निसर्गाच्या गप्पा (भाग २१)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 July, 2014 - 13:39

निसर्गाच्या गप्पांच्या २१ व्या भागाबद्दल सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन.

नि. ग. च्या हया द्विदशकोत्तर धाग्यावर मनोगत व्यक्त करताना खूप खूप आनंद होत आहे. डिसेंबर २०१० मध्ये नि. ग. ला सुरवात झाली आणि आज इतक्या अल्पावधीत वीस भाग झाले ही ह्या धाग्याचे, ही खरं तर आपल्या सगळ्यांच्या
निसर्गावरील प्रेमाचीच पावती आहे. ह्या वर्षी जून महिन्यात पावसानी अढी दिली खरी, पण मागच्या आठवड्यापासून त्याने कम बॅक करुन मस्त बॅटिंग
करायला सुरवात केली आहे. मला असं वाटत की आपल्याकडे पावसाळ्या दरम्यानचा निसर्ग एरवी एवढा बहरलेला नसतो . आता शहरापासून थोड दूर गेलं तर
दिसतील आपल्याला हिरव्या रंगाच्या हर एक छटा, हिरव्या गवतातून हळूच माना उंचावून जग बघणारी इवली इवली गवतफुले, पाणी पिऊन तृप्त झालेली आणि
वार्‍यावर डोलणारी भातशेती, डोंगरमाथ्यावर विहरणारे ढग, उतारावरून वाहणारे छोटे छोटे निर्झ्रर आणि नशीबाने साथ दिली तर इंद्रधनुष्य ही. सगळेच नजरेला आणि मनाला शांतावणारे. सोनचाफा, सोनटक्का, प्राजक्त, तगर, ब्रम्हकमळ, लिली, अनंत ,
गावढी गुलाब, अशा विविध फुलांच्या बहरण्याचे ही हेच दिवस.

नि .ग. चा धागा म्हणजे माझ्यासकट अनेकांसाठी दिवसभराचा ताण तणाव विसरून एका निखळ आनंदाची अनुभुती मिळवण्याचा एक मार्ग आहे. हा भाग ही नेहमीप्रमाणेच उत्तमोत्तम फोटो, उपयुक्त माहिती, दिलखुलास गप्पा आणि
निखळ निरोगी थट्टा विनोद यानी बहरु दे हीच त्या निसर्ग देवतेच्या चरणी प्रार्थना!!!

वरील मनोगत व फोटो नि.ग. प्रेमी आय.डी. मनीमोहोर चे आहे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नावांचा सुगंधी घोळ!>>>> येस्स! Happy
शशांकजी छान लिंक आहे, त्यातली पिवळा जास्मीन कातील आहे Happy

जिप्सी, साध्या जास्वंदीच्या कळ्या बाजारात आणेपर्यंत टिकत नाहीत ना म्हणून.. त्यामानाने डबलच्या टिकतात>>>>पण मला साध्या जास्वंदीचीच फुले गणपतीला वाहायला आवडतात आणि हल्ली याची झाडे जवळपास कुठेही दिसत नाही. पूर्वी २१ फुलांचा हार करून घालायचो गणोबाला. आता गणेशोत्सवात एक फुलही मिळणे दुरापास्त झाले आहे. Sad

मला पण.. मी पुर्वी आमच्या झाडावरच्या कळ्या, त्याच्या पानानेच झाकून ठेवायचो ( कळीभोवती एक पान तोडून घट्ट गुंडाळायचे त्याच्या देठाच्या सहाय्याने ) द्मग त्या कळ्या कुणाच्या लक्षात येत नाहीत. दुसर्‍या दिवशी ते पान सोडवले कि कळी आपल्यासमोरच उमलते. मला झाडावर फुललेले फुलच आवडायचे.

आता गणेशोत्सवात एक फुलही मिळणे दुरापास्त झाले आहे.

बस टाईम आ गया.... एकेक करुन सगळे दुरापास्त होतेय. कुंड्या विकत आणा आणि लावा रोपे.

एकेक करुन सगळे दुरापास्त होतेय. कुंड्या विकत आणा आणि लावा रोपे.++ अनुमोदन

मी पुर्वी आमच्या झाडावरच्या कळ्या, त्याच्या पानानेच झाकून ठेवायचो ( कळीभोवती एक पान तोडून घट्ट गुंडाळायचे त्याच्या देठाच्या सहाय्याने ) द्मग त्या कळ्या कुणाच्या लक्षात येत नाहीत. दुसर्‍या दिवशी ते पान सोडवले कि कळी आपल्यासमोरच उमलते. मला झाडावर फुललेले फुलच आवडायचे.+++ कीत्ती मस्त Happy दिनेश दा तुम्ही खरच खुप वेगळेच आहात Happy Happy

सायली, एकदा प्रयोग करून पहाच...
या जास्वंदीचा नैसर्गिक प्रसार होत नाही. कसा होणार ? फळ नाहीत, बिया नाही.
म्हणून प्रसार करायचा तर आपणच करायचा. जसे कुत्र्या मांजराचे माणसाशिवाय निभत नाही तसेच जास्वंदी तगरीचे आहे. मानवाचा सहवास हवाच यांना !

या कुंदा फुलाचेच बघा ना, अगदी डोंगरावर पण तो भरभरून फुललेला असतो. कारण सोपे आहे. फुलाएवढ्या संख्येने नसतील पण त्याला फळे येतात. ती खाणारे काही पक्षी असतातच.. बाकीच्या जास्मिन कूळातल्या झाडांनी उत्क्रांतीच्या एका टप्प्यात असे प्रयत्न करणे सोडून दिले... मानव नावाचा प्राणी करतोय ना आपला प्रसार. त्याला थोडा सुंगध दिला कि काम भागतंय.. मग कशाला हवेत रंग आणि साखरपाणी.. म्हणजे कुणी कुणाला वापरून घेतलं ?

पण मला साध्या जास्वंदीचीच फुले गणपतीला वाहायला आवडतात आणि हल्ली याची झाडे जवळपास कुठेही दिसत नाही. >>>>>>> +१.

snigdha, many happy returns of the Day Happy

खूप सुरेख आहेत फुलं..
खरच , मानुषी कशात बिझलिये कोण जाणे.. कोणाजवळ तिचा नंबर असल्यास फोन करा...

हाय ऑल
हाय गं वर्षू
मी पण मिस केलं तुम्हा सर्वांंना.
सध्या आय पॅड वापरते त्यामुळे घरी वाय फाय कम्पल्सरी.
आणि सगळा प्रयत्न करून कनेक्टच होत नाहीये. माझ्या कॉम्प वाल्याने हात टेकलेत.
आता पुण्याहून एकाला बोलावलंय. बघू. खूप लिहायचय आणि खूप वाचायचंय इथे!
आणि हपिसात खूप काम असल्याने तिथले सगळे कॉम्प बीझी असतात. आत्ता हपिसातूनच लिहितेय.
नलिनीने फोन केला होता तिकडून ...सो स्वीट ऑफ हर.
(सॉरी फॉर सो मच अवांतर)

Clipboard01_0.jpg
हे कोण?
कृष्णकमळासारखाच मंद मादक सुगंध होता.
मोठा वृक्ष होता. फांदीला धरून फुटबॉल साइजची गोल ब्राऊन फळे लागलेली होती.

़ वर्षू
जान हथेलीपर ले आये रे..........
हं ....दिनेश अन्जू....अगदी अगदी !
अजूनही आय पॅद आणि वाय फाय यांचं नीट जमेल तेव्हाच इथे येता येणारे!

मानव नावाचा प्राणी करतोय ना आपला प्रसार. त्याला थोडा सुंगध दिला कि काम भागतंय.. मग कशाला हवेत रंग आणि साखरपाणी.. म्हणजे कुणी कुणाला वापरून घेतलं ?+++ बापरे इतका गहन विचार फक्त तुम्हीच करू शकता दा... Happy

मनुषी ताई... वेलकम ब्यक...

जागु, नवा धागा लवकर येऊ देत... Happy

आर्या, पुण्याला बालगंधर्वच्या आवारातच मोठा बहरणारा वृक्ष आहे. भरपूर फुले लागतात त्याला.
बाकी कुठल्या झाडाबद्दल नाही सांगणार पण या झाडाची जमतील तितकी फुले खुडावीत असेच सांगेन कारण याची जी फळे असतात त्याला भयानक दुर्गंधी येते आणि त्यांची विल्हेवाट लावणे अवघड असते.

सायली, मला पुस्तकातून, माहितीपटातून जे ज्ञान देतात ना त्या गुरुजनांचे हे विचार.. मला कुठलं एवढं सुचायला ?

Pages