चला , वजन कमी करूया

Submitted by केदार जाधव on 31 July, 2014 - 02:38

आजपासून मी डाएट करणार ... रोज १ तास चालणार ... नक्क्की म्हणजे नक्क्क्की

आज मित्राच्या वाढदिवसाची पार्टी आहे , एक दिवस दाबून खाल्ल तर काय होतय , उद्या कव्हर करू .

आज खूप उशिर झाला उठायला , आज फिरण कॅन्सल .

आज घरी पुरणपोळ्या केल्या होत्या , पाच हाणल्या .

कित्ती हा पाऊस , आज राहू दे फिरायच .

गेले १ महिना वजन कमी करायचा प्रयत्न करतोय , पण १ किलोही कमी झाल नाही , जाऊ दे , ये अपने बसकी बात नही .

हे चित्र अनेकांच्या बाबतीत सारखच असत .
वजन कमी करायच असणार्या सगळ्यानाच इच्छा तर खूप असते , सुरूवातही बर्याचदा केली जाते , पण नंतर नंतर आता जाऊ दे , आपल्याच्यानं नाही होणार हे वर गाडी येते . हे टाळायच असेल तर एक तर मनावर संयम हवा किंवा कुणीतरी चेक ठेवणार हव . ते घरातील कुणी असेल तर सर्वोत्तम , पण आपल्याच माणसाला त्रास (?) कसा द्यायचा (उदा . त्याला आवडते पुरणपोळी असू दे , काल फार दमला होता तो आज राहू दे) म्हणून ते माणूस तुम्हाला सारख माग लागत नाही . आणि मग काय ? Happy

त्यासाठी हा धागा . ज्याना ज्याना वजन कमी करायचय (हेल्दी वे , नो क्रॅश डाएट) त्यांचा इथे ग्रुप बनवूया .
प्रत्येकाने काय आज चांगल केल , काय चुकल याची रोज लिस्ट देऊया . चांगल करणार्याच अभिनंदन करू अन एखादा सारख चुकायला लागला त्याचे कान पकडूया , काही शंका असतील तर एकमेकाना विचारूया .
क्या बोलते भाई (और बहन ) लोग ?

लोकहो ,

आता आपण या गुणपद्धतीत बर्यापैकी सेट झालो आहोत . तर आता कंप्लिट सेट घेऊया Happy
खाली आणखी काही पॉईंट अ‍ॅड केले आहेत , जे तसे सोपे आहेत पण ते गरजेचेही आहेत
आता थोडे जास्त सिरियसही होऊया

आणि आजपासून परत एकदा गुण मोजायला सुरू करू. फक्त यावेळी एक लक्षात ठेवा, इथे नाही लिहिले तरी तुमचे रोजचे गुण स्वतः लिहून ठेवा . एखाद दिवस काही नाही केल तर ०/१० . हे खूप महत्वाच आहे.
दर आठवड्याला ज्यांचे ७५% पेक्षा कमी असतील त्यांचे कान पकडण्यात येतील . शिक्षा काय ते नंतर सगळे मिळून ठरवू.

कोण किती चांगल करतय आणि कुणाचे कान उपटायचे आहेत हे ठरवण्यासाठी खालील पद्धत वापरू

रोज तुम्ही खालील बाबी कशा पाळता ते पाहा .

१ . रोजचा व्यायाम न चुकवणे (व्यायामाचा प्रकार अन वेळ प्रत्येकाने आपापल्या सोयीने ठेवा ) जे ठरवेल त्यापेक्षा थोडा कमी जास्त किंवा वेगळा झाला तरी चालेल . पण चुकवायचा नाही

२. रोजच्या आहारात २ फळे / फळभाज्या अथवा २ वेळा सॅलेड असणे (फळात केळ्/चिक्कू कमीतकमी ठेवा)
३. रोजच्या आहारात २ वाट्या मोड , डाळी , उसळी , सोया , कमी तेलाच पिठल/ झुणका (२ अंड्यांचा पांढरा भाग , चिकन किंवा फिश रोस्टेड , शिजवलेले किंवा फार कमी तेल , पनीर ) असणे
४. बेकरी प्रॉडक्ट्स न खाणे (एखादा ब्राऊन ब्रेड अन ४ मारी इज ओके) केक्स , चॉकलेट्स , शीतपेये ,मैद्याचे पदार्थ नो नो
५. बाहेरचे खाणे (ऑफिसामधले जेवण , नाश्ता वगळता) मोस्टली हॉटेलिंग टाळणे
६. रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे अन जेवण व झोप यात किमान १:३० तास अंतर ठेवणे
७ चहा , कॉफी किंवा इतर पदार्थातून डायरेक्ट साखरेचा इनटेक ३ छोट्या चमच्यापेक्षा जास्त नसणे

जर व्यायाम नाही चुकवला तर ४ पैकी ४ गुण अन इतर सर्व क्रमांक पाळले तर प्रत्येकी १ पैकी १ गुण

त्यामुळे आता रोजचे गुण १०.

म्हणजे जर तुम्ही आज व्यायाम केला अन इतर क्रमांक नाही पाळला तर तुमचे ४/१० गुण . हे रोज लिहित जा . जर २-३ दिवसानी आला तर त्या दिवसाचे मिळून १२/२० किंवा १५/३० असे लिहा .
शक्य असल्यास आधीच्या गुणांमधे अ‍ॅड करून लिहा .
मी थोड्या अंतराने ते हेडर मधे अ‍ॅड करत जाईन .

काही शंका असतील तर विचारा . याचा फायदा म्हणजे तुम्ही किती कन्सिस्टंट आहात ते कळेल , अन इतरांचे पाहून हुरूप ही येईल

आणखी एक , ही काही स्पर्धा नाही , तेव्हा प्रामाणिकपणे आपले गुण लिहा . Wink

31 August, 2014 - 12:59

१. केदार जाधव १८२/२२०
२ सामान्य वाचक १४९/२२०
३ अदिति १३८/१८०
४ अनिरूध्द १२२/१६०
५ साती १०३/१७०
६ सीमांतिनी ५४/७०
७ मनीशा ९४/१४०
८ स्वाती२ ७०/८०
९ वर्षू नील १२१/१५०
१० देवकी १६५/२२०
११ smitaklshripad ८६/१८०
१२ पाखरू १४३/२२०
१३ खारूताई १५३/१९०
१४ दक्षिणा १०/१०
१५ पौर्णिमा १०/१०
१६ चनस ९६/१५०

१४ . चिनूक्स
१५. भानूप्रिया
१६. जाई
१७. प्रितीभुषण
१८. रीया
१९. पौर्णिमा
२० . स्मितू
२१ आनंदी
२२ पेरू
२३ डेलिया
२४ आशूडी
२५ वैदेही
२६ मंजू
२७ साधना
२८ . गीतांजली
२९ मृणाल १
३० मी_आर्या
३१ मना
३२ इश्श
३३ दक्षिणा
३४ dreamgirl
३५ दीप्स
३६ नि़क्षिपा
३७ मउ
३८ नंदिनी
३९ अमित एम
४० बीएस
४१ राजू७६
४२ वेल

४४ संदिप एस
४५ राज्या
४६ snoo
४७ शैलु
४८ अखी
४९ सहेली
५० सोनचाफा
५१ आभा
५२ धनश्री
५३ हर्मायनी
५४ मुग्धानंद
५५ आशिका
५६ सायली
५७ mrudul
५८ रमा
५९ आयडू
६० मी_चिऊ
६१ नानबा
६२ मंजू
६३ चनस

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला हा धागा वाचायलाही लाज वाटतेय. अजुन व्यायाम सुरु केलाच नैये...फक्त डायेटच कन्ट्रोल करतेय हळुहळु. Sad

आज मला व्हॉटसप वर अनेकांनी लेस्ली सॅनसन चा विडिओ पाठवण्याची विनंती केली आहे.
२०० एम बी च्या पुढे फाईल असल्याने शेअर करू शकत नाही. ( मला खरंतर माहित नाही इतकी मोठी फाईल शेअर करू शकतो का ते)
तर यू ट्यूबवर जाऊन walk away the pounds with Leslie Sansone असं टाईप करा ३ माईल्स चा जो व्हिडिओ आहे तो डालो करून घ्या.

हा व्हिडिओ बिगिनर्स साठी अतिशय सोप्पा आणि सुटसुटित आहे. कोणतीही इक्विपमेंट्स लागत नाहीत. आणि दमणूक सुद्धा अजिबात होत नाही, पण घाम येतो. ५० मिनटांचा व्हिडिओ आहे विथ स्ट्रेचिंग.

माझा कालचा अपडेट. दुपारपर्यंत व्यवस्थित पाळलं सगळं जेवायला भयणीकडं गेले आणि सगळं संपलंच.
२ पुर्‍या, बटाटा भाजी. साखरभात. Proud
व्यायाम नाही. त्यामूळे कालसाठी मला शून्य मार्क

कालचा आहारः
ब्रेकफास्ट : फोडणीचा भात
लंचः पोळी, कोबी भाजी, कैरीची डाळ, सांबार. (नो भात)
संध्याकाळ: दोन कप चहा, म्यागी. खाकरा
डिनरः पोळी आणि कोबी भाजी आणि ताक.

व्यायामः काल अख्ख्या घराच्या जाळ्या काढणे वगैरे साफसफाईची कामं. संध्याकाळी एरोबिक्स अर्धाच तास.

१ केळे, १ व्हाईट आम्लेट सलाड बरोबर, १ कप वांगी पास्ता, ३ इडली सांबर, २ पोळ्या - पालक भाजी, ३ कप चहा.

७५ मिनिटे योगासने.

७/७

आजचे अपडेट्स
सकाळी ४ मनुका १ अंजिर चकती
एक ग्लास गरम पाणी
५० मिनिटं पॉवर वॉक अ‍ॅट होम
९.४० ब्रेफाला नाचणीची २ धिरडी पातळ
गरम पाण्यात अर्धा लिंबू पिळून
नंतर एक डबा भर खरबूज आणि पपई (११.२०ला)
लंचला शेपूची भाजी+सॅलड+२ फुल्के+ताक
५ वा. चहा आणि ३ बिस्किटे.
७ ला एक मोसंब आणि नंतर गरम पाण्यातून लिंबू घेणार.
जेवायला भाजी +सॅलड + वरण (नो फोडणी)

आज चक्क अवांतर काहीच खाल्लं नाही. Happy

दक्षु ओ एम जी........... Proud
आज ही ताप ,खोकला,सर्दी... व्यामाकरता नो दम
खायची ही इच्छा नाही गेले २,३ दिवस..
पण वजनात घट नाही..
सो मॉरल ऑफ द स्टोरी,' क्रॅश डाएट, उपाशी राहणे डझंट हेल्प'.. Happy
grades for 14-08-10 = 0 / 7 Sad

सकाळी - अर्धा कप अगोड चहा + १ टोस्ट
ब्रेकफास्ट - १ वाटी ज्वारीच्या लाह्या + पाऊण ग्लास दूध
लंच - बाहेरचा पुलाव (कमी तेल/तूपातला)
दुपारी -१/२ अगोड चहा
संध्याकाळी : पाव वाटी चणे + १/२ चमचा साखरवाला चहा+ २ बिस्किटे+ १/२ अगोड चहा + १ स्लाईस ब्रेड+१ सफरचंद +१/२ पेयर
रात्रीचे जेवण-१ छोटी चपाती, बटाटा रस्साभाजी, आमटी-भात,सोलकढी,कालचा नारळीभात

२५ मिनिटे चालणे ........६/७
९/८/२०१४ ...६/७
१०/८/२०१४...१/७
११/८/२०१४..६/७
---------------------
एकूण ३३/४९

आज ८ ला गरम लिंबुपाणी
९ ला दुध ओट
११ ला खरबुज, १ कप दुध
१:३० ला १ पोळी, मटकीची उसळ, १/२ वाटी नारळी भात
४ ला परत खरबुज
८ ला १ पोळी, मुग डाळ दोड्की भाजी, दही १ वाटी
४५ मिन व्यायम

६/७ मार्क्स

८/१२/२०१४
ब्रेकफास्ट - १ कप दूध (लो फॅट), १ सफरचंद
जेवण १ छोटा बाऊल भात + उकडलेली कडधान्य (मीठ, धन्याजीर्‍याची पूड घालून)
दुपारी - कोबीची पानं,
संध्याकाळी (वाईट वेळ) - मायक्रोवेव्ह केलेली पाणीपुरी, १/२ सफरचंद, उकडलेली कडधान्य
रात्रीचं जेवण: गव्हाच्या रव्याचा खिचडा (अत्यंत जाड रवा, नो तेल तूप, १ चमचा साखर, मीठ, भरपूर लसूण, कोथिंबीर)
झोपताना १ कप दूध (लो फॅट)

दक्षे,
'वर्षु उलट अजारपणात हवं ते खा. आबाळ करू नकोस. आजारात मसल मास लॉस होतं, ते भरून काढायला हवं.'
हे उपयुक्त आहे सगळ्यांनाच..
तुझी तायडी इथेही आली तुझे कान उपटायला. :p

मला११/८/२०१४ ला ताप, सर्दी.. व्यायाम नाही.
पण खाण्यावर लक्ष दिले. जाईल तेच आणि तेवढंच खाल्लं.
डाळ, डाळिंबं, फुलके, थोडा भात, वाटीभर कोबीची भाजी. मला वाटतं ३/७ हरकत नाही. नारळीभात केलाच नाही त्यामुळे खाणे पूर्ण टळले..:)
टोटल मार्क्स - २८/३५ + ३/७ =३१/४२

आज जमलं तर योगा ला जाईन पण पॉवर वॉक शक्य नाही वाटत. अशक्तपणा आहे Sad

११/८/२०१४
- सकाळी व्यवस्थित व्यायाम झाला. परंतु परत सोमवार आड आला अन खिचडी गेली. तरी कंट्रोलमध्ये राहून दुपारी एक केळ अन रात्री मटकी उसळ अन ३ पोळ्या असे जेवलो. गुण: ४/७

मी सध्या खाली लिहिलेले व्यायाम करतोय. २ सेट करता करता ४५ मिनिटे सहज जातात. ५ मिनिटांचा वार्म अप जोडला तर अजून जास्त.
नेटवरून जमा केलेल्या माहितीनुसार या व्यायामांमध्ये हात,पाय, पाऊलं, पोट, पाठ, अन खांदे यांचे सगळे स्नायुंचा व्यवस्थित व्यायाम होतोय.

जाणकार मंडळी,
एकदा रिव्यू करुन अजून काही सुधारणा (रिपीटेशन कमी / जास्त किंवा अजून दुसरे प्रकार) सुचवू शकाल काय?

१. स्क्वाटस - ५०
२. फ्रंट लंजेस - एका पायाचे २५, एकुण ५०
३. हाय नी - १००
४. काल्फ अप - ३०
५. पुश अप - ३०
६. प्लँक - साधारण १ मिनिट
७. सीट अप्स - ५०
८. क्रन्चेस - २५
९. हीप राईज - ५०
१०. लेग प्रेस - २५
११. ट्रायसेप्ट डिप्स - २५

काल बर्याच दिवसातून पहिल्यांदा ०/७ Sad

आमच्याच घराची वास्तुशांती असल्याने धुव्वा उडाला Sad

आजचा १ तास व्यायाम डन

इथे लोकांनी हा असा आहार व व्यायम सुरु केल्यापासून किती महिन्यात किती व कसा फरक पडला (वजन, उत्साह वगैरे)ते लिहलं तर आम्हा खादाड लोकांचा निश्चय बळकट होइल.

जरा घरचे पाहुणे गेले की मी जोईन होइन. ते पाहुणे पण खादाड , त्यांच्या नाश्त्याला काही केले की पोटात जातं.
उगाच खोटं कशाला बोला........

साती तुझ्या पोस्टीत आकडे आहेत ते कसले आहेत? Uhoh जरा मला नीट समजावून सांग.

केदार - तु वरती हेडरमध्ये माझ्या नावासमोर ८/१० असे आकडे लिहिले आहेस ते टारगेट चे आहेत का?

आता मला एक सल्ला हवाय. मी सकाळी साधारण पणे ७/७.१५ ला उठते. उठलं की मनुका/ अंजीर खाऊन एक ग्लास गरम पाणी पिते. मग फ्रेश होऊन व्यायामाला सुरूवात करायला ७.४०/७.४५ होतात. व्यायाम साधारणपणे ८.३० ला संपला की मग मी चहा ठेवून तो अ‍ॅक्चूली पोटात जायला ८.४०/८.४५ होतात.
माझी ब्रेफाची वेळ १० च्या आत किंवा फारतर १०.१५ अशीच मी ठरवली आहे. मग चहा बिस्किट आणि नाश्त्यात अंतर नाही रहात.
व्यायामा अगोदर जर मी चहा आणि बिस्किटं खाल्ली तर काय होईल? त्रास होईल का? Uhoh

जरा सल्ला द्या.

कालचा आहारः

ब्रेकफास्टः शेवयाचा उपमा. दोन कप चहा.
लंच: पोळी, दुध्याची भाजी, वरण
संध्याकाळी: एक कप चहा, एक भूट्टा, वाटीभर प्रसादाचा शिरा.
डिनरः दोन पोळ्या, वरण, टोमॅटो कोशिंबीर, दुध्याची भाजी.

व्यायामः काल संध्याकाळी घरी पाहुणे आल्यानं सुट्टी!!!!

मला नाही वाटत दक्षे काही त्रास व्हावा असं.. अर्धा कप चहा आणि दोन बिस्किटं हे काही पोटभर खाणं नाहीए की ज्याने खूप जड व्हावं.. खरं तर सव्वासात ला उठून दहा नंतर म्हणजे तब्बल तीन तासांनी नाश्ता हे मला पटत नाही. त्यात तुझा व्यायाम होतोच.. ऋजुता नुसार, उठल्यापासून अर्ध्या तासात काहीतरी पौष्टेक आणि नंतर तासाभरात व्यवस्थित नाश्ता घ्यावा. कारण रात्रभराचा उपास आणि त्यातच व्यायाम ह्याने शरीराला ताकद मिळायला हवी. हे मलाही वैयक्तिकरित्या जाणवतं..

मी सकाळी सव्वासहा ला उठते. लगेच कोरफड किंवा आवळा रस + पाणी पिते. अर्ध्या तासाच्या अंतराने, नवरा उठला असेल तर त्याच्याबरोबर पाव ते अर्धा कप साखरेशिवाय चहा घेते.. नाही तर अर्धा कप चक्क क्रीम काढलेले दूध पिते. आणि आठ-सव्वाआठ ला नाश्ता. लेकाचा डबा आधी तयार करावा लागतो त्यामुळे खूप धावपळ चालू असते. नाश्त्यापर्यंत पोटात कळकळ्तं नाहीतर.. योगा अकरा ते सव्वाबारा.. घरी आल्यावर जेवण. दोनला लेक घरी आला की दिवसभर दंगा.. शक्यतो साडेचार ते साडेपाच दरम्यान लेक झोपला असेल तर पॉवर वॉक जमवायला लागले आहे इथे आल्यापासून. मग संध्याकाळी चहा/ नवरा नसेल तर चक्क ताक.. चहा टाळते. काहीतरी मधलं खाणं किंवा सकाळच्या नाश्त्यातलं काहीतरी उरलेलं. रात्रीचं जेवण शक्यतो (खूप कमी वेळा जमतं) साडेसात-आठ.. उशीरात उशिरा नऊ वाजता.

आजचे अपडेटः
सकाळी ७.३० ला १ ग्लास गरम पाणी+लिंबु.
नंतर ३ मारी डायजेस्टीव्ह +पाव कप दुध, पाव ग्लास ताक.
९.१५ ला १ अ‍ॅपल.
१०.४५ ला एक कप कॉफी.. ( हे रोज नसते.)
१.१५ ला दोन चपाती+भाजी.
४ ला सॅलड खाईन थोडेसे,
७ ला एक चकली ,लाडु ( हे चेंज होईल २ दिवसांत)

सकाळी १५ मिनीटे व्यायाम, नंतर १५ मिनीटे चालणे.. संध्याकाळी १५ परत चालणे

Pages