दिल्लीमध्ये आज आपच्या सरकारची दुसरी इनिंग चालू झाली आहे. योगायोगाने मायबोलीवरच्या धाग्याचाही दुसरा भाग आज चालू होतो आहे. गेले वर्षभर अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही अरविंद केजरीवाल आणि आपने दिल्ली विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवून ज्या दिमाखात पुनरागमन केलं आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे.
सर्वात महत्वाची आणि पक्षनिरपेक्ष अशी गोष्ट म्हणजे देशातील सर्वांत स्वच्छ, सर्वात तरूण आणि सर्वात जास्त शिक्षित विधानसभा आपच्या निमित्ताने दिल्लीकरांना आणि पर्यायाने देशाला मिळाली आहे. राजकारणामध्ये चालू असणार्या ह्या सकारात्मक बदलाकडे लक्ष ठेवून आपली मते इथे मांडूया.
* टीप - इथे विरोधी मतांचंही स्वागत आहे. वैयक्तिक शेरेबाजी टाळण्याची आणि सभ्य भाषा वापरण्याची सर्वांना विनंती.
** पहिला भाग इथे वाचता येईल.
पान १७ - योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण ह्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून काढल्याबद्दलची चर्चा
पान २४ - योगेंद्र यादव बोलले ते खरं की खोटं?
पान ३१ - आपमधील नेत्यांच्या ट्वीटर हॅण्डल्सची यादी
पान ५५ - दिल्लीतील नगरपालिका आणि कचर्याचं राजकारण
.
मागच्या ४८ तासात राजस्थानात ३
मागच्या ४८ तासात राजस्थानात ३ शेतकर्यांनी आत्महत्या केल्या. हाय हाय केजरीवाल. शेतकर्यांचे तारणहार, मोदींचे सरकार!! नरेंद्र मोदी आगे बढो, किसान पिछवाडे.......
असेच संसद मधे पण कोणी नौटंकी
असेच संसद मधे पण कोणी नौटंकी केली होती ना.

मागच्या ४८ तासात राजस्थानात ३
मागच्या ४८ तासात राजस्थानात ३ शेतकर्यांनी आत्महत्या केल्या. हाय हाय केजरीवाल. शेतकर्यांचे तारणहार, मोदींचे सरकार!! नरेंद्र मोदी आगे बढो, किसान पिछवाडे.......>>>>
असे नाही नाठाळ, केजरीवाल दिल्लीत का बसुन होते, ३ शेतकर्यांना वाचवायला राजस्थानात का नाही गेले असे विचारायचे असते.
टोचा, यावर कुणी धागा काढेल
टोचा, यावर कुणी धागा काढेल असं वाटलं होतं. पण नाही काढला. म्हणुन ईथेच लिहिलं.
अरे महारानीच्या शासनात असे
अरे महारानीच्या शासनात असे काही घडत नाही
राणीसाहीबा बद्दल खोटे बोलु नये
त्यांच्या राज्यात असे काही घडत नाही त्यांचे शेतकरी इतर राज्यांमधे जाउन आत्महत्या करतात त्यामुळे ते जिथे जातात त्यांची जवाबदारी बनते. ज्या राज्यांमधुन ते शेतकरी आहेत त्या राज्याची जवाबदारी अजिबात बनत नाही
त्यामुळे या प्रकरणार राजस्थान सरकारची जवाबदारी नाहीच. फक्त केजरीवालचीच जवाबदारी
बच्चेलोग भक्तजनो बजाओ टाली
काँग्रेस के राज मे २, ९४, ०००
काँग्रेस के राज मे २, ९४, ००० किसान मरते है पर इनको ना शर्म ना हया !!
टोच्या, देशात आतापर्यंत ३
टोच्या,
देशात आतापर्यंत ३ लाख शेतकर्यांनी आत्महत्या केल्यात गेल्या ३ दशकात, तेंव्हा काँग्रेसचे सर्कार होते,
तेंव्हा काँग्रेसने काय असे उपाय केले की आत्महत्या एकदम बंदच झाल्या.
@ अजिंक्य सातारकर : मला
@ अजिंक्य सातारकर : मला काँग्रेस, रा. कॉ बद्दल अजिबात प्रेम नाही. त्यामुळे तुम्ही मला काँग्रेस बद्दल काही बोलूच नका.
इथे उगाचच्या उगाच आप आणि केजरीवालांवर आरोप चालू झाले म्हणुन मी प्रतिक्रीया लिहीली. तुम्ही कॉग्रेस ला काय वाट्टेल त्या शिव्या द्या, माझी काही हरकत नाही.
पण अजुन तरी केजरीवाल नी असे काही वेडेवाकडे केले नाहीये की त्याला दोष द्यावा.
आणि तुम्ही भाजपायी असाल तर मोदी सरकारनी गेल्या ११ महीन्यात काहीच दिवे लावले नाहीत ह्या बद्दल थोडे तरी वाईट वाटायला पाहीजे. त्याहुन जास्त वाईट तुम्हाला देवेंद्र फडणवीसांनी काही काम केले नाही ह्याबद्दल वाटायला पाहीजे.
तुम्ही जर भाजपायी असाल तर तुम्हा संघाचे "राष्ट्र पहीले आणि मग पक्ष" हे तत्व माहीती असायला पाहीजे. जर माहीती असेल तर जे चूक आहे त्याला चूक पण म्हणायला पाहीजे.
काँग्रेस के राज मे २, ९४, ०००
काँग्रेस के राज मे २, ९४, ००० किसान मरते है पर इनको ना शर्म ना हया !!>>>>>>> ह्याचा अर्थ भाजपला किंवा कोणत्याही पक्षाला २९४००१ आत्महत्या होत नाहीत तो पर्यंत शरम वाटायची गरज नाही असा होतो का?
टोचा, यांना भाजपाबद्दल
टोचा, यांना भाजपाबद्दल काडीचेही देणे घेणे नाही, हे सर्व मोदी भक्त आहेत.
झाडावर सुरपारंब्या खेळु आणि
झाडावर सुरपारंब्या खेळु आणि पुढच्या निवडणुकीचे तिकीट मिळवू अशी आयडीया होती, पण झाले वेगळेच. >>> टोच्या , म्हणजे अशी आयडिया येण्यासाठी अशा आयडिया 'योग्य' व्यक्तीशी डिस्कस झालेल्या असाव्यात ? बरोबर ना ? म्हणजे हे सगळं प्लान्ड होतं का ? त्या चिठ्ठीतलं अक्षरही गजेंद्रसिंहच नाहीये म्हणे. तसं असेल तर , आंदोलनात ' जान' आणण्यासाठी , असं एखाद्याच्या ' जान' शी खेळणं बरोबर आहे का ?
राजकारण घाणेरडं असतं हे काही अगदीच चुकीच नाही तर.
<<तसं असेल तर , आंदोलनात '
<<तसं असेल तर , आंदोलनात ' जान' आणण्यासाठी , असं एखाद्याच्या ' जान' शी खेळणं बरोबर आहे का ?
राजकारण घाणेरडं असतं हे काही अगदीच चुकीच नाही तर.>>
किंवा मग सशक्त होऊ घातलेल्या आंदोलनातील 'जान' काढून घेण्यासाठी एखाद्याच्या 'जान'शी खेळ केला गेला असेल का? की राजकारणात घाणेरडे प्रकार ह्याआधी कधी ऐकलेच नाहीयेत?
दिल्लीत आत्ता भूकंपाचे धक्के बसलेत. हा भूकंप म्हणजे परवाच्या दुर्घटनेवरून लक्ष हटवण्यासाठी केजरीवालचा डाव असू शकतो ! राजकारण यु नो.
++++++++++दिल्लीत आत्ता
++++++++++दिल्लीत आत्ता भूकंपाचे धक्के बसलेत. हा भूकंप म्हणजे परवाच्या दुर्घटनेवरून लक्ष हटवण्यासाठी केजरीवालचा डाव असू शकतो ! +++++++++++
श्शी,........ राजकारणासाठी ईतक्या खालच्या पातळीवर जाणे ? हे बरोबर नाही,
केजरीवाल पॉवरफुल आहेत हे माहीती आहे पण ईतके, ..................... हे माहीती नव्हते !!
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
(No subject)
दिल्लीत आत्ता भूकंपाचे धक्के
दिल्लीत आत्ता भूकंपाचे धक्के बसलेत. हा भूकंप म्हणजे परवाच्या दुर्घटनेवरून लक्ष हटवण्यासाठी केजरीवालचा डाव असू शकतो ! राजकारण यु नो.>>>.
३/६७ मुळे असे वाटणे साहजिक आहे.
"क्या केजरीवाल के पाप का घड़ा
"क्या केजरीवाल के पाप का घड़ा भर गया ?
क्या भगवान भी खफा है केजरीवाल से ?
क्यों आया भूकंप ? .........जानने के लिए देखिये झी न्यूज ताल ठोक के"
किंवा मग
"Breaking: भूकंप को नहीं रोक पायी केजरीवाल सरकार .....विपक्ष ने की नैतिकता के आधार पे केजरीवाल के इस्तिफे की माँग"
शक्य आहे. आपल्या मिडियाकडून आणि नेत्यांकडून हे घडणं अशक्य नाही.
आज वाराणसीमध्ये भाजपाचे लोक केजरीवालविरुद्ध निदर्शने करत होते (का? :अओ:) अचानक भूकंप झाल्याने चेंगराचेंगरी होऊन २ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी वाचण्यात आली. दुर्दैवी गोष्ट.
असो. भूकंपाची घटना वाईट घडली आहे. नेपाळमध्ये तर हाहाकार चालू आहे. लोकांना ह्या संकटाला तोंड देण्याचं बळ मिळो.
मिर्ची, मोदी खोट बोलतात
मिर्ची,
मोदी खोट बोलतात त्याचा पुरावा द्या, पण भाषणात बोलताना झालेल्या चुका ( इतिहास / भुगोलाच्या) हे
सांगु नका !!
आता बिन बुडाच्या पोष्टी दाखवा म्हणुन पाठ फिरवु नका !!
तुम्ही म्हंटल्याप्रमाणे तुम्हाला चॅलेंज केलय !
वेटींग,................. , मोदी सर्वांसमोर खोट बोलतात याची दहा उदाहरण !!
http://www.bbc.co.uk/hindi/in
http://www.bbc.co.uk/hindi/india/2015/04/150425_narendra_modi_delhi_metr...
राहुल, केजरीवाल से कैसे अलग मेट्रो में मोदी
http://navbharattimes.indiati
http://navbharattimes.indiatimes.com/business/business-news/modi-governm...
http://www.scoopnest.com/user
http://www.scoopnest.com/user/INCIndia/590354308610142209
https://www.facebook.com/AAPRajkot/posts/815221458574532
सुरेख <<तुम्ही
सुरेख
<<तुम्ही म्हंटल्याप्रमाणे तुम्हाला चॅलेंज केलय !
वेटींग,................. , मोदी सर्वांसमोर खोट बोलतात याची दहा उदाहरण !!>>
धागा भरकटवू नका. 'मोदींच्या खोट्या बोलण्याचे पुरावे' अशा अर्थाचा नवीन धागा उघडून द्या. तिथे लिहिते.
एक उदाहरण इवानने दिलंच आहे.
१००००००००० देउ हो. जितके
१००००००००० देउ हो. जितके चिंचेच्या झाडावर पाने तितके देउ.
जमत नसेल तर राहुच द्या !!
जमत नसेल तर राहुच द्या !!
उगा फुकाच्या बातम्या देऊ नका !
तुम्हाला अड्ड्यावर जाऊन मोदीवर टीका करत बसता येत ना ?
Farmer suicide: Confronted by
Farmer suicide: Confronted by Gajendra's daughter, AAP's Ashutosh breaks down on TV
खोटी नोट कोणी लिहीली ? ह्या गजेंद्र सिंगचा प्रश्नावर अशुतोष कडे उत्तर नव्हत मग काय रडण्याच नाटक केल राव !!
आशुतोषचं लाइव्ह टीव्हीवर रडणं
आशुतोषचं लाइव्ह टीव्हीवर रडणं नाटक नाही वाटलं. पण तरीही मला ते आवडलं नाही. जर भावनांचा उद्रेक ताब्यात ठेवता येत नसेल तर स्पोक्सपर्सनच्या जबाबदारीला आशुतोष योग्य नाहीत.
आपचे नेते तुमच्या-आमच्यासारखे सुशिक्षित लोक आहेत. निर्ढावलेले, थंड रक्ताचे गुन्हेगार नाहीत. कोणाचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. स्वच्छ चारित्र्याच्या व्यक्तीवर अचानक कोणीतरी खुनाच्या कटाचा आरोप केल्यावर जे होईल तेच त्या लोकांचं झालंय. जमलं तर सगळे राजकीय चष्मे काढून स्वतःला त्या जागी ठेवून बघा.
<<टीव्हीवर रडणं नाटक नाही
<<टीव्हीवर रडणं नाटक नाही वाटलं. पण तरीही मला ते आवडलं नाही.>>
------ राजकारण करु नका असे म्हणत स्वतः च अनेकदा भाजपा आणि कॉन्ग्रेसचे नाव घेत होते... दुट्प्पी, ढोन्गी, निव्वळ नाटक वाटले.
उदय, पर्सेप्शन डिफरन्स. १०३१
उदय, पर्सेप्शन डिफरन्स.
१०३१ हेल्पलाइनच्या मदतीने २-३ दिवसांपूर्वी दिल्ली एसीबीने द्वारका ठाण्याच्या राजकुमारी नावाच्या महिला इन्स्पेक्टरवर गुन्हा नोंदवला आहे. २ लाख रूपये न दिल्यास नवर्याच्या खुनात अडकवण्याची धमकी एका महिलेला देण्याचा आरोप आहे.
त्या महिलेने ७५,००० रूपयांत बोली ठरल्याचा कॉल एसीबीच्या मार्गदर्शनाखाली रेकॉर्ड केला.
दिल्लीत आज एका RTI अॅक्टिव्हिस्टवर जीवघेणा हल्ला झाला. त्याने केलेल्या स्टिंग्जमुळे आजवर सुमारे ७० पोलिस अधिकारी निलंबित झाले होते. पोलिस तक्रार नीट नोंदवून घेत नाहीयेत आणि आपलं नाव एफ आय आर मध्ये येऊ न देण्याची धमकी SHO देत आहे असं त्याच्या बायकोचं म्हणणं आहे.
"मोबाइल, पेन, डायरी किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू ठाण्यात नेता येणार नाहीत" असे फलक दिल्लीतील पोलिस स्टेशनांबाहेर लावले आहेत अशी बातमी वाचली. ही अजून एक बातमी - "Mobile phones banned at Delhi police stations"
दिल्ली पोलिस केंद्रसरकारच्या अखत्यारीत आहे. अशाच प्रकारचे आदेश सत्तेत आल्या-आल्या पंप्रंनी पत्रकारांना दिले होते !
त्यातल्या त्यात दिलासा देणारी गोष्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना सर्व ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही लावण्याचे आदेश दिले आहेत. पोलिस केंद्रसरकारचं ऐकतात की सर्वोच्च न्यायालयाचं तेवढं आता बघायचं.
"जब रक्षक बने भक्षक" किंवा "कुंपणानेच शेत खाल्लं तर..." अशा सनसनीखेच मथळ्यांखाली खरंतर मिडियाने पोलिसांचे पराक्रम उघड करायला हरकत नाही. पण...
तुमच्या मते सगळे पोलिस गुंड ,
तुमच्या मते सगळे पोलिस गुंड , भ्रष्टाचारी, खाणारे पिणारे ! का पोलिस सुशिक्षीत नसतात का ?
कारण आआप मधले सगळे सुशिक्षित असतात म्हणुन ते प्रामाणीक, खुनी प्रवृत्तीचे नसतात असा
भलताच संबध तुम्ही लावताय !
४८ तासाच्या मौनानंतर अरविंद यांचे मिडीयाला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणतात, सर्वच पोलिस वाईट नाहीत,
९५-९८ % पो लिसांच्यातही दया भाव वैगेरे आहे.
पण तुमच मात्र जगावेगळच !!
आता दिल्ली सचिवालयात मिडीयाला बंदी केलेली आहे ती का ?
आपचे नेते तुमच्या-आमच्यासारखे
आपचे नेते तुमच्या-आमच्यासारखे सुशिक्षित लोक आहेत. निर्ढावलेले, थंड रक्ताचे गुन्हेगार नाहीत.
<<
>>
कैच्याकै, म्हणे थंड रक्ताचे गुन्हेगार नाहीत. एक माणुस यांच्या डोळ्यासमोर झाडावर लटकतोय आणि हे गरम रक्ताचे केजरिवाल, आशुतोष, सिसोदिया, संजय सिंग सारखे सुशिक्षित लोक भाषण ठोकण्यात व्यस्त, तो कुमार विश्वास हातात माईक घेऊन म्हणतोय, 'लटक गया' क्या? सुशिक्षित.... my foot!!
तिथुन थोबाडल्यावर इथे बोंबलत
तिथुन थोबाडल्यावर इथे बोंबलत आले
हाड हाड
Pages