चला , वजन कमी करूया

Submitted by केदार जाधव on 31 July, 2014 - 02:38

आजपासून मी डाएट करणार ... रोज १ तास चालणार ... नक्क्की म्हणजे नक्क्क्की

आज मित्राच्या वाढदिवसाची पार्टी आहे , एक दिवस दाबून खाल्ल तर काय होतय , उद्या कव्हर करू .

आज खूप उशिर झाला उठायला , आज फिरण कॅन्सल .

आज घरी पुरणपोळ्या केल्या होत्या , पाच हाणल्या .

कित्ती हा पाऊस , आज राहू दे फिरायच .

गेले १ महिना वजन कमी करायचा प्रयत्न करतोय , पण १ किलोही कमी झाल नाही , जाऊ दे , ये अपने बसकी बात नही .

हे चित्र अनेकांच्या बाबतीत सारखच असत .
वजन कमी करायच असणार्या सगळ्यानाच इच्छा तर खूप असते , सुरूवातही बर्याचदा केली जाते , पण नंतर नंतर आता जाऊ दे , आपल्याच्यानं नाही होणार हे वर गाडी येते . हे टाळायच असेल तर एक तर मनावर संयम हवा किंवा कुणीतरी चेक ठेवणार हव . ते घरातील कुणी असेल तर सर्वोत्तम , पण आपल्याच माणसाला त्रास (?) कसा द्यायचा (उदा . त्याला आवडते पुरणपोळी असू दे , काल फार दमला होता तो आज राहू दे) म्हणून ते माणूस तुम्हाला सारख माग लागत नाही . आणि मग काय ? Happy

त्यासाठी हा धागा . ज्याना ज्याना वजन कमी करायचय (हेल्दी वे , नो क्रॅश डाएट) त्यांचा इथे ग्रुप बनवूया .
प्रत्येकाने काय आज चांगल केल , काय चुकल याची रोज लिस्ट देऊया . चांगल करणार्याच अभिनंदन करू अन एखादा सारख चुकायला लागला त्याचे कान पकडूया , काही शंका असतील तर एकमेकाना विचारूया .
क्या बोलते भाई (और बहन ) लोग ?

लोकहो ,

आता आपण या गुणपद्धतीत बर्यापैकी सेट झालो आहोत . तर आता कंप्लिट सेट घेऊया Happy
खाली आणखी काही पॉईंट अ‍ॅड केले आहेत , जे तसे सोपे आहेत पण ते गरजेचेही आहेत
आता थोडे जास्त सिरियसही होऊया

आणि आजपासून परत एकदा गुण मोजायला सुरू करू. फक्त यावेळी एक लक्षात ठेवा, इथे नाही लिहिले तरी तुमचे रोजचे गुण स्वतः लिहून ठेवा . एखाद दिवस काही नाही केल तर ०/१० . हे खूप महत्वाच आहे.
दर आठवड्याला ज्यांचे ७५% पेक्षा कमी असतील त्यांचे कान पकडण्यात येतील . शिक्षा काय ते नंतर सगळे मिळून ठरवू.

कोण किती चांगल करतय आणि कुणाचे कान उपटायचे आहेत हे ठरवण्यासाठी खालील पद्धत वापरू

रोज तुम्ही खालील बाबी कशा पाळता ते पाहा .

१ . रोजचा व्यायाम न चुकवणे (व्यायामाचा प्रकार अन वेळ प्रत्येकाने आपापल्या सोयीने ठेवा ) जे ठरवेल त्यापेक्षा थोडा कमी जास्त किंवा वेगळा झाला तरी चालेल . पण चुकवायचा नाही

२. रोजच्या आहारात २ फळे / फळभाज्या अथवा २ वेळा सॅलेड असणे (फळात केळ्/चिक्कू कमीतकमी ठेवा)
३. रोजच्या आहारात २ वाट्या मोड , डाळी , उसळी , सोया , कमी तेलाच पिठल/ झुणका (२ अंड्यांचा पांढरा भाग , चिकन किंवा फिश रोस्टेड , शिजवलेले किंवा फार कमी तेल , पनीर ) असणे
४. बेकरी प्रॉडक्ट्स न खाणे (एखादा ब्राऊन ब्रेड अन ४ मारी इज ओके) केक्स , चॉकलेट्स , शीतपेये ,मैद्याचे पदार्थ नो नो
५. बाहेरचे खाणे (ऑफिसामधले जेवण , नाश्ता वगळता) मोस्टली हॉटेलिंग टाळणे
६. रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे अन जेवण व झोप यात किमान १:३० तास अंतर ठेवणे
७ चहा , कॉफी किंवा इतर पदार्थातून डायरेक्ट साखरेचा इनटेक ३ छोट्या चमच्यापेक्षा जास्त नसणे

जर व्यायाम नाही चुकवला तर ४ पैकी ४ गुण अन इतर सर्व क्रमांक पाळले तर प्रत्येकी १ पैकी १ गुण

त्यामुळे आता रोजचे गुण १०.

म्हणजे जर तुम्ही आज व्यायाम केला अन इतर क्रमांक नाही पाळला तर तुमचे ४/१० गुण . हे रोज लिहित जा . जर २-३ दिवसानी आला तर त्या दिवसाचे मिळून १२/२० किंवा १५/३० असे लिहा .
शक्य असल्यास आधीच्या गुणांमधे अ‍ॅड करून लिहा .
मी थोड्या अंतराने ते हेडर मधे अ‍ॅड करत जाईन .

काही शंका असतील तर विचारा . याचा फायदा म्हणजे तुम्ही किती कन्सिस्टंट आहात ते कळेल , अन इतरांचे पाहून हुरूप ही येईल

आणखी एक , ही काही स्पर्धा नाही , तेव्हा प्रामाणिकपणे आपले गुण लिहा . Wink

31 August, 2014 - 12:59

१. केदार जाधव १८२/२२०
२ सामान्य वाचक १४९/२२०
३ अदिति १३८/१८०
४ अनिरूध्द १२२/१६०
५ साती १०३/१७०
६ सीमांतिनी ५४/७०
७ मनीशा ९४/१४०
८ स्वाती२ ७०/८०
९ वर्षू नील १२१/१५०
१० देवकी १६५/२२०
११ smitaklshripad ८६/१८०
१२ पाखरू १४३/२२०
१३ खारूताई १५३/१९०
१४ दक्षिणा १०/१०
१५ पौर्णिमा १०/१०
१६ चनस ९६/१५०

१४ . चिनूक्स
१५. भानूप्रिया
१६. जाई
१७. प्रितीभुषण
१८. रीया
१९. पौर्णिमा
२० . स्मितू
२१ आनंदी
२२ पेरू
२३ डेलिया
२४ आशूडी
२५ वैदेही
२६ मंजू
२७ साधना
२८ . गीतांजली
२९ मृणाल १
३० मी_आर्या
३१ मना
३२ इश्श
३३ दक्षिणा
३४ dreamgirl
३५ दीप्स
३६ नि़क्षिपा
३७ मउ
३८ नंदिनी
३९ अमित एम
४० बीएस
४१ राजू७६
४२ वेल

४४ संदिप एस
४५ राज्या
४६ snoo
४७ शैलु
४८ अखी
४९ सहेली
५० सोनचाफा
५१ आभा
५२ धनश्री
५३ हर्मायनी
५४ मुग्धानंद
५५ आशिका
५६ सायली
५७ mrudul
५८ रमा
५९ आयडू
६० मी_चिऊ
६१ नानबा
६२ मंजू
६३ चनस

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सकाळी - आवळारस + कोमट पाणी
एक कप अगोड चहा + १ डायजेस्टिव्ह मारी
ब्रेकफास्ट - ज्वारीच्या लाह्या + पाऊण ग्लास दूध
लंच - २ फुलके + उसळ +१ नारळाची छोटी वडी
दुपारी - १ कप अगोड चहा
संध्याकाळी : १/२ अगोड चहा+१ डायजेस्टिव्ह मारी+ १ सफरचंद +१ मूठ चणे+१/२ च्मचा गूळ
रात्रीचे जेवण- १ छोटी चपाती, भाजी, आमटी-भात,सोलकढी,
४ खजूर.

नो फिरणे. ......२/७
. केदार,
अपडेट करा ना.

आज ९ वाजता लिंबुपाणी,
९:३० ला २ एग व्हाईटच ऑम्लेट, १/२ स्लाईस ब्रेड
११ ला कलिंगड
२ ला मसुरची उसळ , पालक, १ पोळी
४:३० ला परत कलिंगड
रात्री बेरीज, योगर्ट स्मुदी

सकाळी ३५ मिन(२ माईल्स) चालणं
सध्यांकाळी ४० मिन व्यायाम

७/७ Happy की ब्रेड्चे १ कमी करावे?

बर्यापैकी रेग्युलर गुणांचे अपडेट देणारे अन त्यांचे गुण

अदिति वेल डन
साती , सीमांतिनी, देवकी , वर्षू नील , केदार , थोड ढिल पडू लागलाय . टाईटन अप Happy
इतर कम ऑन Happy

१. केदार जाधव ८४/१०४
२ . आशिका ३२/४५
२४ dreamgirl ३२/४३
३३ अदिति ९०/१०५
३७ अनिरूध्द ४३/६६
३८ साती ६२/९६
३९ सीमांतिनी ७८/१००
४४ वर्षू नील ५१/७५
५० सोनचाफा ३३/४९
५१ देवकी ५८/८४

मी दोन दिवस इथे लिहतच नाही. Happy

काल मद्रास फूड वॉक. प्याज की कचोरी, घेवर, मुरुक्कू सँडविच, लस्सी, आलूओ टिक्की, इत्यादि इत्यादि इत्यादि. Sad

केदारच्या धाग्याचा फायदा म्हणजे मी चक्क फळं खाऊ लागलेय.
मागच्या काही दिवसात पेरू, अंजीर, डाळिंब अशी फळे किलोभर (एकूण) तरी पोटात गेलीत.
Wink

बापरे माझा स्कोअर बघुन मला आता टेन्शन आलय. Lol
साती माझा उलटाच प्रॉब्लेम आहे. फळ खाणं कमी करण्यासाठी मला कन्ट्रोल कराव लागत Sad

१५-०८- डाएट व्यवस्थित पण नो जिम ..

१६-०८ - ३ स्लाईस डोमिनोज पिझ्झा , संध्याकाळी प्लेन खिचडी नि दिवसभर चालत फिरलेय टाईम्स स्कवेअर..

वीकांत चीटिंग!

केदारच्या धाग्याचे टेन्शन येते म्हणजे उद्या कसली उसळ करायची .
सकाळी - १/२ कप अगोड चहा + १ डायजेस्टिव्ह मारी
ब्रेकफास्ट - पोहे+१/२ कप अगोड चहा +१ मूठ चणे+१/२ चमचा गूळ
लंच - २ फुलके + उसळ +आमटी-भात,सोलकढी+बटाटयाच्या काचर्‍या २
संध्याकाळी : १/२ अगोड चहा+१ डायजेस्टिव्ह मारी+ १ पेयर + ६ खजूर.
रात्रीचे जेवण- १ छोटी चपाती, भाजी, आमटी-भात,सोलकढी+कोशिंबीर
आज बाहेर फिरून आले.३५ मिनिटे. बर्‍याच दिवसांनी बाहेर फिरताना अवघड वाटत होतं.......७/७

डॉक्टर: तुमच वजन किती ?
रुग्ण: चष्म्यासह १५० किलो.
डॉक्टर: आणि चष्म्याशिवाय ?
रुग्ण: दिसतच नाही हो.

१५/०८/१६ , १४/०८/१६= व्यायाम नाही = ६/१४

आज १४/०८/१७ दोन तास बॅडमिंटन आणी क्रिकेट
आटोक्यातलं जेवण, फळं, बदाम(५) = ७/७

यस्स्स केदार... आजसे टाईटन्ड्प... बॅक टू रूटीन

आज सगळं छान चालल होतं आणि सन्ध्याकाळी १ बरीटो खावा लागला. खुप अनहेल्दी नव्हता(चीझ नव्हता) पण १ मार्क कमी होतोच. ६/७

लॉन्ग वीकेंड ला सगळा बँड वाजला... Sad

१५/८/२०१४ : व्यायाम नाही, १/२ चीज सँड्वीज, फळे खाल्ली, उसळ नाही = १/७
१६/८/२०१४ : व्यायाम केला , पण हॉटेल मद्धे जेवण , फळे खाल्ली, उसळ खाल्ली = ५/७
१७/८/२०१४ : व्यायाम केला, फळे खाल्ली, डाळ खाल्ली, घरी केलेल्या कट्लेट सोबत पाव खाल्ला = ६/७

आजपासुन आता परत बॅक टू रुटीन Happy

गेला आठवडाभर तब्येतीमुळे व्यायाम काहीच नाही.. खाण्यावर बरे नियंत्रण ठेवले.. आता आजपासून परत सुरु हळूहळू..
खरंतर मीच मिस करत्येय व्यायाम आणि नेटकं खाणं.. Happy
रच्याकने, सगळ्यांना फक्त विकांताची काळजी लागते पण मला येऊ घातलेले बाप्पा अधून मधून दचकवतायत.. सासरी जायचं म्हणजे, वेळ-काळ, व्यवस्थित डाएट ह्याची वाट लागते.. त्यातून सगळंच गोडाधोडाचं. Sad

लोकहो ,

हेडर पहा .

आता आपण या गुणपद्धतीत बर्यापैकी सेट झालो आहोत . तर आता कंप्लिट सेट घेऊया Happy
खाली आणखी काही पॉईंट अ‍ॅड केले आहेत , जे तसे सोपे आहेत पण ते गरजेचेही आहेत
आता थोडे जास्त सिरियसही होऊया

आणि आजपासून परत एकदा गुण मोजायला सुरू करू. फक्त यावेळी एक लक्षात ठेवा, इथे नाही लिहिले तरी तुमचे रोजचे गुण स्वतः लिहून ठेवा . एखाद दिवस काही नाही केल तर ०/१० . हे खूप महत्वाच आहे.
दर आठवड्याला ज्यांचे ७५% पेक्षा कमी असतील त्यांचे कान पकडण्यात येतील . शिक्षा काय ते नंतर सगळे मिळून ठरवू.

कोण किती चांगल करतय आणि कुणाचे कान उपटायचे आहेत हे ठरवण्यासाठी खालील पद्धत वापरू

रोज तुम्ही खालील बाबी कशा पाळता ते पाहा .

१ . रोजचा व्यायाम न चुकवणे (व्यायामाचा प्रकार अन वेळ प्रत्येकाने आपापल्या सोयीने ठेवा ) जे ठरवेल त्यापेक्षा थोडा कमी जास्त किंवा वेगळा झाला तरी चालेल . पण चुकवायचा नाही

२. रोजच्या आहारात २ फळे / फळभाज्या अथवा २ वेळा सॅलेड असणे (फळात केळ्/चिक्कू कमीतकमी ठेवा)
३. रोजच्या आहारात २ वाट्या मोड , डाळी , उसळी , सोया , कमी तेलाच पिठल/ झुणका (२ अंड्यांचा पांढरा भाग ) असणे
४. बेकरी प्रॉडक्ट्स न खाणे (एखादा ब्राऊन ब्रेड अन ४ मारी इज ओके) केक्स , चॉकलेट्स , शीतपेये ,मैद्याचे पदार्थ नो नो
५. बाहेरचे खाणे (ऑफिसामधले जेवण , नाश्ता वगळता) मोस्टली हॉटेलिंग टाळणे
६. रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे अन जेवण व झोप यात किमान १:३० तास अंतर ठेवणे
७ चहा , कॉफी किंवा इतर पदार्थातून साखरेचा इनटेक ३ चमच्यापेक्षा जास्त नसणे

जर व्यायाम नाही चुकवला तर ४ पैकी ४ गुण अन इतर सर्व क्रमांक पाळले तर प्रत्येकी १ पैकी १ गुण

त्यामुळे आता रोजचे गुण १०.

म्हणजे जर तुम्ही आज व्यायाम केला अन इतर क्रमांक नाही पाळला तर तुमचे ४/१० गुण . हे रोज लिहित जा . जर २-३ दिवसानी आला तर त्या दिवसाचे मिळून १२/२० किंवा १५/३० असे लिहा .
शक्य असल्यास आधीच्या गुणांमधे अ‍ॅड करून लिहा .
मी थोड्या अंतराने ते हेडर मधे अ‍ॅड करत जाईन .

केदार खूप छान् धागा...
मला पण अ‍ॅडाना ....

मी गेल्या काही दिवसापासून तुमचा हा धाग्याप्रमाणे बाबी पालत आहे....

माझा काल पर्यतचा स्कोर आहे ३६/४९ ..

खूप छान वाटत ..धन्स तुम्हाला

केदार,
एक शंका.डॉ.स्मिता नरम यांच्या आयुशक्ती केंद्राच्या जाहिरातीत वाचलेले की स्थूलता कमी करण्यासाठी, कडधान्ये
कमी खा.(जेवणाच्या ३०% कडधान्ये,१०% कार्ब्ज्,भाज्या) टॉमेटो खाऊ नका इ. पण इथे आपण सर्व २ वाट्या मोड , डाळी वगैरे खातोय.प्रोटीनमुळे मेटॅबॉलिजम वाढायला मदत होत असली तरी वजनही वाढते का?

देवकी,
डॉ.स्मिता नरम यांच्या आयुशक्ती केंद्राच्या जाहिरातीत वाचलेले की स्थूलता कमी करण्यासाठी, कडधान्ये
कमी खा.(जेवणाच्या ३०% कडधान्ये,१०% कार्ब्ज्,भाज्या) टॉमेटो खाऊ नका इ. पण इथे आपण सर्व २ वाट्या मोड , डाळी वगैरे खातोय.प्रोटीनमुळे मेटॅबॉलिजम वाढायला मदत होत असली तरी वजनही वाढते का?

>> २ वाट्या अथवा २ अंडी पांढर काही फार नाही .
जेवणाच्या ३०% म्हणजे २ वाट्या अंदाजे होईलच ना ? खर तर मोड प्रेफरड आहेत पण रोज करणे शक्य नाही म्हणून डाळी अन उसळीही चालतात.
आपल्यात एकूणच चहा चपाती , चपाती लोणचे , तूप साखर चपाती वगैरे खायची सवय असल्याने २ वाट्या जास्त वाटतात.

आणि आपण जितकं खातो त्यातनं अ‍ॅक्चूल प्रोटीन खूप कमीच मिळतं.
असो..

मी जरा बरी नसल्याने ८ दिवस नो व्यायाम, डाएट चालू आहे. गेले ४ दिवस रोज काही ना काही अवांतर येतच होतं खाण्यात, पण अतिशय कमी प्रमाणात.

गेले १८ दिवसात माझे वजन कमी झाले नाही. (एक पौंड कमी झाले ते भरूनही आले). पण दिवसाला शिस्त लागली. चहा, जेवण-झोप हे अवघड नियम नाहीत माझ्यासाठी कारण ते आधीपासूनच पाळते. प्रोटीनचा नियम जाच करतो. पण प्रयत्न करीत आहे.

कालचे गुण १०/१०

प्रोटीन्सबाबत.

मांसाहारी प्रोटीन हा फर्स्ट क्लास प्रोटीन म्हटला जातो.

वनस्पतीजन्य प्रोटीन पचनक्रीयेत ब्रेक करून मिळणारी अमायनो अ‍ॅसिड्स, अन अ‍ॅनिमल प्रोटीन्सची, यांत फरक आहे.
आपण अ‍ॅनिमल असल्याने अ‍ॅनिमल प्रोटिन अ‍ॅसिमिलेट करायला सोपा. दुसरं म्हणजे, त्यासोबत आपोआप आपल्याला लागतील तशीच व्हिटॅमिन्स व खनिजे मिळतात. बी-१२ चा "सोर्स" नॉनव्हेज ओन्ली.
नीट नॉनव्हेज खाणार्‍यांना (हाडे चावून खाणारे नॉनव्हेजिटेरियन्स. "एक हाफ बटरचिकन बोनलेस"वाले नवशिके नाही.) कॅल्शियम अन आयर्न प्र च ण्ड प्रमाणात उपलब्ध असते.

तेव्हा १०० ग्राम प्रोटीन वनस्पतीजन्य वि. प्राणीजन्य घेतले, तर प्राणीजन्यची पोषकता जास्त.

ता.क. दूध व दुधाचे पदार्थ उदा. पनीर हे 'नॉनव्हेज' अर्थात, प्राणीजन्य आहेत.
(नेटवर व्हिटॅमीन बी१२ व व्हेजिटेरिअन असे शोधल्यास, दूध, पनीर, चीज अन चक्क अंडी या 'व्हेजिटेरियन' गोष्टी लिहिलेल्या आहेत.)

रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे अन जेवण व झोप यात किमान १:३० तास अंतर ठेवणे>> जेवण, झोप, व्यायाम आणि खाण ह्या मधे किती अंतर ठेवावे हा मला नेहमीच प्रश्न असतो. सांगता येइल का?

Pages