चला , वजन कमी करूया

Submitted by केदार जाधव on 31 July, 2014 - 02:38

आजपासून मी डाएट करणार ... रोज १ तास चालणार ... नक्क्की म्हणजे नक्क्क्की

आज मित्राच्या वाढदिवसाची पार्टी आहे , एक दिवस दाबून खाल्ल तर काय होतय , उद्या कव्हर करू .

आज खूप उशिर झाला उठायला , आज फिरण कॅन्सल .

आज घरी पुरणपोळ्या केल्या होत्या , पाच हाणल्या .

कित्ती हा पाऊस , आज राहू दे फिरायच .

गेले १ महिना वजन कमी करायचा प्रयत्न करतोय , पण १ किलोही कमी झाल नाही , जाऊ दे , ये अपने बसकी बात नही .

हे चित्र अनेकांच्या बाबतीत सारखच असत .
वजन कमी करायच असणार्या सगळ्यानाच इच्छा तर खूप असते , सुरूवातही बर्याचदा केली जाते , पण नंतर नंतर आता जाऊ दे , आपल्याच्यानं नाही होणार हे वर गाडी येते . हे टाळायच असेल तर एक तर मनावर संयम हवा किंवा कुणीतरी चेक ठेवणार हव . ते घरातील कुणी असेल तर सर्वोत्तम , पण आपल्याच माणसाला त्रास (?) कसा द्यायचा (उदा . त्याला आवडते पुरणपोळी असू दे , काल फार दमला होता तो आज राहू दे) म्हणून ते माणूस तुम्हाला सारख माग लागत नाही . आणि मग काय ? Happy

त्यासाठी हा धागा . ज्याना ज्याना वजन कमी करायचय (हेल्दी वे , नो क्रॅश डाएट) त्यांचा इथे ग्रुप बनवूया .
प्रत्येकाने काय आज चांगल केल , काय चुकल याची रोज लिस्ट देऊया . चांगल करणार्याच अभिनंदन करू अन एखादा सारख चुकायला लागला त्याचे कान पकडूया , काही शंका असतील तर एकमेकाना विचारूया .
क्या बोलते भाई (और बहन ) लोग ?

लोकहो ,

आता आपण या गुणपद्धतीत बर्यापैकी सेट झालो आहोत . तर आता कंप्लिट सेट घेऊया Happy
खाली आणखी काही पॉईंट अ‍ॅड केले आहेत , जे तसे सोपे आहेत पण ते गरजेचेही आहेत
आता थोडे जास्त सिरियसही होऊया

आणि आजपासून परत एकदा गुण मोजायला सुरू करू. फक्त यावेळी एक लक्षात ठेवा, इथे नाही लिहिले तरी तुमचे रोजचे गुण स्वतः लिहून ठेवा . एखाद दिवस काही नाही केल तर ०/१० . हे खूप महत्वाच आहे.
दर आठवड्याला ज्यांचे ७५% पेक्षा कमी असतील त्यांचे कान पकडण्यात येतील . शिक्षा काय ते नंतर सगळे मिळून ठरवू.

कोण किती चांगल करतय आणि कुणाचे कान उपटायचे आहेत हे ठरवण्यासाठी खालील पद्धत वापरू

रोज तुम्ही खालील बाबी कशा पाळता ते पाहा .

१ . रोजचा व्यायाम न चुकवणे (व्यायामाचा प्रकार अन वेळ प्रत्येकाने आपापल्या सोयीने ठेवा ) जे ठरवेल त्यापेक्षा थोडा कमी जास्त किंवा वेगळा झाला तरी चालेल . पण चुकवायचा नाही

२. रोजच्या आहारात २ फळे / फळभाज्या अथवा २ वेळा सॅलेड असणे (फळात केळ्/चिक्कू कमीतकमी ठेवा)
३. रोजच्या आहारात २ वाट्या मोड , डाळी , उसळी , सोया , कमी तेलाच पिठल/ झुणका (२ अंड्यांचा पांढरा भाग , चिकन किंवा फिश रोस्टेड , शिजवलेले किंवा फार कमी तेल , पनीर ) असणे
४. बेकरी प्रॉडक्ट्स न खाणे (एखादा ब्राऊन ब्रेड अन ४ मारी इज ओके) केक्स , चॉकलेट्स , शीतपेये ,मैद्याचे पदार्थ नो नो
५. बाहेरचे खाणे (ऑफिसामधले जेवण , नाश्ता वगळता) मोस्टली हॉटेलिंग टाळणे
६. रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे अन जेवण व झोप यात किमान १:३० तास अंतर ठेवणे
७ चहा , कॉफी किंवा इतर पदार्थातून डायरेक्ट साखरेचा इनटेक ३ छोट्या चमच्यापेक्षा जास्त नसणे

जर व्यायाम नाही चुकवला तर ४ पैकी ४ गुण अन इतर सर्व क्रमांक पाळले तर प्रत्येकी १ पैकी १ गुण

त्यामुळे आता रोजचे गुण १०.

म्हणजे जर तुम्ही आज व्यायाम केला अन इतर क्रमांक नाही पाळला तर तुमचे ४/१० गुण . हे रोज लिहित जा . जर २-३ दिवसानी आला तर त्या दिवसाचे मिळून १२/२० किंवा १५/३० असे लिहा .
शक्य असल्यास आधीच्या गुणांमधे अ‍ॅड करून लिहा .
मी थोड्या अंतराने ते हेडर मधे अ‍ॅड करत जाईन .

काही शंका असतील तर विचारा . याचा फायदा म्हणजे तुम्ही किती कन्सिस्टंट आहात ते कळेल , अन इतरांचे पाहून हुरूप ही येईल

आणखी एक , ही काही स्पर्धा नाही , तेव्हा प्रामाणिकपणे आपले गुण लिहा . Wink

31 August, 2014 - 12:59

१. केदार जाधव १८२/२२०
२ सामान्य वाचक १४९/२२०
३ अदिति १३८/१८०
४ अनिरूध्द १२२/१६०
५ साती १०३/१७०
६ सीमांतिनी ५४/७०
७ मनीशा ९४/१४०
८ स्वाती२ ७०/८०
९ वर्षू नील १२१/१५०
१० देवकी १६५/२२०
११ smitaklshripad ८६/१८०
१२ पाखरू १४३/२२०
१३ खारूताई १५३/१९०
१४ दक्षिणा १०/१०
१५ पौर्णिमा १०/१०
१६ चनस ९६/१५०

१४ . चिनूक्स
१५. भानूप्रिया
१६. जाई
१७. प्रितीभुषण
१८. रीया
१९. पौर्णिमा
२० . स्मितू
२१ आनंदी
२२ पेरू
२३ डेलिया
२४ आशूडी
२५ वैदेही
२६ मंजू
२७ साधना
२८ . गीतांजली
२९ मृणाल १
३० मी_आर्या
३१ मना
३२ इश्श
३३ दक्षिणा
३४ dreamgirl
३५ दीप्स
३६ नि़क्षिपा
३७ मउ
३८ नंदिनी
३९ अमित एम
४० बीएस
४१ राजू७६
४२ वेल

४४ संदिप एस
४५ राज्या
४६ snoo
४७ शैलु
४८ अखी
४९ सहेली
५० सोनचाफा
५१ आभा
५२ धनश्री
५३ हर्मायनी
५४ मुग्धानंद
५५ आशिका
५६ सायली
५७ mrudul
५८ रमा
५९ आयडू
६० मी_चिऊ
६१ नानबा
६२ मंजू
६३ चनस

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे अन जेवण व झोप यात किमान १:३० तास अंतर ठेवणे>>>>> हेवी जेवणात
१ छोटी चपाती, भाजी, आमटी-भात,सोलकढी+कोशिंबीर हे येत असेल तर माझा १/२ गूण कायमच कमी.उरलेला १/२ पाळला जातो.
सकाळी - १/२ कप अगोड चहा + १ डायजेस्टिव्ह मारी
ब्रेकफास्ट - ३ मु.पोळे +१/२ कप अगोड चहा +पाऊण ग्लास दूध+ १ वाटी डाळिंबाचे दाणे
लंच - २ फुलके + उसळ +आमटी-भात+ १ वाटी दही
संध्याकाळी : १/२ अगोड चहा+१ डायजेस्टिव्ह मारी
रात्रीचे जेवण- १ छोटी चपाती, भाजी, आमटी-भात,दही+कोशिंबीर
२५ मिनिटे फिरणे.......९ .५ / १०

माझं चालू आहे व्यवस्थित, पोस्टस टाकायला वेळ मिळत नव्हता.
आता मार्क्स बघून टाकेन.

आज रात्री जेवताना एक कप खिचडी खाल्ली Sad
पण इतर काहीच केलेलं नव्हतं.

मला स्वतःला रोज उसळी ,आमट्या खायला आवडत नाही. आणी घरी ही रोज भारतीय जेवण बनत नाही.. पण मी नेमाने मूग स्प्राऊट्स, भिजवलेले छोले / हरबरे किंवा कोणतेही होल कडधान्य न शिजवता खाते , दिवसभरात दोन वाट्या , भाजी असेल तर एक फुलका, एक वाटी दही आणी कोशिम्बीरी बरोबर, मोस्टली रात्रीच्या जेवणात रोस्टेड चिकन किंवा फिश असतं पण जोडीला भरपूर सलाद.. ८.३० ते ९ च्या दरम्यान डिनर संपतं.
सकाळी ९ ला ब्रेफा लाईट, व्यायाम + वॉक ( १ ते १.३० तास)११ वाजता एक फळ, १ वाजता लंच, ५ वाजता एक कप चहा बरोबर वाटीभर फुटाणे किंवा एक फ्रूट किंवा ४,५ बदाम किंवा २ अक्रोड , मग वॉक , स्टेशनरी व्यायाम ( 1 तास) ,७ वाजता स्प्राऊट्स लहान वाटी,
रात्री ९ वाजता डिनर . I avoid carbs in the night..
आत्ता पर्यन्तचं हेच रूटीन आहे.. अधे मधे कधी बदलतं, पण drastic चेंज नाही होत
so फार so गुड..
आजचे मार्क्स.. १० / १०

माझे कालचे मार्क्स ७/१०
व्यायाम फक्त १५ मीनट फिरणे....सो ३ मार्क्स कट Sad
बाकी सगल्या गोष्टी व्यवस्तीत पालल्या गेल्या Happy

इब्लिस ,
प्रोटीन्सची पोस्ट मस्त आहे . मी स्वतःही अंडी किंवा फिश प्रोटीन्ससाठी जास्त वापरतो पण इथे बरेच लोक शाकाहारी दिसले अन विदाऊट रस्सा नॉन व्हेज खायची सवय नसते आपल्यात म्हणून शाकाहारी ऑप्शन जास्त दिले Happy

माझे कालचे गुण :

व्यायाम केला ४५ मिनिट्स... ४/४
>>रोजच्या आहारात २ वाट्या मोड , डाळी , उसळी , सोया , कमी तेलाच पिठल/ झुणका (२ अंड्यांचा पांढरा भाग , चिकन किंवा फिश रोस्टेड , शिजवलेले किंवा फार कमी तेल , पनीर ) असणे>> = ० मार्क्स Sad
बाकी सगळं पैकीच्या पैकी

एकुण गुण = ९/१० Happy

बरेच दिवसात लिहिले नाही इथे.
व्यायाम रोज चालू आहे. प्राणायामही चालू केला आहे.
गोड खाणे कन्ट्रोलमध्ये आहे. पण मध्येच प्रचंड क्रेव्हिंग होतं काहीतरी प्रचंड गोडमिट्ट खाण्याचं. ते उगाचच असतं. ते यशस्वीपणे अजूनतरी परतवता आलेले नाही. थोडी सकम्ब होतेच Sad Happy
संध्याकाळच्या भयानक भूकेसाठी ताकातल्या ज्वारीच्या लाह्या हा मला आजवर सूट झालेला उत्तम आहार आहे. आय होप त्यात काही प्रॉब्लेम नसावा.

पौर्णिमा ,
संध्याकाळच्या भयानक भूकेसाठी ताकातल्या ज्वारीच्या लाह्या हा मला आजवर सूट झालेला उत्तम आहार आहे. आय होप त्यात काही प्रॉब्लेम नसावा. >> चांगला ऑप्शन आहे हा Happy

पण मध्येच प्रचंड क्रेव्हिंग होतं काहीतरी प्रचंड गोडमिट्ट खाण्याचं. ते उगाचच असतं. ते यशस्वीपणे अजूनतरी परतवता आलेले नाही. >>>> स्पेशली संध्याकाळी काही तरी गोड खावेसे वाटते.मग खजूर खाल्ला जातो.

काल बाहेरगावी गेल्याने व्यायाम नाही.
खाण्यातपण व्हेज मांचुरियन म्हणून एक मार्क कट.
तेव्हा
१८-०८-१४ चे गुण २/७

आज मात्र अगदी जोरात प्रयत्न चाललेत.

काल १८ ऑगस्ट - ९/१०
व्यायाम ४/४, फळे/भाज्या १/१ , प्रोटिन १/१, नो बेकरी प्रॉडक्ट्स १/१, बाहेरचे खाणे नाही १/१, साखर २ टीस्पून १/१, जेवण आणि झोप यात अंतर ठेवायला जमले नाही ०/१

विदाऊट रस्सा नॉन व्हेज खायची सवय नसते आपल्यात
<<
१००% सत्य आहे.

बहुतेक लोक तिखटजाळ मसालेदार तेलकट रस्सा म्हणजे उत्तम नॉनव्हेज असे समजतात. घरी केला असेल तर किमान स्टॉक तरी नॉनव्हेजचा असतो. हॉटेलात नुसतं पाणीच :-s

मासे हे सर्वात भारी नॉनव्हेज फूड आहे. त्यातलेही स्टीम किंवा बेक केलेले. कमी मसाल्यात, कमी तेलातही रस्सा इ. करता येतात.

रच्याकने जागूतैना डाएट फिश रेसिपीज टाकायला सांगितले पाहिजे इथे.

आहारावर नियंत्रण डळमळीतरीत्या चालू आहे, पण व्यायाम नियमित आणि पुरेसा होतोय. चहा अगोड करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. साखर दोन चमचे वापरली जात आहे. डिनरमधले कार्ब्ज कमी करायचा प्रयत्न आहे.

रात्री एक दीडवाजता जबरदस्त हंगर पँग्ज येतात. त्यावेळेला खाण्यासाठी काहीतरी ऑप्शन सुचवा. मी जनरली कपभर दूध पिते.

त्यावेळेला खाण्यासाठी काहीतरी ऑप्शन सुचवा.
<
सिरियसली सांगू का?
शक्य असल्यास, जागे राहूच नका.
अन जागरण मस्ट असेल तर संध्याकाळचं जेवण थोऽडं वाढवा.

आले, लसूण,कोथिंबीर आणि असल्यास पालक वापरुन माशाचे छान लिप्ते होते.
चिकन करताना कांदा- टोमॅटो चा अगदी १ टीस्पून तेल वापरुन करी बेस करायचा. आवडत असेल तर थोडे बीन साईचे दही घालायचे. आले, लसूण कोथिंबीर लावलेले चिकन त्यात शिजवायचे. बदल म्हणून त्यात मेथी/पालक्/पुदीना घालायचा. धानसाक मसाला आणि मसूर घालून पण छान चिकन होते. मी बरेचदा व्हाइट चिकन चिली करते.

इब्लिस. कामामुळं जागं राहणं आवश्यक आहे. आणि मी एकावेळेला जास्त खाऊ शकत नाही. ऋजुता दिवेकर जे दोन दोन तासांनी थोडं खात रहा सांगते, ती माझी केस लहानपणापासून आहे. थोडंसं खाऊन पोट भरतं आणी दोन तीन तासांनी परत भूक लागते.

नंदिनी, एक कप दूध आणी दोन खजूर(सावकाश चावून खा) ट्राय कर, हंगर पँग्स जातील.. ग्रेट मिड नाईट स्नॅक

व्यायाम : ४
फळे/भाज्या/सॅलडः १
प्रोटिन १
नो बेकरी प्रॉडक्ट्स १
बाहेरचे खाणे नाही १
साखर : १ छोटा पेढा -१ चमचा साखर जेमतेम असेल
जेवण ९ च्याआधी आणि झोप यात अंतर आज निश्चितच. १.......१०/१०

बिनसाखरेचा चहा प्यायला लागल कि साखरेचा चहा म्हणजे , अगदीच गळ्याखाली उतरत नाही. Wink

इब्लिसभाइ, घरात केलेला पाया याबाबतीत एक नं. (नॉट फॉर प्रोटीन्स दो) . पण कॅल्शिअम / मिनरल्स साठी बुस्टर डोस आहे हा.

आणि प्रोटीन्स साठी चिकन (चरबीलेस), कमी तेलात / कमी मसाल्यात वाफवलेले. (याची टेस्ट पण मस्त लागते).

आणि माश्यापरीस खेकडापण लै भारी. त्यात फॅट्स असतात कि नाही माहित नाही पण तेल खुप कमी असतं....

खेकडापण लै भारी. त्यात फॅट्स असतात कि नाही माहित नाही पण तेल खुप कमी असतं...>>> कोलेस्ट्रेरॉल वाढवायला खेकडा,कोलंबी,तिसर्‍या इ. शेलफिश चांगले असतात.
पण हा आपला रोजचा आहार नसल्याने एखाददिवशी खाऊन कोलेस्ट्रेरॉल तरी चालतय.

काल १०/१०
चक्क जेवायची आणि झोपायची वेळ पाळायला जमलं.
पाऊण तास वॉक, पंधरा मिनिटे स्ट्रेचींग.
पालक सूप.
सफरचंद टोमॅटो.
उकडलेली तुरडाळ सकाळी आणि रात्री जास्त मूगडाळ घातलेली खिचडी एक वाटी.
दिवसातून अर्धी चपाती फक्त आणि साखर अज्जिबात नाही.

साती सेम पिंच Happy १०/१०

सकाळी लिंबुपाणी, ३ अन्जीर
१०:३० ला दुध, ओट
१:३० ला उसळ भरपुर पालक टाकुन, कारल्याची भाजी, १ पोळी
४:३० ला १ कप दुध एक केळ
५:३० साखर न घालता चहा
७:३० ला दुपारचच जेवण, २ छोट्या काकड्या
४५ मिन व्यायाम
मार्क कमी करण्यासारख मला तरी काही दिसत नाहिये

Pages