वजन

चला , वजन कमी करूया -- भाग २

Submitted by केदार जाधव on 16 April, 2019 - 01:55

आधीचा धागा एडीट करता येत नाही , म्हणून हा नवीन धागा Happy

थोडी पार्श्वभूमी ? (Background) हवी असल्यास खालील धागे पहा ही विनंती Happy

विषय: 
शब्दखुणा: 

वजन कमी करताना/आरोग्याची काळजी घेताना

Submitted by सई केसकर on 28 September, 2016 - 13:19

मागच्या काही लेखांमध्ये मी कार्ब्स, त्यांचे शरीरावर होणारे दुष्परिणाम आणि इंटरमिटंट फास्टिंग बद्दल लिहिलं होतं. ते लेख वाचून आलेल्या कॉमेंट्स आणि इमेल वाचून मला हा पुढचा फॉलोअप लेख लिहावासा वाटला. वजन कमी करताना काही प्रॅक्टिकल गोष्टी खूप उपयोगी पडतात. कारण हा खूप दूरचा प्रवास असतो आणि कधी कधी मानसिक बळ खचून जातं. काही सध्या गोष्टी पाळल्या तर हा प्रवास तितका बोचरा वाटत नाही.

१. तुम्हाला वजन कमी करायचे आहे का?

विषय: 
शब्दखुणा: 

चला , वजन कमी करूया

Submitted by केदार जाधव on 31 July, 2014 - 02:38

आजपासून मी डाएट करणार ... रोज १ तास चालणार ... नक्क्की म्हणजे नक्क्क्की

आज मित्राच्या वाढदिवसाची पार्टी आहे , एक दिवस दाबून खाल्ल तर काय होतय , उद्या कव्हर करू .

आज खूप उशिर झाला उठायला , आज फिरण कॅन्सल .

आज घरी पुरणपोळ्या केल्या होत्या , पाच हाणल्या .

कित्ती हा पाऊस , आज राहू दे फिरायच .

गेले १ महिना वजन कमी करायचा प्रयत्न करतोय , पण १ किलोही कमी झाल नाही , जाऊ दे , ये अपने बसकी बात नही .

हे चित्र अनेकांच्या बाबतीत सारखच असत .

विषय: 
शब्दखुणा: 

वजन वाढवण्याबाबत

Submitted by बन्या on 19 April, 2014 - 15:43

जिकडे पहावे तिकडे वजन कमी करण्याचे किस्से , त्यावरचे डाएट, व्यायाम इ. च्या माहितिचा स्फोट झालेला दिसतो, पण अशीही लोकं असतात जी अती बारीक, अशक्त, क्रुश असतात, ज्यांचे वजन खुपच कमी असते, आणि काही केल्या वाढत नाही.

अनुवांशिक असेल तर काहीच समस्या नाही, अशा व्यक्ती बारिक असल्या तरी चपळ असतात.

पण काही व्यक्तींची पचनशमता कायमची मंदावलेली असते, यामागे काविळ किंवा त्तसम पोटाचे किंवा लिवर चे विकार असतात.

अन्न पचन न झाल्याने व त्यामुळे पोषण तत्व शरिरात षोषली न गेल्याने वजन वाढत नाही.

यामागे मानसिक ताणतणावही असु शकतो.

शब्दखुणा: 

१०५ किलो ते ७७ किलो एक प्रवास (माझे वजन कमी करण्याचा प्रयोग )

Submitted by केदार जाधव on 2 April, 2014 - 03:41

ही छोटीशी गोष्ट आहे एका आरोग्याबद्द्ल बर्यापैकी उदासिन असलेल्या चहाबाज माणसाने आपला दिनक्रम फारसा न बदलता , कसलीही औषधे ने घेता , जिमला न जाता , केवळ आहारावर नियंत्रण अन व्यायाम याच्या जोरावर १०५ किलोचे वजन ७७ किलो कसे केले (आणि त्याहीपेक्षा जास्त हेल्दी कसा झालो , वजन हा फक्त सहज मोजता येणारा एक पॅरामिटर आहे) याची .
हे लिहिण्याचा मूळ हेतूच जर मी करू शकतो तर तुम्हीही करू शकता आहे हे सांगणे आहे Happy

हा फोटो जरूर पहा Happy

PhotoGrid_1395201659110_1.png

विषय: 

व्यायामशाळा - व्यायामाचा प्रचार/प्रसार ते पैसे उकळण्याचा नवा व्यवसाय....विविध बरे वाईट अनुभव

Submitted by मेधावि on 31 August, 2012 - 21:59

काल आमचा मैत्रिणींच्या गप्पा रंगल्या होत्या. महत्वाच्या विषयावर गाडी आलीच्......जवळपास सर्वच जणींची दुखरी नस्..वाढलेले वजन्...ओघानेच सध्याची जिम्स व त्यांचे बरे वाईट अनुभव कथनही झाले. बर्‍याच नव्या गोष्टी ऐकायला मिळाल्या. जाहिराती पाहून आपण जिम लावतो व नंतर जर काही कारणाने वजन उतरले नाही तर बरेचदा स्वतःला दोषी ठरवतो व "झाकली मुठ सव्वा लाखाची"..झाकलेलीच रहाते. बर्‍याच गोष्टी लोकांपुढे येतच नाहीत. हा धागा तुम्हा-आम्हाला आलेल्या जिम्स्च्या अनुभवांची देवाण घेवाण करण्याकरता.....

विषय: 
शब्दखुणा: 

वजन नियन्त्र्णाच्या सोप्या टिप्स

Submitted by SANTOSH-JALUKAR on 6 August, 2010 - 03:09

आयुर्वेदिक म्हटल्या बरोबर आपल्या मनात प्रथम येतं "परिणाम हळू होत असला तरी साईड-इफेक्ट नसतात". आयुर्वेदामधे अतिशय जलद परिणामकारी औषधे आहेत ह्यावर आपला आता नक्की विश्वास बसेल. वर्षानुवर्ष सतत अभ्यास केल्यावर असा अनुभव येतो की आयुर्वेदात नमूद केलेली औषधे व आरोग्य विषयक मूलभूत सिध्दांत हे त्रिकालाबाधित सत्य आहेत. पित्तशमन औषधे व मेदनाशक औषधांची जोडी मेद कमी करण्यासाठी कशी कार्य करते ह्या विषयी थोडक्यात माहीती बघूया. वजन कमी करण्यासाठी दोन महत्वाच्या क्रिया होणे आवश्यक आहे. प्रथम आहारावर नियंत्रण व दुसरे मेद विलयन करून तो शरीरा बाहेर काढणे.

विषय: 

वजन वाढवण्यासाठी काही टिपा

Submitted by हर्ट on 19 April, 2010 - 03:25

शरिरावर इतर कुठलाच अपाय होणार नाही अशा पद्धतीने मला वजन वाढवायचे आहे. मी शाकाहारी आहे. सात्विक आहार आवडतो. कृपया सहजशक्य उपाय सुचवा. आभारी आहे.

विषय: 
शब्दखुणा: 

वजन कसे कमी केले - एक स्वानुभव !

Submitted by अगो on 3 October, 2009 - 23:35
weight loss apple

या वर्षीच्या २६ जानेवारीला मनाशी पक्क ठरवलं की काही करुन वजन कमी करायचं. तसं लग्न होईपर्यंत माझं वजन अगदी आदर्श म्हणावं असंच होतं. फार कमी नाही आणि फार जास्त नाही. पण गेल्या पाच वर्षांत ते दर वर्षी चार-पाच किलो असं ठरवून घेतल्यासारखं वाढतच गेलं. प्रेग्नन्सीच्या नऊ महिन्यांत माझं ३० पौंड वजन वाढलं होतं ( साधारण १४ किलो ) त्यानंतर त्यातले २१ पौंड कमीही झालं होतं पण बाळंतपण करुन आई भारतात परत गेल्यावर बाहेरच्या खाण्यावरचं नियंत्रण सुटलं आणि वजन वाढतच राहिलं. इंटरनेटवर खूप दिवस वाचत होते आहार आणि व्यायाम या विषयी.

विषय: 
Subscribe to RSS - वजन