निसर्गाच्या गप्पांचा धागा २३ व्या भागामध्ये पदार्पण करत आहे. सगळ्या निसर्गाच्या गप्पांच्या सदस्यांचे हार्दिक अभिनंदन.
"हिवाळा" हा सगळया ऋतुंमधे आल्हाददायक ऋतु वाटतो. हिवाळ्याची पहाट खुपच रम्य वाटते. पहाटे सभोवताल पसरलेले धुके, गार वारं, पक्षांचा किलबिलाट, गाईचे हंबरणे, कोवळ्या उन्हाचा किरणोत्सव, आंगणात पेटवलेल्या चुलीचा धुर,वाफाळता चहा.. सगळेच कसे रमणिक आणि प्रसन्न वाटते.
हिवाळ्यात थकवा, चिडचिड जाणवत नाही, शीण येत नाही, एरवी नकोस झालेले उन सुदधा हवेहवेसे वाटते. या दिवसात अहार वाढलेला असतो तसेच पचन शक्ती पण चांगली असते. या ऋतूत सशक्त होऊन ही ताकद साठवुन वर्षभर पुर्वायची असते..
तसेच थंड हवामानामुळे या दिवसात फळ भाज्यांची रेलचेल असते.. पेरु,सिताफळे,पपई,, चिक्कु अशा मधुर फळाची मेजवानी असतेच जोडीला संत्रे, मोसंबी अशी निमफळ पण चाखायला मिळतात. थंडी मुळे फुला - फळांचे रंग अधिकच गडद आणि लोभस वाटतात.
या दिवसात काही झाडांची पान गळती असते तर..काही झाडे ओसंडुन बहरत असतात.
एकी कडे बुची , पारिजातकांचे सुगंधीत सडे पडलेले असतात तर दुसरीकडे शेवंती, चमेली, सायली नटलेली दिसते..
तर असाहा सुगंधोत्सव कधीच संपु नये असे वाटते...
आपण सगळे नुकतीच दिवाळी जलौषात साजरी करुन एका वेगळ्याच जोशात कामाला लागलेले असतो... आता वेद लागतात ते तुळशीच्या लग्नाचे! आपले सगळे सण समारंभ निसर्गाशीच निगडीत आहेत.. उदा. कार्तीक महिन्यातच तुळशी विवाहा असण्याचे कारण असे की या महिन्यात तुळस बहरलेली असते , तिला भरपुर पान आणि मंजीर्या आलेल्या असतात.. म्हणजेच विवाहा योग्य झालेली असते... या सणाच्या निमित्याने कन्या योग्य वयात आल्यावरच तिचा विवाह करावा असे तर आपल्या पुर्व़जांना सुचवायचे नसेल ना! असे श्री दिलीप व सौ पोर्णिमा कुलकर्णीं यांच्या एका पुस्तकात वाचल्याचे आठवते..
शिवाय, तुळशीच्या लग्नासाठी लागणारे सगळे साहित्य आपल्याला निसर्गचे देते..उदा. विवाहासाठी लागणारी झोपडी किंवा मांडव उसाची किवा ज्वारीची असते,.. पुजेच्या साहित्यात बोरं, चिंचा, आवळे, सिताफळ हवेच. म्हणजेच काय तर सणा समारंभाच्या निमित्याने आपण निसर्गाचीच पूजा करतो, आभार मानतो. आणि असे करणे गरजेचे आहे.कारण आपण निसर्गाकडुन नेहमिच काही ना काही घेत आलो आहोत. त्याचे आपल्यावर अनंत उपकार आहेत, कधी न फेडु शकणारे.
तर अशा या "कधी न संपावा" अस वाटणार्या रुतुचे आपण सगळे मना पासुन नि.ग. वर स्वागत करुया.
(वरील फोटो व लेखन मायबोलीकर निसर्गप्रेमी सायली पातुरकर यांच्याकडून)
नि.ग. च्या धाग्याची सुरुवात झाली आहे ५ डिसेंबर २०१० रोजी पासून.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाच्या गप्पा (भाग २१) http://www.maayboli.com/node/49967
निसर्गाच्या गप्पा (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

माझ्याकडे चित्तमपल्लींची ४-५
माझ्याकडे चित्तमपल्लींची ४-५ पुस्तके आहेत साठवणीत. त्यातली ३ अजुन वाचायची आहेत. अस वाटत सुट्टी घ्यावी आणि वाचनाला वेळ द्यावा.
अदिजो धन्यवाद.
सुदुपार. परवा जिजामाता
सुदुपार.

परवा जिजामाता उद्यानात गेले होते. सध्याची हवा बेस्ट आहे जायला.
या साहेबांचं नाव काय? निळी-पांढरी पीसं आणि डोळ्याचा लाल रंग! मस्त आहे ना कॉम्बिनेशन.
ग्रीन मार्श हॉक असं भारदस्त नाव असणारा चतुर

मन उल्हसित करणारी अत्यंत सुंदर वृक्षराजी!

वर्षा जबरदस्त आले आहेत फोटो.
वर्षा जबरदस्त आले आहेत फोटो.
मित्रहो, मंजूला आपण एक
मित्रहो, मंजूला आपण एक प्रश्नावली देऊन चितमपल्लींची एक मुलाखत घेता येईल आपल्याला. >>> नक्की.
वर्षा नाईट हेरॉन आहे तो.
वर्षा नाईट हेरॉन आहे तो.
रच्याकने आपल्याकडे हा प्क्षी कोणता अस एक बीबी आहे तिथे असे पक्षांचे फोटो टाकत जा. http://www.maayboli.com/node/23573
वर्षा.. सुंदर फोटो. ती बाग
वर्षा.. सुंदर फोटो. ती बाग सर्वच ऋतूंमधे सुंदर असते. पक्ष्यांचे फोटो पिंजर्यांमूळे नीट काढता येत नाहीत.. त्यामुळे चित्रकार वर्षा ने तिथे खास पक्ष्यांसाठी जावे
वर्षा सुंदर फोटो नाईट हेरॉन
वर्षा सुंदर फोटो

नाईट हेरॉन - त्याच्या डोक्यावरची पिस बघुन वाटतय कोणीतरी चांगल तेल चोपुन केस विंचरलेत त्याचे.
ओके. असा बाफ पण आहे हे मी
ओके. असा बाफ पण आहे हे मी विसरलेच होते. चालेल.
हो दिनेशदा पिंजर्यांच्या जाळ्यांमुळे बरेच फोटो मी डिलीट केले.
इनमीन तीन अगदी अगदी मी पण हेच
इनमीन तीन अगदी अगदी मी पण हेच लिहिणार होते की तेल थापून केस विंचरलेत जणू.
तेल थापून नाही चोपून हेच
तेल थापून नाही चोपून हेच बरोबर आहे
रच्याकने वनस्पती/झाड्/वेल
रच्याकने वनस्पती/झाड्/वेल ओळखा बाफ पण आहे काय?
पाण्यात वावरणार्या बदक
पाण्यात वावरणार्या बदक वर्गातील पक्ष्यांकडे असे तेल असते. तेच ते चोचीने पिसांना सारखे लावत असतात.
वर्षा, जाळीमुळे अपुर्ण आलेल्या फोटोतील पक्ष्यांची चित्रे बघायला खुप आवडतील.
झाडे, वेली यांच्यासाठी इथे शांकली, शशांक असतातच
बापरे, हेरॉनचा डोळा काय
बापरे, हेरॉनचा डोळा काय आलाय... इतक्या जवळुन कधी पाहिले नव्हते ना त्याला.
चित्तमपल्लीं चा शेजार,
चित्तमपल्लीं चा शेजार, वेगवेगळे पक्षी, झाडं सगळच वाचनीय आहे
वर्षा, तू टाकलेले नक्की फोटोच
वर्षा, तू टाकलेले नक्की फोटोच आहेत की चित्रं आहेत हे आता नीट बघावे लागते....
नाईट हेरॉन - त्याच्या डोक्यावरची पिस बघुन वाटतय कोणीतरी चांगल तेल चोपुन केस विंचरलेत त्याचे.>>>:हाहा:
वर्षा मस्त फोटो. दिनेशदा
वर्षा मस्त फोटो.
दिनेशदा स्वतःचे नाव लपवताहेत
वर्षा, तू टाकलेले नक्की फोटोच
वर्षा, तू टाकलेले नक्की फोटोच आहेत की चित्रं आहेत हे आता नीट बघावे लागते. >>>>> शांकली + १००
जागू
जागू
मस्तये करकोचा, जागु.. वर्षा
मस्तये करकोचा, जागु..
वर्षा ने काढलेले फोटो ही बहारदार आहेत..
नाईट हेरॉन - त्याच्या
नाईट हेरॉन - त्याच्या डोक्यावरची पिस बघुन वाटतय कोणीतरी चांगल तेल चोपुन केस विंचरलेत त्याचे. >>>> +१
वर्षा, सुरेख फोटो!
ईतन सन्नाटा क्यो है भाई
ईतन सन्नाटा क्यो है भाई
थंडीने काकडलेत सगळे... माघाची
थंडीने काकडलेत सगळे...
माघाची रात, चांदनं त्यात...
दिने>>श, जले पे नमक नै
दिने>>श, जले पे नमक नै छिडकनेका....
मिस्स्स्सिंग थंडी !!!!!
वर्षा, मस्त फोटो.
वर्षा, मस्त फोटो.
वर्षू... चायनाला जायचे
वर्षू... चायनाला जायचे निमित्त शोधते आहेस का ?
ती इस्पिकच्या एक्का यांची मालिका बघून परत सुचवावेसे वाटतेय.. तू चायना टुरीझमचा बिझनेसचा विचार कर ना. तूझ्याशिवाय जास्त योग्य व्यक्ती कोण असणार यासाठी ?
आमच्या समुद्र किनार्यावरील
आमच्या समुद्र किनार्यावरील केतकीचे बन.

फार इच्छा आहे केवड्याच फुल झाडाला लागलेल पहायची पण अजून एकदाही नाही पहायला मिळायल. झाल की म्हणे गावातले लोक लगेच काढून विकायला नेतात.
वर्षा मस्त फोटो. जागू मस्त
वर्षा मस्त फोटो.
जागू मस्त आहे केतकी बन. माझ्या सासरच्या गावी समुद्राजवळ असंच आहे बन.
जागू, हो तसेच करतात. पण तरी
जागू, हो तसेच करतात. पण तरी ते झाड मुलींना तिवराच्या जंगलातले एक झाड म्हणून अवश्य दाखव. त्याची खोडे कशी खार्या पाण्यापासून बचाक करण्यासाठी तयार असतात ते पण दाखव.
तू गणपतीपूळ्याला गेलीस तर तिथल्या प्रदक्षिणेच्या वाटेवरची झाडे अवश्य दाखव. त्याची पाने कुणी तोडत नाहीत म्हणून त्याला फळेपण लागलेली असतात. ( ती देवराई आहे. )
हो>>>> दिनेश, रिअली मिस्स
हो>>>> दिनेश, रिअली मिस्स चायना...
मिस माझे बच्चे, मैत्रीणी ... आणी काय्काय!!!!!!
रम्मी म्हणतच होता पुढच्या थंडीत दोन महिने तिथेच जाऊन राहू
वॉव, हे केवड्याचं बन आहे?? जागु खरंच लक्कीये.. निसर्गाच्या कुशीत राहतेय
सर्व फोटो मस्त आहेत. मजा आली
सर्व फोटो मस्त आहेत. मजा आली !!!!
जागू.. प्लीज तुझी मेल चेक कर. जी मी संपर्कातून पाठवली. निगच्या नवीन भागासाठी ठरलयप्रमाणे मी प्रस्तावना लिहूण पाठवली आहे.
Pages