चला , वजन कमी करूया

Submitted by केदार जाधव on 31 July, 2014 - 02:38

आजपासून मी डाएट करणार ... रोज १ तास चालणार ... नक्क्की म्हणजे नक्क्क्की

आज मित्राच्या वाढदिवसाची पार्टी आहे , एक दिवस दाबून खाल्ल तर काय होतय , उद्या कव्हर करू .

आज खूप उशिर झाला उठायला , आज फिरण कॅन्सल .

आज घरी पुरणपोळ्या केल्या होत्या , पाच हाणल्या .

कित्ती हा पाऊस , आज राहू दे फिरायच .

गेले १ महिना वजन कमी करायचा प्रयत्न करतोय , पण १ किलोही कमी झाल नाही , जाऊ दे , ये अपने बसकी बात नही .

हे चित्र अनेकांच्या बाबतीत सारखच असत .
वजन कमी करायच असणार्या सगळ्यानाच इच्छा तर खूप असते , सुरूवातही बर्याचदा केली जाते , पण नंतर नंतर आता जाऊ दे , आपल्याच्यानं नाही होणार हे वर गाडी येते . हे टाळायच असेल तर एक तर मनावर संयम हवा किंवा कुणीतरी चेक ठेवणार हव . ते घरातील कुणी असेल तर सर्वोत्तम , पण आपल्याच माणसाला त्रास (?) कसा द्यायचा (उदा . त्याला आवडते पुरणपोळी असू दे , काल फार दमला होता तो आज राहू दे) म्हणून ते माणूस तुम्हाला सारख माग लागत नाही . आणि मग काय ? Happy

त्यासाठी हा धागा . ज्याना ज्याना वजन कमी करायचय (हेल्दी वे , नो क्रॅश डाएट) त्यांचा इथे ग्रुप बनवूया .
प्रत्येकाने काय आज चांगल केल , काय चुकल याची रोज लिस्ट देऊया . चांगल करणार्याच अभिनंदन करू अन एखादा सारख चुकायला लागला त्याचे कान पकडूया , काही शंका असतील तर एकमेकाना विचारूया .
क्या बोलते भाई (और बहन ) लोग ?

लोकहो ,

आता आपण या गुणपद्धतीत बर्यापैकी सेट झालो आहोत . तर आता कंप्लिट सेट घेऊया Happy
खाली आणखी काही पॉईंट अ‍ॅड केले आहेत , जे तसे सोपे आहेत पण ते गरजेचेही आहेत
आता थोडे जास्त सिरियसही होऊया

आणि आजपासून परत एकदा गुण मोजायला सुरू करू. फक्त यावेळी एक लक्षात ठेवा, इथे नाही लिहिले तरी तुमचे रोजचे गुण स्वतः लिहून ठेवा . एखाद दिवस काही नाही केल तर ०/१० . हे खूप महत्वाच आहे.
दर आठवड्याला ज्यांचे ७५% पेक्षा कमी असतील त्यांचे कान पकडण्यात येतील . शिक्षा काय ते नंतर सगळे मिळून ठरवू.

कोण किती चांगल करतय आणि कुणाचे कान उपटायचे आहेत हे ठरवण्यासाठी खालील पद्धत वापरू

रोज तुम्ही खालील बाबी कशा पाळता ते पाहा .

१ . रोजचा व्यायाम न चुकवणे (व्यायामाचा प्रकार अन वेळ प्रत्येकाने आपापल्या सोयीने ठेवा ) जे ठरवेल त्यापेक्षा थोडा कमी जास्त किंवा वेगळा झाला तरी चालेल . पण चुकवायचा नाही

२. रोजच्या आहारात २ फळे / फळभाज्या अथवा २ वेळा सॅलेड असणे (फळात केळ्/चिक्कू कमीतकमी ठेवा)
३. रोजच्या आहारात २ वाट्या मोड , डाळी , उसळी , सोया , कमी तेलाच पिठल/ झुणका (२ अंड्यांचा पांढरा भाग , चिकन किंवा फिश रोस्टेड , शिजवलेले किंवा फार कमी तेल , पनीर ) असणे
४. बेकरी प्रॉडक्ट्स न खाणे (एखादा ब्राऊन ब्रेड अन ४ मारी इज ओके) केक्स , चॉकलेट्स , शीतपेये ,मैद्याचे पदार्थ नो नो
५. बाहेरचे खाणे (ऑफिसामधले जेवण , नाश्ता वगळता) मोस्टली हॉटेलिंग टाळणे
६. रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे अन जेवण व झोप यात किमान १:३० तास अंतर ठेवणे
७ चहा , कॉफी किंवा इतर पदार्थातून डायरेक्ट साखरेचा इनटेक ३ छोट्या चमच्यापेक्षा जास्त नसणे

जर व्यायाम नाही चुकवला तर ४ पैकी ४ गुण अन इतर सर्व क्रमांक पाळले तर प्रत्येकी १ पैकी १ गुण

त्यामुळे आता रोजचे गुण १०.

म्हणजे जर तुम्ही आज व्यायाम केला अन इतर क्रमांक नाही पाळला तर तुमचे ४/१० गुण . हे रोज लिहित जा . जर २-३ दिवसानी आला तर त्या दिवसाचे मिळून १२/२० किंवा १५/३० असे लिहा .
शक्य असल्यास आधीच्या गुणांमधे अ‍ॅड करून लिहा .
मी थोड्या अंतराने ते हेडर मधे अ‍ॅड करत जाईन .

काही शंका असतील तर विचारा . याचा फायदा म्हणजे तुम्ही किती कन्सिस्टंट आहात ते कळेल , अन इतरांचे पाहून हुरूप ही येईल

आणखी एक , ही काही स्पर्धा नाही , तेव्हा प्रामाणिकपणे आपले गुण लिहा . Wink

31 August, 2014 - 12:59

१. केदार जाधव १८२/२२०
२ सामान्य वाचक १४९/२२०
३ अदिति १३८/१८०
४ अनिरूध्द १२२/१६०
५ साती १०३/१७०
६ सीमांतिनी ५४/७०
७ मनीशा ९४/१४०
८ स्वाती२ ७०/८०
९ वर्षू नील १२१/१५०
१० देवकी १६५/२२०
११ smitaklshripad ८६/१८०
१२ पाखरू १४३/२२०
१३ खारूताई १५३/१९०
१४ दक्षिणा १०/१०
१५ पौर्णिमा १०/१०
१६ चनस ९६/१५०

१४ . चिनूक्स
१५. भानूप्रिया
१६. जाई
१७. प्रितीभुषण
१८. रीया
१९. पौर्णिमा
२० . स्मितू
२१ आनंदी
२२ पेरू
२३ डेलिया
२४ आशूडी
२५ वैदेही
२६ मंजू
२७ साधना
२८ . गीतांजली
२९ मृणाल १
३० मी_आर्या
३१ मना
३२ इश्श
३३ दक्षिणा
३४ dreamgirl
३५ दीप्स
३६ नि़क्षिपा
३७ मउ
३८ नंदिनी
३९ अमित एम
४० बीएस
४१ राजू७६
४२ वेल

४४ संदिप एस
४५ राज्या
४६ snoo
४७ शैलु
४८ अखी
४९ सहेली
५० सोनचाफा
५१ आभा
५२ धनश्री
५३ हर्मायनी
५४ मुग्धानंद
५५ आशिका
५६ सायली
५७ mrudul
५८ रमा
५९ आयडू
६० मी_चिऊ
६१ नानबा
६२ मंजू
६३ चनस

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>वजन जास्त आहे की कमी त्यापेक्षा बी एम आय महत्वाचा ... .>>
नाही पटले. बी एम आय एक गाईडलाईन म्हणून ठीक आहे पण बी एम आय मसल मास आणि बॉडी फॅट यात फरक करत नाही. काहीवेळा व्यक्तीचा बिएमाअय नॉर्मल रेंज मधे असतो पण बॉडी फॅट जास्त असते तर काही वेळा मसल मास मुळे बिएमाअय जास्त असतो. त्यामुळे जोडीला वेस्टः हिप हा रेशो देखील लक्षात घ्यावा. सगळ्यात महत्वाचे म्हणजे लाइफस्टाइल. यात योग्य आहार आणि व्यायाम दोन्ही आले. नुसत्या आहार नियंत्रणाने वजन आटोक्यात राहीलही पण कार्डिओ हेल्थ आणि मसल मास राखण्यासाठी व्यायाम हवाच. त्यामुळे वजन कमी करायचे नसले तरी आठवड्यातून ५ दिवस कमितकमी ३० मिनिटांचा ब्रिस्क वॉकिंग सारखा एरोबिक एक्झरसाइज हवा, जोडीला स्ट्रेंथ ट्रेनिंगही.

BSK i am so sorry. looks like i have missed your post.
can you send me your no thru email again? orin vipu? i will add you.

आजचा अपडेट:

ब्रेकफास्टः उपमा दोन कप चहा
लंचः २ पोळ्या, दोडक्याची भाजी, १ उकडलेले अंडं.
दुपारी: तुलसी जस्मिन टी
संध्याकाळी पाच वाजता: १ कप चहा
डिनरः अंड्याची बुर्जी.
\

व्यायामः तासभर एरोबिक्स आणि योगा.
आता रात्री काम असल्यानं थर्मासभर चहा भरून ठेवलाय. दिवसाभराचा डायेट खड्ड्यात.

कॅलरी जाळणे आणि किती खाणे यावर चर्चा सुरू होती तर मी माझा एक जुना अनुभव सांगू शकते जो निदान माझ्या बाबतीत वर्क झाला आहे.
मी कॅलरी काउंटच्या साईटवर माझे वय/वजन आणि टार्गेट वजन (कदाचीत टार्गेट टाइम पण असेल) यावरून माझे कॅलरी इनटेक शोधले. ते दिवसाला १२०० होते. आणि मी ३०० कॅलरी जाळायचा व्यायाम (मोस्टली चालणे पण ट्रेडमीलवर आय थिंक ३ मैल मध्ये मध्ये अपहिल वगैरे करून) त्यावेळी आठवड्याला एक किंवा काही वेळा दोन आठवड्याला एक पाउंड असं संथ गतीने मी साधारण वीस पाउंड उतरवले होते. मला दोन वर्षे लागली. खाण्याचं चिटिंग महिन्यातून एकदा वगैरे केलं असेलही. पण पेशंन्स ठेवला. खाल्यापेक्षा जास्त बर्न वगैरे करण्यापेक्षा आधी १५०० कॅलरीतले ३०० कॅलरी खाण्यातले कमी केले आणि ३०० जाळले. हा हिशेब माझ्यासाठी तरी चालला. मला वाटतं आता ती साईट बंद झाली पण तत्सम दुसर्या साईट्स आपला हिशेब काढण्यासाठी वापरायला हरकत नाही. जनरली कार लांब पार्क करणं, ऑफिसमध्ये मोठ्ठ पाण्याचं भांडं ठेवायच्या ऐवजी लागेल तितक्या वेळ उठणं या जादाच्या हालचालीसुद्धा ठेवाव्या. मुख्य चालणे किंवा जो काही व्यायाम कराल त्यात एक पाच-दहा मिनिटं स्ट्रेचिंगसाठी देखील नक्की द्यावी. केदारने वजन कमी करायचं या विषयासाठी हा धागा सुरू केला आहे तर मला वाटतं सुरूवातीला खाण्यावर कंट्रोल आणि झेपेल तितका व्यायाम एवढं जरी दोन महिने करून पाहिलं तरी आपलं शरीर काय प्रतिसाद देतंय हे आपल्याला कळेल. मला खरं तर एकदाच वजन उतरवताना एवढा वेळ लागतो हे लक्षात ठेवलं तरी पुन्हा वजन वाढायला लागलं की मग खाण्यावर (पुन्हा) कंट्रोल करून ते आटोक्यात ठेवणं हळूहळू जमायला लागलं आहे. लो बॅकचा त्रास असल्याने रोज चालणं मस्ट आहेच. आय होप कुणाल तरी या चार ओळींची मदत होईल Happy

<<< १६००़ कॅ जर शरीरात जाताय तर वेट लॉस साठी १६०० पेक्षा जास्त जाळणे आवश्यक आहे.>>> प्रिंसेस, 'वेट लॉस'साठी हे शब्द महत्त्वाचे आहेत.>>>
ओह तुझा मुद्दा आता लक्षात आला. "वेट लॉससाठी" हे या धाग्यावर अध्याहृत आहे ग Wink
वेका छान पोस्ट. वजन उतरवणे हे अगदी हळुहळू आणि आपल्या पेशन्सची परिक्षा घेणारे काम असते याला अनुमोदन. तुमच्या आईडियल वेटवर पोहचल्याशिवाय थांबु नये हे नक्की

मला काही दिवस अपडेट द्यायला नाही जमले पण आहारवर नियंत्रण चालू आहे. व्यायाम आजपासुन सुरु केला. मला वजन कमी करण्यापेक्षा इन्चेस कमी करायचे आहे.

मला पण टाका प्लीज हेडर मधे..
माझे कालचे अप्डेट्स :

८:३०: ग्रीन स्मूदी
१०: १ भाकरी + तीळ/ कडीपत्ता चटणी ( मला सकाळी वेगळ काही करायचा वेळ नसतो..सो मी ब्रेफा मद्दे भाकरीच खाते रोज
११:३० : उकडलेल्या शेंगा + १/२ कप कॉफी
१:३० :भाकरी + चवळी उसळ + १ वाटी डाळ + काकडी
५: १ केळ
६:३० : २ छोटी धिरडी ( ज्वारी + गहु + बेसन )
८:३० : भाज्या सुप + १ छोटी वाटी भरुन मुग खिच्डी

२० मिनिट्स घरीच व्यायाम केला.... व्यायाम कमी पडतोय असं वाटलं म्हणुन त्याचे २च मार्क घेते...
एकुण गुण = ५/७

व्यायाम - सायक्लिंग
नो जंक फुड
प्रोटीन- तुरडाळ २वाट्या
फळ - दोन अंजिर

कर्ब्ज- अर्धी ज्वारि भाकरी
२५ग्रॅ भात
वांग्याच कमीत कमी तेल वाप्रून भरित

एकूण १३-०८-१४
७/७

डॉक्टर , तुरडाळ दोन वाट्या Uhoh जास्त नाहीये का हे प्रमाण ?
२५ ग्रॅम भात Happy कसा मोजला ? हे असे मोजुन खाणे मलाही सुरु करयचे आहे. किचन स्केल विकत घेतलेय. पण प्रत्येक वेळी मोजायचा कंटाळा येतो. लक्षात रहात नाही. ई.ई.

आज संध्याकाळी बाहेर खाण झाल. प्रोटीन म्हणुन चिकण धरल तरी कॅलरीज जास्त झाल्या असणार. बाकी फळ, दुपारी मुग, बिन साखरेचा चहा वैगरे ठिकच झाल. पाणी ७/८ ग्लास, सकाळी कोमट लिंबुपाणी झाल.

व्यायाम मिस होणार होता पण ह्या धाग्याची आठवण येउन २० मिनीट चालुन २ गुण घेउयात असा विचार केला पण एकदा बाहेर निघाल्यावर ५५ मिनीटानेच घरी आहे Happy

सो परत एकदा ६/७ मार्क्स

पैकीच्या पैकी मारकं कधी मिळतील मला :((

अपडेट्स प्लीज .

माझे अपडेट :
१ चहा
३ इडल्या , १ वाटी दूध अन २ अंड्यांच पांढर
१ तास सायकलिंग
जेवण : २ चपात्या , १ वाटी उसळ , १ भाजी , १ ताक
१ चहा आणि ४ मारी
२ फुलके , १ भाजी

गुण ७/७

@ दक्षिणा... तुमच्या पोस्टसाठी धन्यवाद.. आणि आता मीही नक्की करेन निश्चयाने व्यायाम.. कंटाळा येईल थोडे दिवस पण निग्रहाने दूर करीन तो.. thnx again Happy

माझे मार्क्स आणि डाएट उद्यापासुन लिहिते. पण रोज व्यायाम चालु आहे. आणि डाएट पण करतीये..
सो ...

१८ ऑगस्ट नंतर आणखी उरलेले सोपे सोपे ३ पॉईंट अ‍ॅड करून आणखी स्ट्रीक्टली सुरू करू.>>>

केदार, व्यायाम, प्रोटीन हे लाईफस्टइल चेंजेस झटपट जमत नाहीत. सिन्सियरली प्रयत्न करीत आहे पण अजून वेळ लागेल अस वाटत. १ ऑगस्ट पासून ही सिस्टीम सुरु केली, हा महिनाभर हीच मार्किंग सिस्टीम असू दे प्लीज. सप्टेंबर मध्ये अजून गोष्टी वाढवू या का?

आज ४/७, व्यायाम १५-२० मिनिटेच झाला. बाकी फळे प्रोटीन आणि चांगले खाणे सांभाळले.

माझा अपडेट -
ब्रेफा - चहा + पोहे
११.३० मोड आलेले मुग
लंच - सॅलड+ १ नान + पालक पनीर+ पालक दाल + व्हेज बिर्यानी + भजी (बाहेर गेल्याचा परिणाम .. पण सॅलड जास्त खाउन बाकीच पोर्शन कंट्रोल)
संध्याकाळी - १ खाकरा
जिम - १:३० तास + १ बाऊल कलिंगड (जेवणानंतर खायच नाही म्हणुन इथे अ‍ॅडजस्ट करतेय)
रात्री - २ फुलके + फ्लॉवरची भाजी + मोड आलेले मुग
५/७

सध्या रोज व्यायाम चालू आहे. सध्या ७mph ने १० मिनिट जॉगिंग, साधारण १४० कॅलरीज जळतात. त्यानंतर ४० मिनिट वेट ट्रेनिंग. एक दिवसाआड ब्राउन राइस, कडधान्ये. साखर जवळपास पूर्णपणे बंद आहे. मागच्या एका महिन्यात ६ पाउंड ने वजन कमी झाले.
थोडे साखरेविषयी:
१ चमचा साखरेत साधारण २५ कॅलरीज, १२ ग्राम साखर=४८ कॅलरीज. बाहेरुन साखर जसे, चहा, शीतपेये, चॉकलेट, केक, पेस्ट्रीज, स्वीटस इ इ आहारातून वगळले तरी बराच फरक पडेल वजनात.

सकाळी - अर्धा कप अगोड चहा + १ डायजेस्टिव्ह मारी
ब्रेकफास्ट - सा.खिचडी + पाऊण ग्लास दूध+ १ कप अगोड चहा
लंच - २ फुलके + उसळ
दुपारी - १ कप अगोड चहा
संध्याकाळी : १/२ अगोड चहा+१ डायजेस्टिव्ह मारी+ १ सफरचंद+२ वेफर्स + ४चमचे भावनगरी
रात्रीचे जेवण- १ छोटी चपाती, भाजी, आमटी-भात,सोलकढी,

नो फिरणे. ......२/७ .

आज व्यायाम केला, सुरुवातच आहे म्हणुन १.५ किमी चालणे आणि पळणे. उद्या अजुन जास्त करेन.
जेवणात काल मैद्याचा पराठा खाल्ला आणि त्या आधी सॅन्डविचमधे चीज खाल्ले म्हणुन जेवणाचे गुण नाहीत.

आज भरपुर सॅलड टाकुन सॅन्डविच खाणार. फ्रुट्स आणले आहेत. स्प्राउट्स नाहित.

केदार, व्यायाम, प्रोटीन हे लाईफस्टइल चेंजेस झटपट जमत नाहीत. सिन्सियरली प्रयत्न करीत आहे पण अजून वेळ लागेल अस वाटत. १ ऑगस्ट पासून ही सिस्टीम सुरु केली, हा महिनाभर हीच मार्किंग सिस्टीम असू दे प्लीज. सप्टेंबर मध्ये अजून गोष्टी वाढवू या का?
>>

वरच्या ४ गोष्टीच जास्त महत्वाच्या अन जास्त प्रयत्न करायला लागणार्या आहेत.
पुढच्या ज्या ३-४ गोष्टी आहेत , त्या सोप्या अन मोस्टली सेल्फ डिसिप्लिनच्या आहेत , पण चांगल्या रिझल्टसाठी त्या शक्य तितक्या करणही जरूरी आहे .

उदा: रात्री ८-९ नंतर हेवी जेवण न घेणे
बाहेरचे अन्नपदार्थ (ऑफिस जेवण कंपल्सरी असल्यास ते सोडून)अन बेकरी प्रॉडक्ट्स जास्त न खाणे

१४-०८-१४-
२/७
व्यायाम नाही, तीन बाकरवड्या खाल्ल्या.
बाकी प्रोटिन, भाज्या अगदी तीन फळेही खाल्ली.

आज ७/७ झाले अस्ते पण ४ वाजता २ खाकरा खाल्यात (हेतेढकल साठी आणलेल्या, वेळ नाही म्हणुन डायरेक्ट पोटात ढकलत आहे)

सो ६/७.. अगेन :((

८/१४ अपडेट -
उपास असल्याने १.५ प्लेट साबुदाणा खिचडी , २ वेळा कॉफी
संध्याकाळी १ तास जिम
रात्री - २ फुलके + दाल पालक + थोडासा भात

सकाळी - आवळारस + कोमट पाणी
एक कप अगोड चहा + १ डायजेस्टिव्ह मारी
ब्रेकफास्ट - ज्वारीच्या लाह्या + पाऊण ग्लास दूध
११ वाजता २पाव+पावभाजीची भाजी ३-४ चमचे +२ गुलाबजाम्+१ छोटा कप आयस्क्रीम Sad
लंच - १ फुलका + उसळ
दुपारी - १ छोटा कप आयस्क्रीम Sad :-(:
संध्याकाळी : १/२ अगोड चहा+१ डायजेस्टिव्ह मारी+ १ सफरचंद +१ मूठ चणे
रात्रीचे जेवण- १ छोटी चपाती, भाजी, आमटी-भात,सोलकढी,सॅलड

३०मिनिटे फिरणे. ......६/७ .

व्यायाम नाही. फळे नाही. प्रोटीन नाही. सकाळी भात (पुलीयोगरे) आणि रात्री पराठे (बिना तेलाचे) खाल्ले. १/७

Pages