चला , वजन कमी करूया

Submitted by केदार जाधव on 31 July, 2014 - 02:38

आजपासून मी डाएट करणार ... रोज १ तास चालणार ... नक्क्की म्हणजे नक्क्क्की

आज मित्राच्या वाढदिवसाची पार्टी आहे , एक दिवस दाबून खाल्ल तर काय होतय , उद्या कव्हर करू .

आज खूप उशिर झाला उठायला , आज फिरण कॅन्सल .

आज घरी पुरणपोळ्या केल्या होत्या , पाच हाणल्या .

कित्ती हा पाऊस , आज राहू दे फिरायच .

गेले १ महिना वजन कमी करायचा प्रयत्न करतोय , पण १ किलोही कमी झाल नाही , जाऊ दे , ये अपने बसकी बात नही .

हे चित्र अनेकांच्या बाबतीत सारखच असत .
वजन कमी करायच असणार्या सगळ्यानाच इच्छा तर खूप असते , सुरूवातही बर्याचदा केली जाते , पण नंतर नंतर आता जाऊ दे , आपल्याच्यानं नाही होणार हे वर गाडी येते . हे टाळायच असेल तर एक तर मनावर संयम हवा किंवा कुणीतरी चेक ठेवणार हव . ते घरातील कुणी असेल तर सर्वोत्तम , पण आपल्याच माणसाला त्रास (?) कसा द्यायचा (उदा . त्याला आवडते पुरणपोळी असू दे , काल फार दमला होता तो आज राहू दे) म्हणून ते माणूस तुम्हाला सारख माग लागत नाही . आणि मग काय ? Happy

त्यासाठी हा धागा . ज्याना ज्याना वजन कमी करायचय (हेल्दी वे , नो क्रॅश डाएट) त्यांचा इथे ग्रुप बनवूया .
प्रत्येकाने काय आज चांगल केल , काय चुकल याची रोज लिस्ट देऊया . चांगल करणार्याच अभिनंदन करू अन एखादा सारख चुकायला लागला त्याचे कान पकडूया , काही शंका असतील तर एकमेकाना विचारूया .
क्या बोलते भाई (और बहन ) लोग ?

लोकहो ,

आता आपण या गुणपद्धतीत बर्यापैकी सेट झालो आहोत . तर आता कंप्लिट सेट घेऊया Happy
खाली आणखी काही पॉईंट अ‍ॅड केले आहेत , जे तसे सोपे आहेत पण ते गरजेचेही आहेत
आता थोडे जास्त सिरियसही होऊया

आणि आजपासून परत एकदा गुण मोजायला सुरू करू. फक्त यावेळी एक लक्षात ठेवा, इथे नाही लिहिले तरी तुमचे रोजचे गुण स्वतः लिहून ठेवा . एखाद दिवस काही नाही केल तर ०/१० . हे खूप महत्वाच आहे.
दर आठवड्याला ज्यांचे ७५% पेक्षा कमी असतील त्यांचे कान पकडण्यात येतील . शिक्षा काय ते नंतर सगळे मिळून ठरवू.

कोण किती चांगल करतय आणि कुणाचे कान उपटायचे आहेत हे ठरवण्यासाठी खालील पद्धत वापरू

रोज तुम्ही खालील बाबी कशा पाळता ते पाहा .

१ . रोजचा व्यायाम न चुकवणे (व्यायामाचा प्रकार अन वेळ प्रत्येकाने आपापल्या सोयीने ठेवा ) जे ठरवेल त्यापेक्षा थोडा कमी जास्त किंवा वेगळा झाला तरी चालेल . पण चुकवायचा नाही

२. रोजच्या आहारात २ फळे / फळभाज्या अथवा २ वेळा सॅलेड असणे (फळात केळ्/चिक्कू कमीतकमी ठेवा)
३. रोजच्या आहारात २ वाट्या मोड , डाळी , उसळी , सोया , कमी तेलाच पिठल/ झुणका (२ अंड्यांचा पांढरा भाग , चिकन किंवा फिश रोस्टेड , शिजवलेले किंवा फार कमी तेल , पनीर ) असणे
४. बेकरी प्रॉडक्ट्स न खाणे (एखादा ब्राऊन ब्रेड अन ४ मारी इज ओके) केक्स , चॉकलेट्स , शीतपेये ,मैद्याचे पदार्थ नो नो
५. बाहेरचे खाणे (ऑफिसामधले जेवण , नाश्ता वगळता) मोस्टली हॉटेलिंग टाळणे
६. रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे अन जेवण व झोप यात किमान १:३० तास अंतर ठेवणे
७ चहा , कॉफी किंवा इतर पदार्थातून डायरेक्ट साखरेचा इनटेक ३ छोट्या चमच्यापेक्षा जास्त नसणे

जर व्यायाम नाही चुकवला तर ४ पैकी ४ गुण अन इतर सर्व क्रमांक पाळले तर प्रत्येकी १ पैकी १ गुण

त्यामुळे आता रोजचे गुण १०.

म्हणजे जर तुम्ही आज व्यायाम केला अन इतर क्रमांक नाही पाळला तर तुमचे ४/१० गुण . हे रोज लिहित जा . जर २-३ दिवसानी आला तर त्या दिवसाचे मिळून १२/२० किंवा १५/३० असे लिहा .
शक्य असल्यास आधीच्या गुणांमधे अ‍ॅड करून लिहा .
मी थोड्या अंतराने ते हेडर मधे अ‍ॅड करत जाईन .

काही शंका असतील तर विचारा . याचा फायदा म्हणजे तुम्ही किती कन्सिस्टंट आहात ते कळेल , अन इतरांचे पाहून हुरूप ही येईल

आणखी एक , ही काही स्पर्धा नाही , तेव्हा प्रामाणिकपणे आपले गुण लिहा . Wink

31 August, 2014 - 12:59

१. केदार जाधव १८२/२२०
२ सामान्य वाचक १४९/२२०
३ अदिति १३८/१८०
४ अनिरूध्द १२२/१६०
५ साती १०३/१७०
६ सीमांतिनी ५४/७०
७ मनीशा ९४/१४०
८ स्वाती२ ७०/८०
९ वर्षू नील १२१/१५०
१० देवकी १६५/२२०
११ smitaklshripad ८६/१८०
१२ पाखरू १४३/२२०
१३ खारूताई १५३/१९०
१४ दक्षिणा १०/१०
१५ पौर्णिमा १०/१०
१६ चनस ९६/१५०

१४ . चिनूक्स
१५. भानूप्रिया
१६. जाई
१७. प्रितीभुषण
१८. रीया
१९. पौर्णिमा
२० . स्मितू
२१ आनंदी
२२ पेरू
२३ डेलिया
२४ आशूडी
२५ वैदेही
२६ मंजू
२७ साधना
२८ . गीतांजली
२९ मृणाल १
३० मी_आर्या
३१ मना
३२ इश्श
३३ दक्षिणा
३४ dreamgirl
३५ दीप्स
३६ नि़क्षिपा
३७ मउ
३८ नंदिनी
३९ अमित एम
४० बीएस
४१ राजू७६
४२ वेल

४४ संदिप एस
४५ राज्या
४६ snoo
४७ शैलु
४८ अखी
४९ सहेली
५० सोनचाफा
५१ आभा
५२ धनश्री
५३ हर्मायनी
५४ मुग्धानंद
५५ आशिका
५६ सायली
५७ mrudul
५८ रमा
५९ आयडू
६० मी_चिऊ
६१ नानबा
६२ मंजू
६३ चनस

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा नंबर पहिला.

वजन नाही कमी करायचं ते ठीक आहे, पण कॉलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवायचं आहे, म्हणून रोज जलद चालण्याचा व्यायाम करते, मधे मधे वर वर्णन केलंय तसं होत असतं, बघु या ग्रुपचा उपयोग झाला तर चांगलं आहे की

माझ वजन ४३ आहे...कंट्रोल मध्ये टेवण्यासाटी काय करु?सकाळी आट्च्या आत ऊटायला जमणार नाही.

मी ५८ चा ६० झालो, पण फिरतोच आहे पाहीजे तसा अद्याप १५ दिवस झाले पुन्हा वजन चेक केले नाही

सुरूवात अगदी बेसिकपासून करूया .

१ . रोजचा व्यायाम न चुकवणे (व्यायामाचा प्रकार अन वेळ प्रत्येकाने आपापल्या सोयीने ठेवा ) जे ठरवेल त्यापेक्षा थोडा कमी जास्त किंवा वेगळा झाला तरी चालेल . पण चुकवायचा नाही

२. अति प्रमाणात तळलेले गोड (गुलाबजामून , जिलेबी इ) अन पिझ्झा , बर्गर वगैरे टाळणे.

५०- ६० दोरी उड्या.. १०-१५ मिन चालणे .. पुरेसे नाही ना?
सायकलिंग शक्य नाही.. ४-५ सुर्यनमस्कार ट्राय करत आहे..
अजुन काय करु शकते घरच्या घरी?

निक्षिपा ,

केक रहिलेला फ्रिज मधे... वाया कसा घालवायचा म्हणून खाल्ला. >> एक डाव माफी , पुन्यांदा नाय . Happy

पण On a serious note , आपल्यात उरतय ते टाकून देण्यापेक्षा खाव हा स्वभाव असतो .
"खाऊन माजाव पण टाकून माजू नये " हे बरोबर आहे , पण मग करतानाच कमी करा किंवा ताटात कमी घ्या.
भूक नसताना केवळ उरतय म्हणून किंवा चव चांगली आहे म्हणून खाण जास्त वाईट आहे टाकण्यापेक्षा .
ताटात टाकायच नाही म्हणून पोटात टाकू नका .

मला कोणी सल्ला देणार आहे का?
माझ वजन ४३ आहे...कंट्रोल मध्ये टेवण्यासाटी काय करु?सकाळी आट्च्या आत ऊटायला जमणार नाही.

उद्याच कान पकड Happy

मी आधी छोट्या छोट्या व्यायमांनी सुरुवात करनार आहे. एकदम खुप केलं की दमायला होतं आणि मग इच्छा नाही रहात दुसर्‍या दिवशी पासुन

हम भी है जोश में
(इतर म्हणतात) बातें कर होश में
(आरसा म्हणतो) यूं ना आंखे दिखा...
(इथे म्हणतील) आयला रे.. .. रे.. क्या बोला फिर बोल रे!!
Sad Proud

मीही येते या ग्रूपमध्ये.

मला व्यायामामध्ये नियमितपणा आणि सूसूत्रता आणायची आहे. आजपासून परत व्यायामाला सुरूवात केली आहे. व्यायाम होतोच म्हणून खाणे नियंत्रणात नाहीये. वडे, भजी, गोड निवांत चाललंय सगळं. तेही नियंत्रणात आणायचे आहे.

मी उद्यापासून पुन्हा व्यायामाला सुरुवात करणार आहे.

हे माझे रोजचे वाक्य आहे आणि त्यामुळे ह्याचा कॉपीराईट माझ्याकडे आहे हे संबंधितांनी लक्षात घ्या... Wink

बाकी धागा मस्तय... हल्ली पावसामुळे चालणे बंद पडलेय, काही पर्सनल इश्युजमुळे योग, सुन इत्यादी बाबींमध्ये लक्ष लागत नाहीय. (खाण्यात मात्र अगदी व्यवस्थित लक्ष लागतेय, तिथे पर्सनल इश्युज आडवे येत नाहीत Sad Sad )

आजपासुन करते परत सुरू. तसेही बॅगेत जिमचे कपडे घेऊन फिरत असतेच मी. फक्त ते घेऊन जिम मध्ये जाऊन घाम गाळायची गरज आहे. i need someone to motivate me very badly.... feeling very down...

सीमा२७६

तुम्ही रात्री व्यायाम करा , भरपेट खाण्याचा....
>>>
काहीपन काय्...वाड्तय यार वजन ३ महिन्याला १ केजी...लग्नानंतर एक वर्षातच.असच चालु राहिल तर म्हनुन म्हट्ला काहितरि हलका व्यायाम सुचवा मलापण.

सीमा२७६

माझ वजन ४३ आहे...कंट्रोल मध्ये टेवण्यासाटी काय करु?सकाळी आट्च्या आत ऊटायला जमणार नाही.

>>>
सीमा , अहो असे सल्ले देण्याएवढ इथे कुणी तज्ञ नाही Happy
तरीही , तुमच ४३ किलो वजन तुमच्या उंचीच्या मानाने किती आहे ते पहा . जर जास्त वाटत असेल तर तुम्हाला आठ नंतर करता येल असा व्यायाम निवडा . चालण्याचा व्यायाम सगळ्यात चांगला कारण कधीही करता येतो .

माझ्या ऊंचिच्या मानाने माझे वजन ४८ पाहीजे ऊंची १५०+ सेमी आहे
तुम्हाला आठ नंतर करता येल असा व्यायाम निवडा
>>>
आठ नंतर ऑफीस....७ परयंत...

<<पाउस असल्याने सुरु झालेला व्यायाम थंडावला आहे
पण ह्याला कंटाळा कारणीभूत आहे खर तर<< +१

रोजच फिरण होत... २ ते अडीच किमी. आल्यावर दोरीउड्या, थोडीफार योगासने आणि प्राणायाम.
महिना झाला... हे सगळ बन्द आहे. Sad मी पण या ग्रुपमधे.

५०- ६० दोरी उड्या.. १०-१५ मिन चालणे .. पुरेसे नाही ना?
सायकलिंग शक्य नाही.. ४-५ सुर्यनमस्कार ट्राय करत आहे..
अजुन काय करु शकते घरच्या घरी?

Pages