निसर्गाच्या गप्पांच्या २१ व्या भागाबद्दल सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन.
नि. ग. च्या हया द्विदशकोत्तर धाग्यावर मनोगत व्यक्त करताना खूप खूप आनंद होत आहे. डिसेंबर २०१० मध्ये नि. ग. ला सुरवात झाली आणि आज इतक्या अल्पावधीत वीस भाग झाले ही ह्या धाग्याचे, ही खरं तर आपल्या सगळ्यांच्या
निसर्गावरील प्रेमाचीच पावती आहे. ह्या वर्षी जून महिन्यात पावसानी अढी दिली खरी, पण मागच्या आठवड्यापासून त्याने कम बॅक करुन मस्त बॅटिंग
करायला सुरवात केली आहे. मला असं वाटत की आपल्याकडे पावसाळ्या दरम्यानचा निसर्ग एरवी एवढा बहरलेला नसतो . आता शहरापासून थोड दूर गेलं तर
दिसतील आपल्याला हिरव्या रंगाच्या हर एक छटा, हिरव्या गवतातून हळूच माना उंचावून जग बघणारी इवली इवली गवतफुले, पाणी पिऊन तृप्त झालेली आणि
वार्यावर डोलणारी भातशेती, डोंगरमाथ्यावर विहरणारे ढग, उतारावरून वाहणारे छोटे छोटे निर्झ्रर आणि नशीबाने साथ दिली तर इंद्रधनुष्य ही. सगळेच नजरेला आणि मनाला शांतावणारे. सोनचाफा, सोनटक्का, प्राजक्त, तगर, ब्रम्हकमळ, लिली, अनंत ,
गावढी गुलाब, अशा विविध फुलांच्या बहरण्याचे ही हेच दिवस.
नि .ग. चा धागा म्हणजे माझ्यासकट अनेकांसाठी दिवसभराचा ताण तणाव विसरून एका निखळ आनंदाची अनुभुती मिळवण्याचा एक मार्ग आहे. हा भाग ही नेहमीप्रमाणेच उत्तमोत्तम फोटो, उपयुक्त माहिती, दिलखुलास गप्पा आणि
निखळ निरोगी थट्टा विनोद यानी बहरु दे हीच त्या निसर्ग देवतेच्या चरणी प्रार्थना!!!
वरील मनोगत व फोटो नि.ग. प्रेमी आय.डी. मनीमोहोर चे आहे.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
स्निग्धाला वाढदिवसाच्या खुप
स्निग्धाला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा!!!!
जिप्स्या, फ़ुलांवर पण नाव
जिप्स्या, फ़ुलांवर पण नाव घालून दिलसं?
वॉव जिप्सी काय सुंदर रंग आहे,
वॉव जिप्सी काय सुंदर रंग आहे, खुप छान वाटलं
असू दे गं शोभा त्यामुळे
असू दे गं शोभा त्यामुळे त्याला खास जिप्सी टच येतो
ममो, जिप्सी खुप खुप धन्यवाद.
असू दे गं शोभा त्यामुळे
असू दे गं शोभा त्यामुळे त्याला खास जिप्सी टच येतो >>>>>>कळ्ळं का शोभे?
कळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ हा जिप्स्या!
कळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ हा जिप्स्या!
स्निग्धा, वा दि हा शु. तुझा
स्निग्धा, वा दि हा शु. तुझा हा दिवस फुलापानांच्या सान्नीध्यात जावो.
स्निग्धा, वा दि हा शु. तुझा
स्निग्धा, वा दि हा शु. तुझा हा दिवस फुलापानांच्या सान्नीध्यात जावो. >> अरे तुला कस कळलं, माझ्याकडे काल संध्याकाळी एकदम ७ सोनटक्याची फुलं, ५ गुलाबाची फुलं शिवाय आज सकाळी २-३ गोकर्णाची फुलं उमलली आहेत
आणि गंमत म्हणजे कुंडीत सहज म्हणुन टाकलेल्या लालभोपळ्याच्या बियांमधुन वेल आलाय त्याची सुध्दा ३ फुलं उमललीत.
स्निग्धा - वाढदिवसाच्या
स्निग्धा - वाढदिवसाच्या अनेकानेक हार्दिक शुभेच्छा ...
स्निग्धा , वा दि हा शु...
स्निग्धा , वा दि हा शु...
सोनटक्क्या ला एकदम ७ फुलं, वॉव! कुठला आहे, पंढरा का पिवळा ? माझ्याकडे पांढरा आहे, पण तान्हाच आहे आजुन :), केव्हा फुलेल अस झालय! तुझ्या कडच्या फुलांचे फोटो टाक ना प्लीज.
स्निग्धा, वाढदिवसाच्या
स्निग्धा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
स्निग्धा , वा दि हा शु
स्निग्धा , वा दि हा शु
विदर्भात तान्हा पोल्याला खूप
विदर्भात तान्हा पोल्याला खूप महत्व आहे. होली करतो त्याप्रमाणे पोल्याला ही रुईची झाडं जालतात का?+++ होय मंजु ताई.
अश्विनी, मंदार/मांदारबद्दल छान माहिती. ++ १००
संध्याकाळी एकदम ७ सोनटक्याची
संध्याकाळी एकदम ७ सोनटक्याची फुलं, ५ गुलाबाची फुलं शिवाय आज सकाळी २-३ गोकर्णाची फुलं उमलली आहेत स्मित आणि गंमत म्हणजे कुंडीत सहज म्हणुन टाकलेल्या लालभोपळ्याच्या बियांमधुन वेल आलाय त्याची सुध्दा ३ फुलं >>>>>> थांब, जरा दिर्घ श्वास घेऊन तो घमघमाट अनुभवायला दे मग आधी मला.
शशांक, सायली, मोना, कांचन,
शशांक, सायली, मोना, कांचन, दिनेशदा सगळ्यांच खुप ठांकू
सायली, पांढरा आहे सोनटक्का.
मोना, मी पण काल संध्याकाळी असाच दिर्घ श्वास घेऊन त्यांचा सुगंध भरुन घेतला. इनफॅक्ट, काल पासुनच सुगंधी दिवसाची सुरवात झाली
स्निग्धा , हार्दिक शुभच्छा!
स्निग्धा , हार्दिक शुभच्छा!
स्निग्ध्रा, वाढदिवसाच्या
स्निग्ध्रा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!
Thank you very much Ashutosh
Thank you very much Ashutosh & Manjutai
Ashutosh, very beautiful flowers.
जागुताई, नवीन धागा
जागुताई, नवीन धागा "गणेशचतुर्थी" च्या मुहूर्तावर सुरु करणार का?
स्निग्धा, वाढदिवसाच्या
स्निग्धा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
स्निग्धा happy birthday.
स्निग्धा happy birthday. शुभेच्छा.
मानुषीचा फोन नंबर आहे का
मानुषीचा फोन नंबर आहे का कुणाकडे ? खुप दिवस झाले काहिही पोस्ट नाही.
स्निग्धा, वाढदिवसाच्या
स्निग्धा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
दिनेशदा योगायोग बघा. मी आज
दिनेशदा योगायोग बघा. मी आज लिहीणार होते मानुषी येत नाहीत. त्या छान फोटो देतात.
Thanks a lot everyone.
Thanks a lot everyone. Marathi type karata yet nahi aahe
साधनाने कबुतरे पाहीली तेव्हा
साधनाने कबुतरे पाहीली तेव्हा पासुन ती इथे आली नाही.
दिनेशदादा, त्या थोड्या व्यस्त
दिनेशदादा, त्या थोड्या व्यस्त आहेत सध्या तसेच नेटचा जरा प्रॉब्लेम सुरू आहे त्यांच्याकडे. वेळ मिळाला की येते असं म्हणाल्यात.
मी पण मानुषीताईना मिस करत
मी पण मानुषीताईना मिस करत होते, काही दिवसांपूर्वी इथेच लिहिलं पण होते.
नलिनी thanx, त्यांना सांग सगळे आठवण काढतायत.
व्यग्र या शब्दाला समानार्थी
व्यग्र या शब्दाला समानार्थी म्हणुन व्यस्त हा शब्द वापरणे चुकीचे आहे. मराठीत व्यग्रला व्यस्त म्हणणे टेलिफोन कंपन्यांमुळे सुरू झाले. त्यांनी चुकीचे भाषांतर केले आणि आपण ते उचलुन धरले.
तेच प्रधानमंत्री आणि पंतप्रधान या शब्दांचे झाले. दुरदर्शन असेतो पंतप्रधान होते नंतर खासगी चॅनेल्स आल्यावर हिंदी प्रधानमंत्रीचे मराठीतही प्रधानमंत्री झाले. निदान हे दोन शब्द समानार्थी तरी आहेत, पण व्यग्र आणि व्यस्त यांचे एकमेकांशी अजिबात नाते नाहीय.
स्निग्धा, वादिहाशु. सगळ्यांनी तुला फुले दिलीत, म्हणुन मी शब्द देते
नले.. अभार गं. तूझ्या घरी
नले.. अभार गं.
तूझ्या घरी गणपती असेल ना ?
साधना... ते व्यस्त म्हणजे व्यस्त प्रमाण / सम प्रमाण वाले ना ? माझा पण आताशा गोंधळ उडतो काही शब्दांबाबत. वाचन चालू असते पण बोलती बंद ना, ( मराठीत ! )
Pages