अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग २

Submitted by मिर्ची on 14 February, 2015 - 06:14

दिल्लीमध्ये आज आपच्या सरकारची दुसरी इनिंग चालू झाली आहे. योगायोगाने मायबोलीवरच्या धाग्याचाही दुसरा भाग आज चालू होतो आहे. गेले वर्षभर अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही अरविंद केजरीवाल आणि आपने दिल्ली विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवून ज्या दिमाखात पुनरागमन केलं आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे.
सर्वात महत्वाची आणि पक्षनिरपेक्ष अशी गोष्ट म्हणजे देशातील सर्वांत स्वच्छ, सर्वात तरूण आणि सर्वात जास्त शिक्षित विधानसभा आपच्या निमित्ताने दिल्लीकरांना आणि पर्यायाने देशाला मिळाली आहे. राजकारणामध्ये चालू असणार्‍या ह्या सकारात्मक बदलाकडे लक्ष ठेवून आपली मते इथे मांडूया.

* टीप - इथे विरोधी मतांचंही स्वागत आहे. वैयक्तिक शेरेबाजी टाळण्याची आणि सभ्य भाषा वापरण्याची सर्वांना विनंती.
** पहिला भाग इथे वाचता येईल.

पान १७ - योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण ह्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून काढल्याबद्दलची चर्चा
पान २४ - योगेंद्र यादव बोलले ते खरं की खोटं?
पान ३१ - आपमधील नेत्यांच्या ट्वीटर हॅण्डल्सची यादी
पान ५५ - दिल्लीतील नगरपालिका आणि कचर्‍याचं राजकारण
.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

राजनाथ सिंगांचा खोटारडेपणा लपून राहिलेला नाही. गृहमंत्रीच धडधडीत खोटं बोलतोय म्हटल्यावर गुन्हेगारांचं मनोबल शंभर पटीने वाढलं असेल. गुन्हेगारीमुक्त शांत समाजासाठी भारतीयांना शुभेच्छा !!!!

भयाण व्यक्तीपूजक आहात तूम्ही.........आणि व्यक्तीपूजक व्रूत्ती मधून गुन्हेगारीला ब़ळ मिळत कारण आपला मा णूस चू कणारच नाही याची १००% खात्री!!!!!!!!

गजेंद्रच्या कुटुंबियांची ‘आप’वर टीका

गजेंद्रसिंह यांचे भाऊ विजेंद्रसिंह म्हणाले, 'या घटनेसाठी व्यक्तिगतरित्या अरविंद केजरीवाल यांना जबाबदार धरले आहे. मनिष सिसोदिया यांनी गजेंद्रला बुधवारच्या मेळाव्यात उपस्थित राहण्यास सांगितले होते.' पोलिस आणि पक्षकार्यकर्त्यांनी वेळेवर कृती केली असती, तर गजेंद्रचे प्राण वाचवता आले असते, अशी टीका गजेंद्रच्या नातेवाईकांनी केली.

++++++++++राजनाथ सिंगांचा खोटारडेपणा लपून राहिलेला नाही. गृहमंत्रीच धडधडीत खोटं बोलतोय म्हटल्यावर गुन्हेगारांचं मनोबल शंभर पटीने वाढलं असेल. गुन्हेगारीमुक्त शांत समाजासाठी भारतीयांना शुभेच्छा !+++++++++++

गुन्हेगारांचं मनोबल शंभर पटीने वाढु नये अस वाटत असेल तर !!

धडधडीत खोटं न बोलणारे मंत्री हवे असतील तर !!

सर्व गोष्टित घोटाळे होउ नये अस वाटत असेल तर !

अशा सोडुन द्या !! हे काही होणार नाही !!

<<भयाण व्यक्तीपूजक आहात तूम्ही.........आणि व्यक्तीपूजक व्रूत्ती मधून गुन्हेगारीला ब़ळ मिळत कारण आपला माणूस चूक करणारच नाही याची १००% खात्री!!!!!!!!>>

पूर्ण व्हिडिओ पाहिलाय का? तो पाहूनही तुम्हाला वाटत असेल की पोलिसांनी प्रयत्न केले आणि लोकांनी त्यांच्या कामात अडथळा आणला तर कठीण आहे.
खरं बोलणार्‍याची बाजू घेणे म्हणजे व्यक्तीपूजा असेल तर....कॉल मी दॅट. आय डोण्ट केअर.

<<गजेंद्रसिंह यांचे भाऊ विजेंद्रसिंह म्हणाले, 'या घटनेसाठी व्यक्तिगतरित्या अरविंद केजरीवाल यांना जबाबदार धरले आहे. मनिष सिसोदिया यांनी गजेंद्रला बुधवारच्या मेळाव्यात उपस्थित राहण्यास सांगितले होते.'>>

गजेंद्रच्या कॉलहिस्टरीमध्ये कुठल्याही आपनेत्याला फोन केल्याचं आढळलेलं नाही. आयबीएनने ही बातमी दिली आणि लगेच उडवून टाकली. का उडवली हे लक्षात येत नसेल तर अवघड आहे. आणि लक्षात येतंय पण तरीही काही चूक वाटत नसेल तर त्याहून अवघड आहे.

dilip pandey.jpgप्रश्न अभी भी जिंदा है....

+++++++++गजेंद्रच्या कॉलहिस्टरीमध्ये कुठल्याही आपनेत्याला फोन केल्याचं आढळलेलं नाही. आयबीएनने ही बातमी दिली आणि लगेच उडवून टाकली.++++++++++++

कारण कॉल हिस्टरीत आपनेत्याला फोन केला नसल्याच आढळणे हा आआपनेत्याम्शी कम्युनिकेशन नसल्याचा पुरावा होउ शकत नाही. आआप नेत्याने कोणाच्या ही मार्फत त्याला तिथे बोलावलेले असु शकते, तिथे बोलावुन त्याला चिथावणी देउन आत्महत्या करण्यास भाग पाडल असेल !!

शेवटी शेतकरी आत्महत्या करतात ह्याचा आआप ला पुरावा हवा होता !!

बर मग आपच्या नेत्यांनी गेल्या दोन-चार दिवसात आणि खासकरुन त्या शेतकर्‍याच्या आत्महत्येनंतर केलेले अनेक ट्विट का बरे डिलीट केले.

Probably the tweets were not 'politically correct'. Their own views about the incidence. They should not have tweeted.

Why does a news channel have to be politically correct ???

I hate to type from phone. Nantar lihite.

पोलिस उपस्थित असताना इतरांनी लुडबुड करू नये. आपच्या समर्थकांनी बघ्याची भूमिका घेतली असेल तर माझा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे.

पोलिसांच्या समक्ष मदत करण्याचा प्रयत्न केल्यावर मिळालेल्या प्रसादाचा प्रत्यक्ष अनुभव गाठीशी.

मी कालच लिहील आहे कि हा publicity stunt असू शकतो.....किती लोकानी ( आपच्या )/ पोलिसानी seriously घेतल असेल, कोणी अस करेल? त्यालाही नसेल करायची वाटल असेल लोक वाचवतील.........
गजेंद्र
१० एकर शेत, २ फळबागाचा मालक.
फेटा बांधायाचा व्यावसाय करत होता.
समाजवादी पार्टीतून २ वेळा निवडणूक लढला.
कॉंग्रेस मध्ये गेला होता.
झी न्यूज (२३/०४/१५) दाखवलायानुसार, त्याचा भाऊ सांगतो आत्महत्येच्या चिट्ठीतले अक्षर त्याचे नाही, पुरावा
म्हणून त्याचे हस्ताक्षार दाखवले.

सत्य खूप वेगळ असणार आहे........................

पूर्ण व्हिडिओ पाहिलाय का? तो पाहूनही तुम्हाला वाटत असेल की पोलिसांनी प्रयत्न केले आणि लोकांनी त्यांच्या कामात अडथळा आणला तर कठीण आहे.
खरं बोलणार्‍याची बाजू घेणे म्हणजे व्यक्तीपूजा असेल तर....कॉल मी दॅट. आय डोण्ट केअर.

मी कालच लिहील आहे कि हा publicity stunt असू शकतो.....किती लोकानी ( आपच्या )/ पोलिसानी seriously घेतल असेल, कोणी अस करेल? त्यालाही नसेल करायची वाटल असेल लोक वाचवतील.........
गजेंद्र
१० एकर शेत, २ फळबागाचा मालक.
फेटा बांधायाचा व्यावसाय करत होता.
समाजवादी पार्टीतून २ वेळा निवडणूक लढला.
कॉंग्रेस मध्ये गेला होता.
झी न्यूज (२३/०४/१५) दाखवलायानुसार, त्याचा भाऊ सांगतो आत्महत्येच्या चिट्ठीतले अक्षर त्याचे नाही, पुरावा
म्हणून त्याचे हस्ताक्षार दाखवले.

सत्य खूप वेगळ असणार आहे........................

मी कालच लिहील आहे कि हा publicity stunt असू शकतो >>>>>
अहो तो माणुस काय गरीब बिचारा शेतकरी दिसत होता का? मस्त रंगीत फेटा वगैरे लावून आला होता.

झाडावर सुरपारंब्या खेळु आणि पुढच्या निवडणुकीचे तिकीट मिळवू अशी आयडीया होती, पण झाले वेगळेच.

टोच्या,

तुम्ही सुपर पत्रकार दिसताहात !!

ज्याचा काही पुरावा नाही त्या गोष्टीही तुम्ही छाती ठोक पणे सांगताहात !!

That doesn't mean AK is right and police/BJP is wrong or AK is wrong and police/BJP is right.. or in this matter congress is wrong as he was in Congress before. ..........this is wht I am trying to say, consider it as a situation.......

एक्झॅक्टली माय पॉइंट.
मग का सगळे केजरीवालच्या मागे लागले आहेत हात धुवून? मिडिया आणि इथले विचारी लोक?
थोडा सत्य बाहेर येईपर्यंत धीर धरायला काय हरकत आहे? मिडियाला त्यांचं पोट भरायचं आहे, आपल्याला काय मिळणार आहे असं करून?

<<सत्य खूप वेगळ असणार आहे........................>>

पटतंय ना?

तुम्हाला आजपर्यंत मोदी बँशीग करताना पटल होत ?

सातारकर,
मोदींवर बिनबुडाचे, अर्वाच्य भाषेत आरोप केलेली एक तरी पोस्ट दाखवून द्या. एक महिना धागासंन्यास घेईन. तेवढीच तुम्हाला शांती. Wink
मोदी खोटं बोलतात हे मी पहिल्यापासून म्हणते आणि अजूनही म्हणते. हवे असतील तर निसंदिग्ध १० पुरावे देऊ शकेन. आणि खोटं बोललेलं उघड करणं म्हणजे बॅशिंग नव्हे.

OK , द्या

मोदी खोट बोलतात त्याचा पुरावा द्या, पण भाषणात बोलताना झालेल्या चुका ( इतिहास / भुगोलाच्या) हे
सांगु नका !!

आता बिन बुडाच्या पोष्टी दाखवा म्हणुन पाठ फिरवु नका !!

तुम्ही म्हंटल्या प्रमाणे तुम्हाला चॅलेंज केलय !

मिर्ची ताई तुम्ही कशाला डीफ़ेंड करत आहात?

केजरीवाल यांनी माफ़ी मागितली तरी. एवढी सेंसेटीवीटी दाखवली.
बाकी आज पर्यंत इतक्या आत्महत्या झाल्या कोणी इतक्या वर्षात लोकांची माफ़ी मागितली?

हे राजकारण आहे ते तसच चालणार.

तरी सुद्धा तुमच्या या वाक्याने मला धक्का बसला. एका वाक्यात तुम्ही या धाग्याचा भाग १ आणि दोन यावर जे काही लिहीलत त्यावर बोळा फ़िरवलात

<<इस देश का कुछ नहीं हो सकता.....आपच्या नेत्यांनी आपला वेडपट प्रयत्न सोडून द्यावा आणि आमच्यासारखंच परदेशात जाऊन रहावं. आपलं आयुष्य आरामात जगावं. भारतीयांना खोटारडे आणि गुन्हेगार नेतेच हवे आहेत. ते त्यांना लखलाभ असोत. दुसर्‍यांच्या घरात लागलेली आग स्वतःपर्यंत पोहोचत नाही तोवर त्यांचे डोळे उघडणार नाहीत.>>

या धाग्यावर हा मूद्दा तूम्ही सूरु केलात ना पान ३४ वर.......23 April, 2015 - 13:16 ला......कहर म्हणजे देशाचे गृहमंत्रीच भर संसदेत खोटं बोलत आहेत (हे तूमच मत झाल लगेच????????)..............त्या नतर zee news video आला....................मग BJP against सूरुच झालात तूम्ही.......'' भाजपाला वाटत असेल की ह्या सगळ्या प्रकाराने शेतकर्‍यांचं आंदोलन दाबलं जाईल. असं अजिबात होणार नाही. ज्याला जगणं अशक्य झालंय तो आता भाजपाच्या खोट्या मुखवट्याला फसणार नाही. दिल्लीत फुटला तसा भाजपाच्या भ्रमाचा भोपळा फुटण्याचा दिवस दूर नाही. वेट अँड वॉच !
आणि आत्तापर्यंतचा अनुभव असा आहे की विरोधक आपविरुद्ध जितकी कारस्थाने करतात ती त्यांच्यावरच बॅकफायर होतात................. याच काय???

<<तरी सुद्धा तुमच्या या वाक्याने मला धक्का बसला. एका वाक्यात तुम्ही या धाग्याचा भाग १ आणि दोन यावर जे काही लिहीलत त्यावर बोळा फ़िरवलात>>

युरो, सहनशक्ती संपण्याचे झटके येतात अधनंमधनं असे. पण फारवेळ टिकत नाहीत. Happy

जॉलीजुई,
तुम्ही व्हिडिओ पाहिलेला नाही असं वाटतंय. त्या व्हिडिओमध्ये आणि इतर फोटोंमध्ये जे दिसतंय त्यावरून पोलिसांची FIR आणि राजनाथसिंगांचं विधान खोटं आहे हे म्हणायला कुठल्या चौकशीची गरज नाही. स्पष्ट दिसतंय समोर सगळं.

झी न्युजचा 'लटक गया' व्हिडिओ हा शुद्ध नालायकपणा आहे. त्यामुळे उद्वेगात पुढची वाक्ये आली.

एकंदरीतच जे झाले ते वाईट झाले. केजरीवाल यांनी माफी मागून किमान आपला संवेदनशीलपणा आणि प्रामाणिकपणा दाखवला.

--
झी न्युजचा 'लटक गया' व्हिडिओ हा शुद्ध नालायकपणा आहे
--
>> ते पाहिल्यावरच एडिटिंग आहे दिसून येते.

तो आशुतोष मिडीया समोर अगदी धाय मोकलुन रडला हा व्हीडीओ सुद्धा खोट्टा होता का ?

ते सर्व खरे आणी मिडीया आणी बाकिचे तेव्हडे खोटार्डे मग रडायच कारण काय ?

ते सर्व खरे आणी मिडीया आणी बाकिचे तेव्हडे खोटार्डे मग रडायच कारण काय ?

>>

त्यांनाच विचारा. ते सांगतील. इथ मोठ्ठ मोठ्ठ लिहून काय फायदा?

Pages