निसर्गाच्या गप्पांच्या २१ व्या भागाबद्दल सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन.
नि. ग. च्या हया द्विदशकोत्तर धाग्यावर मनोगत व्यक्त करताना खूप खूप आनंद होत आहे. डिसेंबर २०१० मध्ये नि. ग. ला सुरवात झाली आणि आज इतक्या अल्पावधीत वीस भाग झाले ही ह्या धाग्याचे, ही खरं तर आपल्या सगळ्यांच्या
निसर्गावरील प्रेमाचीच पावती आहे. ह्या वर्षी जून महिन्यात पावसानी अढी दिली खरी, पण मागच्या आठवड्यापासून त्याने कम बॅक करुन मस्त बॅटिंग
करायला सुरवात केली आहे. मला असं वाटत की आपल्याकडे पावसाळ्या दरम्यानचा निसर्ग एरवी एवढा बहरलेला नसतो . आता शहरापासून थोड दूर गेलं तर
दिसतील आपल्याला हिरव्या रंगाच्या हर एक छटा, हिरव्या गवतातून हळूच माना उंचावून जग बघणारी इवली इवली गवतफुले, पाणी पिऊन तृप्त झालेली आणि
वार्यावर डोलणारी भातशेती, डोंगरमाथ्यावर विहरणारे ढग, उतारावरून वाहणारे छोटे छोटे निर्झ्रर आणि नशीबाने साथ दिली तर इंद्रधनुष्य ही. सगळेच नजरेला आणि मनाला शांतावणारे. सोनचाफा, सोनटक्का, प्राजक्त, तगर, ब्रम्हकमळ, लिली, अनंत ,
गावढी गुलाब, अशा विविध फुलांच्या बहरण्याचे ही हेच दिवस.
नि .ग. चा धागा म्हणजे माझ्यासकट अनेकांसाठी दिवसभराचा ताण तणाव विसरून एका निखळ आनंदाची अनुभुती मिळवण्याचा एक मार्ग आहे. हा भाग ही नेहमीप्रमाणेच उत्तमोत्तम फोटो, उपयुक्त माहिती, दिलखुलास गप्पा आणि
निखळ निरोगी थट्टा विनोद यानी बहरु दे हीच त्या निसर्ग देवतेच्या चरणी प्रार्थना!!!
वरील मनोगत व फोटो नि.ग. प्रेमी आय.डी. मनीमोहोर चे आहे.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
<<आर्या, पुण्याला
<<आर्या, पुण्याला बालगंधर्वच्या आवारातच मोठा बहरणारा वृक्ष आहे. <<
हो दिनेशदा, मला शोभा म्हणाली होती तस! जाउन बघावेच लागेल आता एकदा.
काल गणेश चतुर्थीलाच सोनचाफा
काल गणेश चतुर्थीलाच सोनचाफा उमलला...
मनोभावे वाहिला, खुप समाधान मिळाले...:)
सायली वा, बाप्पा खुश
सायली वा, बाप्पा खुश तुझ्यावर.
अन्जु
अन्जु
सायली , मस्त ग.
सायली , मस्त ग.
अरे वा, सोनचाफा धन्य झाला !
अरे वा, सोनचाफा धन्य झाला !
हेमा ताई, दिनेश दा.. होय
हेमा ताई, दिनेश दा.. होय सोनचाफा पणं आणि मी पण..
सायली, पुर्वी कोकणात चाफ्याची
सायली, पुर्वी कोकणात चाफ्याची फुले प्रीझर्व करून ठेवायचे एक खास तंत्र वापरत. एका स्वच्छ काचेच्या बाटलीत, भरपूर तूरटी घातलेले पाणी घ्यायचे. मग त्यात अगदी ताजे सोनचाफ्याचे फूल, न दुखवता अलगद बुडवायचे.
मग बाटलीला घट्ट झाकण लावून लाखेने सील करायचे. अशी बाटलीतली फुले वर्षानुवर्षे न कोमेजता टिकत. सील मात्र तोडायचे नाही. अशी बाटली शोकेसमधे छान दिसत असे.
अगदी बरोबर . आमच्याकडे अजुन
अगदी बरोबर . आमच्याकडे अजुन ही आहेत अशी फुले.
अरे व्वा! करुन बघायला
अरे व्वा! करुन बघायला पाहिजे...अशाप्रकारची वेगवेगळी फुले मॉल्स मधे दिसतात.. तेव्हा मला नेहमी वाटायचे की हे
नेमक कुठल रासायनीक द्रव वापरतात ते? पण निव्वळ तुरटीच पाणी असतं नाही ते? ..
हेमा ताई फोटो टाका ना प्लीज...
दिनेशदा यांनी लिहिलेलं तंत्र
दिनेशदा यांनी लिहिलेलं तंत्र माझ्या नवऱ्याला पण माहितेय, त्यांच्या घरी नाही पण गावात काहीजण असं करायचे.
हेमाताई, येस फोटो हवाच आता.
पाऊस पाऊस आणि पाऊस.....
पाऊस पाऊस आणि पाऊस.....
सायली, अंजू ती सोनचाफ्याची
सायली, अंजू ती सोनचाफ्याची बाटलीत भरलेली फुलं घरी म्हणजे गावाला आहेत ग. आता गेले की फोटो काढून आणीन.
हाय मानुषी, प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला का पीसी चा ?
मानुषीताई यंदा पाऊस नगरला
मानुषीताई यंदा पाऊस नगरला गेलाय, आमच्याकडे एवढा नाहीये. मध्ये दोनदा फोन केला होता मैत्रिणीला नगरला, ती सांगत होती पाऊसच पाऊस आहे इकडे. एन्जॉय.
दिनेशदा, तुम्ही मागे विचारलं
दिनेशदा, तुम्ही मागे विचारलं होतं ते कन्फर्म केलं पण इथे लिहायचं राहून गेलं होतं. शिवाजीपार्कातल्या ब्राह्मण सहायक संघाच्या गल्लीत सेनापती बापटांच्या पुतळ्याच्या एंडकडून जाताना डावीकडल्या तिसर्या इमारतीबाहेर ते 'करवंदाचं' झाड आहे. आता ती जुनी बिल्डिंग पाडून नवी बांधायला काढलीये. पण नशिबाने ते झाड शाबूत ठेवलंय. ते तसंही कुंपणाच्या अगदी जवळ असल्याने फुटपाथवर फांद्या पसरून होतंस, तसंच आहे. आतला भाग थोडा कापला असेल. पण तोही नंतर वाढेलच.
वरच्या पोस्टवरून आठवलं,
वरच्या पोस्टवरून आठवलं, हल्ली अशा इमारती बांधताना झाडे मध्येच येतात पण ती काढता येत नाहीत. मग त्यांच्या इमारतीच्या बाजूच्या अर्ध्या भागातल्या फांद्याच फक्त कापल्या जातात. त्यामुळे त्या झाडांचा तोल बिघडतो. आणि जरा जोराचा वारा आला की झाडं मुळसकट उन्मळून पडतात.
हो मामी.. झाड वाढताना अगदी
हो मामी.. झाड वाढताना अगदी बॅलन्स संभाळत वाढते, पण एका बाजूच्याच फांद्या तोडल्या तर तोल जातोच.
त्यातूनही संधी मिळाली तर बरोबर दूसर्या बा़जूच्याच फांद्या वाढतात.
बरं, आता माझी एक शंका दूर करा बघू.. गजरेवाल्याकडे ज्यावेळी सुरंगीचे गजरे असतात त्यावेळी त्यावर हमखास
मधमाश्या दिसतात. पण बाजूला मोगर्याचा गजरा असला तरी त्यावर कधी मधमाशी जात नाही.
मी एरवीही कधी या फुलांवर ( मोगरा, जाई, जुई, चमेली ... ) किटक बसलेले बघितले नाहीत. तर ज्यांच्या घरी ही
फुले फुलतात, त्यांनी कधी बघितलेत का ? हि फुले बहुदा संध्याकाळी किंवा रात्री फुलतात. त्यावेळी कधी किटक दिसले का ?
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=qwF-ZENphHw
What Plants Talk About - Documentary
झाडं काय बोलतात ? बोलतात का ? त्यांचे सोशल सर्कल असते का ? वगैरे प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न
वरच्या माहितीपटात आहे. केवळ अदभूत आहे हे .. असे विषय असले कि आपल्या जगदीशचंद्र बोस यांची आठवण
आवर्जून काढली जाते. पण त्यानंतर आपल्याकडे काहीच संशोधन नाही झाले का ?
नाही गं ममो. आयपॅड्वर जीमेल,
नाही गं ममो.
आयपॅड्वर जीमेल, पिकासा आणि यूट्यूब वर्क नाही होत.
आणी माबो वरचे माझे प्रतिसाद कधी सेव होतात कधी नाही.
अन्जू रस्त्यांची वाट लागलीये.
अन्जू
रस्त्यांची वाट लागलीये. फोर व्हीलर गावात नेता येत नाही. आणि टू व्हीलर वरून आता पाण्यातले खड्डे कळ्त्च नाहीत.
४ सप्टे. नंतर पाऊस थांब्णारे असं भाकित आहे.
हो मानुषीताई, नगरचे खड्डे
हो मानुषीताई, नगरचे खड्डे चांगलेच परिचयाचे आहेत त्यापेक्षा श्रीरामपूरचे रस्ते खूप सुंदर होते पण विशेष काही वाटायचे नाही आमची डोंबिवली पण आहे प्रसिद्ध खड्ड्यांसाठी. यंदा जरा परिस्थिती काही ठिकाणी बरी आहे डोंबिवलीत.
आज आमच्याइथे भरपूर पाऊस
आज आमच्याइथे भरपूर पाऊस पडला.
नि.ग.च्या २२ व्या भागाचे अर्धे काम झाले आहे.
उद्या पूर्ण होताच नविन धागा निघेलच.
आमच्या मार्केटयार्डात झाली
आमच्या मार्केटयार्डात झाली बरं का सुरवात!


निसर्गागौरींच्या...आवाहनाला!
चिंचा, बोरे व्वा ! तों पा
चिंचा, बोरे व्वा ! तों पा सु... बोरं की करवंद?
अतृप्त आत्मा आता सगळ्यांची
अतृप्त आत्मा आता सगळ्यांची नावे सांगा.
जागु नविन भाग?
जागु नविन भाग?
बरंच ती ते हिरवं हिरवं वेफर्स
बरंच ती
ते हिरवं हिरवं वेफर्स सारखं काय आहे?
नमस्कार निसर्गपूजक मित्र
नमस्कार निसर्गपूजक मित्र हो.....
कोणी घरातील विघटनशील कचरा कुजवून त्याचे खत करण्यासाठी मातीची ३ भान्डी असणारा “Composter” वापरला आहे का ?
कसा आहे तो अनुभव ?
पूर्वी यावर चर्चा झाली आहे का ?
सॉरी लोक्स, मी मागे म्हणालेले
सॉरी लोक्स, मी मागे म्हणालेले तो कर्टुल्याचा वेल नव्हता. त्या कळ्या होत्या. आणि उमलल्यावर अशा दिसतायेत.
कशाचा वेल आहे ते सान्गा बर.
आर्या, हा बहुतेक पॅशनफ्रुटचा
आर्या, हा बहुतेक पॅशनफ्रुटचा वेल आहे. फुले राहुदेत तशीच. याला फळे लागतील. मग बघू या फळे कशी आहेत ती.
पॅसिफ्लोरा कूळातला वेल आहे नक्की.
Pages