अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग २

Submitted by मिर्ची on 14 February, 2015 - 06:14

दिल्लीमध्ये आज आपच्या सरकारची दुसरी इनिंग चालू झाली आहे. योगायोगाने मायबोलीवरच्या धाग्याचाही दुसरा भाग आज चालू होतो आहे. गेले वर्षभर अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही अरविंद केजरीवाल आणि आपने दिल्ली विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवून ज्या दिमाखात पुनरागमन केलं आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे.
सर्वात महत्वाची आणि पक्षनिरपेक्ष अशी गोष्ट म्हणजे देशातील सर्वांत स्वच्छ, सर्वात तरूण आणि सर्वात जास्त शिक्षित विधानसभा आपच्या निमित्ताने दिल्लीकरांना आणि पर्यायाने देशाला मिळाली आहे. राजकारणामध्ये चालू असणार्‍या ह्या सकारात्मक बदलाकडे लक्ष ठेवून आपली मते इथे मांडूया.

* टीप - इथे विरोधी मतांचंही स्वागत आहे. वैयक्तिक शेरेबाजी टाळण्याची आणि सभ्य भाषा वापरण्याची सर्वांना विनंती.
** पहिला भाग इथे वाचता येईल.

पान १७ - योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण ह्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून काढल्याबद्दलची चर्चा
पान २४ - योगेंद्र यादव बोलले ते खरं की खोटं?
पान ३१ - आपमधील नेत्यांच्या ट्वीटर हॅण्डल्सची यादी
पान ५५ - दिल्लीतील नगरपालिका आणि कचर्‍याचं राजकारण
.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिल्लीमध्ये शेतकर्‍यांना प्रतिहेक्टर ५०,००० रूपये भरपाई दिली जाणार आहे>>>

हे मी पण ऐकले होते. त्यामध्ये आंनंदच आहे. पण हे करताना तुम्हाला हे नाही जाणवत का बाकिच्या गरिब लोकावर अन्याय करत आहोत. समजा शेतकर्याकडे १ एकर जमिन आहे तर त्याला ५०००० रुपये मिळतिल. ( मला नाही वाटत की कुणा कडे १ एकर पेक्षा कमी जमिन असेल) . जर ५ एकर जमिन असेल तर २,५०,००० रुपये मिळतिल.
पण १२ तास काम करुन सिक्युरिटी गार्ड ला , घरकाम करणार्या गड्याला महिना ४००० रु मिळतात, त्याची वर्षाची कमाई ५०,००० पेक्षा कमिच होते. त्यानी काय घोड मारलय.
तिच गोष्ट दिल्लीतिल अनिमयित बांधकाम नियमित करण्याची. जी लोक प्रामाणिक पणे जगतात ( त्याना आम आदमी म्हणुया Happy ) ती लोक शहरापासुन लांब किंवा छोट्याशा घरात कोंवा भाड्याने राहतात त्याचावर अन्याय नाही का?

साहिलजी,
५०,००० रूपये प्रतिहेक्टर. म्हणजे २०,००० रूपये प्रतिएकर. आकड्यांमध्ये गल्लत करत आहात.

सलील शहा - ५ एकर जमीन असेल तर १ लाख मिळतील, पण त्याला पण काही अटी असतीलच ना. शेत नुस्ते ओसाड ठेवले असेल तर कशी भरपाई मिळेल. आणि ५ एकर शेतीत लागवड करायला काही खर्च आलाच असेल ना आणि मेहनत पण केली असेल.

साहिल, ५० हजारचे २० हजार झाल्यावरही तुमचं तेच मत आहे का?
टोचा +१
घरगडी घरकाम करतो किंचा सिक्युरिटी गार्ड नोकरी करतो तेव्हा तो त्याच्यामध्ये काही गुंतवणूक करतो का?

जर ५ एकर जमिन असेल तर २,५०,००० रुपये मिळतिल. पण १२ तास काम करुन सिक्युरिटी गार्ड ला , घरकाम करणार्या गड्याला महिना ४००० रु मिळतात, त्याची वर्षाची कमाई ५०,००० पेक्षा कमिच होते. त्यानी काय घोड मारलय >> Lol

युरो, कायमस्वरूपी उपाय निघेल, काढावाच लागेल. पण आधी त्वरित उपाय करून हा क्रायसिस थांबवायला पाहिजे. तासाला दोन शेतकरी आत्महत्या करत आहेत ही भयानक गोष्ट आहे.

शेती करणं दिवसेंदिवस अवघड का होतंय ह्याच्यामागे अनेक कारणे आहेत. बनावट कीटकनाशके, बनावट खते, पाणीपुरवठ्यात अडचणी, कारखान्यांचं दूषित पाणी नद्यांमध्ये मिसळलं जाणं, खतांच्या किंमतीत वाढ, जमिनी बळकावल्या जाणं, मालाला योग्य किंमत न मिळणं ही त्यातील काही.

मूळात शेती हा एक उद्योग आहे आणि त्यात वाढ झाली तर लोकांची अवस्था आणि देशाची इकॉनॉमी सुधारेल हे मान्य व्हायला हवं. इतर उद्योगांना मिळणारा 'खराखुरा' मदतीचा हात शेतीला मिळायला हवा.

हा एक चांगला ब्लॉग परवा वाचण्यात आला -
Ground Reality : Understanding the politics of food, agriculture and hunger

शेतकर्‍यांना सगळं उत्पादन लेव्ही म्हणुन आधारभुत किंमतीत विकावे लागते की काही भाग? याच उत्तर या ब्लॉग मधे नाही. केवळ हमी किंमत कमी आहे म्हणुन शेतकर्‍याचे उत्पन्न कामी आहे की बाकी वितरण आणि बाजार व्यवस्थेत तृटी आहेत?

कांद्याचा प्रश्न तुम्हाला माहित असेलच. पाकिस्तान मधुन कांदा आयात केला तो १४रु. किलो मिळु लागला पण लोकल शेतकरी नाराज होता कारण त्यांचे म्हणणे होते उत्पादन खर्चच मुळी ३० रु प्रति किलो आहे त्या खाली कांदा विकणे हे नुकसान आहे.

हे गणित तेव्हाही समजले नव्हते.

मिर्ची एक गोष्ट मला मनापासुन लिहाविशी वाटते ती लिहीते. माझ्यासकट बर्‍याच जणान्ची एकमेकान्शी वैचारीक मतभिन्नता आहे. पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की तुमच्यासारखी लोक, जी परदेशात जातात, तिथेच त्या परदेशी लोकाना फायदा होतो. मी पण परदेशात राहुन आले आहे, पण तुमच्या सारखी हुशार नाहीये. ( कृपया हे मी उपहासाने लिहीत नाहीये, मनापासुन तुमचे कौतुक करतेय ) पण नेमकी अशाच लोकान्ची आपल्या भारतात वानवा आहे.

हो हुशार लोक सगळ्याच पक्षात आहेत. पण हे राजकीय लोक जेव्हा खर्‍या अर्थाने लोकान्ची सेवा करतील, त्याना एकत्र आणतील, त्यान्चे प्रबोधन करतील तेव्हाच भारत परत सुजलाम सुफलाम होईल. जो तो स्वतःची तुम्बडी भरायला बसलाय. हे जे शेतीबाबत तुम्ही लिहीले आहे, त्यात मी पण भर टाकते की शेतकर्‍याला त्याच्या शेतातला माल डायरेक्ट ग्राहकापर्यन्त पोहोचवु देणारी सन्घटना हवीय, मधले दलाल नकोत. हा माझा विचार किन्वा कल्पना चुकिची असेल तर सान्गा. मला यातले खोलवर कळत नाही. पण सावकारानी नाडलेले शेतकरी पाहीलेत. म्हणून लिहावे वाटले. बाकी राजकारणापासुन कुठेतरी लाम्ब पळत जावे असे वाटु लागले आहे.

१. शेतकर्याला पिकावर नुकसान भरपाई २०,००० रु / एकर
२. दिल्लीतल्या अनधिकृत कॉलन्या अधिकृत ( जमिनी सरकारच्या रहाणारे अतिक्रमण करुन रहातात)
३. कुटंबा मागे ७०० लि पाणी दर दिवशी फुकट, (ह्यात अनधिकृत कॉलनीत रहाणारे ही आले)
४. कुटंबा मागे मल-निसा:रण फुकट (ह्यात अनधिकृत कॉलनीत रहाणारे ही आले)
५. विज दर १/२ (ह्यात अनधिकृ त कॉलनीत रहाणारे ही आले)

<<शेतकर्‍यांना सगळं उत्पादन लेव्ही म्हणुन आधारभुत किंमतीत विकावे लागते की काही भाग? याच उत्तर या ब्लॉग मधे नाही. केवळ हमी किंमत कमी आहे म्हणुन शेतकर्‍याचे उत्पन्न कामी आहे की बाकी वितरण आणि बाजार व्यवस्थेत तृटी आहेत?>>

युरो, तो एकच ब्लॉग नाहीये. शेतीच्या समस्यांवर त्यांचं बरंच लिखाण आहे. देविंदर शर्मा शेतीतज्ञ आहेत. ते कुठल्याही राजकीय पक्षासोबत जोडलेले नाहीत (म्हणजे निदान मला तरी तसं माहीत नाही)

<<कांद्याचा प्रश्न तुम्हाला माहित असेलच. पाकिस्तान मधुन कांदा आयात केला तो १४रु. किलो मिळु लागला पण लोकल शेतकरी नाराज होता कारण त्यांचे म्हणणे होते उत्पादन खर्चच मुळी ३० रु प्रति किलो आहे त्या खाली कांदा विकणे हे नुकसान आहे. हे गणित तेव्हाही समजले नव्हते.>>

मी माझं मत लिहिलं की कदाचित तुम्ही म्हणाल की हरदासाची कथा मूळपदावर Proud पण कांद्याचा प्रश्न केवळ मागणी आणि पुरवठा ह्यातील फरकामुळे तयार होत नसावा. कृत्रिम तूट तयार केली जात असावी. रश्मी म्हणतात तसं मधल्या दलालांचा बंदोबस्त करायला हवा.

<<मिर्ची एक गोष्ट मला मनापासुन लिहाविशी वाटते ती लिहीते. माझ्यासकट बर्‍याच जणान्ची एकमेकान्शी वैचारीक मतभिन्नता आहे. पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की तुमच्यासारखी लोक, जी परदेशात जातात, तिथेच त्या परदेशी लोकाना फायदा होतो. मी पण परदेशात राहुन आले आहे, पण तुमच्या सारखी हुशार नाहीये. ( कृपया हे मी उपहासाने लिहीत नाहीये, मनापासुन तुमचे कौतुक करतेय ) पण नेमकी अशाच लोकान्ची आपल्या भारतात वानवा आहे.>>

रश्मी, कौतुकाबद्दल धन्यवाद. Happy
पण आपल्या हक्कांविषयी जागरूक असण्याचा संबंध हुशार असणं किंवा नसणं ह्याच्याशी नाहीये. प्रत्येकजण हे करण्यास सक्षम असतो, असायला हवा.
परदेशात राहण्याविषयी. इथे येण्यापूर्वी मी महाराष्ट्र सरकारमध्येसुद्धा एक वर्ष काम केलंय. अ‍ॅज अ गॅझेटेड ऑफिसर. त्यामुळे 'आतल्या गोष्टींची' व्यवस्थित माहिती आहे. पाळंमूळं घट्ट रूजलेल्या सिस्टीमविरुद्ध आवाज उठवण्याइतकी हिंमत नव्हती. पण त्या सिस्टीमचा भाग होणंदेखील मान्य नव्हतं. म्हणून एक वर्षाने नोकरी सोडली. नंतर खाजगी क्षेत्रात त्याच्याहून भारी भारी प्रकार आढळले. म्हणून दोघांनी (नवरा आणि मी) विचार करून परदेश गाठला. इथे नैतिक मार्गाने मुबलक पैसा मिळतोय.
ह्याचा अर्थ भारतात राहणारे, सरकारी किंवा खाजगी नोकरीत असणारे सगळे भ्रष्टाचाराचा भाग असतात असा अजिबात नाही ! कृपया गैसन.

देशात असताना जे विचार डोक्यात यायचे, जो राग यायचा, जे उपाय केले जावेत असं वाटायचं ते केजरीवालच्या माध्यमातून होताना दिसले. त्यामुळे ज्या गोष्टीला तोंड न देता देश सोडून आले त्या गोष्टीसाठी जमेल तितका हातभार लावायचा प्रयत्न चालू आहे. लिखाण जमतं (बहुतेक), म्हणून जमेल तसं लिहिते. निवडणूकांच्या वेळी देणगी देते. दिवसातला ठराविक वेळ ट्वीटर आणि व्हिडिओज बघण्यात घालवून मिडिया दाखवतेय त्याच्यापलीकडे काही आहे का ह्याचा शोध घ्यायचा प्रयत्न करते.

<<हो हुशार लोक सगळ्याच पक्षात आहेत. पण हे राजकीय लोक जेव्हा खर्‍या अर्थाने लोकान्ची सेवा करतील, त्याना एकत्र आणतील, त्यान्चे प्रबोधन करतील तेव्हाच भारत परत सुजलाम सुफलाम होईल. जो तो स्वतःची तुम्बडी भरायला बसलाय. हे जे शेतीबाबत तुम्ही लिहीले आहे, त्यात मी पण भर टाकते की शेतकर्‍याला त्याच्या शेतातला माल डायरेक्ट ग्राहकापर्यन्त पोहोचवु देणारी सन्घटना हवीय, मधले दलाल नकोत. हा माझा विचार किन्वा कल्पना चुकिची असेल तर सान्गा. मला यातले खोलवर कळत नाही. पण सावकारानी नाडलेले शेतकरी पाहीलेत. म्हणून लिहावे वाटले.>>

दलालांचा मुद्दा एकदम मान्य.
आपसरकारने लोकांच्या हिताविरोधी निर्णय घेतलेला अजून तरी दिसलेलं नाही. आपण लक्ष ठेवू या. दिसलं तर नक्की सांगा.
आजवर केजरीवालला फक्त नैतिक आधारांवर तोंडघशी पाडणं, माफी मागायला लावणं विरोधकांना शक्य झालंय. बाकी काही अजून तरी त्यांना मिळेना. सो लेट अस बी पॉझिटीव्ह.

<< बाकी राजकारणापासुन कुठेतरी लाम्ब पळत जावे असे वाटु लागले आहे>>

हे अजिबात करू नका. चोरांना तेच हवंय. सुशिक्षित, सज्जन लोकांनी राजकारणात लक्ष घातलं नाही तर गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक कब्जा करणार हे सरळ आहे.

सातारकर,
तुमचा मुद्दा कळला नाही. ह्या मूलभूत सुविधांवर होणारा खर्च वायफळ आहे असं म्हणायचं आहे का तुम्हाला?

Kejriwal, You Have Failed Us: An AAP Volunteer's Blog

"Not even the king has the right to subordinate the interests of the state to his personal sympathies or antipathies."

AAP "leader" Ashutosh started his blog with this statement to defend the expulsion of four AAP leaders from the party. If there is one person who needed to be reminded of this sentence today, it is none other than Arvind Kejriwal.

Kejriwal has no moral ground to remain as the convener of AAP and here are the reasons.

http://www.ndtv.com/blog/kejriwal-you-have-failed-us-an-aap-volunteers-b...

Caught on camera: Arvind Kejriwal avoids paying toll tax

गुजरातेत विकासाच्या कामाची पहाणी करायला गेलेल्या केजरीवाल यांच्या गाडी सकट त्यांच्या सो बत आलेल्या
सर्व गाड्यांच्या ताफ्याने टोल भरलाच नाही.

हा त्याचा व्हिडीओ, http://zeenews.india.com/videos/caught-on-camera-arvind-kejriwal-avoids-...

15 lakh cameras in Delhi - Arvind Kejriwal's Jumla

https://www.youtube.com/watch?v=xCEkULjFslQ

ह्या वरच्या व्हीडीओत श्री अरविंद केजरीवाल म्हणतात १५ लाख कॅमेरे लावणार ! संतोष सिंग म्हणतात कोण म्हणाल ? अस केजरीवाल म्हणतच नव्हते. !

:G:

:G:

:G:

सातारकर, उगाचच लिंका डकवू नका इकडून तिकडून...तुमच्याकडे काही मुद्दे आहेत कि नाही स्वताचे?
मुद्देसूद वादविवाद करा की...एकदातरी...(मंदार जोशी, चहावाला, कोकणस्थ, अप्पाकाका आणि इतर बरेच id यांनी कधीच मुद्देसूद प्रतिवाद केल्याचे आठवत नाही)

मिर्ची ताई

दलालांचा मुद्दा आहेच पण मी म्हणतो ते वेगळे आहे. आयात केलेला कांदा स्वत आणि देशांतर्गत जो कंदा पिकवला होता त्याचे उत्पादन खर्च आयात केलेल्या कांद्या पेक्षा जास्त होता. शेतकर्‍यांचे म्हणणे होते कांद्याचे पिक कमी आहे त्यामुळे भाव वाढलेले आहेत आयात कांदा स्वत असेल तर इथल्या शेतकर्‍यांना आपला कांदा उत्पादन खर्चाच्या खाली विकावा लागेल व नुकसान होईल.

सरकारने कांदा आयात केला कारण सरकारला वाढणार्‍या चलनफ़ुगवट्याला तोड़ द्यावे लागले असते.

सरकारचा हा निर्णय शेतकरी विरोधी आणि शेतकर्‍यांवर अन्याय करणारा आहे असे शेतकर्‍याचे म्हणणे होते.

तसेच जे धान्य सरकार खरेदी करते ते स्वत धान्य दुकानां मधे विकण्यासाठी असते. दुष्काळा साठी बफ़र स्टॉक असतो. सगळेच धान्य खुल्या मर्केट मधे पाठवले किंवा आधारभूत किंमत वाढवली तर गरीबांना स्वत धन्य कुठुन देणार?

तसेच वेगवेगळ्या धान्यावर हमी भाव देणे आणि सबसीडी देणे याची कारणे वेगवेगळी आहेत.

शेतकर्‍यांना कोणी किती जास्त नुकसान भरपाई दिली या राजकारणात मुळ प्रश्न नेहेमीच अनुत्तरीत रहातो. नुकसान भरपाई देणे किंवा सरसकट कर्ज माफ़ करणे हे केवळ तात्कालिक उत्तर असले पाहिजे पण तेच आता राजकारणामुळे एकमेव उत्तर असल्या सारखे भासवले जात आहे असे वाटते आहे.

असो आम आदमी पार्टी या विषयावर धागा असाल्याने विषयांतर करत नाही.

सातारकर,
१. ते पत्र लिहिलेल्या प्रिया जेम्सला मी ट्वीटरवर एक वर्षापासून वाचते आहे. कट्टर योयासमर्थक आहे ती. मी आपसाठी प्रचार केला, हे केलं, ते केलं आणि आता आप योयांना काढून टाकतं...हाऊ डेअर आप? असा पवित्रा आहे तिचा. असू दे. हरकत नाही. तिचं मत.
आता हे वाचा -->
"Today @ArvindKejriwal proved, he is yet another peanut brain or another Stalin. Either way, the future picture is not pretty."
किंवा हे -
"AAP is THE biggest scam of this decade. The scammer #cowardAK is still hiding. "

आपबद्दल हे असे उच्च विचार असताना स्वतःला आप वॉलंटियर म्हणवून घ्यायचं कारण काय??? यार, पहले बाहर निकलो और फिर जहर उगलो. आतमध्ये राहून हा प्रकार करण्यात काहीच अर्थ नाही. असे लोक दुसर्‍या पार्टीत असते तर त्यांनी काय केलं असतं सांगा बघू? Wink

त्या लेखातील शेवटचं वाक्य सगळ्या दुखण्याचं मूळ आहे. "For these very reasons, he should resign from the National Convener chair. Period."
अकेला हटवायचं, योयांना संयोजक बनवायचं आणि लोकसभा निवडणूकीच्या वेळी केला तसा वेडपटपणा करून देशभर निवडणूका लढवत बसायच्या, हरायच्या आणि आप संपवून टाकायची. म्हणजे मग पुन्हा पुढचे ३०-४० वर्षे राजकारण्यांच्या विरोधात जायची कुणी हिंमत करणार नाही !

२. गुजरात मध्ये टोल का भरला नाही ह्याबद्दल आपचं स्टेटमेंट.
"However, Gujarat unit of AAP said they could not pay toll tax as “police had instructed them not to stop midway.”
We are law abiding citizens and we had paid toll tax on the first day of the tour. But in Kutch, we had strict instructions from police not to stop midway to avoid trouble. As we approached the toll plaza, gates of emergency lane were opened and we passed through. They (police) had made prior arrangement,” Anirudh Jadeja, AAP organiser for Gujarat said."

असं घडलेलं असणं शक्य आहे का? गुजरात मोदींचं, पोलिस मोदींचे, केजरीवालांवरचं मोदींचं 'प्रेम' जगजाहीर आहे. त्यामुळे आपच्या विधानात तथ्य असू शकतं.
नसेल तर ५०-६० रूपयांचा टोल टॅक्स नंतर भरून घ्यायला हवा होता. तो द्यायला अकेने नकार दिला का? की भाजपाच्या आमदार रूस्तमसिंगसारखं टोलवर्करला मारहाण केली??

३. व्हिडिओमध्ये संजय सिंगच्या वाक्यावरून असं दिसतंय की त्यांना अकेने केलेलं विधान माहीत नव्हतं. असं होणं योग्य नाही. पण nonetheless दिल्लीत कॅमेरे लावायचं काम सुरू आहे. मॅनिफेस्टोमध्ये कॅमेर्‍यांची संख्या दिलेली नाही. १५ लाखपेक्षा कमीमध्ये काम होणार असेल तर फक्त तेवढ्या संख्येवरून धोपटणं बरोबर नाही असं माझं वैम. सुरक्षा महत्वाची.

तुमच्या जागरूकतेबद्दल आनंद वाटला. अशीच जागरूकता फडणवीस आणि मोदी सरकारविषयी दाखवावीत ही विनंती. (हे उपहासाने लिहिलेलं नाही)

युरो, तुमची पोस्ट खरंतर पगारेंच्या धाग्यावर हवी.

<<शेतकर्‍यांना कोणी किती जास्त नुकसान भरपाई दिली या राजकारणात मुळ प्रश्न नेहेमीच अनुत्तरीत रहातो. नुकसान भरपाई देणे किंवा सरसकट कर्ज माफ़ करणे हे केवळ तात्कालिक उत्तर असले पाहिजे पण तेच आता राजकारणामुळे एकमेव उत्तर असल्या सारखे भासवले जात आहे असे वाटते आहे.>>

यंदा कांद्यांचे, भाज्यांचे भाव नेहमीसारखे वाढू नयेत म्हणून दिल्लीसरकार हॉर्टिकल्चर ट्रेन, फळे-भाज्यांचा शीतसाठा असे उपायही करत असल्याचं वाचण्यात आलं होतं. संध्याकाळी लिहिते.

मिर्ची,

तुमचे प्रतिसाद आवडला, खर म्हणजे संयम आवडला ! पण,

असं घडलेलं असणं शक्य आहे का? गुजरात मोदींचं, पोलिस मोदींचे, केजरीवालांवरचं मोदींचं 'प्रेम' जगजाहीर आहे. त्यामुळे आपच्या विधानात तथ्य असू शकतं.
नसेल तर ५०-६० रूपयांचा टोल टॅक्स नंतर भरून घ्यायला हवा होता. तो द्यायला अकेने नकार दिला का? की भाजपाच्या आमदार रूस्तमसिंगसारखं टोलवर्करला मारहाण केली??

हे लिहीण टाळु शकला असता . पण,....... !!

<<हे लिहीण टाळु शकला असता . पण,....... !!>>

ते लिहिण्याचा एकमेव उद्देश "कुसळाला धोपटायच्या नादात आपण मुसळ जाऊ देतोय" ही जाणीव करून देणं हा होता....

चालु आआपाख्यान !!

केजरीवालना काहीही माफ, दुसर्याने केले की आभाळ फाटते ?

१५ लाखापेक्षा कमी संख्या का चालावी ? त्यांचे कुसळ बाकी च्यांचे मुसळ ?

व्वा रे वा !!

आप चे वॉलेंटीय्यरच आआप वर उलटले तर ,,,,,,

आआप मध्ये काहीतरी चुकतय !!

अ‍ॅनी वे, केजरीवाल नी आता सुरु केलय, देतील बर्याच संधी !!

Uhoh सातारकर, अचानक काय झालं तुम्हाला?

कुणीही अ ब क व्यक्ती उठून उद्या म्हणाला की मी आपचा वॉलंटियर आहे, नेता आहे तर त्याला काहीच अर्थ नाही.
मी इथे उगीचच्या उगीच एवढा कीबोर्ड बडवत असते तरीही मी आपची वॉलंटियर नाही. फक्त समर्थक आहे.
आपमध्ये काय चुकतंय त्याच्याशी आपला थेट संबंध नाही. दिल्लीसरकारचं काय चुकतंय ह्याच्यावर चर्चा केलीत तर बरं होईल.

दिल्लीचे कायदामंत्री जितेंद्रसिंग तोमर ह्यांची कायद्याची डिग्री खोटी असल्याचा अजून एक नवीन विवाद आज चालू झाला आहे. आपच्या अधिकृत प्रतिक्रियेची वाट पहात आहे. डिग्री खोटी असल्यास त्याला पदावरून आणि आपमधून बाहेर काढायला हवं.

दिल्लीचे कायदामंत्री जितेंद्रसिंग तोमर ह्यांची कायद्याची डिग्री खोटी असल्याचा अजून एक नवीन विवाद आज चालू झाला आहे. आपच्या अधिकृत प्रतिक्रियेची वाट पहात आहे. डिग्री खोटी असल्यास त्याला पदावरून आणि आपमधून बाहेर काढायला हवं.>> मी पण हेच लिहायला आले होते. पेपरात त्या युनिव्हर्सिटीने कायद्याची डिग्री खोटी असल्याचं कळ्वलंय आणि बार काउंसिलने त्यांचं सदस्यत्व स्थगित केलं अशा अर्थाची बातमी होती.

Pages