दिल्लीमध्ये आज आपच्या सरकारची दुसरी इनिंग चालू झाली आहे. योगायोगाने मायबोलीवरच्या धाग्याचाही दुसरा भाग आज चालू होतो आहे. गेले वर्षभर अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही अरविंद केजरीवाल आणि आपने दिल्ली विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवून ज्या दिमाखात पुनरागमन केलं आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे.
सर्वात महत्वाची आणि पक्षनिरपेक्ष अशी गोष्ट म्हणजे देशातील सर्वांत स्वच्छ, सर्वात तरूण आणि सर्वात जास्त शिक्षित विधानसभा आपच्या निमित्ताने दिल्लीकरांना आणि पर्यायाने देशाला मिळाली आहे. राजकारणामध्ये चालू असणार्या ह्या सकारात्मक बदलाकडे लक्ष ठेवून आपली मते इथे मांडूया.
* टीप - इथे विरोधी मतांचंही स्वागत आहे. वैयक्तिक शेरेबाजी टाळण्याची आणि सभ्य भाषा वापरण्याची सर्वांना विनंती.
** पहिला भाग इथे वाचता येईल.
पान १७ - योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण ह्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून काढल्याबद्दलची चर्चा
पान २४ - योगेंद्र यादव बोलले ते खरं की खोटं?
पान ३१ - आपमधील नेत्यांच्या ट्वीटर हॅण्डल्सची यादी
पान ५५ - दिल्लीतील नगरपालिका आणि कचर्याचं राजकारण
.
<<कैच्याकै, म्हणे थंड रक्ताचे
<<कैच्याकै, म्हणे थंड रक्ताचे गुन्हेगार नाहीत. एक माणुस यांच्या डोळ्यासमोर झाडावर लटकतोय आणि हे गरम रक्ताचे केजरिवाल, आशुतोष, सिसोदिया, संजय सिंग सारखे सुशिक्षित लोक भाषण ठोकण्यात व्यस्त, तो कुमार विश्वास हातात माईक घेऊन म्हणतोय, 'लटक गया' क्या? सुशिक्षित.... my foot!!>>
झी न्युजचा 'लटक गया' व्हिडिओ १००% फॅब्रिकेटेड आहे. कशाची पैज लावता ह्याच्यावर?
झी न्युजचे मालक सुभाष चंद्रा आणि भाजपाचं साटंलोटं आहे. त्यांना भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवायची होती. त्यांना तिकीट मिळालं नाही तरीसुद्धा त्यांनी भाजपाच्या उमेदवारासाठी प्रचार केला होता.
"Chandra also said, "I and my father had been volunteers of RSS and that is why I have been supporting BJP candidates in the elections (referring to 2014 Lok Sabha polls also) !"
झि न्युजने काँग्रेसचे खासदार नवीन जिंदालकडून १०० कोटीची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला होता. त्याबद्दल जिंदालने केस केली. त्यांनी रेकॉर्ड केलेल्या संभाषणाची कॅसेट सत्य असल्याचं सिद्ध झालं आणि सुधीर चौधरी (तोच सगळ्यांची डीएनए टेस्ट करत सुटणारा) व समीर अहलुवालिया या सिनियर एडिटर्सना अटक झाली होती. करचुकवेगिरीबद्दलही त्यांना नुकतीच नोटिस मिळाली आहे. तर अशी 'शुभ्रधवल' कारकीर्द आहे झीन्युजची.
आता झी न्युजचं लायसन्स रद्द करण्याबद्दल परवाच सर्वोच्च न्यायालयाने केंद्रसरकारचा अभिप्राय मागितला आहे. इतक्या घनिष्ट दोस्ताबद्दल केंद्रसरकार काय अभिप्राय देईल बरं?
'लटक गया' बद्दल अधिकृतरित्या काय ते सिद्ध होईलच. तोवर हे बघा.
ZEE News Exposed "LATAK GAYA" Voiceover
<<४८ तासाच्या मौनानंतर अरविंद
<<४८ तासाच्या मौनानंतर अरविंद यांचे मिडीयाला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणतात, सर्वच पोलिस वाईट नाहीत,
९५-९८ % पो लिसांच्यातही दया भाव वैगेरे आहे. पण तुमच मात्र जगावेगळच !!>>
मग मी कुठे लिहिलंय की १००% पोलिस वाईट असतात म्हणून ??ह्खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन २ लाखाची लाच मागणारी इन्स्पेक्टर योग्य आहे म्हणता?
<<आता दिल्ली सचिवालयात मिडीयाला बंदी केलेली आहे ती का ?>>
कुठल्या राज्याच्या सचिवालयात मिडियाला प्रवेश आहे? गुजरात? महाराष्ट्र ?
खोटे पसरवण्यांना भर चौकात
खोटे पसरवण्यांना भर चौकात चाबकांनी फोडुन काढा
गेल्या काही वर्षात "खोटे बोलणारे" लोक जास्त वाढली आहे. खरी परिस्थिती यांना पचत नाही म्हणुन असे काहीबाही खोटे पसरवुन जनतेची दिशाभुल करतात. हाच विकृत धंदा आहे.
इथे देखील अश्या विकृत लोकांची संख्या वाढली आहे. आणि त्यांचा बंदोबस्त योग्य ठिकाणी केला आहे. परिणाम दिसुन येतीलच
कुमार विश्वासने झीन्युजवर
कुमार विश्वासने झीन्युजवर मोठ्या रकमेचा मानहानीचा दावा टाकावा आणि ते पैसे शेतकर्यांना मदत म्हणून वापरावेत.
दर तासाला दोन शेतकरी आत्महत्या करत आहेत. अतिगंभीर आहे हे. असंच चालू राहिलं तर 'शेतकरी' हा प्राणी म्युझियममध्येच पहायला मिळण्याची वेळ येईल.
खोटं बोलण्याबद्दल सहमत. परवाच्या प्रसंगात खोटी FIR दाखल करणं ही एकदम निंद्य गोष्ट आहे. जे लोक ह्या गोष्टीला केवळ आपबाबत घडली आहे म्हणून पाठिंबा देत आहेत त्यांना दुर्दैवाने कधी पोलिस ठाण्याची पायरी चढावी लागल्यास आणि खोट्या FIR चा सामना करावा लागल्यास तक्रार करण्याचा काडीचाही हक्क नाही.
दर तासाला दोन शेतकरी
दर तासाला दोन शेतकरी आत्महत्या करत आहेत. अतिगंभीर आहे हे. असंच चालू राहिलं तर 'शेतकरी' हा प्राणी म्युझियममध्येच पहायला मिळण्याची वेळ येईल.
<<
>>
अगदि, आम आदमी पार्टीचा जन्म झाल्यावर आणि मोदि सरकार सत्तेवर आल्यापासून देशाची परिस्थिती किती अतिगंभीर झालेय, त्या आधी तर कसे सगळीकडे रामराज्य होते.
हो आताच रावण राज्य आले आहे
हो आताच रावण राज्य आले आहे
खोटे पसरवण्यांना भर चौकात
खोटे पसरवण्यांना भर चौकात चाबकांनी फोडुन काढा
गेल्या काही वर्षात "खोटे बोलणारे" लोक जास्त वाढली आहे. खरी परिस्थिती यांना पचत नाही म्हणुन असे काहीबाही खोटे पसरवुन जनतेची दिशाभुल करतात. हाच विकृत धंदा आहे.
आणि जनता एकदम भोळी आहे ना................लोकाना दूसरयाने खर वागावे अस वाट्त असत, स्वत नाही.....आणि फुकट मिळाल की झाल, ते नाही मिळाल नाही कि रावण राज्य.............:(
<<अगदि, आम आदमी पार्टीचा जन्म
<<अगदि, आम आदमी पार्टीचा जन्म झाल्यावर आणि मोदि सरकार सत्तेवर आल्यापासून देशाची परिस्थिती किती अतिगंभीर झालेय, त्या आधी तर कसे सगळीकडे रामराज्य होते.>>
असं मी कधी आणि कुठे म्हटलंय?
मोदी सरकार आल्यापासून शेतकरी आत्महत्येत २६% वाढ झाली असे आकडे आहेत.आम आदमी पार्टी निदान समस्या सोडवायचा प्रयत्न तरी करत आहे. मिडियाच्या जाळ्यात अडकून आपण चोर सोडून संन्याशाला फाशी देतो आहोत.
जमलं तर राजकारणातून बाहेर येऊन परिस्थितीकडे पहा.
<<आणि फुकट मिळाल की झाल, ते नाही मिळाल नाही कि रावण राज्य...........>>
शेतकर्यांना सगळं फुकट मिळतं हा मोठ्ठा गैरसमज आहे. त्यांच्या नावाने वेगवेगळ्या योजना बनवून मधले लोकच जास्त खात आहेत. प्राप्तिकर भरणार्यांना वाटत असेल की करातील रक्कम देऊन आपण शेतकर्यांवर फार मोठे उपकार करतोय, त्यांना शेती जमत नसेल तर आम्ही काय करणार, दे डिझर्व टु डाय वगैरे.
पण खरी परिस्थिती तशी दिसत नाहीये.
+++++++++ शेतकर्यांना सगळं
+++++++++ शेतकर्यांना सगळं फुकट मिळतं हा मोठ्ठा गैरसमज आहे. त्यांच्या नावाने वेगवेगळ्या योजना बनवून मधले लोकच जास्त खात आहेत. +++++++++
हे तुम्हाला वाटत ? तुम्ही काँग्रेसच्या बाजुनेच बोलत असता मग क स काय जमत बुवा तुम्हाला ?
स्वातंत्र्यानंतर शेतकर्याला लुटल अस म्हणायच आहे का तुम्हाला ?
++++++++++प्राप्तिकर
++++++++++प्राप्तिकर भरणार्यांना वाटत असेल की करातील रक्कम देऊन आपण शेतकर्यांवर फार मोठे उपकार करतोय, त्यांना शेती जमत नसेल तर आम्ही काय करणार, दे डिझर्व टु डाय वगैरे.
पण खरी परिस्थिती तशी दिसत नाहीये ++++++++++++++++
मग खरी परिस्थीती फक्त तुम्हालाच माहीती अ सेल नाही का ? मग आम्हाला ही समजाउन सांगा की !!
++++++++++ आता झी न्युजचं
++++++++++ आता झी न्युजचं लायसन्स रद्द करण्याबद्दल परवाच सर्वोच्च न्यायालयाने केंद्रसरकारचा अभिप्राय मागितला आहे. इतक्या घनिष्ट दोस्ताबद्दल केंद्रसरकार काय अभिप्राय देईल बरं? +++++++++++
ईतक धडधडीत खोट बोलु नका मॅडम !!
ती बातमी आहे सुप्रिम कोर्टाने आताच्या सरकारच्या उत्तराबद्दल, पुर्वीच्या युपिए सरकारने झी टिव्हीवर कारणे
दाखवा नोटीस पाठवलेली होती, ते पण नविन जिंदालच्या कोळसा खाणीच्या घोटाळ्याचा झी टिव्ही ने
पर्दाफाश केलेला होता म्हणून !!
<<तुम्ही काँग्रेसच्या बाजुनेच
<<तुम्ही काँग्रेसच्या बाजुनेच बोलत असता मग क स काय जमत बुवा तुम्हाला ?>>
__/\__
सातारकर,
सचिवालयात मिडियाच्या प्रवेशाचं सांगताय ना?
नुसते आरोप करून पळून जाऊ नका.
झीन्युजच्या बातमीत मी धडधडीत खोटं काय लिहिलंय?
========= झी न्युजचा 'लटक
========= झी न्युजचा 'लटक गया' व्हिडिओ १००% फॅब्रिकेटेड आहे. =======
झी न्युजचा व्हीडियो फॅब्रिकेट करायला कुमार विश्वास परत अॅक्टींग करणार आहे का ?
लटक गया !! हा वॉईस ओव्हर आहे अस म्हणता मग कुमार विश्वासने जे हावभाव केले आहेत लटका गया वर ते पण फॅब्रिकेट करुनच घातले का व्हीडीयो मध्ये ?
तुम्ही दिलेल्या कोणत्याही व्हीडीओ मध्ये कुमार विश्वासच्या त्या हावभावाच स्पष्टीकरण नाहीय.
त्यासाठी नमोरुग्णयुक्त चष्मा
त्यासाठी नमोरुग्णयुक्त चष्मा हिडीस डोळ्यांवरुन काढावा लागतो. पण तरी काही जणांना दिसणार नाहीच कळणार तर नाहीच नाही

अच्छा, म्हणजे हावभाव पाहून
अच्छा, म्हणजे हावभाव पाहून वाट्टेल ती वाक्ये कोणाच्याही तोंडात कोंबायला झीन्युजला परवानगी आहे तर?

मला कोणी विचारलं की 'सातारकर सेन्सिबल गोष्टी लिहितात का?'
मी 'हो' म्हणून मान हलवली.
नंतर फक्त तो प्रश्न बदलून 'सातारकर वेड्यासारखे प्रश्न विचारतात का?' असा केला गेला.
तर त्यात माझी काय चूक ?
असो. गजेंद्रसिंगचे खुनी कुमार विश्वास आहेत किंवा नाही हे कळेलच थोड्या दिवसांत.
पण त्या घटनेनंतर तहसीलदाराच्या ऑफिससमोर अजून एका शेतकर्याने झाडाला लटकून फाशी घेतली, दुसर्याने मोबाइल टॉवरवरून उडी मारली आणि ४ दिवसांत देशभरात असे शेकडो शेतकरी आत्महत्या करून मेले त्यांच्याबद्दलही बातम्या द्यायला सांगा तुमच्या लाडक्या झीन्युजला.
आणि हो, त्या दिवशी लगबगीने ट्वीट करणार्या मोदींनाही सांगा ह्या सगळ्यांसाठीसुद्धा एक ट्वीट करायला. आपवाले फक्त राजकारण करतात, पण मोदी तर समाजसेवक आहेत ना.
सातारकर, सचिवालय आणि मिडिया?
सातारकर,
सचिवालय आणि मिडिया? वेटिंग...
आणि हो, त्या दिवशी लगबगीने
आणि हो, त्या दिवशी लगबगीने ट्वीट करणार्या मोदींनाही सांगा ह्या सगळ्यांसाठीसुद्धा एक ट्वीट करायला. आपवाले फक्त राजकारण करतात, पण मोदी तर समाजसेवक आहेत ना.
<<
<<
आणि मोदींचे वर्तनच पहायचे असेल तर हा व्हिडीओ पहा...
https://www.youtube.com/watch?v=hyEbrpZ9_5E
उगाच कुमार विश्वासने मान
उगाच कुमार विश्वासने मान हलवली आणी 'लटकला का ?" ह्यावर असे हाव भाव केले !! असा दुबळा बचाव
तुम्ही तरी करु नका !!
हा व्हीडिओ त्या आआपख्यान
हा व्हीडिओ त्या आआपख्यान बाईंना आणी काँग्रेजी लोकांना दिसणार नाहीच !!
विजय आंग्रे, जबरदस्त
विजय आंग्रे,
जबरदस्त व्हिडिओ !!
पुरा साफ, पानी का पानी दुध का दुध !!
काय सिद्ध झालं त्या
काय सिद्ध झालं त्या व्हिडिओमुळे?
केजरीवाल भाषण करत असताना तो माणूस झाडावर नव्हता. त्याला सभेतील लोकांनी (पोलिसांनी नव्हे) खाली उतरवून आधीच हॉस्पिटलमध्ये नेलं होतं.
केजरीवाल भाषण करत असताना तो
केजरीवाल भाषण करत असताना तो माणूस झाडावर नव्हता. त्याला सभेतील लोकांनी (पोलिसांनी नव्हे) खाली उतरवून आधीच हॉस्पिटलमध्ये नेलं होतं.
<<
<<
पण असा काही नियम आहे का, कि भाषण करतानाच कोणी मरत असेल तरच त्याला वाचवावे? केजरिवाल स्वत: स्टेजवर उपस्थित असताना तो गजेंद्र झाडावर लटकला होता.
मिर्ची तै, जंप करायला शिका
मिर्ची तै, जंप करायला शिका फालतुच्या पोस्टींना उत्तरे देऊ नका.
मोदी इनोव्हा घेऊन वाचवायला
मोदी इनोव्हा घेऊन वाचवायला का गेले नाही?
टि्व्हीवर 70मिनीट बघत होते पटकन जाता आले असते?
70 मिनीट का थांबले?
एका व्र्र्षात सगळे प्र श्न
एका व्र्र्षात सगळे प्र श्न सूटटिल हा वेडेपणा आहे. Long term solutions वर भर दिला जात आहे. Land accentuation bill ला नाव ठेवली तर सेझ बद्दल काय म्हणणे आहे ? सेझ द्वारा जमिनी घेता येतातच, त्या साठी Land accentuation bill ची गरज नाहिये...........शेतकर्यांना शेती बरोबर दूसरे छोटे उद्योग करन्याची गरज आहे, आणि small scale industry उभारली गावात तर हा प्रश्न नीट सूटेल + शहर बकाल होणार नाहीत................ आणि शेतकर्यांकडे दिल्लीला यायला जमत होत? What did AAP achieve by taking rally in Delhi for farmers? How many farmers stay in Delhi? When Kejariwal wanted to share his thoughts about farmers, he could have convey it in different way, he has a power.........For Delhi q, having a rally in Delhi is understandable........Anyway Delhi suffers a lot bcoz of VVIP securities, why to give more pressure on Delhi's Aam adami.........
आंग्रे, काल वाराणसीत
आंग्रे,
काही राजकारणी--काही उद्योजक--काही मिडियाहाऊसेस ह्यांचं नेक्सस जोपर्यंत लक्षात घेत नाही तोपर्यंत केजरीवालविरुद्ध चालू असलेला गेमप्लॅन कळणार नाही. पिरीयड.
काल वाराणसीत केजरीवालविरुद्ध निदर्शने करताना अचानक भूकंप झाल्याने चेंगराचेंगरी झाली. दोन माणसे मेली.
परवाच्या रॅलीत केजरीवाल अचानक खाली उतरून झाडाकडे धावले असते तर गोंधळ होऊन चेंगराचेंगरी झाली नसती का? तिथल्या लोकांनी झाडावर चढून त्याला उतरवायचा प्रयत्न केला ना? झाडावर चढलेल्यांपैकी एक माणूस तर भेदरून तिथेच रडायला लागला. पोलिस निर्लज्जासारखे खाली का उभे होते हा प्रश्न तुम्हाला का पडत नाही?
केजरीवाल झाडाजवळ गेले असते तरी मिडियाने आणि भक्तांनी धोपटणं सोडलं नसतंच. कण्टेण्ट बदलला असता फक्त. समथिंग लाइक धिस? --->
सुरेख, खरंय. रॅलीतील आत्महत्या ह्याविषयावरच्या त्याच-त्याच प्रश्नांना आता उत्तरे देणार नाही.
जॉलीजुई,
तुमचं बरोबर आहे. एका वर्षात प्रश्न सुटणार नाहीच. पण चिघळत चालला आहे त्याचं काय?
आपचे नेते झेड सिक्युरिटी घेत नाहीत.
रॅली दिल्लीत का घेतली ह्या प्रश्नाला काहीच अर्थ नाहीये. गडकरी, राहुल गांधी ह्यांनाही हाच प्रश्न विचारणार का?
मोदी का आला नाही? 70 मिनीट का
मोदी का आला नाही?
70 मिनीट का टिव्हीवर बघत बसले?
सातारकर दिल्ली सचिवालयात
सातारकर दिल्ली सचिवालयात मिडियाला बंदी का घातली हा प्र्शन फेकून निघून गेले. नंतरच्या प्रश्नांना (कदाचित त्यांच्याकडे उत्तरच नसल्याने) पद्धतशीरपणे टाळलं.
ज्यादिवशी मिडियाने ह्या गोष्टीवरून दिवसभर दळण दळलं त्यादिवशीच्या मिटींगसाठी दिल्लीसरकारने मिडियाला दिलेलं हे पत्र --->
ह्यात स्पष्टपणे मिडियाला सचिवालयात बोलवल्याचा उल्लेख आहे. मिडिया रूममध्ये पत्रकारांना यायला परवानगी होती. उद्या ते सगळ्या मिटिंग्जमध्ये बसून ब्रेकिंग न्यूज देऊ द्या म्हणून हट्ट धरून बसले तरी द्यायची का परवानगी??
ह्याविषयावर मनिष सिसोदियांनी दिलेली स्पष्ट प्रतिक्रिया.
No ban on media, public contact is priority: Manish Sisodia
सोचो, समझो. मिडियाला फक्त टीआरपी हवाय आणि तो आपच्या निगेटिव्ह बातम्या देऊन मिळवता येतो हे त्यांना माहीत झालंय.
रच्याकने, मोदींनी गुजरातमध्ये सचिवालयात मिडियाला बंदी का घातली होती ह्याचं उत्तर सातारकर देतील अशी अपेक्षा नाही.
तुमचं बरोबर आहे. एका वर्षात
तुमचं बरोबर आहे. एका वर्षात प्रश्न सुटणार नाहीच. पण चिघळत चालला आहे त्याचं काय?
चिघळत आहे अस नाही, वेळ लागत आहे........
सेझ बद्द्ल आप च काय म्हणण आहे?
आपचे नेते झेड सिक्युरिटी घेत नाही - सिक्युरिटी मज्जा म्हणून नसते, भारता सारख्या देशात गरज आहे ती..... आणि राजकारणि नाही तर विदेषी राजदूत etc.........सो आपचे नेते झेड सिक्युरिटी घेत नाही, याने दिल्लीचा ताण कमी होत नाही, आणि मध्ये AK नी vvip entrance वापरला होता -
रॅली दिल्लीत का घेतली ह्या प्रश्नाला काहीच अर्थ नाहीये. गडकरी, राहुल गांधी ह्यांनाही हाच प्रश्न विचारणार का? - हो विचारायलाच हवा....... खर तर as CM -AK नी नक्किच, दिल्ली आम आदमीला त्रास होतो....
दिल्ली रॅलीतून खरच काय achieve झाल हा प्रश्न आहे? AK typical राजकारणि नाहीयेत ना, मग नूस्त्या दिल्लीत रॅली घेउन काय साधल? AK ना स्वताचे विचार पोचवायला दूसरा मार्ग नाही का हा प्रश्न आहे?
<<चिघळत आहे अस नाही, वेळ लागत
<<चिघळत आहे अस नाही, वेळ लागत आहे........>> हे जरा स्पष्ट करून सांगाल का?
<<आपचे नेते झेड सिक्युरिटी घेत नाही - सिक्युरिटी मज्जा म्हणून नसते, भारता सारख्या देशात गरज आहे ती..... आणि राजकारणि नाही तर विदेषी राजदूत etc.........सो आपचे नेते झेड सिक्युरिटी घेत नाही, याने दिल्लीचा ताण कमी होत नाही, आणि मध्ये AK नी vvip entrance वापरला होता - >>
दिल्लीचा ताण कमी व्हायचा असेल तर बाकीच्यांनीही सुरक्षा घ्यायचं सोडायला पाहिजे. आपने सुरूवात केली आहे. लोकांनी बाकीच्यांकडेही तशी मागणी करायला हवी. बाबा रामदेव, अमित शहा, संगीत सोम असल्या लोकांसाठी विशेष सुरक्षा द्यायला टॅक्सचे पैसे का वाया घालवले जातात??? त्यांना त्यांच्याच पूर्वकर्मांमुळे जर जीवाची भिती वाटत असेल तर त्यांनी स्वतःच्या सुरक्षेचा खर्च स्वतः उचलावा. त्या पैशाचा उपयोग मरणार्या शेतकर्यांसाठी केला गेला तर माझ्यासारख्या अनेकांना निश्चितच आवडेल. पण हे आपण सरकारच्या कानावर घालू शकतोय का?? निषेध नोंदवू शकतोय का?? नाही. पण तरीही आपण जगातील सर्वांत मोठी लोकशाही (!) आहोत. आहे की नाही गंमत !
कुठल्या vvip entrance बद्दल बोलत आहात तुम्ही? बेंगलोर की तालकटोरा?
<<दिल्ली रॅलीतून खरच काय achieve झाल हा प्रश्न आहे? AK typical राजकारणि नाहीयेत ना, मग नूस्त्या दिल्लीत रॅली घेउन काय साधल? AK ना स्वताचे विचार पोचवायला दूसरा मार्ग नाही का हा प्रश्न आहे?>>
दिल्ली रॅलीतून काय अचिव्ह होणार होतं हे विचारा. तिथे आलेले शेतकरी, कार्यकर्ते आपापल्या गावी जाऊन सांगणार होते की दिल्लीमध्ये शेतकर्यांना प्रतिहेक्टर ५०,००० रूपये भरपाई दिली जाणार आहे. शिवाय ती भरपाई सरकारी अधिकारी ऑफिसमध्ये बसून नाही ठरवणार. गावात सभा होऊन लोकांसमोरच अधिकारी आणि लोक मिळून निर्णय घेणार की कुणाला भरपाईची गरज आहे. ह्या प्रकारामुळे पारदर्शकता येऊन भ्रष्टाचाराची शक्यता कमी होणार आणि खरंच नुकसान झालेल्यालाच भरपाई मिळणार. अधिकारी त्यातला 'टक्का' घेऊ शकणार नाहीत.
पण घडलेल्या प्रकाराने काय झालं? मिडियाने प्रो-शेतकरी असलेल्या केजरीवालला अॅण्टि-शेतकरी, राक्षस, खुनी वगैरे दाखवण्यात यश मिळवलं. विरोधकांना हेच हवं होतं.
आप ला नक्कीच नुकसान झालंय ह्यामुळे. गेलेली इमेज पुन्हा मिळवायला त्यांना आणखी कष्ट करावे लागतील. पण हरकत नाही. विरोधकांनी मिडियाच्या मदतीने अकेची 'भगोडा' म्हणूनही अशीच प्रतिमा बनवण्यात यश मिळवलं होतं. पण उलट त्यांचेच चांगले तीन तेरा (सॉरी ३/७०) वाजलेले दिसलंच आहे.
असल्या संकंटांचा सामना करावाच लागणार हे 'इन्किलाब झिंदाबाद' ची घोषणा देणार्यांना पक्कं माहीत असतं.
असो.
वे टु गो आप.
Subsidy on free water scheme may go soon
ही बातमी वाचून जेरीसारखी 'पियुssविक' म्हणून शिट्टी मारावीशी वाटली
डीजेबीला (दिल्ली जल बोर्ड) दरवर्षी भ्रष्टाचार आणि अनागोंदी कारभार ह्यामध्ये सुमारे १००० कोटींचा तोटा होतो. पाण्याच्या सबसिडीसाठी सरकारला दरवर्षी २५० कोटी लागणार आहेत. डीजेबीची पैसागळती थांबवली की सरकारची सबसिडी नक्कीच थांबू शकते.
सध्या डीजेबीचे उपाध्यक्ष असलेले कपिल मिश्रा हे आपमधल्या माझ्या आवडत्या आमदारांपैकी अजून एक. रोखठोक विचार. कामाचा आवाका पण भारी आहे.
Pages