चला , वजन कमी करूया

Submitted by केदार जाधव on 31 July, 2014 - 02:38

आजपासून मी डाएट करणार ... रोज १ तास चालणार ... नक्क्की म्हणजे नक्क्क्की

आज मित्राच्या वाढदिवसाची पार्टी आहे , एक दिवस दाबून खाल्ल तर काय होतय , उद्या कव्हर करू .

आज खूप उशिर झाला उठायला , आज फिरण कॅन्सल .

आज घरी पुरणपोळ्या केल्या होत्या , पाच हाणल्या .

कित्ती हा पाऊस , आज राहू दे फिरायच .

गेले १ महिना वजन कमी करायचा प्रयत्न करतोय , पण १ किलोही कमी झाल नाही , जाऊ दे , ये अपने बसकी बात नही .

हे चित्र अनेकांच्या बाबतीत सारखच असत .
वजन कमी करायच असणार्या सगळ्यानाच इच्छा तर खूप असते , सुरूवातही बर्याचदा केली जाते , पण नंतर नंतर आता जाऊ दे , आपल्याच्यानं नाही होणार हे वर गाडी येते . हे टाळायच असेल तर एक तर मनावर संयम हवा किंवा कुणीतरी चेक ठेवणार हव . ते घरातील कुणी असेल तर सर्वोत्तम , पण आपल्याच माणसाला त्रास (?) कसा द्यायचा (उदा . त्याला आवडते पुरणपोळी असू दे , काल फार दमला होता तो आज राहू दे) म्हणून ते माणूस तुम्हाला सारख माग लागत नाही . आणि मग काय ? Happy

त्यासाठी हा धागा . ज्याना ज्याना वजन कमी करायचय (हेल्दी वे , नो क्रॅश डाएट) त्यांचा इथे ग्रुप बनवूया .
प्रत्येकाने काय आज चांगल केल , काय चुकल याची रोज लिस्ट देऊया . चांगल करणार्याच अभिनंदन करू अन एखादा सारख चुकायला लागला त्याचे कान पकडूया , काही शंका असतील तर एकमेकाना विचारूया .
क्या बोलते भाई (और बहन ) लोग ?

लोकहो ,

आता आपण या गुणपद्धतीत बर्यापैकी सेट झालो आहोत . तर आता कंप्लिट सेट घेऊया Happy
खाली आणखी काही पॉईंट अ‍ॅड केले आहेत , जे तसे सोपे आहेत पण ते गरजेचेही आहेत
आता थोडे जास्त सिरियसही होऊया

आणि आजपासून परत एकदा गुण मोजायला सुरू करू. फक्त यावेळी एक लक्षात ठेवा, इथे नाही लिहिले तरी तुमचे रोजचे गुण स्वतः लिहून ठेवा . एखाद दिवस काही नाही केल तर ०/१० . हे खूप महत्वाच आहे.
दर आठवड्याला ज्यांचे ७५% पेक्षा कमी असतील त्यांचे कान पकडण्यात येतील . शिक्षा काय ते नंतर सगळे मिळून ठरवू.

कोण किती चांगल करतय आणि कुणाचे कान उपटायचे आहेत हे ठरवण्यासाठी खालील पद्धत वापरू

रोज तुम्ही खालील बाबी कशा पाळता ते पाहा .

१ . रोजचा व्यायाम न चुकवणे (व्यायामाचा प्रकार अन वेळ प्रत्येकाने आपापल्या सोयीने ठेवा ) जे ठरवेल त्यापेक्षा थोडा कमी जास्त किंवा वेगळा झाला तरी चालेल . पण चुकवायचा नाही

२. रोजच्या आहारात २ फळे / फळभाज्या अथवा २ वेळा सॅलेड असणे (फळात केळ्/चिक्कू कमीतकमी ठेवा)
३. रोजच्या आहारात २ वाट्या मोड , डाळी , उसळी , सोया , कमी तेलाच पिठल/ झुणका (२ अंड्यांचा पांढरा भाग , चिकन किंवा फिश रोस्टेड , शिजवलेले किंवा फार कमी तेल , पनीर ) असणे
४. बेकरी प्रॉडक्ट्स न खाणे (एखादा ब्राऊन ब्रेड अन ४ मारी इज ओके) केक्स , चॉकलेट्स , शीतपेये ,मैद्याचे पदार्थ नो नो
५. बाहेरचे खाणे (ऑफिसामधले जेवण , नाश्ता वगळता) मोस्टली हॉटेलिंग टाळणे
६. रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे अन जेवण व झोप यात किमान १:३० तास अंतर ठेवणे
७ चहा , कॉफी किंवा इतर पदार्थातून डायरेक्ट साखरेचा इनटेक ३ छोट्या चमच्यापेक्षा जास्त नसणे

जर व्यायाम नाही चुकवला तर ४ पैकी ४ गुण अन इतर सर्व क्रमांक पाळले तर प्रत्येकी १ पैकी १ गुण

त्यामुळे आता रोजचे गुण १०.

म्हणजे जर तुम्ही आज व्यायाम केला अन इतर क्रमांक नाही पाळला तर तुमचे ४/१० गुण . हे रोज लिहित जा . जर २-३ दिवसानी आला तर त्या दिवसाचे मिळून १२/२० किंवा १५/३० असे लिहा .
शक्य असल्यास आधीच्या गुणांमधे अ‍ॅड करून लिहा .
मी थोड्या अंतराने ते हेडर मधे अ‍ॅड करत जाईन .

काही शंका असतील तर विचारा . याचा फायदा म्हणजे तुम्ही किती कन्सिस्टंट आहात ते कळेल , अन इतरांचे पाहून हुरूप ही येईल

आणखी एक , ही काही स्पर्धा नाही , तेव्हा प्रामाणिकपणे आपले गुण लिहा . Wink

31 August, 2014 - 12:59

१. केदार जाधव १८२/२२०
२ सामान्य वाचक १४९/२२०
३ अदिति १३८/१८०
४ अनिरूध्द १२२/१६०
५ साती १०३/१७०
६ सीमांतिनी ५४/७०
७ मनीशा ९४/१४०
८ स्वाती२ ७०/८०
९ वर्षू नील १२१/१५०
१० देवकी १६५/२२०
११ smitaklshripad ८६/१८०
१२ पाखरू १४३/२२०
१३ खारूताई १५३/१९०
१४ दक्षिणा १०/१०
१५ पौर्णिमा १०/१०
१६ चनस ९६/१५०

१४ . चिनूक्स
१५. भानूप्रिया
१६. जाई
१७. प्रितीभुषण
१८. रीया
१९. पौर्णिमा
२० . स्मितू
२१ आनंदी
२२ पेरू
२३ डेलिया
२४ आशूडी
२५ वैदेही
२६ मंजू
२७ साधना
२८ . गीतांजली
२९ मृणाल १
३० मी_आर्या
३१ मना
३२ इश्श
३३ दक्षिणा
३४ dreamgirl
३५ दीप्स
३६ नि़क्षिपा
३७ मउ
३८ नंदिनी
३९ अमित एम
४० बीएस
४१ राजू७६
४२ वेल

४४ संदिप एस
४५ राज्या
४६ snoo
४७ शैलु
४८ अखी
४९ सहेली
५० सोनचाफा
५१ आभा
५२ धनश्री
५३ हर्मायनी
५४ मुग्धानंद
५५ आशिका
५६ सायली
५७ mrudul
५८ रमा
५९ आयडू
६० मी_चिऊ
६१ नानबा
६२ मंजू
६३ चनस

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही तिन्ही विधानं परस्परविरोधी आहेत. >> ??

मी जेव्हा व्यायामाने अस लिहिल त्यावेळी फक्त वेगळा व्यायाम करून बर्न केलेल्या कॅलरीज लिहिल्या आहेत .

आपण खात असलेल्या कॅलरीजपेक्षा पूर्ण दिवसात जास्त कॅलरी बर्न व्हायला हव्यात>>> म्हणजे दिवसभरात उदा. १६०० कॅलरी आपण घेत असू तर १६१० कॅलरी जाळायला हव्यात असं म्हणायचं आहे का?

म्हणजे दिवसभरात उदा. १६०० कॅलरी आपण घेत असू तर १६१० कॅलरी जाळायला हव्यात असं म्हणायचं आहे का? >> हो . १६०० पेक्षा जास्त .

पण मंजूडे नुसत्या व्यायामाने ५००-६०० बर्न केल्या तरी बास, बाकिच्या इतर हालचालितून बाकी कमी होतात असं त्याला म्हणायचं असेल.

आणि केड्या तू ते ऑर असं लिहिलं नाहियेस, स्वल्पविराम टाकलायस
घाबरेलच कुणीतरी वाचून Lol

आणि केड्या तू ते ऑर असं लिहिलं नाहियेस, स्वल्पविराम टाकलायस
घाबरेलच कुणीतरी वाचून हाहा >> डन Happy

मंजूडी ,
छान आहे लिंक ,

त्या लिंकप्रमाणे

1 Badminton >> Competitive 272
2 Walking >> 16 km/hour 1200
3 Walking >> 8 km/hour 600
4 Jogging >> 5 mile/hour 600
5 Cycling >> 12-13 mph 450
6 Cycling >> 13-15 mph 588
7 Badminton >> General 168

फक्त ४० मिनिटे सलग Badminton खेळल्यावर जी अवस्था होते ती पाहता फक्त १५०-२०० कॅलरी जळत अस्तील हे पटत नाही Happy

मंजुडी, प्रश्न केदार साठी आहे पण मी मला माहिति असलेले उत्तर देते. समजा, तुमची कॅलरी नीड १६०० आहे तर वजन कमी करतांना १. कॅलरी डेफिसिट २. कॅलरी बर्निंग ३. वाईज कॅलरी कंझंप्शन करुन साध्य करु शकतात. १६००़ कॅ जर शरीरात जाताय तर वेट लॉस साठी १६०० पेक्षा जास्त जाळणे आवश्यक आहे.

कॅलरी डेफिसिट करतांना १६०० ऐवजी ११०० कॅलरी खाल्ल्यात तर दर आठवड्याला एक किलो वजन कमी होईल पण अशक्तपणा येउ शकतो

कॅलरी बर्निंग मेथड वापरतांना १६०० कॅलरीज इन आणि १६०० आउट - व्यायामाने ८०० दैनण्दिन अ‍ॅक्टिविटीजने नॉर्मल व्यक्तिच्या उरलेल्या ८०० कॅ जळतात

वाईज कॅलरी कंझंप्शन यात व्यायाम आणि योग्य आहार वापरुन १६०० कॅलरीजचा हिशेब करायचा.
माझे लिहुन होइपर्यंत तुमच्या पोस्ट्स आल्यात.

कदाचित मला नीट लिहिता येत नाहीये, Sad अगदी बेसिक लिहितो.
जर तुम्हाला तुमच्या वेटच्या मानाने बेसिक बॉडी फंक्शनिंग साठी १५०० कॅलरीज लागत असतील अन जर तुम्ही २००० घेतल्या तर त्या स्टोअर होतात अन त्यापेक्षा जास्त व्यायाम केला अन जास्त कॅलरी जाळल्या (मी १५०० कॅलरी कमी करा म्हणत नाहीये तर २००० जाळा म्हणतोय) तर (अन इतरही अनेक फेक्टर जसे प्रोटीन इनटेक) तर त्या स्टोरेज मधून घेतल्या जातात.

केदार, तसं तर नुसतं बसून ५० कॅलरी जळत असतील हेही पटत नाही Proud

१६००़ कॅ जर शरीरात जाताय तर वेट लॉस साठी १६०० पेक्षा जास्त जाळणे आवश्यक आहे.>>> प्रिंसेस, 'वेट लॉस'साठी हे शब्द महत्त्वाचे आहेत.

माझ्या वय/वजनानुसार मला रोज ११०० ते १३०० कॅलरीज कंज्यूम करायच्यात.
मी कॅलरीज चा इनटेक १००० ठेवते ( अंदाजी) आणी मग व्यायाम, वॉक रोजचे दोन तास
कालचे अपडेट्स ( १४/०८/१२)
७/७
दोन दिवसाच्या तापामुळे मार्क्स कमी झालेत... ऊप्स!!!

केदार त्या लिंकवर जनरल लेव्हल एरोबिक्स मध्ये फक्त २५० कॅ बर्न होतात असं लिहिलंय ते ही तासात. मला नाही वाटत. नुसतं जागच्या जागी दहा मिनिटं जॉग केलं तरिही ५०-६० कॅ सहज बर्न होतात.

मीपण जॉईन होते आजपासून या ग्रुपमध्ये.. यातलं सगळ कितपत आणि कसं फॉलो करायला जमेल (तुमच्यासारखं रोज) हा प्रश्नच आहे, पण अ‍ॅटलीस्ट इथले सगळे प्रतिसाद वाचून जास्तीत जास्त प्रयत्न करेन व्यायामाचा आणि बाहेरचं कमी खायचा.. सध्या आजारामुळे पाय खूप दुखत आहेत, त्यामुळे चालणं अगदी नको वाटतं.. पण वजन कमी करणे भाग आहे आणि त्यासाठी चालणं मस्ट.. ऑफीसच्या शिफ्ट्समुळे जिम किंवा योगा क्लास लावता येत नाही, आणि घरी व्यायामाचा खूप कंटाळा येतो.. कसं करू वजन कमी? कोणी मार्गदर्शन करेल का प्लीज?

मिनाक्षी वजन जास्ती असल्याने पाय दुखतात. आळस कंटाळा हे शब्द खिडकीतून बाहेर फेकले पाहिजेत. घरी व्यायाम केलाच पाहिजे. कंटाळा मलाही होताच व्यायामाचा. वेळ मिळत नाही हे ठरलेलं उत्तर माझ्याकडे ही होतच. आधी मी फक्त आहाराविषयी सिरियस होते, पण हा धागा निघाला त्या नंतर मी इरेला पेटून व्यायामही रेग्युलर करतेय. आपण डोक्यात एखादी गोष्ट ठरवायचा अवकाश असतो. आपण ती करतोच. निदान आठवड्यातून ३ दिवस व्यायाम मस्ट आहे. माझं टाईमटेबलही सिडेंट्रीच आहे. रात्री १०.३० ला जेवते ऑफिस वर्क रात्री १२.३० पर्यंत सुरू असते. १ ला झोपते. व्यायाम करत नसे तेव्हा ८-८.३० ला उठायची. आता ७ ला उठून ८.३० पर्यंतचा वेळ व्यायामाला देते, आणि ऑफिसच्या बसमध्ये एक डुलकी काढते. ठरवलं की सगळं होतं.

घरी व्यायाम करण्याचे अनेक फायदे आहेत.
*बाहेर पाऊस असो वा ऊन वा थंडी आपल्याला फरक पडत नाही.
*कधीही उठून सुरू करू शकतो, कधीही थांबवू शकतो. (कधी अर्धा तास्/एक तास )
*जिममध्ये वेट्स किंवा कोणत्याही यंत्रासाठी वेटिंग असते पीक अवर्सला ते टळते.
* पैसे वाचतात., जिम्/योगा क्लास लांब असेल तर जाण्यायेण्याचा वेळ वाचतो.
* विशेष ड्रेस बदला बदली करावी लागत नाही. घरच्या ड्रेस मध्ये करू शकतो.
* बूटं बिटं घालण्याचा वेळ ही वाचतो.

आजचा स्कोर ६/७. प्रोटीन आणि मी अशी लढाई सुरु झालीये माझी ह्या धाग्यामुळे. माझ्या जेवणात प्रोटीन फार फार माफक आहे हे लक्षात येतंय. बाकी सर्व ठीक.

For calories, I will try to write more about Okinawa lifestyle when I get a chance. People in okinawa live long because they have included movement in their daily lives. Few individuals actually exercise e.g. always sit down on the floor, spend time gardening etc. I have found that it is an easy way to burn calories.

साती धन्यवाद.
एकेकाळी मी ही वजनाचा फक्त विचार, व्यायामाचा कंटाळा आणि खाण्याचा अतिरेक करत होते.
२०१० साली मनावर घेतलंच आणि ७-८ महिन्यात नेटानं १० किलो वजन कमी केलं. नंतर हळूहळू थोडं वाढलं पण पहिल्यासारखं नाही. एक मात्र आहे की हे १० किलो कमी करूनही मी आयडियल वेट ला पोचलेले नव्हते (४ किलो जास्तच होते) पेशन्स संपला होता तोपर्यंत.
आता नव्याने ठरवलंय. आयडियल वेट ला पोचायला ८ कमी करायचे आहेत. आणि यावेळी ते मी करणारच. Happy

मी रोज ट्रेडमिलवर ३.७/३.८ नि एलिव्हेशन २.५ पर्यंत ठेवुन ४५ मिनीट चालते .. 270 KCAL दाखवतं ट्रेडमिल .. सायकलिंग / एलिप्टिकल ३० मिनीट - ८ सेट - 200/170 KCAL येतं ..
बाकी मी जास्त कॅल्क्युलेट करत नाही .. भरपुर घाम येवुन जातो नि फ्रेश वाटत इतकं पुरेस आहे

माझा अपडेट :
ब्रेफा - पोहे + चहा
लंच - मेथी भाजी + २ फुलके + मोड आलेले मुग
३:०० - ४:०० - कॉफी / १ कुकी + १ चीज क्युब , क्रॅकर्स + स्ट्राबेरीज नि चेरी ( ऑफिस किचन मधे पार्टी!)
संध्याकाळी - १ तास जिम + सफरचंद
रात्री - २ फुलके + फ्लॉवरची भाजी ..

ट्परवेअरची बॉटल बहुतेक अर्धा लिटरची आहे . .४ वेळा भरुन होते .. म्हणजे कमीत कमी २ लिटर तरी पिते
पण मला कधीही थकवा किंवा आळस जाणवत नाहीये ..

मंजूडी ,
लिंक मस्त आहे .

लोक्स
चालण्याच्या व्यायामातून किती कॅलरी जळतात कसे कळेल ?

एलिप्टिकल ३० मिनीट - ८ सेट - 200/170 KCAL येतं . << चनस, ८ सेट म्हणजे काय? माझ्या मशिन वर मला ३५ मिनीटात, ५ रेसिस्टन्स ने ५०० कॅल जाळल्यात अस दिसतय. चुकीच असेल का ते?

चालण्याच्या व्यायामातून किती कॅलरी जळतात कसे कळेल ? << तासभर चालल तरी २५० पर्यंत (अस माझं नाईकीच अ‍ॅप दाखवतं)

मस्त .. मी सध्या तरी रोज नियमित व्यायाम करायचा, इतकाच प्रयत्न करते आहे. आमच्याकडच्या अ-खं-ड पावसामुळे फिरायला जाणं शक्यच नाही, त्यामुळे स्टॅटीक सायकल आणि आसनांवर्च भिस्त! खादाडी दिवेकरबाई जिंदाबाद!!!

आदिती .. ८ लेव्हल .. म्हणजे वेव्लेंग सारखी चढ्-उतार असलेला ट्रॅक येतो.. मी बर्न कॅलरीज ऑप्श्न घेते त्यात वजन , वेळ नि लेव्हल दिल्यावर ट्रॅक येतो ..

तुझी सेटिंग्ज वेगळी असतील ना .. चुकीच नसावं.. ५०० दाखवतयं तर बी हॅप्पी Wink

सकाळी - अर्धा कप अगोड चहा + १ टोस्ट
ब्रेकफास्ट - पोहे + पाऊण ग्लास दूध+ १ कप अगोड चहा
लंच - २ फुलके + उसळ
दुपारी - १ कप अगोड चहा
संध्याकाळी : १ मूठ चणे + १/२ अगोड चहा+१ टोस्ट+ +१ पेयर+ ४ वेफर्स
रात्रीचे जेवण- १ छोटी चपाती, भेंडीची भाजी, आमटी-भात,सोलकढी,सॅलड.

३० मिनिटे घरी फिरणे. ......७/७ .

आजकाल पाणी बरंच कमी प्यायलं जातेय. ७-८ ग्लासऐवजी४-५ ग्लासच प्यायलं जातेय.

दक्षे वजन जास्त आहे की कमी त्यापेक्षा बी एम आय महत्वाचा ... तो जर आटोक्यात असेल तर नुस्त्या आहार नियंत्रनानेही वजन कमी होइल फारसा रिगरस व्यायाम न करता...

Pages