निसर्गाच्या गप्पांचा धागा २३ व्या भागामध्ये पदार्पण करत आहे. सगळ्या निसर्गाच्या गप्पांच्या सदस्यांचे हार्दिक अभिनंदन.
"हिवाळा" हा सगळया ऋतुंमधे आल्हाददायक ऋतु वाटतो. हिवाळ्याची पहाट खुपच रम्य वाटते. पहाटे सभोवताल पसरलेले धुके, गार वारं, पक्षांचा किलबिलाट, गाईचे हंबरणे, कोवळ्या उन्हाचा किरणोत्सव, आंगणात पेटवलेल्या चुलीचा धुर,वाफाळता चहा.. सगळेच कसे रमणिक आणि प्रसन्न वाटते.
हिवाळ्यात थकवा, चिडचिड जाणवत नाही, शीण येत नाही, एरवी नकोस झालेले उन सुदधा हवेहवेसे वाटते. या दिवसात अहार वाढलेला असतो तसेच पचन शक्ती पण चांगली असते. या ऋतूत सशक्त होऊन ही ताकद साठवुन वर्षभर पुर्वायची असते..
तसेच थंड हवामानामुळे या दिवसात फळ भाज्यांची रेलचेल असते.. पेरु,सिताफळे,पपई,, चिक्कु अशा मधुर फळाची मेजवानी असतेच जोडीला संत्रे, मोसंबी अशी निमफळ पण चाखायला मिळतात. थंडी मुळे फुला - फळांचे रंग अधिकच गडद आणि लोभस वाटतात.
या दिवसात काही झाडांची पान गळती असते तर..काही झाडे ओसंडुन बहरत असतात.
एकी कडे बुची , पारिजातकांचे सुगंधीत सडे पडलेले असतात तर दुसरीकडे शेवंती, चमेली, सायली नटलेली दिसते..
तर असाहा सुगंधोत्सव कधीच संपु नये असे वाटते...
आपण सगळे नुकतीच दिवाळी जलौषात साजरी करुन एका वेगळ्याच जोशात कामाला लागलेले असतो... आता वेद लागतात ते तुळशीच्या लग्नाचे! आपले सगळे सण समारंभ निसर्गाशीच निगडीत आहेत.. उदा. कार्तीक महिन्यातच तुळशी विवाहा असण्याचे कारण असे की या महिन्यात तुळस बहरलेली असते , तिला भरपुर पान आणि मंजीर्या आलेल्या असतात.. म्हणजेच विवाहा योग्य झालेली असते... या सणाच्या निमित्याने कन्या योग्य वयात आल्यावरच तिचा विवाह करावा असे तर आपल्या पुर्व़जांना सुचवायचे नसेल ना! असे श्री दिलीप व सौ पोर्णिमा कुलकर्णीं यांच्या एका पुस्तकात वाचल्याचे आठवते..
शिवाय, तुळशीच्या लग्नासाठी लागणारे सगळे साहित्य आपल्याला निसर्गचे देते..उदा. विवाहासाठी लागणारी झोपडी किंवा मांडव उसाची किवा ज्वारीची असते,.. पुजेच्या साहित्यात बोरं, चिंचा, आवळे, सिताफळ हवेच. म्हणजेच काय तर सणा समारंभाच्या निमित्याने आपण निसर्गाचीच पूजा करतो, आभार मानतो. आणि असे करणे गरजेचे आहे.कारण आपण निसर्गाकडुन नेहमिच काही ना काही घेत आलो आहोत. त्याचे आपल्यावर अनंत उपकार आहेत, कधी न फेडु शकणारे.
तर अशा या "कधी न संपावा" अस वाटणार्या रुतुचे आपण सगळे मना पासुन नि.ग. वर स्वागत करुया.
(वरील फोटो व लेखन मायबोलीकर निसर्गप्रेमी सायली पातुरकर यांच्याकडून)
नि.ग. च्या धाग्याची सुरुवात झाली आहे ५ डिसेंबर २०१० रोजी पासून.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाच्या गप्पा (भाग २१) http://www.maayboli.com/node/49967
निसर्गाच्या गप्पा (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

मानुषी ताई वाढदिवसाच्या खूप
मानुषी ताई वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मस्त माहिती दिलीत.
मानुषी वादिहाशु!!!!!!!!!!!!!!
मानुषी
वादिहाशु!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
मानुषीताई वाढदिवसाच्या
मानुषीताई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!
पण ती एका बारीक दोर्यावर आहेत. परागकण असतात तशी. फोटोत प्रत्येक डॉटच्या खाली अंधुकशी रेष दिसतेय पहा. ते पानापासुन वर उचलेले आहेत. चिकटलेले नाहित.>>>>>मोनाली, माझ्याकडेही तुळशीच्या एकाच पानावर आलंय हे. फोटो काढुन इथे देणार होतो पण सध्या खुपच व्यस्त आहे. इंटरनेटवरही साधारण तासभरच येता येतं.
सर्वांना पुनश्च धन्यवाद!
सर्वांना पुनश्च धन्यवाद!
मानुषी ताई वाढदिवसाच्या खूप
मानुषी ताई वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
माझ्याकडे पण कडिपत्त्याच्या पानांवर पांढरट ठिपके पडलेत. मागे एकदा सर्व रोपाची तोडणी केली होती. नंतर आलेली पाने थोडे दिवस छान आली , आता परत ते ठिपके दिसू लागले. आता काय करावे ?
मानुषी, वाढदिवसाच्या हार्दिक
मानुषी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रज्ञा काही वर्षापूर्वी माझा
प्रज्ञा काही वर्षापूर्वी माझा खूप छान झालेला कडीपत्ता असाच गेला. त्यावेळी मला नि ग माहिती नव्हतं नाहीतर इथे मार्गदर्शन मिळाले असते.
प्रज्ञा , झाडावर हिंग मिश्रित
प्रज्ञा ,
झाडावर हिंग मिश्रित पाण्याची फवारणी, हिरवी मिरची-आल-लसूण पेस्टच्या पाण्यात भरपूर पाणी घालून त्या पाण्याची फवारणी किंवा तंबाखुच्या पाण्याचा फवारणी करून बघ.
ती पांढर्या ढेकणाची अंडी
ती पांढर्या ढेकणाची अंडी आहेत. भारी चेंगट असतात ते. सध्या तरी लागण झालेली पाने, फांद्या काढून दूरवर नेऊन जाळून टाका.
नंतरही दिसलेच तर त्यावर थेट
नंतरही दिसलेच तर त्यावर थेट जेट स्प्रे करा ( वरील मिश्रणाचा ) किंवा ब्रशने लावा हे मिश्रण..
ं मनुषि ताई उ.वा दि हा
ं मनुषि ताई उ.वा दि हा शु.प्रे. बद्दल हा.अ..,..
प्रज्ञा देवकी सायली सर्व
प्रज्ञा देवकी सायली सर्व मुलींना खूप खूप धन्यवाद!
सायली मिस्टर बरे आहेत ना? काळजी घे.
म नुशि ताई आता बरे आhet...
म नुशि ताई आता बरे आhet... आजुन २ आthavde प्लास्तर आहे .. स गळ्या चे खुप आभार...
दीनेश दा तुमचा उम्बरात ले किडे माकोडे खुप छान लेख आहे...
उ.चे झाड जिथे अस्ते तिथे वाटर लेव्हल हाय अ स ते...
मा.चीत्त्त म प ल्ली म्हण्तात हे झाड नाल्याच्या काठि लावावे... पाणी शुद्धी क र णा चे काम क र ते....
@मानुषी ताई वा.दि.च्या
@मानुषी ताई वा.दि.च्या उशिराने पण मनापासुन खुप खुप शुभेच्चा.
@सायली ताई मिस्टरांना लवकर बरे वाटेल आणि तुमची ही काळजी घ्या.
उजू पावसाळ्यात मी दुधी,
उजू पावसाळ्यात मी दुधी, घोसाळी, शिराळी, काकडीवर तू वर सांगितलेले पाणी मारले. सगळी किड गेली. अजुनही त्यातला घोसाळ आणि दुधीचा वेल आहे त्यावर अजुन परत किड लागली नाही.
सुप्र निगकर्स......... काल
सुप्र निगकर्स.........


काल एका शाळेत गॅदरिन्गचे प्र.पा. म्हणून गेलो होतो. तिथे पुष्पगुच्छाऐवजी हे दिलं. नटलेल्या चिमण्यांच्या हातून घेताना मस्त वाटलं.
पिन्की धन्यवाद.
घरातली फुलं..........
अरे वा अभिनंदन मानुषी ताई. ते
अरे वा अभिनंदन मानुषी ताई.
ते सेम गुलाबाझे झाड माझ्याकडे आहे.
अरे वा, सायली आहे का ? छान
अरे वा, सायली आहे का ? छान वाटलं.
मानुषीताई, कित्ती गोड दोन्ही
मानुषीताई, कित्ती गोड दोन्ही फोटो.
नवीन भागाचं कुठपर्यंत आलं,
नवीन भागाचं कुठपर्यंत आलं, मला एका गाण्याबद्दल लिहायचे आहे !
सध्या फक्त वाचनमोड मध्ये.
सध्या फक्त वाचनमोड मध्ये.
नविन भाग कधी येतोय?
नगरकर गारठले. ५ डिग्री
नगरकर गारठले. ५ डिग्री टेम्परेचर.
एन्जॉय मानुषीताई.
एन्जॉय मानुषीताई.
देवकी सर्व मुलींना खूप खूप
देवकी सर्व मुलींना खूप खूप धन्यवाद!>>>> डोक्यावर राहिलेल्या पांढर्या केसांसह गहिवरले.
काल एका शाळेत गॅदरिन्गचे
काल एका शाळेत गॅदरिन्गचे प्र.पा. म्हणून गेलो होतो. >>>>>> अर्रे वा, मानुषी अभिनंदन - प्रमुख पाहुणे - व्वा, मज्जा आहे बुवा सेलिब्रिटीची (मर्राठीत वलयांकितच ना ????) ....
बास्स का राव
बास्स का राव ...........शशांक? अरे छोट्या गावात मोठ्या वयाच्या लोकांना हा मान वय वाढलं म्हणून आपोआप मिळतो. (हे फक्त माझ्याबाबतीत हं!)
देवकी ...यू आर मंजे अगदी टू मच हं!
डोक्यावर राहिलेल्या पांढर्या केसांसह गहिवरले.>>>>>>>>
काय ? ५ डिग्री ?
काय ? ५ डिग्री ? मज्जाय.
अवेळी पाऊस काय, एवढी थंडी काय ? काय चाल्लय काय नगरमधे ?
नगर rocking. रस्त्यावरच्या
नगर rocking. रस्त्यावरच्या खड्यात काही बदल झालाय का मानुषीताई
काय म्हणायचंय काय तुला
काय म्हणायचंय काय तुला अंजली????आँ? नगरमधे काही बदल होत नाही असं तुला का वाटतं? असं इतकं काही हे नाही हं नगर!
खड्ड्यात तर इतका बदल झालाय.............आधी होते त्यापेक्षा खूप मोठ्ठे झालेत ना!!
(No subject)
Pages