निसर्गाच्या गप्पांचा धागा २३ व्या भागामध्ये पदार्पण करत आहे. सगळ्या निसर्गाच्या गप्पांच्या सदस्यांचे हार्दिक अभिनंदन.
"हिवाळा" हा सगळया ऋतुंमधे आल्हाददायक ऋतु वाटतो. हिवाळ्याची पहाट खुपच रम्य वाटते. पहाटे सभोवताल पसरलेले धुके, गार वारं, पक्षांचा किलबिलाट, गाईचे हंबरणे, कोवळ्या उन्हाचा किरणोत्सव, आंगणात पेटवलेल्या चुलीचा धुर,वाफाळता चहा.. सगळेच कसे रमणिक आणि प्रसन्न वाटते.
हिवाळ्यात थकवा, चिडचिड जाणवत नाही, शीण येत नाही, एरवी नकोस झालेले उन सुदधा हवेहवेसे वाटते. या दिवसात अहार वाढलेला असतो तसेच पचन शक्ती पण चांगली असते. या ऋतूत सशक्त होऊन ही ताकद साठवुन वर्षभर पुर्वायची असते..
तसेच थंड हवामानामुळे या दिवसात फळ भाज्यांची रेलचेल असते.. पेरु,सिताफळे,पपई,, चिक्कु अशा मधुर फळाची मेजवानी असतेच जोडीला संत्रे, मोसंबी अशी निमफळ पण चाखायला मिळतात. थंडी मुळे फुला - फळांचे रंग अधिकच गडद आणि लोभस वाटतात.
या दिवसात काही झाडांची पान गळती असते तर..काही झाडे ओसंडुन बहरत असतात.
एकी कडे बुची , पारिजातकांचे सुगंधीत सडे पडलेले असतात तर दुसरीकडे शेवंती, चमेली, सायली नटलेली दिसते..
तर असाहा सुगंधोत्सव कधीच संपु नये असे वाटते...
आपण सगळे नुकतीच दिवाळी जलौषात साजरी करुन एका वेगळ्याच जोशात कामाला लागलेले असतो... आता वेद लागतात ते तुळशीच्या लग्नाचे! आपले सगळे सण समारंभ निसर्गाशीच निगडीत आहेत.. उदा. कार्तीक महिन्यातच तुळशी विवाहा असण्याचे कारण असे की या महिन्यात तुळस बहरलेली असते , तिला भरपुर पान आणि मंजीर्या आलेल्या असतात.. म्हणजेच विवाहा योग्य झालेली असते... या सणाच्या निमित्याने कन्या योग्य वयात आल्यावरच तिचा विवाह करावा असे तर आपल्या पुर्व़जांना सुचवायचे नसेल ना! असे श्री दिलीप व सौ पोर्णिमा कुलकर्णीं यांच्या एका पुस्तकात वाचल्याचे आठवते..
शिवाय, तुळशीच्या लग्नासाठी लागणारे सगळे साहित्य आपल्याला निसर्गचे देते..उदा. विवाहासाठी लागणारी झोपडी किंवा मांडव उसाची किवा ज्वारीची असते,.. पुजेच्या साहित्यात बोरं, चिंचा, आवळे, सिताफळ हवेच. म्हणजेच काय तर सणा समारंभाच्या निमित्याने आपण निसर्गाचीच पूजा करतो, आभार मानतो. आणि असे करणे गरजेचे आहे.कारण आपण निसर्गाकडुन नेहमिच काही ना काही घेत आलो आहोत. त्याचे आपल्यावर अनंत उपकार आहेत, कधी न फेडु शकणारे.
तर अशा या "कधी न संपावा" अस वाटणार्या रुतुचे आपण सगळे मना पासुन नि.ग. वर स्वागत करुया.
(वरील फोटो व लेखन मायबोलीकर निसर्गप्रेमी सायली पातुरकर यांच्याकडून)
नि.ग. च्या धाग्याची सुरुवात झाली आहे ५ डिसेंबर २०१० रोजी पासून.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाच्या गप्पा (भाग २१) http://www.maayboli.com/node/49967
निसर्गाच्या गप्पा (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
जागू मस्त आहे गो ग्रीन.
जागू मस्त आहे गो ग्रीन. सोनचाफ्याची फळे फोडून पाहिली तर मस्त अबोली रंगाच्या बिया दिसतील. मनमोहक असतात.
दिनेशदा - बरे आहेत फिजो. चालू
दिनेशदा - बरे आहेत फिजो. चालू आहे उद्या परवाकडे भेटायला जाईन . भेटायला येणारे खूप आहेत म्हणून मी फोनवरच चौकशी करते.
चितमपल्ली काका माझ्या घराच्या मागेच राहतात त्यांची मुलगी माझी मैत्रीण आहे अन तिच्याच बरोबर नागझीरा नवेगावबांध गेले होते ...
बी - तुला हेवा वाटेल
आई गं! हे काय हे तू आत्ता
आई गं! हे काय हे तू आत्ता सांगते. तू नशीबवान आहेस मंजू. चितमपल्ली सारखा लेखक फार दुर्मिळ आहे.
भारत आणि इस्रायल यांचे संबंध
भारत आणि इस्रायल यांचे संबंध नेहमी चांगलेच राहिले. अनेक ज्यू भारतात स्थायिक झाले होते. त्यांची सिनेगॉग्ज भारतात अजून आहेत.
काही वाद अमेरिका मुद्दाम निर्माण करते वा मिटू देत नाही.. त्या गाझा बद्दल काय लिहायचे ? टीयर्स ऑफ गाझा हा चित्रपट तर मी बघूही शकत नाही.
मला वाटतं अजूनही इस्रायली विमाने अरब देशांवरून उडू शकत नाहीत. भारतातून तेल अवीवला जाणारे विमान, बरेच वरून वळसा घालून जाते.
मंजू... त्यांच्या घराचे फोटो
मंजू... त्यांच्या घराचे फोटो त्यांच्या परवानगीने मिळू शकतील का ?
बी प्रमाणेच माझ्यावरही त्यांचा जबरदस्त प्रभाव आहे. "पोखरडोंगरी" चे वर्णन ऐकून आयूष्यात एकदातरी ती बघावी असे वाटते.
जागु ग्रो ग्रीन माझी लाडकी
जागु ग्रो ग्रीन माझी लाडकी नर्सरी आहे गं . मला तिथल्या सेवकांचा अॅटिट्युड खुप आवडतो. आत पाय टाकताच एकजण आपल्या मागे मागे फिरायला लागतो, जिथे आपण थबकू तिथल्या झाडांची माहिती द्यायला पुढे सरसावतो पण चुकूनही 'आता एवढे रामायण मी सांगितल्यावर हे झाड विकत घ्याच' हा आग्रह नाही. अगदी सुहास्यमुद्रेने झाडे दाखवत राहतील. त्यांचेही झाडांवर प्रेम आहे हे दिसत राहते त्यांच्या वागण्यातुन.
साधना, आपण रिटायर झाल्यावर
साधना, आपण रिटायर झाल्यावर असे काही करु या ! मला असला जॉब करायला मनापासून आवडेल.
हो मलाही आवडेल असे काहीतरी
हो मलाही आवडेल असे काहीतरी करायला.
गो ग्रीन कुठे आहे? फोटो मस्त
गो ग्रीन कुठे आहे?
फोटो मस्त आहेत. त्या वॉटर लिलीला मी इतके दिवस कमळ समजत होते.
इस्रायल ने यशस्वीरित्या पार
इस्रायल ने यशस्वीरित्या पार पाडलेले ऑपरेशन एण्टेबे की एण्टेब मला खुप स्फुर्तीदायी वाटले. याच्यावर एक मराठी पुस्तकही आहे, ज्यामुळे मला ह्याची पहिल्यांदा माहिती मिळाली. घरी गेल्यावर नाव देते. पुस्तक वाचताना पानोपानी जाणवत राहते ती इस्रायली लोकांची त्यांच्या सरकारवरची निष्ठा आणि विश्वास. कुठल्याही परिस्थितीत आपले लोक आपल्याला सोडवायला येतीलच हा विश्वास त्यांना जिवंत ठेवतो आणि त्यांचे सरकार तो विश्वास खरा करुन दाखवते.
वर्षा गो ग्रिन मुंबई-पुणा
वर्षा गो ग्रिन मुंबई-पुणा हायवे नेरा ला आहे. त्या लाईनमध्ये बर्याच नर्सरीज आहेत.
मी पण फॅन आहे चित्तमपल्लींची. मंजू तू खरच नशिबवान आहेस. तुझ्याकडे यायला लागेल आता.
मला पण लहानपणापासून वाटत आपण नर्सरी चालू करावी. लहानपणी मी दुधाच्या पिशव्यांमध्ये माती भरून त्यात फांद्या जगवायचे. मग ती झाडे नंतर कोणालाही भेट म्हणून द्यायचे.
मंजू, लेखक चितमपल्लींना आमचा
मंजू, लेखक चितमपल्लींना आमचा नमस्कार सांगशील का? आम्ही त्यांना फोन केला तर चालत असेल तर प्लीज त्यांचा नंबर सुद्धा दे. खूप खूप बोलायची इच्छा आहे अशा लेखकांसोबत.
ला त्या देशाच्या धडाडीचे
ला त्या देशाच्या धडाडीचे कौतुक वाटते. चारी बाजुने शत्रूने वेढलेला देश असुनही अतिशय खंबीरपणे त्याने स्वतःला उभे केले आहे. आणि त्यात या देशाचे नागरिक म्हटले तर जगभरातुन आलेले, सोबत आपले जगभराचे वेगवेगळे संस्कार, चालिरीती, विचार करण्याच्या पद्धती घेऊन आलेले. पण एका धर्माखाली त्यांनी स्वतःला संघटित केले आणि अतिशय प्रतिकुल परिस्थितितुन बाहेर येऊन आज स्वत्:चा विकास साधलाय.>>>>>>> +१००
साधना तुलाही ते पुस्तक आवडेल. मला माहिती नाही ते बाजारात आहे/नाही.
जागू .........ग्रो ग्रीन छाने गं नर्सरी.
.
.
सगळ्या निगकर्सना सस्नेह
सगळ्या निगकर्सना सस्नेह आमंत्रण ! मी काकांना विचारुन, परवानगी घेऊन फोटो टाकीन. त्यांच्या घरात फक्त पुस्तके अन फक्त पुस्तकंच आहेत! ते लिखाणात इतरे गर्क असतात की त्यांच्या घरी इतर कोणी (फॅन्स व्यतिरीक्त) येऊन गेल्याच गावीही नसतं. संध्याकाळी आगाऊ परवानगीने फॅनसना भेटतात.
अच्छा जायला पाहीजे गो
अच्छा जायला पाहीजे गो ग्रीनला.
चितमपल्ली फॅनक्लबमध्ये मलापण घ्या. मलाही फार आवडतात त्यांची पुस्तकं. किती नवे शब्द कळतात.
रच्याकने रिक्षा फिरवीन म्हणते. या मेपल पानाने मला फार भुरळ घातली होती. : http://www.maayboli.com/node/51916
नशीबवान आहेस मंजू. चितमपल्ली
नशीबवान आहेस मंजू. चितमपल्ली सारखा लेखक फार दुर्मिळ आहे. +१
अगदी
व्वा.. मस्त गप्पा.. मंजू खरीच
व्वा.. मस्त गप्पा.. मंजू खरीच भाग्यवान , इथे तुझे अनुभव शेअर कर अजून !!
लसणाची वेल... बरं झालं कोडं बिडं न घालता जागुली ने सरळ नांवच सांगितलं ते
साधना, ते एअर फ्रांसचे विमान
साधना, ते एअर फ्रांसचे विमान होते. अपहरणकर्त्यांनी ते युगांडा ( एन्टेबे म्हणजेच कंपालाचा विमानतळ ) मधे नेले. त्याकाळचा युगांडाचा अध्यक्ष इदी अमीन याने प्रवाश्यांच्या सुटकेचे कुठलेही प्रयत्न न करता अपहरणकर्त्यांनाच साथ दिली. त्यावेळी इस्रायली कमांडोजनी त्या प्रवाश्यांची सुटका केली. त्या वेळी वादळही झाले होते. यावर एक चित्रपट होता. आपणच आपल्या लोकांची सुटका केली पाहिजे, इतर कुणीही करणार नाही, असे एक वाक्य या घटनेवर निघालेल्या चित्रपटात होते.
चितमपल्लींनी नवीन काही लिहिले
चितमपल्लींनी नवीन काही लिहिले तर इथे अवश्य लिहित जा, मंजू. बर्याच वर्षांत त्यांचे नवीन पुस्तक बघितलेले नाही.
साधना > त्या देशाच्या
साधना > त्या देशाच्या धडाडीचे कौतुक वाटते. चारी बाजुने शत्रूने वेढलेला देश असुनही अतिशय खंबीरपणे त्याने स्वतःला उभे केले आहे. > त्यांची ती भूमी त्यांना परत मिळालीही. पण ती परत मिळली ती त्या भूमीवर त्यांच्यानंतर राहणा-या लोकांना विस्थापित करुन. जे दु:ख त्यांनी भोगले तेच दु:ख त्यांच्यामुळे पॅलेस्टिनीजच्या वाट्याला आले. आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणालाही समाधान लाभणार नाही याची खात्री करुनच निर्णय घेतले जातात का? >+१
नशीबवान आहेस मंजू.> +१
जागू मस्त फोटो. मंजुताई
जागू मस्त फोटो.
मंजुताई नशीबवान आहेस.
बाकी माहिती वाचते आता.
मस्त फोटो गो ग्रीन चे. कमळ तर
मस्त फोटो गो ग्रीन चे. कमळ तर एकदम सुंदरच, या रंगाचे मी पाहिले नव्हते.
म्हणजे तुम्ही पुणा मुंबईत सेट होणार नंतर हे नक्की समजायला हरकत नाही. 
दिनेशदा ,मला असला जॉब करायला मनापासून आवडेल.>> मला पण घ्या .मी तर फ्री मधे .
सिनी, आडगावी नर्सरी असेल तरी
सिनी, आडगावी नर्सरी असेल तरी माझी तयारी आहे. मला ना झाडावरून फळे तोडायला फार आवडतात ( नारळ नाही
) तसे फळतोडणीचे काम मिळाले तर मी आनंदाने करीन, मी पण फ्री मधे.
रच्याकने, मानुषी, नारळाची झाडे तूम्ही घर बांधतानाच लावली का ? बहुतेक गुर्जरसाहेबांनी कोकणची आठवण म्हणून लावली असणार !
दिनेश विपु पहा.
दिनेश विपु पहा.
मंजू, चितमपल्ली हे अगदी
मंजू, चितमपल्ली हे अगदी ऋषीतुल्य व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या लिखाणातूनच ते जाणवतं. छाया चितमपल्लींची आणि तुमची मैत्री आहे ही गोष्ट नि ग कर्सच्या खूपच फायद्याची आहे!!


जागू, नक्की येणारे गं तुझ्याकडे...:स्मित: (आणि दा भारतात आले की बहुधा आम्ही दोघेही त्यांच्याकडे पडीकच असू!! :डोमा:)
मला ना झाडावरून फळे तोडायला फार आवडतात ( नारळ नाही स्मित ) >>>>
मी पण, मी पण!!................... फ्री मधे नर्सरीत काम करायला मी अगदी 'एका पायावर' तयार आहे!!
इस्रायलवरचं पुस्तक वाचायलाच पाहिजे..
हा करकोचाच आहे ना? मला ह्याचा
हा करकोचाच आहे ना?

मला ह्याचा धागा काढायचा आहे.
जागू, हा घोगलीफोड्या /
जागू, हा घोगलीफोड्या / घोगल्याफोड्या करकोचा किंवा Asian Open bill Stork आहे. किरण पुरंदरेंच्या 'पाणथळीतील पक्षी' मधे आहे. चोचीच्या वैशिष्ट्यपूर्ण आकाराचा उपयोग त्याला कठिण कवचे (शिंपले) फोडण्यासाठी होतो.
गो ग्रीन सुंदर!
छाया चितमपल्लीही छान लिहितात. त्यांच्या लहानपणीच्या आठवणींचा, वडिलांवरचा लेख दिवाळी अंकात वाचल्याचे आठवते आहे.
छाया चितमपल्लीही छान लिहितात.
छाया चितमपल्लीही छान लिहितात. त्यांच्या लहानपणीच्या आठवणींचा, वडिलांवरचा लेख दिवाळी अंकात वाचल्याचे आठवते आहे.>> आठवत असेल तर अंकाचे नाव सांग.
जागू करकोचा मस्तच.
छाया चितमपल्लींची आणि तुमची मैत्री आहे ही गोष्ट नि ग कर्सच्या खूपच फायद्याची आहे!! स्मित>> अगदी बरोबर.
मित्रहो, मंजूला आपण एक प्रश्नावली देऊन चितमपल्लींची एक मुलाखत घेता येईल आपल्याला.
मंजूला आपण एक प्रश्नावली देऊन
मंजूला आपण एक प्रश्नावली देऊन चितमपल्लींची एक मुलाखत घेता येईल आपल्याला.+ बी ला अनुमोदन
Pages