पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

Submitted by admin on 22 April, 2013 - 23:08

या अगोदरचे धागे
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुरण, पुरणाचे ते वडे करतात बूरेलु ते. हयग्रीव. वाटली डाळ नाहीतर भाजणी बनवून त्यात घालता येइल. पुरण पोळ्या.

मूगाची फोडणीची सुकी डाळ करतो तशी करता येईल. चांगली लागते. ह.डा. आधी भिजवावी लागेल. नुसत्या ह. डाळीचं वरण / दाल तडका पण छान होईल.
फार लाड करायचे असतील तर वाटल्या डाळीचे लाडू, पुरण > दिंड, पोळी, हलवा असले बरेच प्रकार करता येतील :धूम ठोकणारा बाहुला: :p

बुरेलुची रेस्पी हवी का? Wink
पत्ताकोबीची ह. डाळीने मस्त भाजी होते. रेस्पी हवी असल्यास योजा टाकते.

धोकार दालना नको करूस. ते तब्बेतीत करायचं आणि खायचं काम आहे. रेडीमेड मिक्स नसेल तर फार कुटारेटा आहे शिवाय तळणीचा पदार्थ!
हमस किंवा हयग्रीव सोपं वाटतंय, किंवा छोलार दाल.
चिकपीज, बेन्गाल ग्रॅम म्हणजेच हरभरा गं

पुरण कर नी. पुरणाचे कड्बूपण करता येतील जर तळण चालणार असेल तर. भरपूर पाणी मत्र घालायचं डाळ शिजवताना.
आआणि शिजल्यावर कट वेगला करायचा. साध्या आमटीत पण ढक्ल्टाआ येतो कटाची कराय्ची नसेल तर.

Needhap, chana dal tasbhar bhijwa, ani cooker madhe sadharan 10 mins botchepi hoi paryant bharpur panyat shijvun ghya. Cooker thand zalyavar pani kadhun thaka. Dal mash kara. Barik chirlela kanda, tikhat ,meeth, dhanepud ghalun mishranache parathe banawa.

एक वर्ष जून्या ब्राऊन राईस चे काय करता येईल .>>> ईडली, डोसे . आई जुन्या किंवा संपत नसलेल्या जाड बेचव तांद्ळाच्या ईड्ल्या करते. ब्राऊन राईस च्या हि होतिल भाज्या घालुन हेल्दि ऑप्शन आहे.

खूप सोपी रेसेपी आहे पण मला नाही जमत आहे. थेपले !!
मेथीचे थेपले नेहमी कडक होतात (सेमी पापड).नेटवर खूप प्रकार आहेत पण नक्की कसे करावे ? वाटीचे प्रमाण दिले तर बरे होयिल म्हणजे किती वाटी दही, मेथी , मळायचे कसे …

युसांयुसु, माकाचु? सगळेच प्रश्न इकडेच आलेले दिसताहेत.

चणाडाळ वापरून केलेले कोबीचे दोसे मस्त होतात. ट्राइड & टेस्टेड रेसिपी आहे.

थेपले मऊ होण्यासाठीच्या युक्त्या इथे आरंभीच दिल्या आहेत. थेपल्यांसाठी तेल फार वापरलं जातं असं वाटत असल्याने पराठेच केले आहेत.

तळण अजिबातच नको. सोपे हवे.
डाळ हे प्रकरण लीड रोलमधे हवंय त्यामुळे डाळी घातलेल्या भाज्या नको.
हयग्रीव आणि चिन्मयने हडा हमसची रेसिपी दिल्यास ती यांचा विचार करेन.
अजून काही असल्यास सांगा.

चणाडाळ मिक्सरमधून पाणी न घालता वाटा .त्याच्यात तिखट हळद ,मीठ,साखर घाला. कांद्याच्या फोडणीवर वरील वाटण घाला.

आमच्याकडे ह. डाळीचे भेंडके करतात. भरपूर लसून हि. मि., कोथिंबिर, कांदा, मीठ वगैरे घालून स्टीम करतात. डाळ आधी भिजवून, सरभरीत वाटून त्यात हे कलवायचे, गोळे बनवून कुकरात स्टीम करायचे आणि कढी सोबत ओरपायचे. (मोडून, कालवून वर कच्चे तेल घालून)

Pages