निसर्गाच्या गप्पांचा धागा २३ व्या भागामध्ये पदार्पण करत आहे. सगळ्या निसर्गाच्या गप्पांच्या सदस्यांचे हार्दिक अभिनंदन.
"हिवाळा" हा सगळया ऋतुंमधे आल्हाददायक ऋतु वाटतो. हिवाळ्याची पहाट खुपच रम्य वाटते. पहाटे सभोवताल पसरलेले धुके, गार वारं, पक्षांचा किलबिलाट, गाईचे हंबरणे, कोवळ्या उन्हाचा किरणोत्सव, आंगणात पेटवलेल्या चुलीचा धुर,वाफाळता चहा.. सगळेच कसे रमणिक आणि प्रसन्न वाटते.
हिवाळ्यात थकवा, चिडचिड जाणवत नाही, शीण येत नाही, एरवी नकोस झालेले उन सुदधा हवेहवेसे वाटते. या दिवसात अहार वाढलेला असतो तसेच पचन शक्ती पण चांगली असते. या ऋतूत सशक्त होऊन ही ताकद साठवुन वर्षभर पुर्वायची असते..
तसेच थंड हवामानामुळे या दिवसात फळ भाज्यांची रेलचेल असते.. पेरु,सिताफळे,पपई,, चिक्कु अशा मधुर फळाची मेजवानी असतेच जोडीला संत्रे, मोसंबी अशी निमफळ पण चाखायला मिळतात. थंडी मुळे फुला - फळांचे रंग अधिकच गडद आणि लोभस वाटतात.
या दिवसात काही झाडांची पान गळती असते तर..काही झाडे ओसंडुन बहरत असतात.
एकी कडे बुची , पारिजातकांचे सुगंधीत सडे पडलेले असतात तर दुसरीकडे शेवंती, चमेली, सायली नटलेली दिसते..
तर असाहा सुगंधोत्सव कधीच संपु नये असे वाटते...
आपण सगळे नुकतीच दिवाळी जलौषात साजरी करुन एका वेगळ्याच जोशात कामाला लागलेले असतो... आता वेद लागतात ते तुळशीच्या लग्नाचे! आपले सगळे सण समारंभ निसर्गाशीच निगडीत आहेत.. उदा. कार्तीक महिन्यातच तुळशी विवाहा असण्याचे कारण असे की या महिन्यात तुळस बहरलेली असते , तिला भरपुर पान आणि मंजीर्या आलेल्या असतात.. म्हणजेच विवाहा योग्य झालेली असते... या सणाच्या निमित्याने कन्या योग्य वयात आल्यावरच तिचा विवाह करावा असे तर आपल्या पुर्व़जांना सुचवायचे नसेल ना! असे श्री दिलीप व सौ पोर्णिमा कुलकर्णीं यांच्या एका पुस्तकात वाचल्याचे आठवते..
शिवाय, तुळशीच्या लग्नासाठी लागणारे सगळे साहित्य आपल्याला निसर्गचे देते..उदा. विवाहासाठी लागणारी झोपडी किंवा मांडव उसाची किवा ज्वारीची असते,.. पुजेच्या साहित्यात बोरं, चिंचा, आवळे, सिताफळ हवेच. म्हणजेच काय तर सणा समारंभाच्या निमित्याने आपण निसर्गाचीच पूजा करतो, आभार मानतो. आणि असे करणे गरजेचे आहे.कारण आपण निसर्गाकडुन नेहमिच काही ना काही घेत आलो आहोत. त्याचे आपल्यावर अनंत उपकार आहेत, कधी न फेडु शकणारे.
तर अशा या "कधी न संपावा" अस वाटणार्या रुतुचे आपण सगळे मना पासुन नि.ग. वर स्वागत करुया.
(वरील फोटो व लेखन मायबोलीकर निसर्गप्रेमी सायली पातुरकर यांच्याकडून)
नि.ग. च्या धाग्याची सुरुवात झाली आहे ५ डिसेंबर २०१० रोजी पासून.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाच्या गप्पा (भाग २१) http://www.maayboli.com/node/49967
निसर्गाच्या गप्पा (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
हो हो देते. सकाळी वर्षू(नील)
हो हो देते. सकाळी वर्षू(नील) चा फोन आला होता. तीही हेच म्हणाली. देते थोड्या वेळात.
ठांकू शांकली.
मानुषी अभिनंदन. मानुषी अग
मानुषी अभिनंदन.
मानुषी अग रोटरी कॉन्फरन्सला येणार आहेस का गोव्याला ५ ते ७ फेब. ला? मी जाणार आहे. आलीस तर तिथे तरी आपली भेट होईल.
हॅपी बड्डे मानुषी तै
हॅपी बड्डे मानुषी तै

डोक्यावरचे केस कापसासारखे होऊ देत
(आमची आजी ह आशिर्वाद द्यायची. त्यामागे म्हणे ३ आशिर्वाद लपलेत.
१) सगळे केस पांढरे शुभ्र होईपर्यंत जग.
२) नॉर्मली अजारपणातच डोक्याचे केस जातात. टक्कल पडतं. तेंव्हा कापसासारखे म्हणजे दाट रहोत म्हातारपणापर्यंत म्हणजे ते कधीच न गळोत. म्हणजे निरोगी म्हातारपण येवो.
साआणि तिसरा आठवत नाही पण काहीतरी मऊसूत रहाण्याबद्दल होतं)
अरे वा मानुषी...
अरे वा मानुषी... वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... आणि मॅडमनी प्रेझेंटेशनही केले?? मज्जाय..
हल्ली मी फेबुवर फिरकत नाही त्यामुळे हे असले महत्वाचे अपडेट्स्स मिस होतात.
जागु, तु गोव्याला जातेय्स??
जागु, तु गोव्याला जातेय्स?? मज्जा कर गं.. अंजली चितळेला फोन कर. ती आली नाही इथे बरेच दिवस
अग हो असतात त्या कॉन्टॅक्ट
अग हो असतात त्या कॉन्टॅक्ट मध्ये. नि.ग. वॉट्सअॅपवर.
मी त्यांना भेटणार आहे तिथे.
सर्वांना धन्यवाद. जागू ...अगं
सर्वांना धन्यवाद.
जागू ...अगं काल झाला गोव्याचा विषय मीटिंगमधे. पण नाही जाणार आहोत आम्ही. गोवा खूप वेळा झालंय एक तर आणि नवरोबांची सी.ए. कॉनफरन्सही गोव्यातच असते आणि त्यातही काही दुसर्या कमिटमेन्ट्स आहेत. नाहीतर झाली असती गं आपली भेट.
श्शे. तू आली असतीस तर मजा आली
श्शे. तू आली असतीस तर मजा आली असती. ठिक आहे अशाच भेटू कधीतरी.
हो गं जागू ...नक्की भेटू! हे
हो गं जागू ...नक्की भेटू!
हे दिनेशने मला मेल करून पाठवलेले स्पष्टीकरण
"हिवाळ्यात सुर्यप्रकाश कमी मिळणार हे झाडांना माहित असते. त्यामूळे मेपलसारखी झाडे पानातील साखर
खोडात परत घेतात. म्हणून खोडात गोड रस तयार होतो व आपल्याला मेपल सिरप मिळते.
तशीही पाने झाडावर राहिली तर त्यावर बर्फ पडणार तो साचून राहणार. तो पेलायची क्षमता त्या झाडांच्या
पानात नाही. पानांना श्वासोच्छवास करता येणार नाही, म्हणून पानांचा उपयोग नाही. त्यापेक्षा तोवर
तयार झालेली साखर साठवून ठेवलेली बरी, असे झाड विचार करते.
स्प्रिंगमधे तपमान हळू हळू वाढायला सुरवात होते, तशी झाडाला जाग येते. पण त्यावेळी उन्हाळा थोडा वेळ्च
असणार आहे याची झाडाला कल्पना असते. शिवाय आधी तयार केलेली साखर झाडाच्या खोडात असतेच.
त्यामूळे फुले येण्यासाठी जी साखर एरवी पाने तयार करतात, त्याची वाट बघायची गरज नसते.
त्यामूळे असलेली साखर वापरून थेट फुलेच तयार होतात. फुलांपैकी जे महत्वाचे अवयव असतात, म्हणजे
स्त्रीकेसर, पुंकेसर, बीजकोष ते महत्वाचे. पाकळ्या म्हणजे रुप बदललेली पानेच असतात. अशी फुले तयार करून
झाड पुढच्या पिढीची आधी सोय करून ठेवते. तेच झाडाचे महत्वाचे काम असते. ते एकदा झाले कि पाने तयार
करून पुढच्या मोसमाची तयारी करता येते.
हा खरे तर मोठा विषय आहे. तूम्हाला पत्रकार निळू दामले याचे माणूस आणि झाड हे पुस्तक मिळाले तर
अवश्य बघा. त्यात हे सर्व छान विस्ताराने आणि सोप्या भाषेत लिहिलेले आहे."
अरे वा मस्त वर्णन आहे. हे
अरे वा मस्त वर्णन आहे.
हे पुस्तक आता शोधावेच लागेल.
मानुषी, वाढ्दिवसाच्या
मानुषी, वाढ्दिवसाच्या शुभेच्छा !! आणि प्रेझेंटेशन बद्दल अभिनंदन.
वरचे स्पष्टीकरण ही आवडले.
हा मेपल सिरप लैच भारी लागतो.
हा मेपल सिरप लैच भारी लागतो. मी वॉलमार्टच्या साईटवर शोधला. वरिजीनल ऑर्गॅनिक मेपल सिरप २२० डोलर्सला असल्याने मग आम्ही २० डॉलर्सच्या एका मेपल सिरप फ्लेवर्ड साखरेच्या पाण्याची निवड केली आणि पंकजला तो आणायला सांगितला. आता अधुनमधुन केक, लोफ वगैरे प्रकार करुन त्यावर हे फ्लेवर्ड पाणी ओततो आणि फ्लेवर्ड पाणी इतके झक्कास तर वरिजीनल सिरप कित्ती झक्कास असेल याच्या कल्पनेत विहार करायला लागतो.
साधना, या मेपलची झाडे
साधना, या मेपलची झाडे आपल्याकडे उत्तरेकडे असणार. तिथे मिळायला हवा होता.
या झाडाच्या खोडाला भोक पाडले कि साखरपाणी पाझरते ते आटवले कि मेपल सिरप मिळतो. अर्थात त्याला
छान स्वाद असतो.
आपल्याकडे उंबराच्या झाडातूनही असे गोड पाणी पाझरते कधी कधी.. त्यावर प्रयोग करायला हवा. हे उंबराचे पाणी पुर्वी गौर ( ताप ) आल्यावर देत असत.
आता सांगायला हरकत नाही..
आता सांगायला हरकत नाही.. मानुषी भेटल्यावर मला नलिनी म्हणाली होती, अरे दादा माझ्याएवढी मुलगी आहे त्यांना.. मी अवाक.. तिला म्हणालो, तूझ्याएवढी कशी असेल ? त्या तर लहान आहेत.
सगुणाबागेत त्यांच्या व्यक्ती
सगुणाबागेत त्यांच्या व्यक्ती मार्फत उंबराच्या झाडाची माहीती ऐकली की उंबराच्या मुळात खुप पाणी असते. पूर्वी जेंव्हा लोक रानावनात फिरायचे तेंव्हा त्यांना जर कुठे पाणी नाही मिळाले तर उंबराचे मुळ खणून त्यातून पाणी काढून ते प्यायचे.
विहीर खोदताना, उंबराचे झाड
विहीर खोदताना, उंबराचे झाड जवळपास असावे, असा एक निकष असतोच.
दिनेश, उत्तरेत आहेत मेपलची
दिनेश, उत्तरेत आहेत मेपलची झाडे. मी श्रीनगरला पाहिलेले एक झाड. आणि बहुतेक कारगीललाही पाहिलेले. मेपलची झाडे पाहिली नसली तरी यश चोप्रांच्या चित्रपटांमध्ये मेपलची पाने पाहिलीत ना.. त्यावरुनच झाडे ओळखली. पण आपल्याकडे त्याचा रस काढण्याची कल्पना अजुन तरी बहुतेक नाहीय.
उंबराच्या झाडात पाणी असते. खरेतर उंबर हा स्वतःच बरेचदा पाण्याच्या शेजारी असतो. जिथे उंबर तिथे आजुबाजुला पाणी असतेच असते.
माझ्या गावी घराच्या बाजुला एक उंबराचे झाड आहे जे मी अगदी बालपणापासुन पाहतेय. एकदा गावी गेलेले तर कोणीतरी त्या झाडाची एक मोठी फांदी तोडलेली. त्या तोडलेल्या जागेतुन ८-१० दिवस अर्धवट नळ चालु राहावा तसे पाणी गळत होते.
मानुषीताई happy birthday. खूप
मानुषीताई happy birthday. खूप खूप शुभेच्छा. एन्जॉय.
एकदम सह्ही स्पष्टीकरण दा! खूप
एकदम सह्ही स्पष्टीकरण दा! खूप आवडलं!! आता ते 'माणूस आणि झाड' पुस्तक वाचणं मस्ट आहे!

मी अवाक.. तिला म्हणालो, तूझ्याएवढी कशी असेल ? त्या तर लहान आहेत.>>>
'पाय टाकुनी जळात बसला असला
'पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर!!'................ ही कविता पण!!
दिनेश माझ्या कोणत्या
दिनेश माझ्या कोणत्या (दुर)गुणावरून मी लहान वाटले होते?
मानुषी, वाढदिवसाच्या हार्दिक
मानुषी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन! दिनेशदांनी दिलेली नेहमीप्रमाणे इंटरेस्टिंग! परवा सायलीची भेट झाली... यम्मी पुडाची/सांबार वडी घेऊन आली होती. मि. च्या तब्येतीत खूप छान सुधारणा आहे. ती निगकर्सना खूप मिस करतेय...
२ जा. ला बापू महाजन -अनिल अवचट गप्पा असा सेतू - अ काॅन्शस पॅरेंट फोरमतर्फ घेतोय. माझा प्रश्न विचारण्या इतका अभ्यास नाही पण तुमच्या प्रश्नांचे स्वागत...
हो साधना, तेच पाणी औषधी
हो साधना, तेच पाणी औषधी म्हणून वापरतात.
एक मजा म्हणजे उंबरातला मध ( खरे तर साखरपाणी ) मधमाश्यंना मिळत नाही. कारण लौकिक अर्थाने त्याला फुले नसतात. पण काही किटकांचा प्रतिकार करण्यासाठी उंबराचे झाड एक चिक तयार करते. तो झाडावरच रबरासारखा सुकतो. ( रबराचे झाडही याच कूळातले ) त्यासाठी मात्र मधमाश्या येतात.
कधी कधी उंबराच्या खोडावरूनच पाणी वहात गेल्याच्या खुणा असतात. ते पाणी त्या झाडातूनच पाझरते. ते गोड असते. माकडे मजेने चाटतात ते.
उंबराच्या झाडाची आणखी ( किंवा त्या वर्गातल्या सगळ्याच ) एक खासियत म्हणजे त्यांच्या फळण्याचा निश्चित असा ऋतू नसतो. ज्या काळात जंगलातील कुठल्याच झाडावर फळे नसतात त्या काळात पक्ष्या प्राण्यांच्या पोटाची काळजी हे झाड घेते. या झाडांना वर्षातून दोन तीनदादेखील बहर येऊ शकतो. कारण त्यांचे फलन घडवून आणणार्या किटकांचा आयूष्यकाल कमी असतो.
खरं तर उंबराच्या झाडाबाबत लिहिण्यासारखे खुप आहे, माझ्या त्या लेखातही सगळे देता आले नाही.
मानुषी, मला आपले सगळे
मानुषी, मला आपले सगळे माझ्यापेक्षा लहानच वाटतात. घरात मी सगळ्यात लहान. मला कुणीही दादा म्हणत नाही. ते सुख फक्त मायबोलीवर मिळते.
सायलीची वाट बघतोय आम्ही मंजू.. आणि अवचटांना प्रश्न विचारावे लागत नाहीत, ते बोलतात तेच ऐकत रहावेसे वाटते.
बापू - अवचट यांचा प्रोग्रॅम
बापू - अवचट यांचा प्रोग्रॅम कुठे आहे? पुण्यात असेल तर वेळ, तारीख, ठिकाण सांगणार का?
दा म्हणजे एन्सायक्लोपिडीयाच आहेत!!
मी नीट वाचलंच नाही... २ जाने
मी नीट वाचलंच नाही... २ जाने लिहिलंय हं तुम्ही! बापूंना प्लँट्स अँड इंजिनियरिंग बद्दल विचारा... थक्क होऊन दहाही बोटं तोंडात घातली जातील अशा खूप विलक्षण माहितीचा खजिना आपल्याला ऐकायला मिळेल. शक्य झालं तर हा प्रोग्रॅम रेकॉर्ड करून यू ट्यूब वर टाकून लिंक देता आली तर बघा प्लीज......
नाही शांकली पुण्यात नाही
नाही शांकली पुण्यात नाही नागपूरात बुटी हाॅल रामदासपेठ
रेकाॅर्ड नेहमीच करतो,
रेकाॅर्ड नेहमीच करतो, शब्दांकनही करतो.. युट्युब टाकता येईल ..
मानुषी, मला आपले सगळे
मानुषी, मला आपले सगळे माझ्यापेक्षा लहानच वाटतात.>>>>>>. ओक्के!
सर्वांना धन्यवाद!
मानुषी, वाढदिवसाच्या अनेकानेक
मानुषी, वाढदिवसाच्या अनेकानेक आणि हार्दिक शुभेच्छा !!

आणि प्रेझेंटेशनबद्दल मनापासून अभिनंदन.
Pages