोटोत लिखाण्बाशेजारीच ते ग्रे रंगाचे पक्षी आहेत ना ते बहुतेक फिंच आहेत, मी नाव विसरले. ते आपल्या चिमणीएवढे आहेत आणि इतके क्युट दिसतात की हे घरी हवेतच हा हट्ट धरला गेला (नशिबाने तिथे पक्षी विकत मिळत नव्हते, नाहीतर.......... )
१५-२० फिशटँक्स पण ठेवलेल्या. बच्चे कंपनीला थोडे बरे वाटेल असा सिन आहे एकंदर. मी मात्र वैतागले. अर्ध्या तासात बघुन आटोपले आणि त्यासाठी एवढे लांबुन गेलो तिथे.
Pages