निसर्गाच्या गप्पा (भाग २३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 10 November, 2014 - 14:09

निसर्गाच्या गप्पांचा धागा २३ व्या भागामध्ये पदार्पण करत आहे. सगळ्या निसर्गाच्या गप्पांच्या सदस्यांचे हार्दिक अभिनंदन.

"हिवाळा" हा सगळया ऋतुंमधे आल्हाददायक ऋतु वाटतो. हिवाळ्याची पहाट खुपच रम्य वाटते. पहाटे सभोवताल पसरलेले धुके, गार वारं, पक्षांचा किलबिलाट, गाईचे हंबरणे, कोवळ्या उन्हाचा किरणोत्सव, आंगणात पेटवलेल्या चुलीचा धुर,वाफाळता चहा.. सगळेच कसे रमणिक आणि प्रसन्न वाटते.

हिवाळ्यात थकवा, चिडचिड जाणवत नाही, शीण येत नाही, एरवी नकोस झालेले उन सुदधा हवेहवेसे वाटते. या दिवसात अहार वाढलेला असतो तसेच पचन शक्ती पण चांगली असते. या ऋतूत सशक्त होऊन ही ताकद साठवुन वर्षभर पुर्वायची असते..

तसेच थंड हवामानामुळे या दिवसात फळ भाज्यांची रेलचेल असते.. पेरु,सिताफळे,पपई,, चिक्कु अशा मधुर फळाची मेजवानी असतेच जोडीला संत्रे, मोसंबी अशी निमफळ पण चाखायला मिळतात. थंडी मुळे फुला - फळांचे रंग अधिकच गडद आणि लोभस वाटतात.

या दिवसात काही झाडांची पान गळती असते तर..काही झाडे ओसंडुन बहरत असतात.
एकी कडे बुची , पारिजातकांचे सुगंधीत सडे पडलेले असतात तर दुसरीकडे शेवंती, चमेली, सायली नटलेली दिसते..
तर असाहा सुगंधोत्सव कधीच संपु नये असे वाटते...

आपण सगळे नुकतीच दिवाळी जलौषात साजरी करुन एका वेगळ्याच जोशात कामाला लागलेले असतो... आता वेद लागतात ते तुळशीच्या लग्नाचे! आपले सगळे सण समारंभ निसर्गाशीच निगडीत आहेत.. उदा. कार्तीक महिन्यातच तुळशी विवाहा असण्याचे कारण असे की या महिन्यात तुळस बहरलेली असते , तिला भरपुर पान आणि मंजीर्‍या आलेल्या असतात.. म्हणजेच विवाहा योग्य झालेली असते... या सणाच्या निमित्याने कन्या योग्य वयात आल्यावरच तिचा विवाह करावा असे तर आपल्या पुर्व़जांना सुचवायचे नसेल ना! असे श्री दिलीप व सौ पोर्णिमा कुलकर्णीं यांच्या एका पुस्तकात वाचल्याचे आठवते..

शिवाय, तुळशीच्या लग्नासाठी लागणारे सगळे साहित्य आपल्याला निसर्गचे देते..उदा. विवाहासाठी लागणारी झोपडी किंवा मांडव उसाची किवा ज्वारीची असते,.. पुजेच्या साहित्यात बोरं, चिंचा, आवळे, सिताफळ हवेच. म्हणजेच काय तर सणा समारंभाच्या निमित्याने आपण निसर्गाचीच पूजा करतो, आभार मानतो. आणि असे करणे गरजेचे आहे.कारण आपण निसर्गाकडुन नेहमिच काही ना काही घेत आलो आहोत. त्याचे आपल्यावर अनंत उपकार आहेत, कधी न फेडु शकणारे.

तर अशा या "कधी न संपावा" अस वाटणार्‍या रुतुचे आपण सगळे मना पासुन नि.ग. वर स्वागत करुया.

(वरील फोटो व लेखन मायबोलीकर निसर्गप्रेमी सायली पातुरकर यांच्याकडून)

नि.ग. च्या धाग्याची सुरुवात झाली आहे ५ डिसेंबर २०१० रोजी पासून.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाच्या गप्पा (भाग २१) http://www.maayboli.com/node/49967
निसर्गाच्या गप्पा (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय शांकली Happy

बीबीसी ची टाईम मशीन म्हणून एक डॉक्यूमेंटरी आहे, त्यात फुलांच्या फुलण्याच्या वेळा आणि दिवसाच्या नेमक्या त्या काळात अ‍ॅक्टीव्ह असणारे किटक यांचा संबंध कसा गहीरा असतो ते दाखवले आहे. किटकांच्या सोयीनेच ती फुलत असतात... आणि आपल्याला वाटतं...

वाहवा.. सरसों के बाग, कुंडीतली सरसो.. मस्त..

वर्षे , सरड्याला मी ही इतक्या प्रेमपूर्वक पहिल्यांदाच पाहिलं, सरडा शुड टेल यू थांकु.. Happy

शांकली Rofl

सरड्याचा फोटो मस्त. मला तो थोडी 'झोकुन' आलाय असे वाटतेय त्याच्या डोळ्यांवरुन. Happy

जागु आणि दिनेश, फडके मारण-यांची जागा भरली असेल तर मी थोडी भांडी घासेन. मला सैपाकाचा भारी कंटाळा आहे, कोणी आयते करुन दिले तर दोनचार भांडी घासायची तयारी आहे माझी Wink

दिनेशदा आणि मित्रहो, मी काल रात्री मुस्तफातून व्हीट-ग्रासची दोन पाकीटे आणलीत. मलेशियाला ही लोक व्हीट्ग्रास उगवतात आणि इथे विकतात. तर माझ्यामते, अंदाजे एक दीड ग्लास पाण्यात हे व्हीट ग्रास मी मिक्सर मधून काढून ते गाळणीने गाळून पिता येईल. मी हा प्रयोग पहिल्यांदाच करत आहे. योग्य पद्धत कशी आहे व्हीट ग्रास खाण्याची तेवढे सांगला का? धन्यवाद.

बी, पहिल्यांदाचा घेतो आहेस का ? कदाचित पोटाला त्रास होऊ शकेल. त्यामूळे आधी थोडाच घेऊन बघ.
बाकी रस काढायची पद्धत बरोबर आहे. तशी त्याला खास चव नसते. थोडेसे मीठ व लिंबू घतलेस तर चांगले.

शांकली, साधना... लांब राहतो म्हणून, नाहीतर हक्काने माहेरपणाला बोलावलं असतं. तसही माझ्या मुंबईच्या घरी कधीही या. स्वागतच आहे. माझी आई आणि वहीनी माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून स्वागत करतात.

अरे वा मस्त मस्त फोटो.

बी हो ती पाती धुवुन थोड्या पाण्यात मिक्सीतुन फिरवुन घे. जास्त पाण्याने रस पांचट होईल व इतका सर्व संपवावा लागेल. रस येण्यापुरतेच पाणी टाकुन करुन पहा.
गाळल्यावर उरलेला चोथा कोथींबीर सारखा चटणी करुन घेणे (म्हणजे करुन बघणे, व कशी झाली ते सांगणे.)
चोथ्याची आयडीया वरचा रिप्लाय देताना सुचली. मी अजुन वापरुन पाहिला नाहीये.

वर्षे , सरड्याला मी ही इतक्या प्रेमपूर्वक पहिल्यांदाच पाहिलं, सरडा शुड टेल यू थांकु.>>>> Proud

दा, व्हीटग्रासचा रस गुळचट लागतो की. बाकी काही अ‍ॅड करायची मला तरी गरज वाटली नव्हती.

दिनेशदा आणि मोनालि, त्वरित उत्तराबद्दल धन्यवाद. ही माहिती उद्याला उपयोगात येईल. इथे छायाचित्र देईल.

मला फक्त चोथा वाया जाईल ह्याचे दु:ख आहे. कारण मी परत त्या चोथ्याची चटणी वगैरे करणार नाही. घरी असतो तर बकरीला गाईला दिला असता. इथे परदेशात असे उरले सुरले कुणालाही देता येत नाही.

बी, तो चोथा भाकरीत वापरून बघ ना. खरं तर व्हीट ग्रास बारीक वाटून तेच भाकरीच्या पिठात मिसळलं तर, असाही विचार मनात आला. भाकरी गोड लागेलच शिवाय थापायलाही सोपी जाईल.

नवऱ्याचा तुटपुंजा पगार नियमितपणे घरी येण्याची खात्री असली तर पत्नी त्यात आनंदाने संसार करते. पण कधी घबाड मिळतं तर कधी महिनोन्महिने पैचीही कमाई होत नाही अशी बिनभरंवशाची गत असली तर शहाणी कारभारीण घबाडाचा घसघशीत हिस्सा बँकेत टाकते. स्वत: माळवं, शिवणटिपण करते. कमीत कमी मिळकतीतूनही शिल्लक उरवण्यासाठी काटकसर करायला शिकते. डाएटच्या काळात शरीरही तशीच काटकसर शिकतं आणि मिळणाऱ्या पोषणाचा मोठा हिस्सा चरबीच्या रूपाने शिलकीत टाकतं. निव्वळ वजन कमी झाल्यामुळे शरीराचं रोजचं कामही कमी होतं आणि शिलकीतल्या कॅलरीज वाढतात. शिवाय भूक वाढवणाऱ्या रसायनांचं प्रमाणही शरीरात चढतं. कारभारणीची कमाई वाढते. म्हणून तीस किलो झटपट गमावले की नव्याने पन्नास किलो सटासट कमावले जातात. एका सर्वेक्षणात ८३ टक्के डाएटकऱ्यांचं वजन डाएटनंतर पुन्हा वर गेलं आणि बहुतेकांचं पूर्वीहूनही अधिक चढलं!

माझ्या आवडत्या लेखिका, डॉ उज्ज्वला दळवी यांच्या लेखातील एक भाग.
मूळ लेख इथे आहे.

http://www.loksatta.com/lokprabha/excessive-diet-1050086/

उज्ज्वला दळली एक व्यक्ती म्हणून अतिशय महान आहेत. त्यांच्यासारख प्रेमळ बोलायला कुणालाही जमणार नाही. इथे त्या आल्यात.. त्यांच्या आयुष्याबद्दल अगदी सुरवातीपासून सांगितल. त्या अतिशय छान बोलतात. जे काही बोलतात ते अगदी मनापासून .. एकही शब्द खोटा नाही. प्रत्येक शब्द प्रेमाने रसरसलेला. मग तो शब्द कितीही गद्य असो. पण त्यांच्या तोंडून तो शब्द तरल होऊन बाहेर पडेल. खूप ओलावा आहे त्यांच्या वागणूकीमधे.

दिनेशदा भाकरीची आयडीया एकदम भारी आहे. धन्यवाद.

मागे मी तॉम यॅम सुप बद्दल लिहिले होते. त्याचे इथे एक चित्र. ह्यात खूप सार्‍या मिरच्या आहेत. दोन लेमन ग्रास अर्थात गवती चहाची देठ आहेत. लिंबाची पाने आहेत. गलंगल आहे जे आल्यासारखे दिसते. हे सुप खोकला सरदी पडाशावर उत्तम मानले जाते पण अति तिखट असते. माझे तर जीभ पोळली होती:

हे एक लॉलीपॉपसारखे काहीतरी...

हे बांगलादेशाचे लिंबू आहेत. ह्याची चव ऑडोमाससारखी लागते पण तरीही चवीला छान असते. फक्त तो एक मंद मंद ऑडोमॉस सारखा वास येतो.

कोवळी पाने....

मागील पानावर आपण सरड्याचा सुंदर आणि सुस्पष्ट फोटो पाहिला - हा सरडा - खवलेधारी सरपटणारा प्राणी - थंड रक्ताचा असतो - म्हणजेच याला स्वतःच्या शरीराचे तापमान स्वतःच्या मर्जीने राखता येत नाही - खूप थंडी पडल्यास याला उन्हात बसावे लागते - या उन्हातून शरीराचे तापमान झटकन वाढावे म्हणून हे खवले मदत करतात. उन्हात फार तापल्यास हा मरुन जाईल म्हणून मग शरीराचे योग्य ते तापमान राखण्यासाठी हा लगेच बिळात किंवा सावलीत जाऊन बसतो.

आपण उष्ण रक्ताचे प्राणी - आपले शरीर ३७ डि. से. हे तापमान आपले आपण कायम राखू शकते. आपण समजा थंड प्रदेशात गेलो तरी शरीर आटोकाट प्रयत्न करुन ३७ डि. से. तापमान राखणारच. तसेच समजा आपण गरम प्रदेशात गेलो तर शरीराचे तापमान आहे तेच ठेवण्यासाठी आपल्याला भरपूर घाम येईल - जसे माठाच्या सच्छिद्रतेमुळे पाणी बाहेर पाझरते व हे पाणी बाष्प होण्यासाठी आतील पाण्यातील उष्णता वापरते - सहाजिकच माठाच्या आतील पाणी थंड थंड होत जाते - (थोडक्यात आपल्याला कोणी काय "माठ" आहे म्हटल्यास अजिबात वाईट वाटून घेऊ नये - आपण खरोखरीचे "माठच" आहोत हे लक्षात असू द्यावे ... Happy Wink )

टण् - टण् -टण् -टण् -टण् .... (तास लवकर संपवलेला आहे - काळजी नसावी Happy )

बी, फोटोंचा खजीनाच आहे की रे तुझ्याकडे. छान फोटो.

वर्षा, सरड्याचा फोटो तर अफलातून.
दिनेशदादा, जागू, मी पण तयार आहे भांडी घसायला, फडकं मारायला. जागूकडे मासे साफ करायचे पण काम करेन. Happy
दिनेशदादा, लिगर आहेत की. जगातील सर्वात मोठी cat हा/ ही लिगरच आहे. https://www.youtube.com/watch?v=OSx_x5FkY2w

शशांक, सर्पदंशाच्या लसीच्या तसेच इतर सर्व माहीतीबद्दल आभार.

काहीदिवसांपुर्वीच वाचनात आले होते की जे लोक इबोलातून बरे झालेत त्यांचे प्लाझ्मा घेऊन इबोलावर लस बनवण्याचा विचार आहे.

हल्ली मला स्वप्नात पण हाच धागा दिसायला लागला आहे. शांकली ने दाखवलेली मोठीच्या मोठ्ठी वेल पण टोमॅटोची. मोठमोठाले साप पण दिसले. वेगवेगळ्या भाज्या पण स्वप्नात येतात हल्ली माझ्या. ह्या सगळ्यांसोबत स्वप्नात आईपण दिसली.

नले, रोमात का असतेस ? येत रहा ! लायगर आहेत म्हणजे आंतरप्राणीय विवाह यशस्वी होतात तर. आणखी कुणाकुणाची लग्नं लावता येतील Happy

बी, आमच्याकडे एक निलगिरीचे झाड असते. त्याच्या पानांना ओडोमॉस सारखा वास असतो. त्याची पाने आपल्या निलगिरीपेक्षा किंचीत वेगळी असतात. म्हणजे आपल्याकडच्या पानाना टोकाशी देठ असतो तर या पानांना जरा पुढे असतो. ( फोटो दाखवल्याशिवाय कळणार नाही . )

डॉ. उज्ज्वला यांना भेटायची खुप इच्छा आहे. त्या दहावी आणि बारावीला पण प्रथम आल्या होत्या.

गलांगल एवढे तिखट असते, हे माहीत नव्हते. इथे क्वचित दिसते दुकानात पण खुप महाग असते.

आंतरप्राणीय लग्न म्हंटल्यावर माला शिंग असलेला घोडा, उडणारा हती असे काहीसे डोळ्यासमोर दिसायला लागलेय.

बी, मागच्या पानावरचा तिसरा फोटो कदाचित petunia आहेत वाट्ते.
शांकली जॅक्मोन्सिया(बरोबर?) चे विष्णुकांता नाव किती छान आहे. पेंटासच्या पा़ कळ्या टोकदार असतात. बी ने ती फुलं झूम करुन काढली असावी असे वाटते.

साधना, क्रोमवर तुझ्यामुळे लिहायला यायला लागले. Happy

गालांगाल अजिबात तिखट नस्तं.. तिखटच नसतं.. Happy

बी त्या थाय मिर्च्यांबद्दल सांगत असेल..

अर्रे व्वा.. अंतर्जातीय विवाह आता इतर प्राण्यांतही.. Happy

आता मात्र मला गलांगल चाखायलाच पाहिजे.

माझ्या शरीराच्या तपमानाचा काहीतरी वेगळा फंडा असणार. मला सहसा थंडी वाजत नाही. अगदी बर्फाळ पर्वतावरही नाही. कोल्ड स्टोरेजमधेही मी सहज वावरू शकतो...मी थंडगार फरशीवर अंथरुण न घेता झोपू शकतो.

मग मी थंड रक्ताचा प्राणी असेन का ? कि अंगात चरबी जास्त आहे ??

दिनेश Lol

गालांगाल शिवाय इंडोनेशिअन फूड इज इनकंप्लीट.. चावून खात नाही ते, ठेचून घालतात, फ्रेगरंस करता..

ओ शशांक सर, तुमचा तास अजिब्बात कंटाळवाणा नाही वाटत.. प्लीज थोडक्यात आटपू नका.. सिलेबस नीट कंप्लीट करा बरं.. Happy

वर्षू अगं तूच काय मीपण सरड्याला इतकं काळजीपूर्वक पहिल्यांदाच पाहिलं. Proud
थांकू सर्वांना. शशांक, तुम्ही झुओलॉजिस्ट आहात का? मस्त माहिती असते तुमच्याकडे.

अरे काय वेड्यासारखा पाऊस पडला काल रात्री. मे महिन्यात वळिवाच्या पावसाचे असतात तसे प्रचंड वारे.
माझे दुसर्‍या लॉटमधले आवळा कॅन्डी आणि २ ताटं आवळासुपारी गच्चीत होती. ते फडक्याने झाकलेलं असतं त्यामुळे एखाद दिवशी गच्चीत राहिलं तरी चालतं पण काल रात्री एकंदरित रागरंग बघून सगळं खाली आणलं आणि सगळं वाचलं. काय पाऊस झालाय रात्री.
आमच्या ऑफिसचा एक स्टाफ(बंगाली) नारळाचं सगळं पडलेलं छान तोडून मोळी करून जाळायला स्कूटरवरून घरी घेऊन जातो.(मला त्याचं खूप कौतुक वाटतं.) तर त्याच्यासाठी मी घरात सोलल्या गेलेल्या हिरव्या नारळाच्या शेंड्याही गच्चीत वाळवायला ठेवते. त्या मात्र भिजल्या.
आपला इतका अंदाज चुकला ....शेतकर्‍यांचं जे झालं ते काल टीव्हीवर दाखवत होते. त्यानं गलबलून आलं आणि काळजाचा ठोका चुकला. आडवी झालेली पिकं...कांदा . आणि डाळिंबं, द्राक्षं बागा भुईसपाट.
बघवत नव्हतं!
निसर्ग चक्र बिघडायला आणि अश्या अवकाळी पावसाला आपणच माणसं जबाबदार आहोत नाही का?

आंतरप्राणीय लग्न म्हंटल्यावर माला शिंग असलेला घोडा, उडणारा हती असे काहीसे डोळ्यासमोर दिसायला लागलेय.>>>>> Lol
निसर्ग चक्र बिघडायला आणि अश्या अवकाळी पावसाला आपणच माणसं जबाबदार आहोत नाही का?>>>> अगदी अगदी!
अदिती, ती गुलाबी फुलं पिटुनियाच आहेत. जमिनीत लावलेली पिटुनियाची फुलं मी प्रथमच बघितली!! आणि अशीही किती सुंदर दिसताहेत...तुम्ही म्हणता तसं ती दुसरी पेंटास नसावीतही. पण विष्णुक्रांता म्हणजे इव्हॉव्ह्युलस अल्सीनॉइड्स (Evolvulus alsinoides) असं फ्लॉवर्स ऑफ इंडियात दिलेलं आहे. (ही बोटॅनिकल नावं म्हणजे अगदी टंग ट्विस्टर आहेत!!).:स्मित: तुम्ही म्हणता ते जॅक्मोन्सिया मात्र मला माहिती नाही.

सुप्रभात लोक्स Happy
मागील दोन आठवडे चिक्कार धावपळीत गेले. तब्बल ११-१३ वर्षानंतर काल आयटी क्षेत्रात शेवटचा दिवस झाला. सोमवार पासुन नविन सुरूवात. बादवे मला "म्हाडा"मध्ये जॉब मिळाला आहे. निग पर्यायाने माबोवर येणे काहि दिवस/महिने कमी होणार, पण वेळ मिळेल तेंव्हा जरूर चक्कर मारणार. Happy

एक पर्व काल संपले, दुसर्‍या पर्वाला परवापासुन सुरूवात होणार. Proud

(विषयांतराबद्दल क्षमस्व Happy )

Pages