निसर्गाच्या गप्पांचा धागा २३ व्या भागामध्ये पदार्पण करत आहे. सगळ्या निसर्गाच्या गप्पांच्या सदस्यांचे हार्दिक अभिनंदन.
"हिवाळा" हा सगळया ऋतुंमधे आल्हाददायक ऋतु वाटतो. हिवाळ्याची पहाट खुपच रम्य वाटते. पहाटे सभोवताल पसरलेले धुके, गार वारं, पक्षांचा किलबिलाट, गाईचे हंबरणे, कोवळ्या उन्हाचा किरणोत्सव, आंगणात पेटवलेल्या चुलीचा धुर,वाफाळता चहा.. सगळेच कसे रमणिक आणि प्रसन्न वाटते.
हिवाळ्यात थकवा, चिडचिड जाणवत नाही, शीण येत नाही, एरवी नकोस झालेले उन सुदधा हवेहवेसे वाटते. या दिवसात अहार वाढलेला असतो तसेच पचन शक्ती पण चांगली असते. या ऋतूत सशक्त होऊन ही ताकद साठवुन वर्षभर पुर्वायची असते..
तसेच थंड हवामानामुळे या दिवसात फळ भाज्यांची रेलचेल असते.. पेरु,सिताफळे,पपई,, चिक्कु अशा मधुर फळाची मेजवानी असतेच जोडीला संत्रे, मोसंबी अशी निमफळ पण चाखायला मिळतात. थंडी मुळे फुला - फळांचे रंग अधिकच गडद आणि लोभस वाटतात.
या दिवसात काही झाडांची पान गळती असते तर..काही झाडे ओसंडुन बहरत असतात.
एकी कडे बुची , पारिजातकांचे सुगंधीत सडे पडलेले असतात तर दुसरीकडे शेवंती, चमेली, सायली नटलेली दिसते..
तर असाहा सुगंधोत्सव कधीच संपु नये असे वाटते...
आपण सगळे नुकतीच दिवाळी जलौषात साजरी करुन एका वेगळ्याच जोशात कामाला लागलेले असतो... आता वेद लागतात ते तुळशीच्या लग्नाचे! आपले सगळे सण समारंभ निसर्गाशीच निगडीत आहेत.. उदा. कार्तीक महिन्यातच तुळशी विवाहा असण्याचे कारण असे की या महिन्यात तुळस बहरलेली असते , तिला भरपुर पान आणि मंजीर्या आलेल्या असतात.. म्हणजेच विवाहा योग्य झालेली असते... या सणाच्या निमित्याने कन्या योग्य वयात आल्यावरच तिचा विवाह करावा असे तर आपल्या पुर्व़जांना सुचवायचे नसेल ना! असे श्री दिलीप व सौ पोर्णिमा कुलकर्णीं यांच्या एका पुस्तकात वाचल्याचे आठवते..
शिवाय, तुळशीच्या लग्नासाठी लागणारे सगळे साहित्य आपल्याला निसर्गचे देते..उदा. विवाहासाठी लागणारी झोपडी किंवा मांडव उसाची किवा ज्वारीची असते,.. पुजेच्या साहित्यात बोरं, चिंचा, आवळे, सिताफळ हवेच. म्हणजेच काय तर सणा समारंभाच्या निमित्याने आपण निसर्गाचीच पूजा करतो, आभार मानतो. आणि असे करणे गरजेचे आहे.कारण आपण निसर्गाकडुन नेहमिच काही ना काही घेत आलो आहोत. त्याचे आपल्यावर अनंत उपकार आहेत, कधी न फेडु शकणारे.
तर अशा या "कधी न संपावा" अस वाटणार्या रुतुचे आपण सगळे मना पासुन नि.ग. वर स्वागत करुया.
(वरील फोटो व लेखन मायबोलीकर निसर्गप्रेमी सायली पातुरकर यांच्याकडून)
नि.ग. च्या धाग्याची सुरुवात झाली आहे ५ डिसेंबर २०१० रोजी पासून.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाच्या गप्पा (भाग २१) http://www.maayboli.com/node/49967
निसर्गाच्या गप्पा (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
सायली, तुला इथे परत बघुन खूप
सायली, तुला इथे परत बघुन खूप छान वाटलं
झरबेरा, फोटो मस्त आलाय.
झरबेरा, मस्त फोटो.. या
झरबेरा, मस्त फोटो..
या शंकासुराची पाने, चिमण्या मलेरिया होउ नये म्हणून खातात असे पुन्हा आसमंत मधे वाचले होते, त्यांनी बहुतेक या राघूदादांना व्हॉट्स अप केले असणार !
झरबेरा, मिठुचा मस्त फोटो.....
झरबेरा, मिठुचा मस्त फोटो.....
हेमा ताई आभार..ंमला देखिल
हेमा ताई आभार..ंमला देखिल तुम्हा स.खुप आठवण येते.
दा नvin माहिती... ग़जानन मst किस्सा. ...
शुभ रात्री ......
हा किस्सा खास
हा किस्सा खास झरबेरासाठी........
झरबेराच्या पोपटाचे फोटो आले आणि माझ्या मावशीने एक गंमत सांगितली. सध्या माझी मावशी वय ८५ ...माझ्याकडे रहायला आली आहे. माझ्या मावशीकडे एक पोपट होता. तिच्याकडे आम्ही भावंडं रहायला गेलो होतो. धुळ्याला. माझा मामेभाऊ म्हणाला ...चला आपण याला बोलायला शिकवू.
तो मामेभाऊ जरा नाकात बोलतो(अजूनही :फिदी:)
त्याने त्या पोपटाला शिकवायला सुरुवात केली. पिंजर्याजवळ जाऊन म्हणाला....हं म्हण....यांSSSSSSSSS.(हे यां म्हणजे नाकातच. म्हणून बघा सर्वांनी)
लगेच कसा शिकेल ना तो ?
मग माझ्या मामेभावाने मावशीकडचा एक बाटली धुवायचा ब्रश घेतला आणि पुन्हा पुन्हा त्याच्या शेपटावर फटका मारून ....
हं म्हण .... यांSSSSSSSSS. इकडे शेपटावर ब्रशने मारयचं आणि म्हणून घ्यायचं. शेवटी १/२ दिवसात बाटली धुवायचा ब्रशचा शेपटावर एक फटका(हलकाच हं!!) बसला आणि पोपट म्हणायला लागला..........."यांSSSSSSSSS" पोपटही नाकातच यांSSSSSSSSS म्हणायला लागला. आम्ही सगळे खूप हसलो.
नंतरची गंमत एकून काल आम्ही घरातलेहहपुवा::हहपुवा:
तिथून पुढे मावशीने बाटली धुवायचा ब्रश काढला की पोपटाचं ...."यांSSSSSSSSS"
मामेभाऊ तिथे असो वा नसो............
हाहा मानुषी मस्त
हाहा मानुषी मस्त किस्सा.
लाजाळू:
मानुषी, : यां.......
मानुषी, : यां.......

मानुषी, मस्त किस्सा.. वर्षा..
मानुषी, मस्त किस्सा..
वर्षा.. मस्त फोटो. आजच सकाळी मी उजूला इथल्या याच रंगाच्या एका रानफुलाचा फोटो पाठवला.
इथे लाजाळू अजिबात दिसली नाही, नायजेरियात मात्र लाजाळूचे जंगल असायचे. हो अगदी २/३ फूट उंच वाढलेली दाट जाळी. त्यावर अशा रंगाची फुले छान दिसायची पण जवळ जायची सोय नव्हती, भरपूर काटे असायचे.
म नु शि ताई मst
म नु शि ताई मst किस्सा....
लाजाळु म स्तच
आमच्याकडेही मी लहान असताना एक
आमच्याकडेही मी लहान असताना एक पोपट होता. Parrotlet च्या साईझचा. एक दिवशी त्याच्या पिंजर्याची खिडकी उघडीच राहिली आणि मी आपली दिवसभर पोपट पोपट करत बसलेले (नेहमीसारखच
) पण संध्याकाळी आई आली आणि तो पर्यंत तो उडून गेला सुद्धा. त्यानंतर कधीच पक्षी पाळला

Pages