आजपासून मी डाएट करणार ... रोज १ तास चालणार ... नक्क्की म्हणजे नक्क्क्की
आज मित्राच्या वाढदिवसाची पार्टी आहे , एक दिवस दाबून खाल्ल तर काय होतय , उद्या कव्हर करू .
आज खूप उशिर झाला उठायला , आज फिरण कॅन्सल .
आज घरी पुरणपोळ्या केल्या होत्या , पाच हाणल्या .
कित्ती हा पाऊस , आज राहू दे फिरायच .
गेले १ महिना वजन कमी करायचा प्रयत्न करतोय , पण १ किलोही कमी झाल नाही , जाऊ दे , ये अपने बसकी बात नही .
हे चित्र अनेकांच्या बाबतीत सारखच असत .
वजन कमी करायच असणार्या सगळ्यानाच इच्छा तर खूप असते , सुरूवातही बर्याचदा केली जाते , पण नंतर नंतर आता जाऊ दे , आपल्याच्यानं नाही होणार हे वर गाडी येते . हे टाळायच असेल तर एक तर मनावर संयम हवा किंवा कुणीतरी चेक ठेवणार हव . ते घरातील कुणी असेल तर सर्वोत्तम , पण आपल्याच माणसाला त्रास (?) कसा द्यायचा (उदा . त्याला आवडते पुरणपोळी असू दे , काल फार दमला होता तो आज राहू दे) म्हणून ते माणूस तुम्हाला सारख माग लागत नाही . आणि मग काय ?
त्यासाठी हा धागा . ज्याना ज्याना वजन कमी करायचय (हेल्दी वे , नो क्रॅश डाएट) त्यांचा इथे ग्रुप बनवूया .
प्रत्येकाने काय आज चांगल केल , काय चुकल याची रोज लिस्ट देऊया . चांगल करणार्याच अभिनंदन करू अन एखादा सारख चुकायला लागला त्याचे कान पकडूया , काही शंका असतील तर एकमेकाना विचारूया .
क्या बोलते भाई (और बहन ) लोग ?
लोकहो ,
आता आपण या गुणपद्धतीत बर्यापैकी सेट झालो आहोत . तर आता कंप्लिट सेट घेऊया
खाली आणखी काही पॉईंट अॅड केले आहेत , जे तसे सोपे आहेत पण ते गरजेचेही आहेत
आता थोडे जास्त सिरियसही होऊया
आणि आजपासून परत एकदा गुण मोजायला सुरू करू. फक्त यावेळी एक लक्षात ठेवा, इथे नाही लिहिले तरी तुमचे रोजचे गुण स्वतः लिहून ठेवा . एखाद दिवस काही नाही केल तर ०/१० . हे खूप महत्वाच आहे.
दर आठवड्याला ज्यांचे ७५% पेक्षा कमी असतील त्यांचे कान पकडण्यात येतील . शिक्षा काय ते नंतर सगळे मिळून ठरवू.
कोण किती चांगल करतय आणि कुणाचे कान उपटायचे आहेत हे ठरवण्यासाठी खालील पद्धत वापरू
रोज तुम्ही खालील बाबी कशा पाळता ते पाहा .
१ . रोजचा व्यायाम न चुकवणे (व्यायामाचा प्रकार अन वेळ प्रत्येकाने आपापल्या सोयीने ठेवा ) जे ठरवेल त्यापेक्षा थोडा कमी जास्त किंवा वेगळा झाला तरी चालेल . पण चुकवायचा नाही
२. रोजच्या आहारात २ फळे / फळभाज्या अथवा २ वेळा सॅलेड असणे (फळात केळ्/चिक्कू कमीतकमी ठेवा)
३. रोजच्या आहारात २ वाट्या मोड , डाळी , उसळी , सोया , कमी तेलाच पिठल/ झुणका (२ अंड्यांचा पांढरा भाग , चिकन किंवा फिश रोस्टेड , शिजवलेले किंवा फार कमी तेल , पनीर ) असणे
४. बेकरी प्रॉडक्ट्स न खाणे (एखादा ब्राऊन ब्रेड अन ४ मारी इज ओके) केक्स , चॉकलेट्स , शीतपेये ,मैद्याचे पदार्थ नो नो
५. बाहेरचे खाणे (ऑफिसामधले जेवण , नाश्ता वगळता) मोस्टली हॉटेलिंग टाळणे
६. रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे अन जेवण व झोप यात किमान १:३० तास अंतर ठेवणे
७ चहा , कॉफी किंवा इतर पदार्थातून डायरेक्ट साखरेचा इनटेक ३ छोट्या चमच्यापेक्षा जास्त नसणे
जर व्यायाम नाही चुकवला तर ४ पैकी ४ गुण अन इतर सर्व क्रमांक पाळले तर प्रत्येकी १ पैकी १ गुण
त्यामुळे आता रोजचे गुण १०.
म्हणजे जर तुम्ही आज व्यायाम केला अन इतर क्रमांक नाही पाळला तर तुमचे ४/१० गुण . हे रोज लिहित जा . जर २-३ दिवसानी आला तर त्या दिवसाचे मिळून १२/२० किंवा १५/३० असे लिहा .
शक्य असल्यास आधीच्या गुणांमधे अॅड करून लिहा .
मी थोड्या अंतराने ते हेडर मधे अॅड करत जाईन .
काही शंका असतील तर विचारा . याचा फायदा म्हणजे तुम्ही किती कन्सिस्टंट आहात ते कळेल , अन इतरांचे पाहून हुरूप ही येईल
आणखी एक , ही काही स्पर्धा नाही , तेव्हा प्रामाणिकपणे आपले गुण लिहा .
31 August, 2014 - 12:59
१. केदार जाधव १८२/२२०
२ सामान्य वाचक १४९/२२०
३ अदिति १३८/१८०
४ अनिरूध्द १२२/१६०
५ साती १०३/१७०
६ सीमांतिनी ५४/७०
७ मनीशा ९४/१४०
८ स्वाती२ ७०/८०
९ वर्षू नील १२१/१५०
१० देवकी १६५/२२०
११ smitaklshripad ८६/१८०
१२ पाखरू १४३/२२०
१३ खारूताई १५३/१९०
१४ दक्षिणा १०/१०
१५ पौर्णिमा १०/१०
१६ चनस ९६/१५०
१४ . चिनूक्स
१५. भानूप्रिया
१६. जाई
१७. प्रितीभुषण
१८. रीया
१९. पौर्णिमा
२० . स्मितू
२१ आनंदी
२२ पेरू
२३ डेलिया
२४ आशूडी
२५ वैदेही
२६ मंजू
२७ साधना
२८ . गीतांजली
२९ मृणाल १
३० मी_आर्या
३१ मना
३२ इश्श
३३ दक्षिणा
३४ dreamgirl
३५ दीप्स
३६ नि़क्षिपा
३७ मउ
३८ नंदिनी
३९ अमित एम
४० बीएस
४१ राजू७६
४२ वेल
४४ संदिप एस
४५ राज्या
४६ snoo
४७ शैलु
४८ अखी
४९ सहेली
५० सोनचाफा
५१ आभा
५२ धनश्री
५३ हर्मायनी
५४ मुग्धानंद
५५ आशिका
५६ सायली
५७ mrudul
५८ रमा
५९ आयडू
६० मी_चिऊ
६१ नानबा
६२ मंजू
६३ चनस
एवढ्या दिवसांनी इथे यायला लाज
एवढ्या दिवसांनी इथे यायला लाज वाटत आहे.. तब्येत बरी नसल्याने व्यायाम (घाम गाळणारा) काहीच नाही. फक्त योगा रोज न चुकता.. खाण्यावर बर्यापैकी कंट्रोल. एक ते दिड किलो वजन कमी झालं आहे पण ते हा धागा जॉईन करण्यापूर्वी वाढलेलं होतं तेच कमी झालं आहे.. पण निदान तेवढं तरी झालय.
थँक्स केदार आणि इतर ज्यांनी प्रोत्साहन दिलं.
दक्षे, गणपती होईपर्यंत व्यवस्थित व्यायाम जमणं कठीण दिसतय.. सासरी जायचयं पण ते झालं की सॅनसन बाईंना नक्की पाचारण करणार. बघितला आहे तिचा व्हिडिओ पण तेवढं करण्याची उमेद नव्हती विकनेस मुळे.
२१ ऑगस्ट - १०/१० व्यायाम
२१ ऑगस्ट - १०/१०
व्यायाम ४/४
प्रोटिन १/१
नो बेकरी - १/१
साखर २ टीस्पून १/१
भाज्या,फळे १/१
जेवण आणि झोप १/१
बाहेरचे खाणे १/१
४/१० व्यायाम झाला नाही. फळे
४/१० व्यायाम झाला नाही. फळे झाली नाही. पिझ्झा खाल्ला.
दर मंगळ, गुरु कामाच्या वर्कशोप निमित्त पिझ्झा खावा लागणार आहे. डबा घेऊन जायचा प्रयत्न करेन.
ओके साती.. माझे अपडेट्स फॉर
ओके साती..
माझे अपडेट्स फॉर १४/०८/२१ = १० /१०
०७ ए एम =ब्रे फा = १ कप चहा ( १ टी स्पू साखर) + ५ भिजवलेले बदाम
दीड तास वॉक आणी व्यायाम
९.१५ = एक अॅपल किंवा एक नॉर्मल बोल पायनापल चे तुकडे
११ वाजता - दोन अक्रोड , मूठभर फुटाणे
१ वाजता लंच = काल पोटभर ओवन रोस्टेड वांगी,टोमॅटो,कॅप्सीकम्,गाजर सलाद , किंचित ऑलिव ऑईल आणी गार्लिक बेस्ड.
एक चीज स्लाईस
४ वाजता चहा
५ वाजता १ अॅपल ,
१५ मिनिटे सिट अप्स
१ तास हिल्स वर ( उंच चढाव उतारांवर) बर्यापैकी ब्रिस्क वॉक.
रात्री ८ ते ९ च्या दरम्यान = काकडी, कॅप्सीकम, ऑलिव्ज, कांदा, गाजर ,सॅलड लीव्ज , चायनीज कॅबेज चे सॅलड ( फक्त लिंबाचा रस्,मीठ आणी मिरपूड घालून) + वालपापडी ची भाजी भरपूर + अर्धा फुलका ( रात्री आणी एकूणातच कार्ब्ज जास्त जात नाहीत म्हणून अर्धा फुलका बस होतो मला)
२१/८ अपडेट - सकाळी - उपवास
२१/८ अपडेट -
सकाळी - उपवास असल्याने साबुदाणा खिचडी
संध्याकाळी - सफरचंद , १ तास व्यायाम
रात्री - कमी साखरेचा दलिया + मटार भात
काल प्रचंड काम होत त्यामुळे
काल प्रचंड काम होत त्यामुळे दिवसभर व्यायामाला वेळ मिळाला नाही,
माझे ५/१०
सकाळी लिंबुपाणी, १/२ कप बिनसाखरेचा चहा
नाश्ता २ एग व्हाईट च ऑम्लेट
११ ला सुकी भेळ,
१:३० ला असाही(acai) बोल, (स्टॉबेरी टाकुन)
४ ला परत सुकी भेळ
८:४५ ला बिन्स ची भाजी, उस़ळ, १ पोळी, बिट, काकडी
१०:३० ला झोप
२२ ऑगस्ट आज बर्यापैकी जमल.
२२ ऑगस्ट
आज बर्यापैकी जमल. फक्त चहा जरा एक्स्ट्रा झाला.
सो आजचे गुण: ९/१०.
एकूण गुण: ३९/५०
२२/०८/२०१४ आजचे गुण १)व्यायाम
२२/०८/२०१४ आजचे गुण
१)व्यायाम : २
२)फळे/भाज्या/सॅलडः १
३)प्रोटिन : १
४)नो बेकरी प्रॉडक्ट्स :१
५) बाहेरचे खाणे : १
६) रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे इ. :१/२
७) गूळ २ चमचे: १ .............................७.५./१०
एकूण ४१.५/५०
धन्यवाद वर्षू! केदारबाबा, मला
धन्यवाद वर्षू!
केदारबाबा, मला तुमचे जेवणाचे आणि झोपेचे मार्क्स कधी मिळतील असे वाटत नाही.
आमचं जेवणच ११-११:३० ला होतं आणि मग एक पर्यंत कुठे जागणार.
आत्ता जेवूनच लगेच पोस्ट लिहितेय.
आज २२-०८-१४ : ८/१०
व्यायाम- वॉक ४५ मिनीट -४
प्रोटिन- मोड आलेले हरभरे, का वा आमटी-१
फळे- पेरू, केळं, काकडी, अर्धी कैरी-१
साखर- १ चमचा दूधात घालून -१
तेलकट तळकट बेकरी नाही-१
रात्रीचं जेवण ११:३०, झोप- काय माहित नाही :)- ०
मला दररोज गुण लिहणे शक्य न
मला दररोज गुण लिहणे शक्य न झाल्याने सगळे गुण एकदम लिहित आहे. माझी लांबलचक पोस्ट आहे त्याबद्दल क्षमस्व...
१- ० / ०
२- ५/७
३ -५/७
४ -५/७
५ -६/७
६ -६/७
७ -६/७
८ -६/७
९ -७/७
१० -२/७
११-६/७
१२ -५/७
१३ -५/७
१४ -६/७
१५ -२/७
१६ -६/७
१७ -१/७
१८ -५/१०
१९-९/१०
२०-९/१०
२१ -९/१०
२२ -७/१०
व्यायाम शक्यतो चुकवत नाही. तो काही कारणाने चुकलाच तर मनाला चुटपूट लागुण राहाते. खाण्याच्या बाबतीत चहा, कॉफी घेत नसल्यामुळे त्यावर ताबा मिळवण्याचा प्रश्न नाही. रोजच्या रोज २ वाट्या उसळ जमत नाही. त्याला पर्याय सुचवता येईल का ? मला दोन्ही जेवणाच्या वेळेत सहसा काही खायला लागत नाही. म्हणजे माझी सवय होती अशी..ते चांगले कि वाईट?
Motivation साठी हा धागा खूप छान काम करत आहे. सगळ्यांचे धन्यवाद. आपण नक्कीच वजन कमी करू शकू.
साती , तुम्ही एवढ्या हेक्टीक
साती ,
तुम्ही एवढ्या हेक्टीक शेड्युलमधेही हे करताय हे खूपच इन्स्पिरेशनल आहे.
खासकरून अशांसाठी की ज्याना वेळ मिळत नाही म्हणून करायला होत नाहीये अस वाटतय .
मस्त खारूताई , कीप इट अप
मस्त खारूताई , कीप इट अप
रोजच्या रोज २ वाट्या उसळ जमत नाही. त्याला पर्याय सुचवता येईल का ?
>> सोया , डाळीच वरण (कमी तेल ) , अंड्याच पांढर , चिकन , मासे , मोड , पनीर , टोंड मिल्क .
मला दोन्ही जेवणाच्या वेळेत सहसा काही खायला लागत नाही. म्हणजे माझी सवय होती अशी..ते चांगले कि वाईट? >>या बाबतीत अनेक "school of thought" आहेत . अगदी दर २ तासानी खावे यापासून . माझ्या मते जर तुम्ही हेल्दी ब्रेकफास्ट घेत असाल अन अधे मधे फळे वगैरे होत असतील तर २ जेवण पुरे आहेत . फक्त मधे क्रेविंग्ज आल्या म्हणून बिस्किट किंवा फरसाण नको
हो.नाहीतर जेवल्यासारखे नाही
हो.नाहीतर जेवल्यासारखे नाही वाटत.
>>>
सापडले सापडले वजनवाढीचे इंगित सापडले...
22/8 Sheera 1 cut Morning
22/8
Sheera 1 cut
Morning exercise not done only evening walk so 2 cut
1/2 cup tea so 1 cut
Total 6/10
२२ ऑगस्ट ७/१० व्यायाम
२२ ऑगस्ट ७/१०
व्यायाम ४/४
प्रोटिन १/१
फळं/भाज्या १/१
बेकरी प्रॉडक्ट नाही १/१
संध्याकाळी बाहेर जेवण ०/१ खरे तर केजून फूड म्हणजे -१ /१ योग्य राहील.
साखर जास्त गेली - आईसक्रिम- ०/१
जेवणं, झोप अंतर १/१
प्रोटीन, फळे व्यायाम चहा
प्रोटीन, फळे व्यायाम चहा जेवण-झोप सगळे जमले. पण जेवणानंतर एक स्वीटदिश खाल्ली ९/१०
मी पण काल ९/१० हे उपाशी न
मी पण काल ९/१०
हे उपाशी न राहाता वजन कमी करायचा रुटीन आवडल.
जमतही आहे म्हणुन मजा येते आहे!
२३/०८/२०१४ आजचे गुण १)व्यायाम
२३/०८/२०१४ आजचे गुण
१)व्यायाम : ४ .
२)फळे/भाज्या/सॅलडः १
३)प्रोटिन : १
४)नो बेकरी प्रॉडक्ट्स :१
५) बाहेरचे खाणे : १
६) रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे इ. : १/२
७)साखर१.१/२ चमचे: १ .............................९.५./१०
एकूण ५१./६०
फ्रीजमधे चक्क १ आईस्क्रीम १५ ऑगस्टपासून लोळतेय.या धाग्याच्या,खरतर गुणांच्या भितीने आईस्क्रीम आहे हेच विसरले होते.
२३/०८/२०१४ माझे आजचे
२३/०८/२०१४ माझे आजचे गुण:
१)व्यायाम : ४ .
२)फळे/भाज्या/सॅलडः १
३)प्रोटिन : १
४)नो बेकरी प्रॉडक्ट्स :१
५) बाहेरचे खाणे : ०
६) रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे इ. : ०
७)साखर१.१/२ चमचे:०१ .............................८/१०
आत्तापर्यन्त: ४७/६०
23/8 Only 3/10 baryach goshti
23/8
Only 3/10 baryach goshti miss zalya
माझे ९/१०, सगळ केला पण कलिंगड
माझे ९/१०, सगळ केला पण कलिंगड जरा जास्तच खाल्ल.
२३.०८.१४ ८/१ ०
२३.०८.१४
८/१ ०
माझे ३ दिवसाचे अपडेट
माझे ३ दिवसाचे अपडेट :
२२-८
७/१० बाहेरची भेल खाल्ली सो १ मार्क कट, साखर थोडी जास्त झाली सो १ मार्क कट, व्यायामाचा १ मार्क कट
२३-८
७/१० साखर थोडी जास्त झाली सो १ मार्क कट, व्यायामाचा १ मार्क कट (८ सूर्यनमस्कार, २० मिनीट वॉक झाले पण aim १२ सूर्यनमस्कार, ३० मिनीट वॉक), रात्री जेवन उशिरा झाले १ मार्क कट
२४-८
)
६/१० आज एक Birthday Party होती १ आईसक्रीम खाल्ल स्मॉल कप :(, बाहेरच खाल्ल, वॉक केला पण सूर्यनमस्कार नाही . रात्रीच जेवन वेळेत घेणार (ळ typing सापडल
आता पर्यतचे टोटल ५०/७०
डबल पोस्त
डबल पोस्त
९/१० दिवसभर सगळ सगळ सांभाळले.
९/१० दिवसभर सगळ सगळ सांभाळले. रात्री समोर स्वीटस आले. काय घडणार - खाल्ले!!
९/१०
my update for १४/०८/२२ =
my update for
१४/०८/२२ = ७/१०
१४/०८/२३ = १०/१०
२३ ला पूर्ण दिवस आऊटडोअर अॅक्टिविटी होती त्यामुळे दिवसभरात बाहेर चंच खाणं होतं.. पण फक्त रोस्टेड चिकन आणी फिश आणी भरपूर फ्रेश फळं खाल्ली.. कार्ब्ज काहीच नाही .. (मग मार्क्स किती कापू??)
मात्र तीन तास पोहणे, एक तास बीच वॉलीबॉल्,अर्धा तास बॅडमिंटन अशी सॉलिड अॅक्टिविटी केली म्हणून
१०/१० मार्क्स घेतलेत..
माझे अपडेट : परवा : सगळ जमल
माझे अपडेट :
परवा : सगळ जमल १०/१०
काल : फळे नाही , के एफ सी झाल , ४ कप चहा ७/१०
आज : ४ कप चहा , १ मिसळ ८/१०
अय्यो, केदार गुर्जी... चार कप
अय्यो, केदार गुर्जी... चार कप चहा... क्काय ह्हे ??
अपनी एकही कमजोरी है चाय पण
अपनी एकही कमजोरी है चाय
पण होय , कंट्रोल सुटायला लागलय . कंट्रोल केदार कंट्रोल .
केदार चहा नाही के.एफ.सी
केदार चहा नाही के.एफ.सी कमजोरी दिसते. ह्या महीन्यात २ वेळा तरी गेलात
Pages