निसर्गाच्या गप्पांचा धागा २३ व्या भागामध्ये पदार्पण करत आहे. सगळ्या निसर्गाच्या गप्पांच्या सदस्यांचे हार्दिक अभिनंदन.
"हिवाळा" हा सगळया ऋतुंमधे आल्हाददायक ऋतु वाटतो. हिवाळ्याची पहाट खुपच रम्य वाटते. पहाटे सभोवताल पसरलेले धुके, गार वारं, पक्षांचा किलबिलाट, गाईचे हंबरणे, कोवळ्या उन्हाचा किरणोत्सव, आंगणात पेटवलेल्या चुलीचा धुर,वाफाळता चहा.. सगळेच कसे रमणिक आणि प्रसन्न वाटते.
हिवाळ्यात थकवा, चिडचिड जाणवत नाही, शीण येत नाही, एरवी नकोस झालेले उन सुदधा हवेहवेसे वाटते. या दिवसात अहार वाढलेला असतो तसेच पचन शक्ती पण चांगली असते. या ऋतूत सशक्त होऊन ही ताकद साठवुन वर्षभर पुर्वायची असते..
तसेच थंड हवामानामुळे या दिवसात फळ भाज्यांची रेलचेल असते.. पेरु,सिताफळे,पपई,, चिक्कु अशा मधुर फळाची मेजवानी असतेच जोडीला संत्रे, मोसंबी अशी निमफळ पण चाखायला मिळतात. थंडी मुळे फुला - फळांचे रंग अधिकच गडद आणि लोभस वाटतात.
या दिवसात काही झाडांची पान गळती असते तर..काही झाडे ओसंडुन बहरत असतात.
एकी कडे बुची , पारिजातकांचे सुगंधीत सडे पडलेले असतात तर दुसरीकडे शेवंती, चमेली, सायली नटलेली दिसते..
तर असाहा सुगंधोत्सव कधीच संपु नये असे वाटते...
आपण सगळे नुकतीच दिवाळी जलौषात साजरी करुन एका वेगळ्याच जोशात कामाला लागलेले असतो... आता वेद लागतात ते तुळशीच्या लग्नाचे! आपले सगळे सण समारंभ निसर्गाशीच निगडीत आहेत.. उदा. कार्तीक महिन्यातच तुळशी विवाहा असण्याचे कारण असे की या महिन्यात तुळस बहरलेली असते , तिला भरपुर पान आणि मंजीर्या आलेल्या असतात.. म्हणजेच विवाहा योग्य झालेली असते... या सणाच्या निमित्याने कन्या योग्य वयात आल्यावरच तिचा विवाह करावा असे तर आपल्या पुर्व़जांना सुचवायचे नसेल ना! असे श्री दिलीप व सौ पोर्णिमा कुलकर्णीं यांच्या एका पुस्तकात वाचल्याचे आठवते..
शिवाय, तुळशीच्या लग्नासाठी लागणारे सगळे साहित्य आपल्याला निसर्गचे देते..उदा. विवाहासाठी लागणारी झोपडी किंवा मांडव उसाची किवा ज्वारीची असते,.. पुजेच्या साहित्यात बोरं, चिंचा, आवळे, सिताफळ हवेच. म्हणजेच काय तर सणा समारंभाच्या निमित्याने आपण निसर्गाचीच पूजा करतो, आभार मानतो. आणि असे करणे गरजेचे आहे.कारण आपण निसर्गाकडुन नेहमिच काही ना काही घेत आलो आहोत. त्याचे आपल्यावर अनंत उपकार आहेत, कधी न फेडु शकणारे.
तर अशा या "कधी न संपावा" अस वाटणार्या रुतुचे आपण सगळे मना पासुन नि.ग. वर स्वागत करुया.
(वरील फोटो व लेखन मायबोलीकर निसर्गप्रेमी सायली पातुरकर यांच्याकडून)
नि.ग. च्या धाग्याची सुरुवात झाली आहे ५ डिसेंबर २०१० रोजी पासून.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाच्या गप्पा (भाग २१) http://www.maayboli.com/node/49967
निसर्गाच्या गप्पा (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
(No subject)
अरे वा! सायली आली
अरे वा! सायली आली ,गुड.मिस्टरांची तब्येत कशी आहे?
(No subject)
हाय देवकी... स ग ळ ठिक्
हाय देवकी... स ग ळ ठिक् आहे... बर् वाटतय खुप दिवसा नी कोणाशि तri बोलु न...
सो स्वीट सायली. मिस्टर बरे
सो स्वीट सायली. मिस्टर बरे आहेतना, गुड.
सुप्रभात
सुप्रभात ........................सायली देवकी व इतर सर्व निगकर्स
सायलीचे मिस्टर बरे आहेत हे वाचून खूप छान वाटलं.
सायली तुझे स्वागत.तुझ्या
सायली तुझे स्वागत.तुझ्या मिस्टरांची तब्बेत ठीक आहे हे समजल्यावर बरे वाटले.
सुप्रभात! सायली बॅक टु वर्क .
सुप्रभात! सायली बॅक टु वर्क . ...गुड. सॉरी निगकर्स आत्ताच चितमपल्लीकाकांकडे जाऊन आले फोटो काढू दिला नाही...
त्यांनी इतक्यात नवीन पुस्तक
त्यांनी इतक्यात नवीन पुस्तक लिहिले असेल तर त्याची माहिती अवश्य देत जा इथे.
नविन धाग्याचे लिखाण व फोटो
नविन धाग्याचे लिखाण व फोटो तयार आहे. ऑफिसमध्ये नेट स्लो असल्याने उशीर लागतोय. त्यामुळे आज् रात्री किंवा उद्या धागा नक्की काढते.
मानुषी मस्त माहिती व त्या
मानुषी मस्त माहिती व त्या ओघाने आलेले औदुंबराचे माहितीपर लेखन तर क्या बात.
अजुन एक सांगू??? विश्वास किती ठेवायचा हे ज्याच्यात्याच्यावर हा.......
ज्या घराखालुन औदुंबराची मुळे जातात त्या घरातल्या लोकांना कधीही बाहेरची बाधा होत नाही असे म्हणतात.
माझ्या बाबांचा ह्यावर विश्वास आहे. मला स्वतःला अनुभव नाही.
तर हो, ती अंडी / किड जे काही होते ते मी नष्ट केले आहे. पान खुडुन फेकुन दिले.
बाकी परवा ग्रिलला रंग द्यायला म्हणुन ती मोगर्याची कुंडी खाली काढली तर काय.... ते झाड / वेल चक्क ७-८ फुट झाल्याचे लक्षात आले. सहज म्हणुन हातात मोठी डहाळी धरली तर टोक धरायला हात उंच करावा लागला.
त्या ओघाने आलेले औदुंबराचे
त्या ओघाने आलेले औदुंबराचे माहितीपर लेखन तर क्या बात.
अजुन एक सांगू??? विश्वास किती ठेवायचा हे ज्याच्यात्याच्यावर हा.......
ज्या घराखालुन औदुंबराची मुळे जातात त्या घरातल्या लोकांना कधीही बाहेरची बाधा होत नाही असे म्हणतात.
माझ्या बाबांचा ह्यावर विश्वास आहे. मला स्वतःला अनुभव नाही.
>>>>>>>>>>>>> मोनाली..........सॉरी गं पण नाही लक्षात आला संदर्भ.
धnywad सगळ्यन्चे.... मोनाली
धnywad सगळ्यन्चे....
मोनाली म्हण्जे हे झाडघrachaya आस पास जri असेल तरी भुता ची किन्वा कुठलीही वाईट बाधा होत नाही.. अgदि ब रोब र आहे.
साक्शात द्त्ताचा वास अsतो तिथे....
खूप टायपो अस्तात... मो. वरून
खूप टायपो अस्तात... मो. वरून अक्सेस करते आहे..
ईथे डोकाव्ल्या शिवाय राहु शkत नाही...
साम्भाळुन घ्या..
शुभ रात्री.....
शुभ रात्री.....
Caught in act
Caught in act

झरबेरा, मस्त फोटो.तो/ती,
झरबेरा, मस्त फोटो.तो/ती, तिला/त्याला झापत आहे.दुसरा/री मुकाट ऐकून घेत आहे.
झरबेरा, खूssssपच सुंदर फोटो!
झरबेरा, खूssssपच सुंदर फोटो!
Donhi ekach ahet. Don photo
Donhi ekach ahet. Don photo bajula lavlat
झरबेरा, क्युट फोटो.
झरबेरा, क्युट फोटो.
झरबेरा मस्त फोटो!
झरबेरा मस्त फोटो!
devki cha kalpanaavilas
devki cha kalpanaavilas changla aahe. agdi fitt...
मस्त फोटो झरबेरा
मस्त फोटो झरबेरा
झरबेरा, मस्त फोटो!
झरबेरा, मस्त फोटो!
Donhi ekach ahet. Don photo
Donhi ekach ahet. Don photo bajula lavlat>>>> हो साधना, प्रतिसाद दिल्यानंतर लक्षात आले.त्या अगोदर मी त्या फोटोच्या प्रेमात पडले.
झरबेरा खुपच गोड फोटो.....
झरबेरा खुपच गोड फोटो.....
ऐश्वर्या, फोटो मस्तच!!
ऐश्वर्या, फोटो मस्तच!! पोपटांच्या खातानाच्या हालचाली फार मजेशीर असतात. खूप करमणूक होते बघून!! विशेषतः ते जेव्हा त्यांच्या पायात खाद्य पकडून खातात ती हालचाल फार गंमतीदार असते. मधेच त्यांना डोळे बारीक करण्याची (डोळे मारण्याची?) सवय असते!!
तेव्हा असं वाटतं ते रागावलेत की काय!
'पक्षी आपले सख्खे शेजारी' या पुस्तकात श्री. किरण पुरंदरेंनी ह्याच्या उधळपांड्या वृत्तीबद्दल मात्र योग्यच लिहिलंय.
नि ग चा नवा भाग कधी येणार?
झरबेरा,किती छान राघू
झरबेरा,किती छान राघू .लहाणपणी आम्ही नऊच्या आकड्यातुन पोपट काढायला शिकलो.
अजुनही ते शुद्ध रंगसंगतीतले चित्र काढायचा मोह होतोय.
किती तजेलदार रंग दिसतात निसर्गात ...
झरबेरा, मस्तच फोटो. गळ्यावर
झरबेरा, मस्तच फोटो. गळ्यावर लाल रंगाचा पट्टा असतो ना नॉर्मली?
पूर्ण वाढलेला भारतीय जातीचा पोपट काय देखणा दिसतो! पूर्वी शेजार्यांकडे पाळलेले पोपट असायचे. ते कुठून आणत हे कधी कळले नाही. एकदा तर त्यांच्याकडे चौदा पोपट झाले! शेवटी ठेवायला पुरेसे पिंजरे नाहीत म्हणून त्यांना सोडून दिले. आमच्या घराजवळच एक महाकाय पिंपळ होता. सोडल्यानंतर सुरुवातीला हे सोडलेले पोपट बहुतेकदा त्या पिंपळावर दिसायचे. नंतर हळूहळू ते दिसेनासे झाले.
सुरेख फोटो झरबेरा!
सुरेख फोटो झरबेरा!
Pages