आजपासून मी डाएट करणार ... रोज १ तास चालणार ... नक्क्की म्हणजे नक्क्क्की
आज मित्राच्या वाढदिवसाची पार्टी आहे , एक दिवस दाबून खाल्ल तर काय होतय , उद्या कव्हर करू .
आज खूप उशिर झाला उठायला , आज फिरण कॅन्सल .
आज घरी पुरणपोळ्या केल्या होत्या , पाच हाणल्या .
कित्ती हा पाऊस , आज राहू दे फिरायच .
गेले १ महिना वजन कमी करायचा प्रयत्न करतोय , पण १ किलोही कमी झाल नाही , जाऊ दे , ये अपने बसकी बात नही .
हे चित्र अनेकांच्या बाबतीत सारखच असत .
वजन कमी करायच असणार्या सगळ्यानाच इच्छा तर खूप असते , सुरूवातही बर्याचदा केली जाते , पण नंतर नंतर आता जाऊ दे , आपल्याच्यानं नाही होणार हे वर गाडी येते . हे टाळायच असेल तर एक तर मनावर संयम हवा किंवा कुणीतरी चेक ठेवणार हव . ते घरातील कुणी असेल तर सर्वोत्तम , पण आपल्याच माणसाला त्रास (?) कसा द्यायचा (उदा . त्याला आवडते पुरणपोळी असू दे , काल फार दमला होता तो आज राहू दे) म्हणून ते माणूस तुम्हाला सारख माग लागत नाही . आणि मग काय ?
त्यासाठी हा धागा . ज्याना ज्याना वजन कमी करायचय (हेल्दी वे , नो क्रॅश डाएट) त्यांचा इथे ग्रुप बनवूया .
प्रत्येकाने काय आज चांगल केल , काय चुकल याची रोज लिस्ट देऊया . चांगल करणार्याच अभिनंदन करू अन एखादा सारख चुकायला लागला त्याचे कान पकडूया , काही शंका असतील तर एकमेकाना विचारूया .
क्या बोलते भाई (और बहन ) लोग ?
लोकहो ,
आता आपण या गुणपद्धतीत बर्यापैकी सेट झालो आहोत . तर आता कंप्लिट सेट घेऊया
खाली आणखी काही पॉईंट अॅड केले आहेत , जे तसे सोपे आहेत पण ते गरजेचेही आहेत
आता थोडे जास्त सिरियसही होऊया
आणि आजपासून परत एकदा गुण मोजायला सुरू करू. फक्त यावेळी एक लक्षात ठेवा, इथे नाही लिहिले तरी तुमचे रोजचे गुण स्वतः लिहून ठेवा . एखाद दिवस काही नाही केल तर ०/१० . हे खूप महत्वाच आहे.
दर आठवड्याला ज्यांचे ७५% पेक्षा कमी असतील त्यांचे कान पकडण्यात येतील . शिक्षा काय ते नंतर सगळे मिळून ठरवू.
कोण किती चांगल करतय आणि कुणाचे कान उपटायचे आहेत हे ठरवण्यासाठी खालील पद्धत वापरू
रोज तुम्ही खालील बाबी कशा पाळता ते पाहा .
१ . रोजचा व्यायाम न चुकवणे (व्यायामाचा प्रकार अन वेळ प्रत्येकाने आपापल्या सोयीने ठेवा ) जे ठरवेल त्यापेक्षा थोडा कमी जास्त किंवा वेगळा झाला तरी चालेल . पण चुकवायचा नाही
२. रोजच्या आहारात २ फळे / फळभाज्या अथवा २ वेळा सॅलेड असणे (फळात केळ्/चिक्कू कमीतकमी ठेवा)
३. रोजच्या आहारात २ वाट्या मोड , डाळी , उसळी , सोया , कमी तेलाच पिठल/ झुणका (२ अंड्यांचा पांढरा भाग , चिकन किंवा फिश रोस्टेड , शिजवलेले किंवा फार कमी तेल , पनीर ) असणे
४. बेकरी प्रॉडक्ट्स न खाणे (एखादा ब्राऊन ब्रेड अन ४ मारी इज ओके) केक्स , चॉकलेट्स , शीतपेये ,मैद्याचे पदार्थ नो नो
५. बाहेरचे खाणे (ऑफिसामधले जेवण , नाश्ता वगळता) मोस्टली हॉटेलिंग टाळणे
६. रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे अन जेवण व झोप यात किमान १:३० तास अंतर ठेवणे
७ चहा , कॉफी किंवा इतर पदार्थातून डायरेक्ट साखरेचा इनटेक ३ छोट्या चमच्यापेक्षा जास्त नसणे
जर व्यायाम नाही चुकवला तर ४ पैकी ४ गुण अन इतर सर्व क्रमांक पाळले तर प्रत्येकी १ पैकी १ गुण
त्यामुळे आता रोजचे गुण १०.
म्हणजे जर तुम्ही आज व्यायाम केला अन इतर क्रमांक नाही पाळला तर तुमचे ४/१० गुण . हे रोज लिहित जा . जर २-३ दिवसानी आला तर त्या दिवसाचे मिळून १२/२० किंवा १५/३० असे लिहा .
शक्य असल्यास आधीच्या गुणांमधे अॅड करून लिहा .
मी थोड्या अंतराने ते हेडर मधे अॅड करत जाईन .
काही शंका असतील तर विचारा . याचा फायदा म्हणजे तुम्ही किती कन्सिस्टंट आहात ते कळेल , अन इतरांचे पाहून हुरूप ही येईल
आणखी एक , ही काही स्पर्धा नाही , तेव्हा प्रामाणिकपणे आपले गुण लिहा .
31 August, 2014 - 12:59
१. केदार जाधव १८२/२२०
२ सामान्य वाचक १४९/२२०
३ अदिति १३८/१८०
४ अनिरूध्द १२२/१६०
५ साती १०३/१७०
६ सीमांतिनी ५४/७०
७ मनीशा ९४/१४०
८ स्वाती२ ७०/८०
९ वर्षू नील १२१/१५०
१० देवकी १६५/२२०
११ smitaklshripad ८६/१८०
१२ पाखरू १४३/२२०
१३ खारूताई १५३/१९०
१४ दक्षिणा १०/१०
१५ पौर्णिमा १०/१०
१६ चनस ९६/१५०
१४ . चिनूक्स
१५. भानूप्रिया
१६. जाई
१७. प्रितीभुषण
१८. रीया
१९. पौर्णिमा
२० . स्मितू
२१ आनंदी
२२ पेरू
२३ डेलिया
२४ आशूडी
२५ वैदेही
२६ मंजू
२७ साधना
२८ . गीतांजली
२९ मृणाल १
३० मी_आर्या
३१ मना
३२ इश्श
३३ दक्षिणा
३४ dreamgirl
३५ दीप्स
३६ नि़क्षिपा
३७ मउ
३८ नंदिनी
३९ अमित एम
४० बीएस
४१ राजू७६
४२ वेल
४४ संदिप एस
४५ राज्या
४६ snoo
४७ शैलु
४८ अखी
४९ सहेली
५० सोनचाफा
५१ आभा
५२ धनश्री
५३ हर्मायनी
५४ मुग्धानंद
५५ आशिका
५६ सायली
५७ mrudul
५८ रमा
५९ आयडू
६० मी_चिऊ
६१ नानबा
६२ मंजू
६३ चनस
my updates for 14/08/20 10 /
my updates for 14/08/20
10 / 10
काल सगळच चुलीत गेल! व्यायाम,
काल सगळच चुलीत गेल! व्यायाम, प्रोटीन नाही. गोड पुरी खाल्ली (भरपूर). फळे,चहा, रात्रीचे जेवण जमले. ३/१

आजचे गुण १)व्यायाम :
आजचे गुण
१)व्यायाम : ४
२)फळे/भाज्या/सॅलडः १
३)प्रोटिन : १
४)नो बेकरी प्रॉडक्ट्स :१
५) बाहेरचे खाणे : १
६) रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे इ. १ .(मी ९.३० - १०.०० वाजता जेवते.मी नाही दररोज १/२ गुण कापून घेणार)
७) साखर : १ .............................१०./१०
एकूण ३४/४०
फळे; सॅलड,बाहेरचे खाणे वगळता माझा तोच आहार आहे.फळे खाल्ली तर एकदम खायची नाहीतर ४-५ दिवस अजिबात नाही.संध्याकाळी भूक लागायची,त्यामुळे ट्रेनमधे बिस्कीटे खाल्ली जायची.घरी थोडसं का होईना शेव,फरसाण खाल्ले जायचे.गोडासाठी काहीतरी खाल्ले जायचे.पण सध्यातरी त्यात नियमितता आली आहे.
9/10 ek mahimcha halwa khalla
9/10 ek mahimcha halwa khalla
२१ ऑगस्टः १)व्यायाम:
२१ ऑगस्टः
१)व्यायाम: ४
२)फळे/भाज्या/सॅलडः १
३)मोड आलेले डाळी, कडधान्ये: १
४)नो बेकरी प्रॉडक्ट: १
५) तळलेले पदार्थ वा बाहेरचे पदार्थ १
६) रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे: ०
७) साखर २ (फक्त सकाळचा चहा) : ०
आजचे गुण: ८
एकुण : ३०/४०.
मला ही गुणांची सिस्टीम व इतकं
मला ही गुणांची सिस्टीम व इतकं काटेकोर पाळणे फार ओव्हरवेल्मिंग वाटत आहे.
मी एकटीच आहे का असं वाटणारी?
मला वाटतं, माझ्या पद्धतीने जरा व्यायाम्/आहाराचे गणित बसले की मग इकडे यावे. आधीपासूनच नियमांच्या कचाट्यात अडकले की मी सगळंच सोडून देते हा माझा अनुभव आहे..
मला ही गुणांची सिस्टीम व इतकं
मला ही गुणांची सिस्टीम व इतकं काटेकोर पाळणे फार ओव्हरवेल्मिंग वाटत आहे. अरेरे
मी एकटीच आहे का असं वाटणारी?
<<
नाही. तुमच्यासारखे मेजॉरिटी लोक्स आहेत.
तेव्हा, मेजॉरिटी लोकहो,
सिस्टीम गेली उडत.
मुद्दा,
डू यू लाईक द वे यू लुक? द वे यू लिव्ह? तुम्हाला बोलताना दम लागतो का? दोन जिने चढायची जिवावर येते का? नेहेमी करण्याचं काम करताना नकोसे वाटते का? किंवा अशाच छोट्या गोष्टी.
असं होत असेल, तर शाळेत शिकवलेले पीटीचे हात करायला सुरु करा. सिरियसली. फक्त तितकेच. १ ते १६. आकडे म्हणत.
फक्त १५ दिवस, मी सांगतो म्हणून. मग ते पॉइंट्स वगैरे मोजू आपण.
कम ऑन, गेट मूव्हिंग, कारण, यू आर सिरियसली ऑट ऑफ शेप.
*
मला वाटतं, माझ्या पद्धतीने जरा व्यायाम्/आहाराचे गणित बसले की मग इकडे यावे. आधीपासूनच नियमांच्या कचाट्यात अडकले की मी सगळंच सोडून देते हा माझा अनुभव आहे.
<<
ऑनेस्टली,
तुमचा अनुभव आहे तसाच कधी काळी माझाही होता. पण हळू हळू करत प्रयत्नपूर्वक लाइफस्टाईल चेंज केला आहे.
आपल्याकडे झटका बसत नाही तोपर्यंत लोक सुधरत नाहीत. झटका (हृदयविकाराचा) येऊन गेला तरी विड्या फुंकणे न सोडणारे महाभाग मला असंख्य ठाऊक आहेत. इ.
व्यायाम सुरू करण्यासाठी ३५ (वय वर्षे) ही लिमिट ठेवा. त्यानंतर करायला च च च च च हवा.आधी केलेला असो वा नसो.
हळू हळू करा. थोडा करा. पण प्लीज रोज करा. २-४ महिन्यात चस्का लागेल. अन मग तुमचीच छबी तुम्हालाच मोहून टाकेल, प्रॉमीस!
ही नुस्ती पेप टॉक नाहिये. खरंच करा. स्वतःकरता. Nobody can love you like you yourself.
इब्लिस मस्त पोस्ट! तुमच्या
इब्लिस मस्त पोस्ट!
तुमच्या या धाग्यावरच्याच सगळ्याच पोस्ट्स मस्त आहेत.
इब्लिस .. मस्त पोस्ट! पीटीचा
इब्लिस .. मस्त पोस्ट!
पीटीचा तास सुरु केलाय मी ..
हे पीटीचे व्यायाम कुठे मिळतील
हे पीटीचे व्यायाम कुठे मिळतील का? मला इतकं काही आठवत नाहीये आता.
२-४ प्रकार आठवत असतील..
बस्कॆ, १० गुणांची सिस्टीम
बस्कॆ, १० गुणांची सिस्टीम ओव्हर्व्हेल्मिंग आहे खरी. पण आधी इथे ५ गुण होते - व्यायाम ४ आणि १ पिझ्झा इ न खाणे. मग ७ झाले फळे आणि प्रोटीन. मग १० झाले. किमान ५ करायचे हा मी प्रयत्न करते. ५ इज बेटर दॅन झिरो.
जेवढे आठवतील तेवढे करा. ६ उभे
जेवढे आठवतील तेवढे करा. ६ उभे अन ६ हात बसून आहेत. सोप्पे आहेत.
शाळेत जाणारी मुलं कुणाची आहेत?
लिहा बरं जरा? वरती रॉहूंनी मला रुलायेगा का विचारलंय. हुडोबा, लिवा पगू?
ह्म्म.. सिस्टीम उत्तम आहे गं,
ह्म्म.. सिस्टीम उत्तम आहे गं, वाद नाही. पण मला सुट होत नाहीये. सद्ध्यातरी.
बस्के .. टेन्शन कशाला ..
बस्के .. टेन्शन कशाला .. जितकं सुट होईल ते करायच..

खाताना या धाग्याची आठवण आली तरी कमी जातं पोटात आजकाल
इब्लिस, मस्त
इब्लिस, मस्त पोस्ट!
बस्के,
गुणांची सिस्टिम एक गाईडलाइन म्हणून वापर. रोज सगळेच शक्य होइल असे नाही. जे जमेल ते करायचे. जे जमले नाही त्याची नोंद करायची. आपल्यालाच काय सुधारता येइल ते ठरवता येते. माझ्या बाबतीत सध्या समर असल्याने स्वयंपाक तयार असला तरी इतर उनाडक्या करुन जेवायला उशीर व्हायचा. गुणांच्या नव्या सिस्टिममुळे आपोआप लवकर जेऊन मग उनाडक्या असे सुरु केले. मी स्वतःसाठी आठवड्यातून ५ दिवस व्यायाम, जंक फूड टाळणे आणि पोर्शन कंट्रोल असा माफक प्लॅन ठेवलाय. गेल्या आठवड्यात दोन पार्ट्या+ क्लब मिटिंग+ गावची जत्रा असे होते. खाणे काटेकोरपणे सांभाळले गेले नाही पण उगाचच भरपेट चरणे व्हायचे ते या बाफची आठवण ठेवल्याने टळले. .
मला ही गुणांची सिस्टीम व इतकं
मला ही गुणांची सिस्टीम व इतकं काटेकोर पाळणे फार ओव्हरवेल्मिंग वाटत आहे. अरेरे >>
बस्के , गुणांची पद्धत फक्त ट्रॅक ठेवण्यासाठी आहे बाकी काही नाही .
जोवर तुमचे रूटीन बसत नाही तोवर ४/१० , ५/१० असले तरी काही हरकत नाही.
वर इब्लिस म्हणाल्याप्रमाणे सुरूवात तर करा . गुण पद्धत पाळली नाही तर काही हरकत नाही
फक्त एवढच की या सिस्टीममुळे आपण कुठे चुकतोय हे कळत राहत आणि प्रगती मेजरेबल राहते इतकच
केदार ने अगदी बरोबर
केदार ने अगदी बरोबर सांगितलंय..
बस्के मार्क्स चं टेंशन न घेता सुरुवात तर कर..
मी सुरुवात केली ३,४ महिन्यांपूर्वी तेंव्हा हा धागा अस्तित्वात नव्हता पण या धाग्यामुळे कुठे चुकतोय हे मात्र नक्की कळलं .. कंट्रोल आला एक्सेस खाण्यावर किंवा चुकीच्या खाण्यावर..किंवा खाण्याच्या चुकीच्या वेळा कळल्या..
आय अॅम शुअर, माझ्यासारखा अनुभव आलेले या धाग्यावर तुला बरेच लोक्स सापडतील..
तर निश्चय करो और शुरुवात करो..
ऑल द बेस्ट!!!
ह्म्म.. लक्षात ठेवते तुमच्या
ह्म्म.. लक्षात ठेवते तुमच्या सर्वांच्या टीप्स. माझा मेन प्रॉब्लेम सद्ध्या अमाप गोड खाणे होत आहे, व व्यायाम अजिबात नाही , फळं मी कद्धीच खात नाही.
. त्याचा गिल्ट आहेच आहे. त्यातून असं लिहून्,नोंदवून ठेवायला लागले तर मायनसमध्ये जाईन मी.
एनीवेज, हे थोडं प्रॉब्लेम्सपासून पळण्यासारखे होत आहे. थोडी थोडी का होईना सुरवात करतेच आता. 
थँक्स सर्वांना!
ईब्लिस छान पोस्ट. बस्के, इथे
ईब्लिस छान पोस्ट.
बस्के, इथे लिहिले नाही तरी कुठे तरी हे लिहायला घे, फरक पडतो. बर्याचदा नकळत थोड थोड खाउन टोटल खुप होते कधी आहारच चौरस नसतो. इथे लिहायच म्हणुनही मी २/३ दा इच्छा नसतांना व्यायाम केला आहे
my update for 14/08/21 10 /
my update for 14/08/21
10 / 10
वर्षू , डीटेल लिहा. म्हणजे
वर्षू , डीटेल लिहा. म्हणजे आम्हाला खायच्या आयडिया मिळतील आणि हुरूपही.

२१-०८-१४ पाऊण तास वॉक ४ दोन
२१-०८-१४
पाऊण तास वॉक ४
दोन वाट्या मोड आलेली कडधान्ये १
बेकरी/तळकट नाही १
साखर अजिबात नाही १
फळे - दोन पेरु, अर्धी कैरी १
बीट टोमॅटो सूप, पाव वाटी भात, दिड वाटी वरणफळे
रात्रीचे जेवण साडेदहा ०
झोपायला साडेअकरा ०
एकूण ८/१०
रात्रीच्या जेवणाचे आणि जेवल्यानंतर झोपेपर्यंतच्या गॅपचे गणित पाळले जाणे कठिण.
कारण इथे तापाची साथ आल्याने मला संध्याकाळच्या सेशनमध्ये ५वाजल्यापासून रात्री १०:३० -११ पर्यंत अथक काम करावं लागतंय. दुपारचं जेवण साडेचारला होतंय त्यामुळे परत ११ पर्यंत भूक लागणार नाही.
२१/०८/२०१४ १)व्यायाम :
२१/०८/२०१४
१)व्यायाम : ४
२)फळे/भाज्या/सॅलडः १
३)प्रोटिन : १
४)नो बेकरी प्रॉडक्ट्स :१
५) बाहेरचे खाणे : १
६) रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे इ. १
७) साखर : १ .
१०./१०
कालचे मार्क्स :
कालचे मार्क्स : ७/१०
१)व्यायाम: २
२)फळे/भाज्या/सॅलडः ० (एकच फल खाल्ल)
३)मोड आलेले डाळी, कडधान्ये: १
४)नो बेकरी प्रॉडक्ट: १
५) तळलेले पदार्थ वा बाहेरचे पदार्थ: १
६) रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे: १
७) साखर ३ लहान चमचे : १
माझ्यासाटी मार्क्स सिस्टम चागली आहे... अबर-चबर खान्यावर थोडा control आला आहे
ज्यांना व्यायामाचा कंटाळा आहे
ज्यांना व्यायामाचा कंटाळा आहे त्यांनी प्लिज च फक्त एक काम करा.
लेस्ली सॅमसन चा ३ माईल्स वॉक चा व्हिडिओ डालो करा. त्याने लाईफ बनून जाईल.
अत्यंत सोपे व्यायाम प्रकार असल्याने दमणूक होत नाही. फार छान उपयोग होतो आणि ४५ मिनिटात आपण ४.८ किमी चाललो हे पटतच नाही.
प्लिज करा..
मला कोणी पुण्यातील चांगला
मला कोणी पुण्यातील चांगला डाएटीशियनही सांगू शकेल का ?
लेस्ली सॅमसन का sansone
लेस्ली सॅमसन का sansone
Leslie Sansone
Leslie Sansone
मृणाल सॉरी सॅनसन
मृणाल सॉरी सॅनसन
माझे अपडेट : सगळ जमल १०/१०
माझे अपडेट :
सगळ जमल
१०/१०
Pages