चला , वजन कमी करूया

Submitted by केदार जाधव on 31 July, 2014 - 02:38

आजपासून मी डाएट करणार ... रोज १ तास चालणार ... नक्क्की म्हणजे नक्क्क्की

आज मित्राच्या वाढदिवसाची पार्टी आहे , एक दिवस दाबून खाल्ल तर काय होतय , उद्या कव्हर करू .

आज खूप उशिर झाला उठायला , आज फिरण कॅन्सल .

आज घरी पुरणपोळ्या केल्या होत्या , पाच हाणल्या .

कित्ती हा पाऊस , आज राहू दे फिरायच .

गेले १ महिना वजन कमी करायचा प्रयत्न करतोय , पण १ किलोही कमी झाल नाही , जाऊ दे , ये अपने बसकी बात नही .

हे चित्र अनेकांच्या बाबतीत सारखच असत .
वजन कमी करायच असणार्या सगळ्यानाच इच्छा तर खूप असते , सुरूवातही बर्याचदा केली जाते , पण नंतर नंतर आता जाऊ दे , आपल्याच्यानं नाही होणार हे वर गाडी येते . हे टाळायच असेल तर एक तर मनावर संयम हवा किंवा कुणीतरी चेक ठेवणार हव . ते घरातील कुणी असेल तर सर्वोत्तम , पण आपल्याच माणसाला त्रास (?) कसा द्यायचा (उदा . त्याला आवडते पुरणपोळी असू दे , काल फार दमला होता तो आज राहू दे) म्हणून ते माणूस तुम्हाला सारख माग लागत नाही . आणि मग काय ? Happy

त्यासाठी हा धागा . ज्याना ज्याना वजन कमी करायचय (हेल्दी वे , नो क्रॅश डाएट) त्यांचा इथे ग्रुप बनवूया .
प्रत्येकाने काय आज चांगल केल , काय चुकल याची रोज लिस्ट देऊया . चांगल करणार्याच अभिनंदन करू अन एखादा सारख चुकायला लागला त्याचे कान पकडूया , काही शंका असतील तर एकमेकाना विचारूया .
क्या बोलते भाई (और बहन ) लोग ?

लोकहो ,

आता आपण या गुणपद्धतीत बर्यापैकी सेट झालो आहोत . तर आता कंप्लिट सेट घेऊया Happy
खाली आणखी काही पॉईंट अ‍ॅड केले आहेत , जे तसे सोपे आहेत पण ते गरजेचेही आहेत
आता थोडे जास्त सिरियसही होऊया

आणि आजपासून परत एकदा गुण मोजायला सुरू करू. फक्त यावेळी एक लक्षात ठेवा, इथे नाही लिहिले तरी तुमचे रोजचे गुण स्वतः लिहून ठेवा . एखाद दिवस काही नाही केल तर ०/१० . हे खूप महत्वाच आहे.
दर आठवड्याला ज्यांचे ७५% पेक्षा कमी असतील त्यांचे कान पकडण्यात येतील . शिक्षा काय ते नंतर सगळे मिळून ठरवू.

कोण किती चांगल करतय आणि कुणाचे कान उपटायचे आहेत हे ठरवण्यासाठी खालील पद्धत वापरू

रोज तुम्ही खालील बाबी कशा पाळता ते पाहा .

१ . रोजचा व्यायाम न चुकवणे (व्यायामाचा प्रकार अन वेळ प्रत्येकाने आपापल्या सोयीने ठेवा ) जे ठरवेल त्यापेक्षा थोडा कमी जास्त किंवा वेगळा झाला तरी चालेल . पण चुकवायचा नाही

२. रोजच्या आहारात २ फळे / फळभाज्या अथवा २ वेळा सॅलेड असणे (फळात केळ्/चिक्कू कमीतकमी ठेवा)
३. रोजच्या आहारात २ वाट्या मोड , डाळी , उसळी , सोया , कमी तेलाच पिठल/ झुणका (२ अंड्यांचा पांढरा भाग , चिकन किंवा फिश रोस्टेड , शिजवलेले किंवा फार कमी तेल , पनीर ) असणे
४. बेकरी प्रॉडक्ट्स न खाणे (एखादा ब्राऊन ब्रेड अन ४ मारी इज ओके) केक्स , चॉकलेट्स , शीतपेये ,मैद्याचे पदार्थ नो नो
५. बाहेरचे खाणे (ऑफिसामधले जेवण , नाश्ता वगळता) मोस्टली हॉटेलिंग टाळणे
६. रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे अन जेवण व झोप यात किमान १:३० तास अंतर ठेवणे
७ चहा , कॉफी किंवा इतर पदार्थातून डायरेक्ट साखरेचा इनटेक ३ छोट्या चमच्यापेक्षा जास्त नसणे

जर व्यायाम नाही चुकवला तर ४ पैकी ४ गुण अन इतर सर्व क्रमांक पाळले तर प्रत्येकी १ पैकी १ गुण

त्यामुळे आता रोजचे गुण १०.

म्हणजे जर तुम्ही आज व्यायाम केला अन इतर क्रमांक नाही पाळला तर तुमचे ४/१० गुण . हे रोज लिहित जा . जर २-३ दिवसानी आला तर त्या दिवसाचे मिळून १२/२० किंवा १५/३० असे लिहा .
शक्य असल्यास आधीच्या गुणांमधे अ‍ॅड करून लिहा .
मी थोड्या अंतराने ते हेडर मधे अ‍ॅड करत जाईन .

काही शंका असतील तर विचारा . याचा फायदा म्हणजे तुम्ही किती कन्सिस्टंट आहात ते कळेल , अन इतरांचे पाहून हुरूप ही येईल

आणखी एक , ही काही स्पर्धा नाही , तेव्हा प्रामाणिकपणे आपले गुण लिहा . Wink

31 August, 2014 - 12:59

१. केदार जाधव १८२/२२०
२ सामान्य वाचक १४९/२२०
३ अदिति १३८/१८०
४ अनिरूध्द १२२/१६०
५ साती १०३/१७०
६ सीमांतिनी ५४/७०
७ मनीशा ९४/१४०
८ स्वाती२ ७०/८०
९ वर्षू नील १२१/१५०
१० देवकी १६५/२२०
११ smitaklshripad ८६/१८०
१२ पाखरू १४३/२२०
१३ खारूताई १५३/१९०
१४ दक्षिणा १०/१०
१५ पौर्णिमा १०/१०
१६ चनस ९६/१५०

१४ . चिनूक्स
१५. भानूप्रिया
१६. जाई
१७. प्रितीभुषण
१८. रीया
१९. पौर्णिमा
२० . स्मितू
२१ आनंदी
२२ पेरू
२३ डेलिया
२४ आशूडी
२५ वैदेही
२६ मंजू
२७ साधना
२८ . गीतांजली
२९ मृणाल १
३० मी_आर्या
३१ मना
३२ इश्श
३३ दक्षिणा
३४ dreamgirl
३५ दीप्स
३६ नि़क्षिपा
३७ मउ
३८ नंदिनी
३९ अमित एम
४० बीएस
४१ राजू७६
४२ वेल

४४ संदिप एस
४५ राज्या
४६ snoo
४७ शैलु
४८ अखी
४९ सहेली
५० सोनचाफा
५१ आभा
५२ धनश्री
५३ हर्मायनी
५४ मुग्धानंद
५५ आशिका
५६ सायली
५७ mrudul
५८ रमा
५९ आयडू
६० मी_चिऊ
६१ नानबा
६२ मंजू
६३ चनस

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दक्षिणा ,
तू २ दा ४/५ अपडेट दिला होतास , त्याचे ८/१० आहेत ते Happy
मार्क कॅलक्युलेशन वर लिहिलय

आणि मी रोज चहा पिऊन व्यायाम करतो . आणि २ मारी बिस्किट काही फार हेवी नाहीत Happy

खुप दिवसापासुन हा धागा बघते आहे....
पण काही लिहायचे धाडस नाही झाले मला...
पण आज करतेच सुरुवात Happy

गेले काही दिवसांपूर्वी पुण्यातले डॉ. प्रमोद त्रिपाठी यांचे एक व्याख्यान आमच्या ऑफिस मद्धे झाले...
"freedom from dibetes" असे त्यांचे एक drive आहे...त्याच्या अंतर्गत आत्तापर्यंत त्यांनी गेल्या वर्षात १०० पेक्षा जास्त लोकांना डायबेटीस पासुन मुक्त केले आहे....( त्यात माझी एक अत्यंत जवळची मैत्रिण आणि तिचे १८+ पेक्षा जास्त वर्ष डायबेटीस असणारे वडीलही आहेत )...योग्य आहार आणि माफक व्यायामामुळे डायबेटीस पासुन मुक्ती म्हण्जे पूर्णपणे गोळ्या आणि ईन्शुलीन बंद त्याच्बरोबर कॉलेस्त्रॉल वर नियंत्रण, वजनात घट असे अनेक फायदे आहेत... ही त्यांची वेब्साईट http://www.freedomfromdiabetes.org/
( ही जाहिरात नाही..ईतकी बेसिक माहिती देणे गरजेचे वाटले )

तर त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार मी आणि माझ्या नवर्‍याने खाण्यापिण्यात काही बदल केले आणि मला त्याचे छान परिणाम दिसुन आले...
आम्हा दोघानाही डाय्बेटीस नाही पण घरी दोघांकडेही अनुवंशिक डाय्बेटीस आहे....म्हणुन आम्ही विचार केला की चला सुरु तरी करु निदान आपल्याला डाय्बेटीस होणार असेल तर तो कदाचित टळेल किंवा लांबेल....
तर मह्त्वाचे मुद्दे :

१. दिवसाची सुरुवात ग्रीन स्मूदी ने करायची ...चहा त्यानंतर किंवा टाळता आला तर उत्तम
२. पूर्णपणे वेगन डाएट घ्यायचे...( हे आम्हाला फारसे जमले नाही...आम्ही गरजेपुरते दुग्ध्जन्य पदार्थ घेतो..)
३. refined food पूर्ण बंद ( मैदा, रवा, मीठ, साखर, पांढरा भात , पांढरे पोहे ई. ) ब्राऊन राईस व लाल पोहे मिळतात ते चालतील....आणि शप्पथ सांगते ते खुप टेस्टी लागतात..ईतके वर्ष का बर खात नव्ह्तो हे असं वाट्लं मला...
४. बाकी सगळी पथ्ये दिवेकर बाईंप्रमाणे...दर २ तासाने खाणे...झोपायच्या २ तास आधी खाणे ई ई...

रोजचं माझं वेळापत्रक असं :

सकाळी ७:३० : ग्रीन स्मूदी ( ४/५ पालक पाने किंवा ८/१० आंबट चुका पाने , १ फळ कोणेतेही, पुदीना, तुलस, काळं मीठ आणि १/२ ग्लास पाणी..मिक्सर वर फिरवुन शेक ...ईईईईई असं म्हणुन नका करुन बघा खरच मस्त लागतो....आणि उठल्या उठल्या हे पिलं की दिवस मस्त फ्रेश जातो...
सकाळी ९:३० : ओट्स / थालीपीठ/ मुग धिरडे /स्प्राउट्स भेळ /लाल पोह्याचे पोहे/नाच्णी डोसे... यापैकी एक नाष्टा
दुपारी १२:०० : भाकरी, भाजी, भरपुर सॅलड, डाळ
दुपारी ३ : भिजवलेले नट्स ( काळे मनुके, बदाम , अक्रोड )
संध्या ५ : खाकरा/ धिरङे/थालीपीठ्/ढोकळा ई ई यापैकी १. + १/२ कप चहा,,
संध्या ६:३० : १ फळ
रात्री ८ : भाकरी किंवा ब्राऊन राईस भात/ भाज्या घालुन खिच्डी/ सुप आणि स्टर फ्राईड भाज्या,चना चाट ई..

हे वेळापत्रक मी माझ्या घरासाठी बनवले आहे...
व्यायामचं म्हणाल तर गेले २ महिने ऑफिसमद्दे zumba चे सेशन्स चालु होते..मागच्या आठवड्यात संपले...आता रोज दुपारी २०मि ऑफिसच्या पर्किंग् मद्दे चालणे असा आणि ईतकाच व्यायाम चालु आहे..अजुन जास्त वाढवायचा प्रयत्न करते आहे,.
गेल्या २ महिन्यात ५ किलो वजन कमी करु शकले... मधेच ३-४ वेळा डाएट मोडले पण परत गाडी मुळपदावर आणली... Happy
अजुन खुप पल्ला गाठायचाय ..प्रयत्न सुरुच ठेवणार....देव त्यासाठी ईच्छाशक्ती देवो हीच प्रार्थना..
आता रोज मी पण ईथे लिहिन म्हणते,,,,
मला पण तुमच्यात सामिल करुन घ्या Happy

माझा अपडेट-
ब्रेफा - दडपे पोहे + चहा
कॉफी २ वेळा + १ चॉकलेट बिस्कीट
लंच - २फुलके + गवारीची भाजी + काकडी
संध्याकाळी - १/२ सफरचंद + खाकरा
जिम - १:१५ तास .. आल्यावर थोडं कलिंगड
रात्री - २फुलके + मेथीची भाजी
ऑलमोस्ट ऑन ट्रॅक!

८/१२/२०१४
ब्रेफा - एक छोटस केळ, १ कप टोन्ड दूध
लंच - भरपूर वेज क्लिअर सूप (तेल, तूप नाही. टॉमेटो, गाजर, कोबी, थोडे मटार - सूपात भरपूर भाज्या घातल्या) + ब्राऊनराईसचा वरण भात १ बाऊल + एक अ‍ॅपल.
स्नॅक्स - २ खजूर , १/२ वाटी दही पोहे - फोडणी वगैरे नाही
डिनर - उकडलेले हरबरे + छोले
झोपताना दूध पिईन परत

३ सूर्यनमस्कार घातले. वाढवत न्यायचेत. २ वर्षामागे ८४ का ८७ पर्यंत पोचलेले. ते एम ठेवायचय.
+ अर्धा तास चालून आले, त्यामुळे मार्क वाढवते. Happy

आत्तापर्यंतचे गुण १०/१४

काल प्रोटीन खाल्ले नाही. फळे खाल्ली आणि कुठलेही पिझ्झा इ खाल्ले नाही. व्यायाम ४५ मिनिटे तो ३ माईल वॉक व्हिडियो मधला केला. पाय दुखत आहेत. त्या व्हिडियो सोबत एक मसाजमशीन फ्री द्यायला हवे त्यांनी.

६/७

सकाळी - अर्धा कप अगोड चहा + १ टोस्ट
ब्रेकफास्ट - दीड थालिपीठ + पाऊण ग्लास दूध+अर्धा कप अगोड चहा
लंच - २ फुलके + उसळ
दुपारी - १ कप अगोड चहा
संध्याकाळी : पाव वाटी चणे + १/२ अगोड चहा+१ टोस्ट+ +१ पेयर+ ४ वेफर्स
रात्रीचे जेवण- १ छोटी चपाती, मटकीभाजी, आमटी-भात,सोलकढी,सॅलड.

३० मिनिटे घरी फिरणे. ......७/७ .

१२/८/२०१४
व्यायाम कसलाच नाही.. योगा नाही. व्यायामाचे गुण ०
आहार
सकाळी - आवळा रस + पाणी
अर्धा कप दूध अर्ध्या तासाने
नाश्ता - थोडे पोहे + चहा
जेवण - दीड वाटी आमटी + भेंडीची भाजी + फुल्का + थोडा भात
संध्याकाळी - अर्धा चहा
रात्री - एक फुल्का + थोडी भाजी + एक वाटी आमटी.

अरबटचरबट काही नाही. फळ डाळिंब + अर्ध केळं, स्प्राउट्स किंवा कच्चं सलाड खाउ नयेसं होतय तापानी.. आहाराचे गुण - २/३ - एकूण २/७ एकूण टोटल - ३३/४९
गुणातली दरी वाढत्येय पण इलाज नाही, कधी नाही एवढा विकनेस आला ह्या तापाने.. Sad

@ केदार, मीही देत्येय की रे अपडेट्स रोज.. Sad

आज सकाळी कोमट लिंबु पाणी
९ ला दुध , ओट
११ ला खरबुज १ वाडग
१२:३० ला परत खरबुज
२:३० ला बाहेर खाण झाल, चिकन हॉट पॉट + ग्रीन टी स्नो
५ ला कलिंगड
९:३० ला १ पोळी, मुगाची डाळ, दही

४५ मिन. व्यायाम
५/७

ओके.
१२ -०८-१४

व्यायम -वॉक अ‍ॅट होम- २
प्रोटीन - मट्की मोड आणि उकड्लेली तूरडाळ-१
फळे -तीन अंजीर एक टोमॅटो-१
गोड तेल्कट - नाही - १

एकूण - ५/७

@ केदार, मीही देत्येय की रे अपडेट्स रोज.. अरेरे >> येस , सॉरी Happy
मी गुणांच्या टक्केवारीवरून बोलत होतो. ओव्हर अ पिरियड , तुम्ही ८०% च्या वर असाल तर तुम्ही बर्यापैकी सेट झाला असता अन ९०%च्या वर असाल (यासाठी व्यायाम चुकलेला चालत नाही Happy ) तर वेरी गुड.

इतर लोक , अपडेट प्लीज ,

१८ ऑगस्ट नंतर आणखी उरलेले सोपे सोपे ३ पॉईंट अ‍ॅड करून आणखी स्ट्रीक्टली सुरू करू.

४८/७५

लाज .
::फिदी:

मी तर चक्क १५-२० दिवस उरुळी कांचनच्या आश्रमात जाऊन बसतो...

१३ ऑगस्ट

सकाळी ७ ला उठून ४ मनुका/अंजीर चकती १ + एक ग्लास गरम पाणी.
२० मिनिटांनी अर्धा कप चहा + २ बिस्किटं
७.४५ तो ८.३० - पॉवर वॉक अ‍ॅट होम.
८.४० - २ घोट चहा प्यायले पुन्हा.
९.४५ ब्रेफाला रवा आणि ढबू चा डोसा. (दिड) + गरम पाण्यातून लिंबू
११.३० ल खरबूज आणि पपई मिक्स. डबाभर
जेवायला सॅलड + ताक + वांग्याची भाजी + २ फुलके

या पुढे ५ वा. चहा + २ बिस्किटं
७ वा एक पेरू + लिंबू गरमपाण्यातून.
९ वा. सॅलड
घरी जाऊन डिनर ला पोळी भाजी + वरण.

केदार ३ माईल्स पॉवर वॉक म्हणजे साधारण किती कॅलरिज बर्न होत असतील?
अ‍ॅडिशनल व्यायामाची गरज आहे का?

काल
बाहेरच नो खाणं...
सकाळी ब्रेड बटर चहा नाश्ता नो ईलाज ऑफिस मधे खावा लागतो कधी कधी..
दुपारी दीड पोळी - भाजी जेवण...
संध्याकाळी फरसाण टाईप चट्पट १- २ वाटी...
२ पोळी- वांग भरीत - डाळ .. नो राईस..
मग २०-२५ मिनस चालणे हाच व्यायाम..
दिवस संपला झोप...
मार्क्स = ६/१०

माझे कालचे आणि आजचे १२/१४ मार्क्स.
व्यवस्थित व्यायाम व आहारही झाला. फक्त फळ खाल्ले नाही काल आणि आज कडधान्य मिसले, म्हणून २ मार्क्स कमी.

खरंच खूप फायदा होतोय या धाग्याचा आणि व्हॉट्सअप ग्रुपचा.
व्यायामाचा कंटाळा आला किंवा काही चमचमीत पदार्थ समोर दिसला तर आठवण होते यांची आणि आपल्याला कबूल करावे लागेल काय खाल्ले, किती आळस केला या विचाराने आळस झटकुन व्यायाम होतोय, चमचमीत पदार्थांवर बर्‍यापैकी नियंत्रण करता येतेय, हेही नसे थोडके.
धन्स केदार आणि दक्षिणा.

केदार ३ माईल्स पॉवर वॉक म्हणजे साधारण किती कॅलरिज बर्न होत असतील? >> मला पॉवर वॉक म्हणजे काय ते नक्की माहित नाही पण ते जॉगिंग इतक असेल तर ४.५ किमी इज गुड .

केदार ३ माईल्स पॉवर वॉक म्हणजे साधारण किती कॅलरिज बर्न होत असतील?>>>>>
साधारणतः २५० ते २६० कॅलरिज बर्न होतील.

Check below link

http://www.shapesense.com/fitness-exercise/calculators/running-calorie-b...

ललिता धन्यवाद लिंक साठी.
केदार मला सांगशील का एकूण दिवसात किती कॅलरिज निव्वळ व्यायामाद्वारे बर्न व्हायला हव्यात?

दक्षिणा ,
मी स्वतः साधारण ५००- ६०० कॅलरीज बर्न होतील असा व्यायाम करतो .
आपण खात असलेल्या कॅलरीजपेक्षा पूर्ण दिवसात जास्त कॅलरी बर्न व्हायला हव्यात . जर आपल रूटीन पूर्ण बैठ असेल तर व्यायामाने जास्त कॅलरी बर्न कराव्या लागतील. तेही तुमच वजन जास्त असेल तर तेव्ढ्याच व्यायामाने जास्त कॅलरी बर्न होतील .
माझ्या मते १ तास भरभर चालणे OR ४० मिनिट रिगरस सायकलींग OR १ तास टीटी OR ४० मि बॅडमिंटन इज ओके Happy
जिम बद्द्ल फारशी माहिती नाही.

बाप रे २ तास चाळिस मिनिटं. Uhoh माझं वजन काही फार जास्त नाही. मी आपलं रोज थोडा थोडा व्यायाम करूनच करिन वजन कमी.

बाप रे २ तास चाळिस मिनिटं. अ ओ, आता काय करायचं माझं वजन काही फार जास्त नाही. मी आपलं रोज थोडा थोडा व्यायाम करूनच करिन वजन कमी. >>
अग ते ऑर आहे अँड नाही Happy

मी स्वतः साधारण ५००- ६०० कॅलरीज बर्न होतील असा व्यायाम करतो .
आपण खात असलेल्या कॅलरीजपेक्षा पूर्ण दिवसात जास्त कॅलरी बर्न व्हायला हव्यात . जर आपल रूटीन पूर्ण बैठ असेल तर व्यायामाने जास्त कॅलरी बर्न कराव्या लागतील. >>> ही तिन्ही विधानं परस्परविरोधी आहेत.

Pages