निसर्गाच्या गप्पांचा धागा २३ व्या भागामध्ये पदार्पण करत आहे. सगळ्या निसर्गाच्या गप्पांच्या सदस्यांचे हार्दिक अभिनंदन.
"हिवाळा" हा सगळया ऋतुंमधे आल्हाददायक ऋतु वाटतो. हिवाळ्याची पहाट खुपच रम्य वाटते. पहाटे सभोवताल पसरलेले धुके, गार वारं, पक्षांचा किलबिलाट, गाईचे हंबरणे, कोवळ्या उन्हाचा किरणोत्सव, आंगणात पेटवलेल्या चुलीचा धुर,वाफाळता चहा.. सगळेच कसे रमणिक आणि प्रसन्न वाटते.
हिवाळ्यात थकवा, चिडचिड जाणवत नाही, शीण येत नाही, एरवी नकोस झालेले उन सुदधा हवेहवेसे वाटते. या दिवसात अहार वाढलेला असतो तसेच पचन शक्ती पण चांगली असते. या ऋतूत सशक्त होऊन ही ताकद साठवुन वर्षभर पुर्वायची असते..
तसेच थंड हवामानामुळे या दिवसात फळ भाज्यांची रेलचेल असते.. पेरु,सिताफळे,पपई,, चिक्कु अशा मधुर फळाची मेजवानी असतेच जोडीला संत्रे, मोसंबी अशी निमफळ पण चाखायला मिळतात. थंडी मुळे फुला - फळांचे रंग अधिकच गडद आणि लोभस वाटतात.
या दिवसात काही झाडांची पान गळती असते तर..काही झाडे ओसंडुन बहरत असतात.
एकी कडे बुची , पारिजातकांचे सुगंधीत सडे पडलेले असतात तर दुसरीकडे शेवंती, चमेली, सायली नटलेली दिसते..
तर असाहा सुगंधोत्सव कधीच संपु नये असे वाटते...
आपण सगळे नुकतीच दिवाळी जलौषात साजरी करुन एका वेगळ्याच जोशात कामाला लागलेले असतो... आता वेद लागतात ते तुळशीच्या लग्नाचे! आपले सगळे सण समारंभ निसर्गाशीच निगडीत आहेत.. उदा. कार्तीक महिन्यातच तुळशी विवाहा असण्याचे कारण असे की या महिन्यात तुळस बहरलेली असते , तिला भरपुर पान आणि मंजीर्या आलेल्या असतात.. म्हणजेच विवाहा योग्य झालेली असते... या सणाच्या निमित्याने कन्या योग्य वयात आल्यावरच तिचा विवाह करावा असे तर आपल्या पुर्व़जांना सुचवायचे नसेल ना! असे श्री दिलीप व सौ पोर्णिमा कुलकर्णीं यांच्या एका पुस्तकात वाचल्याचे आठवते..
शिवाय, तुळशीच्या लग्नासाठी लागणारे सगळे साहित्य आपल्याला निसर्गचे देते..उदा. विवाहासाठी लागणारी झोपडी किंवा मांडव उसाची किवा ज्वारीची असते,.. पुजेच्या साहित्यात बोरं, चिंचा, आवळे, सिताफळ हवेच. म्हणजेच काय तर सणा समारंभाच्या निमित्याने आपण निसर्गाचीच पूजा करतो, आभार मानतो. आणि असे करणे गरजेचे आहे.कारण आपण निसर्गाकडुन नेहमिच काही ना काही घेत आलो आहोत. त्याचे आपल्यावर अनंत उपकार आहेत, कधी न फेडु शकणारे.
तर अशा या "कधी न संपावा" अस वाटणार्या रुतुचे आपण सगळे मना पासुन नि.ग. वर स्वागत करुया.
(वरील फोटो व लेखन मायबोलीकर निसर्गप्रेमी सायली पातुरकर यांच्याकडून)
नि.ग. च्या धाग्याची सुरुवात झाली आहे ५ डिसेंबर २०१० रोजी पासून.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाच्या गप्पा (भाग २१) http://www.maayboli.com/node/49967
निसर्गाच्या गप्पा (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

जिप्स्या माबो वर नाही भेटलास
जिप्स्या माबो वर नाही भेटलास तरी तुला, सहकुटुंब्,सहपरिवार माझ्या घरी केंव्हाही यायचे खुले आमंत्रण आहे., लक्षात आहे ना??.
तुझ्या पुढच्या वाटचालीला आम्हा सर्वांकडून शुभेच्छा..
जिप्सी ............तुझ्या
जिप्सी ............तुझ्या पुढच्या वाटचालीला आम्हा सर्वांकडून शुभेच्छा..!
वर्षूदी, मानुषीताई धन्यवाद!!!
वर्षूदी, मानुषीताई धन्यवाद!!!
मानुषी, काय झालंय या पावसाला
मानुषी, काय झालंय या पावसाला ?
आधीच शेतकर्याची परिस्थिती वाईट आहे, त्यात ही अस्मानी !
त्यांना आधी माहीत असते तर त्यांनी वेगळे पिक घेतले असते.
अवकाळी पडलेल्या पावसाचे पाणी साठवायची देखील आपली काही योजना नसते.
जिप्सी, पुढील वाटचाली साठी
जिप्सी, पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा.
जमेल तस या भेटायला.
जिप्सी शुभेच्छा. आमच्याकडे पण
जिप्सी शुभेच्छा.
आमच्याकडे पण रात्री २ नंतर तासभर पाऊस पडला.
जिप्स्या, विपु बघ रे !
जिप्स्या, विपु बघ रे !
दिनेश, अवकाळी काय सुकाळी
दिनेश, अवकाळी काय सुकाळी पडलेला पाऊसही आपण साठवत नाही.
हल्ली हल्ली शेतकरी सुधारताहेत पण या सुधारणांसाठीही पैसा पाहिजे. ज्यांच्याकडे आहे ते सुधारले, ज्यांच्याकडे नाही ते आहेत तसेच. शेतक-यांना कर्जमाफी दिली म्हणजे आपली जबाबदारी संपली असे शासनाला वाटते. दुष्काळ, आत्महत्या, गारपिट प्रत्येक गोष्टीसाठी पॅकेज आहे आज. पण मुळात ही परिस्थिती येऊच नये यासाठी प्रयत्न कोण करणार? १००० वर्षांपुर्वी अवलंबुन निसर्गाच्या लहरीवर होतो, आजही आहोत. मग प्रगती कुठेय? आपल्याकडे प्रत्येकाच्या हातात मोबाईल आणि त्यात १० रुपयाचे नेट पॅक मिळाले म्हणजे प्रगती झाली असे समजतात. या १० रुपयाच्या नेटपॅकमध्ये काय पाहतात याचे रिपोर्ट येतात अधुनमधुन पेपरात
पंकजचा सटाण्यातील गाव कायम दुष्काळग्रस्त. बाकी सगळीकडे पाऊस पडेल पण त्याच्या भागात नाही पडणार. प्र्चंड ओढग्रस्ती असुनही, गावातले लोक मुर्खात काढत असुनही, त्याच्या वडलांनी जमिनीचे तुकडे विकुन आपल्या मुलांना शिकवले आणि गावाबाहेर काढले. त्या मुलांच्या नोकरीतल्या पैशातुन घरच्या जमिनीत शेततळे बांधणे शक्य झाले. सुदैवाने गेल्या वर्षी पाऊस बरा झाला आणि शेततळ्यात पाणी भरले. त्या शेततळ्याच्या भरोशावर यावर्षी डाळिंबाचे उत्पन्न मिळाले. नाहीतर चार वर्षांपुर्वी पाण्याअभावी डोळ्यासमोर मक्याचे पुर्ण शेत सुकुन जाताना त्यांना पाहावे लागलेले. पाणी विकत मिळते पण इतक्या प्रमाणात घ्यायलाही परवडायला पाहिजे. इतक्या वर्षांत त्यांना शेतकरी म्हणुन शासकिय मदत शुन्य मिळाली. उलट जेव्हा कर्जमाफी आली तेव्हा दरवर्षी कर्जफेड केली म्हणुन कर्जमाफी नाकारण्यात आली. अशा आहेत शासकिय योजना. ज्यांच्याकडे पैश्याचे दुसरे स्त्रोतही आहेत आणि एका वर्षी शेती झाली नाही तरी ज्यांना अन्नाची ददात नाही असे लोकच आता शेतकरी म्हणुन राहु शकतात. जे राहु शकत नाहीत ते आत्महत्या करताहेत.
अवकाळी काय सुकाळी पडलेला
अवकाळी काय सुकाळी पडलेला पाऊसही आपण साठवत नाही. स्मित...
हो ना दरवर्षी वाटतं की रेनवॉटर हार्वेस्टिन्ग निदान आपल्यापुरतं तरी करायला हवं.
हो साधना, आता दरवर्षीच पाऊस
हो साधना, आता दरवर्षीच पाऊस बेभरवश्याचा झालाय. त्याचा अंदाज बांधणेही शक्य होत नाही आजकाल.
आपले अनेक मंत्री इस्रायलची शेती बघायला ( सरकारी खर्चाने, अर्थात ) जातात. तिथून येऊन इथे काय दिवे लावतात ?
मी अनेक वर्षे इस्रायल मधून आलेली फळे खातोय. चव, दर्जा, रंग सगळ्याच बाबतीत उत्तम असतात ती.
आपल्याला अशक्य आहे का ते ?
सगळं शक्य आहे... फक्त
सगळं शक्य आहे... फक्त इच्छाशक्ती नाहीये.
साधना , परफेक्ट लिहीलयस
साधना , परफेक्ट लिहीलयस
ज्यांच्याकडे पैश्याचे दुसरे
ज्यांच्याकडे पैश्याचे दुसरे स्त्रोतही आहेत आणि एका वर्षी शेती झाली नाही तरी ज्यांना अन्नाची ददात नाही असे लोकच आता शेतकरी म्हणुन राहु शकतात. जे राहु शकत नाहीत ते आत्महत्या करताहेत.
साधनाताई - +१
हो नितिन, माझ्या पण बघण्यात
हो नितिन, माझ्या पण बघण्यात असे शेतकरी आहेत. माझ्या आजोळची शेती कूळ कायद्यात गेली पण त्यापुर्वीच आजोबांनी व्यवसाय सुरु केला होता.
कुटुंब पातळीवर मर्यादीत जमिनीवर अवलंबून आता उदरनिर्वाह अशक्यच आहे. पोटापुरतंही पिकत नाही मग बाजारात विकायला वरकड उत्पन्न कुठून येणार ?
थोडा वेगळा विषय ...तरी
थोडा वेगळा विषय ...तरी लिहिते. माझ्या लहानपणी वडिलांनी "इस्राएल : दुधामधाचा देश" या नावाचं एक पुस्तक मला दिलं होतं. तेव्हापासून इस्राएल विषयी मनात एक कुतुहल आहे. अप्रतीम पुस्तक होतं ते. लेखक वि.स. वाळिंबे होते का आठवत नाही. त्यात या देशाने कशी प्रगती केली, कशी नव्या पद्धतीची शेती ते करतात असं खूप छान वर्णन होतं.
हे पुस्तक कुणी वाचलंय का?
खूप दिवसांनी आलेय निगवर. मस्त
खूप दिवसांनी आलेय निगवर.
मस्त मस्त वाटतय............
७ पाने वाचून पूर्ण केली. खूप
७ पाने वाचून पूर्ण केली. खूप माहिती मिळतेय.
जिप्सी, खूप खूप शुभेच्छा!
सरडा ह्या प्राण्याविषयी नविन माहिती कळली.
बी, फोटो मस्त !
दिनेशदा, भारतवारी कधी?
मानुषी, वाचलेलं नाही मी पण
मानुषी, वाचलेलं नाही मी पण वाचायला नक्कीच आवडेल. इस्रायल बद्दल सगळेच चांगले असे मी म्हणत नाही पण शेतीबाबत मात्र ते श्रेष्ठच आहेत.
काही वर्षांपुर्वी सर्व देशांनी त्या देशावर बहीष्कार टाकला होता. इस्रायली बॉयकॉट कमिटी होती. जर एखादी बोट तिथे गेली असेल तर तिला बाकीचे देश आपल्या बंदरात देखील येऊ देत नसत.... आमची बोट इस्रायलला गेलेली नाही असे प्रमाणपत्र त्या बोटीच्या कंपनीला द्यावे लागत असे.
प्रज्ञा पुढच्या महिन्यात येतोय. पण फक्त ४ दिवसच आहे भारतात
सगळी माहीती खुप चांगली
सगळी माहीती खुप चांगली आहे.
साधना गंभिर आहे ग सगळे.
शशांकजी मस्त माहिती.
शांकली कधी पासुन बोलावतेय मी तुला बिनफडक्याने
तु येतच नाहीस.
सुदुपार! ताडोबा - अहेरी -
सुदुपार! ताडोबा - अहेरी - हेमलकसा तीन दिवसीय निसर्ग पर्यटन करुन आले. वाटेत सरडे दिसले एरवी माझ्यासाठीतरी दुर्लक्षित प्राणी, लक्ष वेधून घेत होता. अहेरीतील डाॅ सांगत होते दर दुसरा रोगी मलेरियाचा व पाचवा सर्पदंशाचा असतो. ट्रीप खूप छान झाली तरी शिक्षणाची, विकासाची गंगा पोचायला किती काळ जावा लागणार ? मन खिन्न होते ..
अहेरीतील डाॅ सांगत होते दर
अहेरीतील डाॅ सांगत होते दर दुसरा रोगी मलेरियाचा व पाचवा सर्पदंशाचा असतो>> आणि पहिला, तिसरा आणि चवथा कशाचा असतो? मला ह्या वाक्याचा संदर्भ नाही लागला.
मीही प्रयत्न करत आहे ताडोबाला जायला. तू कुठल्या गेटमधून गेलीस?
अहेरी मधे काय आहे बघण्यासारखे ?
बी, म्हणजे ५०टक्के रुग्ण
बी, म्हणजे ५०टक्के रुग्ण मलेरियाचे तर २० टक्के सर्पदंशाचे !
मंजू.. आपण शिकतो तेच शिक्षण असा आपला एक समज असतो. खरं तर निसर्गाच्या सानिध्यात राहणारी माणसेही तेवढीच ज्ञानी असतात. खरं तर आपणच त्यांच्याकडे शिकायला जायला पाहिजे.. त्याबदल्यात आपण त्यांना थोडेफार "पुस्तकी" ज्ञान देऊ शकतो.
बी त्यांच्याकडे येणार्या
बी त्यांच्याकडे येणार्या रोग्यांमधला .. अहेरीला बघण्यासारखं काहीनाही आम्ही तिथल्या डाॅकडे उतरलो होतो. आम्हा मोहर्ला गेटने गेलो होतो.
धन्यवाद दिनेशदा. ही शैली
धन्यवाद दिनेशदा. ही शैली निराळीच आहे
मंजू, तू विदर्भात राहतेस का?
दिनेश अगदी खरंय . तिथले दाट
दिनेश अगदी खरंय . तिथले दाट जंगल टिकले आहे ते त्यांच्यामुळेच.. लोकबिरादरी प्रकल्प .. हेच पुस्तकी द्न्यान देण्याचं काम करताहेत..
बी - नागपूरात ..
बी - नागपूरात ..
तू भंडारा आणि तिथली तळे
तू भंडारा आणि तिथली तळे पाहिली आहेस का?
मारुती चितमपल्ली वाचले की ही गावे डोळ्यासमोर दिसतात. केवढे प्रलोभन उभे करतात ते लेखनातून तिथे जायला. मी अजून चांदा, गढचिरोली, भंडारा, आनंदवन, हेमलकसा, लोकबिरादारी, पेंच, ताडोबा, नवेगाव हे काहीही पाहिलेल नाही.
मंजू, सायलीचे मिस्टर कसे आहेत
मंजू, सायलीचे मिस्टर कसे आहेत आता ?
१५ दिवसांपूर्वी गो ग्रिन ला
१५ दिवसांपूर्वी गो ग्रिन ला भेट दिली.

तेथिल फुलपाखरू आता असे फुलले आहे.
इन्डोअर प्लान्टस.

तिथुन पुढे एक नर्सरी आहे. त्यातील वॉटर लीली

लसुण वेल

सोन चाफ्याची फळे.

दिनेश सर्व देशांनी बहिष्कार
दिनेश सर्व देशांनी बहिष्कार टाकलेला का? भारताने कधी टाकलाय का कोणावर बहिष्कार?
माझ्या आठवणीप्रमाणे जर आखाती देशात काही माल विकायचा असेल तर सोबत हा माल इस्रायली ओरिजिनचा नाही असे बिलावर छापावे लागे. माझ्या कंपनीचा तेव्हा आखाती देशांशी खुप एस्क्पोर्ट चालायचा आणि हे वाक्य बहुतेक सगळ्या महत्वाच्या कागदपत्रांवर छापावे लागे.
मला त्या देशाच्या धडाडीचे कौतुक वाटते. चारी बाजुने शत्रूने वेढलेला देश असुनही अतिशय खंबीरपणे त्याने स्वतःला उभे केले आहे. आणि त्यात या देशाचे नागरिक म्हटले तर जगभरातुन आलेले, सोबत आपले जगभराचे वेगवेगळे संस्कार, चालिरीती, विचार करण्याच्या पद्धती घेऊन आलेले. पण एका धर्माखाली त्यांनी स्वतःला संघटित केले आणि अतिशय प्रतिकुल परिस्थितितुन बाहेर येऊन आज स्वत्:चा विकास साधलाय.
मला एकाच गोष्टीचे आश्चर्य वाटते किंवा हा नियतीचा फटकाच असावा असे म्हणा हवे तर. ज्युंना परिस्थितीवश स्वतःच्या भूमीवरुन विस्थापित व्हावे लागले. शेकडो वर्षे त्यांनी आपल्या भूमीवर परत जायचा ध्यास घेतला आणि त्यांची ती भूमी त्यांना परत मिळालीही. पण ती परत मिळली ती त्या भूमीवर त्यांच्यानंतर राहणा-या लोकांना विस्थापित करुन. जे दु:ख त्यांनी भोगले तेच दु:ख त्यांच्यामुळे पॅलेस्टिनीजच्या वाट्याला आले. आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणालाही समाधान लाभणार नाही याची खात्री करुनच निर्णय घेतले जातात का?
Pages