अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग २

Submitted by मिर्ची on 14 February, 2015 - 06:14

दिल्लीमध्ये आज आपच्या सरकारची दुसरी इनिंग चालू झाली आहे. योगायोगाने मायबोलीवरच्या धाग्याचाही दुसरा भाग आज चालू होतो आहे. गेले वर्षभर अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही अरविंद केजरीवाल आणि आपने दिल्ली विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवून ज्या दिमाखात पुनरागमन केलं आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे.
सर्वात महत्वाची आणि पक्षनिरपेक्ष अशी गोष्ट म्हणजे देशातील सर्वांत स्वच्छ, सर्वात तरूण आणि सर्वात जास्त शिक्षित विधानसभा आपच्या निमित्ताने दिल्लीकरांना आणि पर्यायाने देशाला मिळाली आहे. राजकारणामध्ये चालू असणार्‍या ह्या सकारात्मक बदलाकडे लक्ष ठेवून आपली मते इथे मांडूया.

* टीप - इथे विरोधी मतांचंही स्वागत आहे. वैयक्तिक शेरेबाजी टाळण्याची आणि सभ्य भाषा वापरण्याची सर्वांना विनंती.
** पहिला भाग इथे वाचता येईल.

पान १७ - योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण ह्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून काढल्याबद्दलची चर्चा
पान २४ - योगेंद्र यादव बोलले ते खरं की खोटं?
पान ३१ - आपमधील नेत्यांच्या ट्वीटर हॅण्डल्सची यादी
पान ५५ - दिल्लीतील नगरपालिका आणि कचर्‍याचं राजकारण
.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला एक समजत नाहिये, की नक्की काय सुरू आहे?

स्टेजवरून ऑडियन्समधे नक्की काय चाललं आहे ते कसं समजतं? .

स्टेडियममधे बसून हातात दूर्बीण नसेल तर क्रिकेटही नीट दिसत नाही. मग केजरीवाल स्टेजवरून भाषण करत असताना त्यांना तिकडे दूर झाडावर कुणीतरी आरडाओरडा करून सभा डिसरप्ट करायचा प्रयत्न करतो आहे, इतकेच समजेल ना?

स्टेडियममधे बसून हातात दूर्बीण नसेल तर क्रिकेटही नीट दिसत नाही. मग केजरीवाल स्टेजवरून भाषण करत असताना त्यांना तिकडे दूर झाडावर कुणीतरी आरडाओरडा करून सभा डिसरप्ट करायचा प्रयत्न करतो आहे, इतकेच समजेल ना?
<<
>>
याला म्हणतात अर्धवट ज्ञान. Lol

त्या स्टेजपासून तो शेतकरी चढलेला झाड फक्त चालत २५ ते ३० सेंकदच्या अंतरावर होते, हे कालपासून सर्व प्रसारमाध्यम ओरडुन सांगतायत.

<<त्या स्टेजपासून तो शेतकरी चढलेला झाड फक्त चालत २५ ते ३० सेंकदच्या अंतरावर होते, हे कालपासून सर्व प्रसारमाध्यम ओरडुन सांगतायत.>>

समोर १०,००० च्या आसपास लोक बसले होते हे किती जणांनी सांगितलं?
पोलिस झाडाजवळ उभे राहून निर्लज्जपणे हसत होते हे किती जणांनी सांगितलं??

cruel police.jpg

पोलिसवाला आहे का तो ? टोपी मिलिटरीची का घातली आहे त्याने ?

पण जर तुम्ही म्हणत आहात म्हणजे तो पोलिसच असला पाहीजे !

+++++त्या स्टेजपासून तो शेतकरी चढलेला झाड फक्त चालत २५ ते ३० सेंकदच्या अंतरावर होते, हे कालपासून सर्व प्रसारमाध्यम ओरडुन सांगतायत.+++++++

हे प्रत्यक्ष पुण्यप्रसुन वाजपेयी ने स्टॉपवॉच लावुन अंतर टीव्हीवर मोजुन दाखवल होत.

हा publicity stunt असू शकतो ना.....किती लोकानी ( आप )/ पोलिसानी seriously घेतल असेल, कोणी अस खरच करेल ? अजून एक जर हे भाजप / congress च्या सभेत झाल असत तर आरोप प्रत्यारोप उलट झाले असते फक्त (ids would have said exactly opposite things), याला काय म्हणाव?

एखाद्या माणसाने आत्महत्या केली आणी तरीही केजरीवालांनी रॅली सुरुच ठेवली ? ज्या शेतकर्‍यांसाठी रॅली काढली किमान त्यांच्यासाठी तर रॅली ताबडतोब थांबवायला हवी होती. केजरीवालांनी एवढी तरी संवेदना दाखवायला हवी होती.
हा तर मढ्याच्या टाळुवरच लोणी खाण्यासारखा प्रकार झाला Sad

आपला मिडिया काय दाखवत आहे, कशावर फोकस करत आहे हे इथले सगळे पाहतच आहेत. जरा ह्याच्यावरही नजर घालुन घ्या.
१. Kejriwal's protest marred by tragedy as farmer hangs himself in public during AAP's rally against Land Bill - Dailymail.co.uk
२. Farmer kills himself steps from India’s Parliament - washingtonpost
३. Indian farmer kills himself during New Delhi land reform protest - The Guardian
४. 3. Distraught farmer kills himself steps from India's Parliament to protest plight of India's farmers - Sydney Herald

आपला मिडिया संपूर्ण लक्ष 'केजरीवाल राक्षस आहे' ह्यावर वळवून शेतकर्‍यांचा प्रश्न दाबून टाकायचा प्रयत्न करत आहे. का लक्षात येत नाहीये हे?

gobel.jpg

कालपासून खूप चिडचिड झाली आहे. त्याचा परिणाम होऊ न देता लिहायचा प्रयत्न करतेय.
कालच्या रॅलीत घडलेली घटना नेमक्या कुणाच्या चूकीमुळे घडली ह्याबद्दल तपास होईलच. पण रॅलीच्या थेट प्रक्षेपणाचा व्हिडिओ पाहून आणि इतर बातम्या वाचून सगळ्या घटनेचं वर्णन लिहीत आहे.

१. ८-१० दिवसांपूर्वीच भूमी अधिग्रहण कायद्याविरोधातच संसदेपासून राष्ट्रपती भवनापर्यंत सर्वपक्षीय मोर्चा झाला होता. सत्ताधारी पक्षाच्या विरोधातील सर्व पक्ष त्यात सामील होते. काल आपच्या सभेनंतर संसद मोर्चासुद्धा होणार होता. पण पोलिसांनी परवानगी नाकारली. कारण माहीत नाही. त्यानंतर आपने फक्त जंतर-मंतरवरच सभा घ्यायचा निर्णय घेतला.

२. सभा सुरू व्हायच्या आधीच बातम्या यायला लागल्या की अकेने मिडियाला माझ्याजवळ येऊ देऊ नका असं पोलिसांना सांगितलं आहे. मुख्यमंत्री ऑफिसकडून हे नाकारल्यानंतर पोलिस म्हणायला लागले की ही कागदपत्रे गोपनीय असतात, दाखवता येणार नाहीत !

३. निवडून आल्यावर लगेचच दिल्ली सरकारने आदेश काढला होता की सगळ्या प्रकाराचा व्यवस्थित आढावा घेतल्याशिवाय कुठल्याही तात्पुरत्या कर्मचार्‍याला कामावरून काढून टाकलं जाणार नाही. डॉक्टर्स, नर्सेस, शिक्षक, सफाई कर्मचारी सगळ्यांचा ह्यामध्ये समावेश होता.
ह्या आदेशानंतरही हे शिक्षक वरचेवर निदर्शने करत राहिले. ४-५ दिवसांपूर्वी मनिष सिसोदियांच्या घराबाहेर घेरावही केला होता. त्यावेळी पोलिसांनी काहींना पकडलं होतं. नंतर भाजपाच्या सतिश उपाध्यायच्या मध्यस्थीने ह्या शिक्षकांना सोडून देण्यात आलं होतं.
एवढ्या वेळा स्वतःच्या मागण्या मांडून झालेली असूनसुद्धा कालच्या शेतकर्‍यांच्या प्रश्नासाठी आयोजित केलेल्या सभेमध्ये ह्या शिक्षकांनी येण्याचं कारण काय होतं?
"केजरीवाल हाय हाय" "केजरीवाल होश में आओ, अपने वादों से मुकर न जाओ" अशा घोषणा देत काळे झेंडे दाखवत होते.
ह्या 'शिक्षकां'मध्ये भाजपाचे सक्रिय सदस्य होते.

४. कुमार विश्वास बोलायला उभे राहिले तेव्हा झाडावर कोणीतरी चढून बसलेलं दिसलं. निदर्शन करणारा एखादा शिक्षक वर चढला आहे असा त्यांचा समज झाल्याचं त्यांच्या बोलण्यावरून स्पष्ट कळतंय. ते वारंवार शिक्षकांना सांगत आहेत की आपण नंतर पुन्हा भेटू, पुन्हा चर्चा करू. आजचा दिवस शेतकर्‍यांच्या प्रश्नावर चर्चा चालली आहे, तुम्ही त्यात विघ्न आणू नका. पोलिस नुसते बघत उभे आहेत हे दिसल्यावर केव्ही चिडलेले स्पष्ट दिसत आहे. त्यांनि पोलिसांना आणि निदर्शने करणार्‍या शिक्षकांना कडक शब्दांत ऐकवायला सुरूवात केली. वारंवार सांगितलं की त्या व्यक्तीला खाली उतरवा. नुसते बघत उभे राहू नका. त्या पूर्ण वेळात कोणीही भाषणबाजी करत नव्हतं. तेवढ्या वेळात जमाव संतापून 'दिल्ली पोलिस हाय हाय' च्या घोषणा चालू झाल्या होत्या. नंतर संजयसिंगने माइक हातात घेऊन निदर्शने करणार्‍या शिक्षकांना आणि सगळ्यांना सांगायला सुरूवात केली की पोलिसांशी कन्फ्रण्ट करू नका. आधी त्या व्यक्तीला खाली घ्या. जो कोणी जिथे आहे त्या जागी खाली बसा, कार्यकर्त्यांसाठी जायला वाट द्या.

हे सगळं होईपर्यंत नेमकं काय आणि किती तीव्रतेची घटना घडली आहे हे स्टेजवरील कोणालाही कळल्याचं दिसत नव्हतं. सगळेच कन्फ्युज्ड दिसत होते.

५. सगळ्या घटनेनंतर सुमारे ४५-५० मिनिटानंतर केजरीवालांनी बोलायला सुरूवात केली.
"It was around 2.30pm — almost an hour since the chaos had begun and half-an-hour since the victim had fallen from the tree — that Delhi Chief Minister Arvind Kejriwal began his address during which he said he would immediately rush to the hospital to see the victim."

२:५६:२५ पासून ३:०९:०० पर्यंत ---मोजून १५ मिनिटे. काय बोलले? मला मतं द्या? मला पंतप्रधान बनवा, मी तुम्हाला बुलेट ट्रेन देतो, स्मार्ट सिटी देतो?
देशभरातून शेतकरी आलेले होते. अके पूर्ण १५ मिनिटे फक्त शेतकर्‍यांच्या प्रश्नावरच बोलत होते. बोलायलाच हवं होतं.

भाजपाला वाटत असेल की ह्या सगळ्या प्रकाराने शेतकर्‍यांचं आंदोलन दाबलं जाईल. असं अजिबात होणार नाही. ज्याला जगणं अशक्य झालंय तो आता भाजपाच्या खोट्या मुखवट्याला फसणार नाही. दिल्लीत फुटला तसा भाजपाच्या भ्रमाचा भोपळा फुटण्याचा दिवस दूर नाही. वेट अँड वॉच !

आणि आत्तापर्यंतचा अनुभव असा आहे की विरोधक आपविरुद्ध जितकी कारस्थाने करतात ती त्यांच्यावरच बॅकफायर होतात.
निर्भयाच्या वेळीसुद्धा पोलिसांनी IAC च्या ८ कार्यकर्त्यांना कॉन्स्टेबलच्या मृत्यूच्या खोट्या केसमध्ये अडकवलं होतं. कोर्टात त्यांचं खोटं उघडकीला आलं. आत्तासुद्धा तोच प्रयत्न चालू आहे.

<<हा तर मढ्याच्या टाळुवरच लोणी खाण्यासारखा प्रकार झाला>>

शेतकर्‍यांच्या हक्कासाठी लढणं म्हणजे मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणं नव्हे.

bjp.jpg

ह्या नेत्यांना लवकर सद्बुद्धी मिळो.

मढ्याच्या टाळुवरच लोणी खाण्याचा प्रकार नाहीतर काय आहे हा ? केजरीवालांनी ताबडतोब रॅली थांबवुन त्या माणसाची विचारपुस करण्यासाठी जायला हवं होतं.
फेसबुकवर वाचलं की अण्णा हजारेंना पण ११ दिवस उपोषण करायला भरीस पाडलं गेलं होतं ? खरं आहे का हे ?

<<फेसबुकवर वाचलं की अण्णा हजारेंना पण ११ दिवस उपोषण करायला भरीस पाडलं गेलं होतं ? खरं आहे का हे ?>>

आणि डायबिटीस असताना केजरीवालांना १३ दिवस उपोषण करायला कोणी भरीस पाडलं? केजरीवालांनीच. हो ना? अगदी निर्दयी मनुष्य आहे.
संबित पात्रा म्हणाला तसं लवकरात लवकर गुन्हा सिद्ध करून त्याला सूळावर चढवून टाका. म्हणजे भारतातील सगळे प्रश्न चुटकीसरशी सुटतील. विकासाच्या रस्त्यात नसती धोंड !

वेल सेड
या निर्लज्जपणाचा बुरखा काढायलाच हवा
पेड आर्मी द्वारे सर्वत्र खोट्या बातम्या पसरवण्याचे काम जोमात सुरू आहे. दिल्ली निवडणूक नंतर बेकारांना काम मिळाले

छे छे! मोदी बोलताहेत का ते? मग ते माफ.
अहो ते त्यांचे व्यक्तीगत मत आहे. त्याच्याशी मोदींचा काय संबंध? मोदींचा भारताशी, भारताचा मोदी सरकारशी, सरकारचा लोककल्याणाशी काय संबंध? इ.

अवांतर माहिती : एक विकृत व्यक्तीमत्व दुसर्‍या स्वभावापासून फारकत घेऊन जेव्हा कुणाचेही अस्तित्व बनते, त्याला schizophrenia म्हणतात.

टीप : भाजपा सरकारच्या दुतोंडीपणाशी या व्याख्येचा काहीही संबंध नाही.

मिर्ची तै,

आम आदमीच्या १०,००० लोकांच्या समोरच एक आम आदमी शेतकर्यांने आत्महत्या केलेली आहे, तुमच्या ईथल्या
सर्व प्रतिक्रीयांना सारवासारव अस म्हणता येईल.

तुम्हाला कोणात्याही आआपच्या नेत्याच्या कोणत्याही व्यक्तव्यात जराही चुक दिसली नाही ?

आशुतोष आणी कुमार विश्वासने देशाकडुन जाहीर माफी मागीतलीय !! कदाचीत तुमच्या मते ते चुक नव्हतेच !!

दुर्दैवी घटना. आपला ह्या घटनेचे जबाबदार ठरवणार्‍यांचे खरोखर आश्चर्य वाटते. आखीर किस मिट्टी के बने है ये लोग. Sad

बुधवारी आम आदमी पार्टीच्या जंतरमंतर येथील रॅलीत गजेंद्र सिंग राजावत या शेतकर्‍याने केलेल्या आत्महत्येच्या प्रकरणात पोलिसांनी आज गुन्हा दाखल केला. त्यात ‘आप’च्या कार्यकर्त्यांवर त्या शेतकर्‍याला आत्महत्येसाठी चिथावल्याचा आणि त्याला वाचवण्याचे पोलिसांचे प्रयत्न हाणून पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे.

<<कुमार विश्वास यांनी सुसाईड नोट स्टेजवरुन वाचली का ? ती त्यांच्यापाशी कशी पोहोचली ?>>

नाही. नोट त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही. टीव्हीवर दाखवलेल्या बातमीतून त्यांनी वाचून दाखवली. व्हिडिओमध्ये त्यांनी तसं सांगितलंसुद्धा आहे. (थेट प्रक्षेपणाच्या व्हिडिओत. नंतर मुलाखतीत नव्हे.)

तिथे उपस्थित असलेल्यांपैकी दोन व्यक्तींचे लेख -
१. An Eyewitness Account Of Jantar Mantar Farmer Suicide - हे लिहिणारा आपसमर्थक आहे. त्यामुळे बायस्ड असेल असं म्हणू शकता.
२. suicide at farmers protest - हे तिथे उपस्थित असलेल्या reuters च्या पत्रकाराने लिहिलं आहे. त्यामुळे बायस्ड असण्याचं काही कारण नसावं.

राजनाथ सिंगांचा खोटारडेपणा लपून राहिलेला नाही. गृहमंत्रीच धडधडीत खोटं बोलतोय म्हटल्यावर गुन्हेगारांचं मनोबल शंभर पटीने वाढलं असेल. गुन्हेगारीमुक्त शांत समाजासाठी भारतीयांना शुभेच्छा !

राजनाथ सिंगांचा खोटारडेपणा लपून राहिलेला नाही. गृहमंत्रीच धडधडीत खोटं बोलतोय म्हटल्यावर गुन्हेगारांचं मनोबल शंभर पटीने वाढलं असेल. गुन्हेगारीमुक्त शांत समाजासाठी भारतीयांना शुभेच्छा !
<<
>>
अच्छा! राजनाथसिंग खोटे बोलतायत, मग तुमचे श्रद्धास्थान केजरीवाल काल पर्यंत काय बोलत होते. आणि आज काय बोलतायत ते पहा.
>>
गजेंद्रने गळफास घेतलेल्या ठिकाणापासून स्टेज बऱ्याच अंतरावर होते. तेथे नेमके काय सुरू आहे हे दिसत नव्हते. तरी या घटनेनंतर भाषण सुरू ठेवणे ही माझी चूक होती, असे केजरीवाल यांनी सांगितले. या रॅलीमुळे जनतेच्या भावना दुखवल्या असतील तर मी माफी मागतो. मात्र यासाठी कोणाला दोषी ठरवणे योग्य नाही. पोलिसांना सुद्धा दोष देता येणार नाही.
>>

राजनाथ सिंगांचा खोटारडेपणा लपून राहिलेला नाही. गृहमंत्रीच धडधडीत खोटं बोलतोय म्हटल्यावर गुन्हेगारांचं मनोबल शंभर पटीने वाढलं असेल. गुन्हेगारीमुक्त शांत समाजासाठी भारतीयांना शुभेच्छा !
<<
<<
"मेरा कुर्ता तुमसे जादा सफेद है" हे दाखवायचा किती तो अट्ठहास. Proud

अलवर में एक किसान ट्रेन के सामने कूद कर मर गया...लेकिन मीडिया में बहस नहीं...क्योंकि ट्रेन में अरविन्द केजरीवाल नहीं था..

Rofl

farmers suicide.jpg

बहोत हुआ किसानों पे अत्याचार.....:(

बाहेरचे लोक भ्रमातून बाहेर यायला सुरूवात झाली आहे. इथल्यांचे डोळे लवकर उघडोत ही सदिच्छा.
"So far, the new government has done nothing but talk, and it is a shame because Modi had experience; he said he knew what needs to be done. He campaigned for many months saying he knows how to fix India, but he has done very little. Cleaning toilets is wonderful, but as far as building the economy or changing India (goes), he has not done very much."
अहो, नुसते 'ते' म्हणाले नाहीत, आमच्या गुलाम मिडियाने ते सगळं मधात घोळवून आमच्यावर हॅमर केलं.
भक्तों, चालू हो जाओ, जिम रॉजर्स सीआयए एजंट है....

Pages