निसर्गाच्या गप्पा (भाग २३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 10 November, 2014 - 14:09

निसर्गाच्या गप्पांचा धागा २३ व्या भागामध्ये पदार्पण करत आहे. सगळ्या निसर्गाच्या गप्पांच्या सदस्यांचे हार्दिक अभिनंदन.

"हिवाळा" हा सगळया ऋतुंमधे आल्हाददायक ऋतु वाटतो. हिवाळ्याची पहाट खुपच रम्य वाटते. पहाटे सभोवताल पसरलेले धुके, गार वारं, पक्षांचा किलबिलाट, गाईचे हंबरणे, कोवळ्या उन्हाचा किरणोत्सव, आंगणात पेटवलेल्या चुलीचा धुर,वाफाळता चहा.. सगळेच कसे रमणिक आणि प्रसन्न वाटते.

हिवाळ्यात थकवा, चिडचिड जाणवत नाही, शीण येत नाही, एरवी नकोस झालेले उन सुदधा हवेहवेसे वाटते. या दिवसात अहार वाढलेला असतो तसेच पचन शक्ती पण चांगली असते. या ऋतूत सशक्त होऊन ही ताकद साठवुन वर्षभर पुर्वायची असते..

तसेच थंड हवामानामुळे या दिवसात फळ भाज्यांची रेलचेल असते.. पेरु,सिताफळे,पपई,, चिक्कु अशा मधुर फळाची मेजवानी असतेच जोडीला संत्रे, मोसंबी अशी निमफळ पण चाखायला मिळतात. थंडी मुळे फुला - फळांचे रंग अधिकच गडद आणि लोभस वाटतात.

या दिवसात काही झाडांची पान गळती असते तर..काही झाडे ओसंडुन बहरत असतात.
एकी कडे बुची , पारिजातकांचे सुगंधीत सडे पडलेले असतात तर दुसरीकडे शेवंती, चमेली, सायली नटलेली दिसते..
तर असाहा सुगंधोत्सव कधीच संपु नये असे वाटते...

आपण सगळे नुकतीच दिवाळी जलौषात साजरी करुन एका वेगळ्याच जोशात कामाला लागलेले असतो... आता वेद लागतात ते तुळशीच्या लग्नाचे! आपले सगळे सण समारंभ निसर्गाशीच निगडीत आहेत.. उदा. कार्तीक महिन्यातच तुळशी विवाहा असण्याचे कारण असे की या महिन्यात तुळस बहरलेली असते , तिला भरपुर पान आणि मंजीर्‍या आलेल्या असतात.. म्हणजेच विवाहा योग्य झालेली असते... या सणाच्या निमित्याने कन्या योग्य वयात आल्यावरच तिचा विवाह करावा असे तर आपल्या पुर्व़जांना सुचवायचे नसेल ना! असे श्री दिलीप व सौ पोर्णिमा कुलकर्णीं यांच्या एका पुस्तकात वाचल्याचे आठवते..

शिवाय, तुळशीच्या लग्नासाठी लागणारे सगळे साहित्य आपल्याला निसर्गचे देते..उदा. विवाहासाठी लागणारी झोपडी किंवा मांडव उसाची किवा ज्वारीची असते,.. पुजेच्या साहित्यात बोरं, चिंचा, आवळे, सिताफळ हवेच. म्हणजेच काय तर सणा समारंभाच्या निमित्याने आपण निसर्गाचीच पूजा करतो, आभार मानतो. आणि असे करणे गरजेचे आहे.कारण आपण निसर्गाकडुन नेहमिच काही ना काही घेत आलो आहोत. त्याचे आपल्यावर अनंत उपकार आहेत, कधी न फेडु शकणारे.

तर अशा या "कधी न संपावा" अस वाटणार्‍या रुतुचे आपण सगळे मना पासुन नि.ग. वर स्वागत करुया.

(वरील फोटो व लेखन मायबोलीकर निसर्गप्रेमी सायली पातुरकर यांच्याकडून)

नि.ग. च्या धाग्याची सुरुवात झाली आहे ५ डिसेंबर २०१० रोजी पासून.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाच्या गप्पा (भाग २१) http://www.maayboli.com/node/49967
निसर्गाच्या गप्पा (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>जागु खरंच लक्कीये.. निसर्गाच्या कुशीत राहतेय

खरोखर. 'केतकीच्या बनी....' आठवलं एकदम.

Hello all... Saglyanche abhar. Mr.prakrutit pragati ahe. Ajun off join nahi kelay. Jan first week madhe karin bahutek. ni ga. Khup miss karte aahe. Adun madhun vachat aste... Dinesh da hema tai sini jagu manju tai dhanyvad.

Dhaga mastch dhawtoy... B lavkar manogat yevu det. Manju tai hemalkasa var lavkarach lekh ani pra chi tak... Pratikshet.... Shubhratri.

हा रविवार ( खरं तर सोमवार ) आपल्याकडचा वर्षातला सर्वात लहान दिवस असेल. ( आमच्याकडे सर्वात मोठा )
मी इथे बघितलंय या दिवशी सूर्य इतका दक्षिणेकडे गेलेला असतो कि त्या दिवशीचा सुर्योदय आणि सुर्यास्त मला एकाच खिडकीतून दिसतात. मला भारतातून असे बघितल्याचे आठवत नाही. या रविवारी आठवणीने बघून इथे कुणी लिहील का ?

हा रविवार ( खरं तर सोमवार ) हा भारतातला सर्वात लहान दिवस तर आमच्याकडे सर्वात मोठा.
मी बघितलंय इथे कि मला या दिवशीचा सुर्योदय आणि सुर्यास्त, एकाच खिडकीतून दिसतात. भारतात असे निरिक्षण केल्याचे मला आठवत नाही. या रविवारी कुणी बघून इथे लिहील का ?

मी बघितलंय इथे कि मला या दिवशीचा सुर्योदय आणि सुर्यास्त, एकाच खिडकीतून दिसतात. <<< पण वेगवेगळ्या वेळी ना? Wink

दिनेशदा, अगदी बरोबर. माझ्या खिडकीतून सुद्धा सुर्य दक्षिणेकडे अजून अजून सरकत आहे आणि मला वाटत आहे जणू पुर्व दिशा बदलली का Happy मजा येते अशी निरिक्षणे करताना.

दिनेशदा, हा सोमवार वर्षातला लहान दिवस असेल असं लिहाल तर दुवा मिळेल. रविवार लहान असेल असं लिहिलत तर मात्र...... Proud

लोकहो, वरच्या मोगर्‍याच्या फुलाचा फोटो काढताना हे दिसलेले... काय आहे कोणी सांगेल का? एकाच पानावर होता तो प्रकार. DSC_0905.JPG
अन थोडा वेगळा अँगल. DSC_0906.JPG

पण ती एका बारीक दोर्‍यावर आहेत. परागकण असतात तशी. फोटोत प्रत्येक डॉटच्या खाली अंधुकशी रेष दिसतेय पहा.
ते पानापासुन वर उचलेले आहेत. चिकटलेले नाहित.

मानुषीताई, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Happy

मोनाली, हे असलं पांढरं माझ्याकडेही आलं होतं पानांवर पुर्वी. नंतर त्याला तंतू आले होते आणि झाडाची वाट लागली होती. भिंग घेऊन बघ ना जरा काय आहे ते.

मानुषी वाढदिवसाच्या हर्दिक शुभेच्छा.

मोनाली पान काढून टाक सरळ ते आणि नष्ट करून टाक जर किड असेल तर.

हॅप्पी बड्डे मानुषी

---------

मोनाली, ती अंडीच आहेत. ताबडतोब पान काढून टाकायला हवेय.

अर्रे...........सर्वांना खूप खूप धन्यवाद!
सायली तुला बघून छान वाटलं गं! मिस्टरांना "गेट वेल सून" सांग हं!
आज आधी दिनेशला खूप खूप धन्यवाद! आणि माझ्या इथल्या सर्व निसर्गप्रेमी मित्र मैत्रिणींना खूप खूप धन्यवाद.
इथे वावरून निसर्गाकडे पहाण्याची एक जादूई दृष्टी प्राप्त होते. आजूबाजूच्या निसर्गाच्या करामती जाणवायला लागतात.
या पाल्हाळाचा मुद्दा:
काल आमच्या रोटरी क्लबात माझं पाऊण तासांचं प्रेझेन्टेशन झालं. विषय होता: विन्टर अ‍ॅन्ड स्प्रिन्ग इन यू एस ए थ्रू माय आय पॅड"
या विषयीचे फोटो दाखवले आणि थोडं थोडं नॅरेशन. तर त्यात थोडा सायन्टिफिक टच दिला होता. कारण प्रेक्षकांच्यात डॉकटर , प्रोफेसर आणि उच्च शिक्षित मंडळी(आमचेच मित्र) होती. यासाठी एका मुद्द्याचा खूप सविस्तर विस्तार मला दिनेशनी समजावून सांगितला. तो मी तिथे उधृत केला. लोक्स खूप इम्प्रेस्ड झाले. मुख्य म्हणजे सगळ्यांना नवीन विषय कळला आणि आवडला.
तो मुद्दा: अति थंड प्रदेशात हिवाळ्यात सगळ्या झाडांचे आधी खराटे असतात आणि स्प्रिन्गच्या सुरवातीस एकदम फुलांनीच झाड बहरते. पानं न येता. याबद्दल मला खूप कुतुहल होतं
ते दिनेशने खूप छान एक्स्प्लेन केलं.

मानुषी, तुझ्या प्रेझेंटेशनबद्दल तुझं अभिनंदन! Happy आणि दिनेशदांनी जे सांगितलं ते इथे दे ना....

Pages