माजं काय चुकलं...?
येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं
म्हनले आय करती तसं करशील का पिठलं?
मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय?
बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं
टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं
आन मग वरुनशान डावभर त्याल घातलं
पाणी आणि बेसनाचं पीठ केलं भज्यावानी
धूर व्हायला लागला तसं भांड्यात वतलं
उकळलं रटारटा, भाकरी केली पटापटा
चटणी, कांद्यासंगं मग पानात वाढलं
जेऊनशान उठल्यावर म्हन्त्यात कसं मला
पिठलं करनार व्हतीस न्हवं, त्याचं काय झालं!?
असा वाया गेला बगा माजा समदा खटाटोप
सांगा आता तुमीच यात माजं काय चुकलं?
सांगा माजं काय चुकलं..
****************
पाककृतींसंबंधी माहिती विचारण्यासाठी हा धागा उघडला आहे. कधी कधी साधारण साहित्य, रेसिपी माहित असते पण तंत्र न जमल्यामुळे, अंदाज चुकल्यामुळे पाककृती बिघडते. किंवा जमत नाही आणि नक्की काय चुकते आहे तेच समजत नाही. असे सगळे प्रश्न इथे विचारावेत.
मंजुडी +१. पालकाची मस्त चटणी
मंजुडी +१.
पालकाची मस्त चटणी करा. ठेपले, पोळ्या, पराठ्यांबरोबर छान लागेल.
थ्यांक्स मंजुडी, चिन्नु... ३
थ्यांक्स मंजुडी, चिन्नु...
३ पदार्थ होतील बहुतेक. बघुया...
कोथिंबीर वडी सारखी पालकवडी
कोथिंबीर वडी सारखी पालकवडी बनवुन ठेवा ( रेसीपी आहे वाटत माबोवर). वाफवलेली वडी फ्रिजमध्ये राहील आठवडाभर. साईड डिश म्हणुन अथवा संध्याकाळी नाश्ता म्हणुन फ्राय करुन खाता येईल.
पालक छान फ्रीज होतो. ६
पालक छान फ्रीज होतो. ६ महिन्याच्या आत वापरणार असाल तर ब्लांच करायची गरज नाही. ब्लांच करणार असाल तर शक्यतो स्टीम ब्लांच करावा.
पालक सुप करा
पालक सुप करा
मी बरेच वेळा अंडा करी केली पण
मी बरेच वेळा अंडा करी केली पण छान होत नाहि ़ इथे दिलेल्या रेसिपी ट्राय करुन बघितल्या काय चुकत असेल ? चमचमीत रेसिपी हवीये
बरेच दिवसपुर्वी डोसा चुकतो
बरेच दिवसपुर्वी डोसा चुकतो असे म्हणुन मी इथे बराच कोलाहल माजवला होता

काल गिट्स चे डोसा आणि इडली पीठ ट्राय केले. मस्त झाले. त्यमुळे आता गिट्स जिंदाबाद!
परवा ताकातली भेंडी केली
परवा ताकातली भेंडी केली होती... अतिशय चविष्ट वगैरे झालेली. पाहुणे आल्यावर १० मिनीटांनी भाजी तयार झाली आणि आम्ही लगेच जेवायला बसलो. जेवण अगदी छान पार पडले, पण थोडी भाजी उरली होती.
नंतर थोडे उशिरा - साधारण २ तासांनी, दुसरे भेंडीप्रेमी अचानक उगवले. त्यांनी आधीच्या भेंडीचे कौतुक ऐकून भाजीची चव चाखली. तर हाय रे दैवा! अतिचशय चिक्कट्ट् आणि गिळगिळीत झाली होती. नंतर फक्त फेकूनच द्यावी लागली. मी फक्त पहिल्यांदा थंड झालेली भाजी मंद गॅसवर गरम करून दुसर्यांदा वाढली होती. काय चुकलं असेल?
तसे काही कारण नाही... ताक
तसे काही कारण नाही... ताक पुरेसे आंबट असेल तर असे व्हायला नको. परत पाणी घातले का ? भेंडी आधी साधारण ओलसरपणा जाईल इतपत परतायला हवी.
मी पण घरी गेलो होतो त्यावेळी केली होती. त्यात बाजारी बटाट्याचा किस टाकला होता. त्याने छान चव आली.
दिनेशदा, पुरेसे आंबट ताक
दिनेशदा, पुरेसे आंबट ताक होते. परत काहीही अॅडिशन केली नव्हती. नंतर मला वाटलं कदाचित पुन्हा उकळली त्यामुळे काही बिघडले की काय. पण दोन्ही चवींत जमिन-अस्मानाचा फरक होता.
घरून असे कळाले की ताकातली
घरून असे कळाले की ताकातली भेंडी परत गरम करायची / उकळायची नाही. त्यामुळे चव बिघडते / भाजी फाटते. मी स्वतः कधी हा प्रयोग केला नसल्यामुळे कल्पना नाही.
ताकातली भेंडी कशी करतात?
ताकातली भेंडी कशी करतात?
अकु, धन्यवाद. पुढच्या वेळी
अकु, धन्यवाद. पुढच्या वेळी पुन्हा प्रयोग करून पाहणार आणि इथे अपडेट देणार.
घातला बेसनाच्या लाडवाचा घाट
घातला बेसनाच्या लाडवाचा घाट आणि आता लागली आहे माझी वाट !!!
बेसन लाडू कधीच चुकत नाहीत माझे. आज मोजून घातलं नाही तूप. आगाऊपणा दुसरं काय ?? जरा जास्तच झालं आहे तूप. मिश्रण थंड केलय पण लाडू वळण्याचं चिन्हं दिसत नाही आहे...आता काय करू? वड्या बनतील का? कि थोडसं बेसन भाजून मिक्स करू ???
बेसन भाजून झाल्यावर लगेच
बेसन भाजून झाल्यावर लगेच त्यावर गार दुध शिंपडल होत का?
त्यामुळे बेसन आळायला
मदत होते. नसेल तर अजुनही परत अगदी थोडा वेळ भाजुन दुध शिंपडा.
koraDe besan kinvaa koraDaa
koraDe besan kinvaa koraDaa ravaa bhaajun ghaalaa. tup vegaLe karaNe kaThiN aahe.
दिनेश दा, बेसन कोरडं भाजलं
दिनेश दा, बेसन कोरडं भाजलं जातं का? म्हणजे अजिबात तूप न घालता...
हो जातं भाजलं.. हात भराभर
हो जातं भाजलं.. हात भराभर हलवावा लागतो कारण लवकर करपट वास येतो. नॉन स्टीक भांड्यात लाकडी उलाथने घेऊन भाजायचे.
) बेसनाचा खमंगपणा येणार नाही. त्यापेक्षा रवाच वापरणे चांगले.
पण वरच्या प्रकारात तूपात भाजलेल्या ( तळलेल्या
काल संध्याकाळी ढोकळा केला.
काल संध्याकाळी ढोकळा केला. लिंबू नव्हतं त्यामुळे सायट्रिक अॅसिड घातलं. अंदाजाने घातलं पण मिश्रणाची चव घेतली तर आंबट वाटलं. पण साबा म्हणाल्या ढोकळा फुलल्यावर एवढं आंबट नाही वाटणार. म्हणून अजून बेसन वगैरे न घालता तसाच केला. उत्तम फुललाय पण आंबट्ट्ट्ट्ट्ट. आम्ही तसाच थोडा खाल्ला. पण अजून उरलाय व तो फ्रिजमध्ये ढकलून ठेवलाय. त्याचं काय करु म्हणजे आंबटपणा जाईल आणि फुकट जाणार नाही? पहिल्यांदाच झालंय असं.
अमिरी खमण करायचा विचार आहे पण त्यात खोबरं, शेव, डाळींब घातल्यावर आंबटपणा जाईल का? की त्या वस्तूपण फुकट जातील?
की त्याचं अजून काही करु? अर्धं तसराळं ढोकळा आहे.
अमिरी खमण करून पाहा, जरा साखर
अमिरी खमण करून पाहा, जरा साखर वगैरे चवीला घातली + भरपूर नारळ, कोथिंबीर घातली तर जाईल की आंबट्पणा.
हा मग आज तेच करते
हा मग आज तेच करते
हा पण आधी अगदी लहान वाटीभर
हा पण आधी अगदी लहान वाटीभर करून पाहा; ढोकळ्याच्या एखाद्याच तुकड्याचं... नाहीतर सगळं करशील अन मग तो ढीग संपवणं कठीण होईल
तसंच करते
उरलेल्या आंबट ढोकळ्याचं अमिरी
उरलेल्या आंबट ढोकळ्याचं अमिरी खमण केलं. आंबटपणा कमी होउन झकास लागतंय. खात बसलेय.
चांगला झाला वाचून बरं वाटलं.
चांगला झाला वाचून बरं वाटलं. >>उरलेल्या आंबट ढोकळ्याचं अमिरी खमण केलं. >> हे वाचल्यावर आता तो पण आंबट लागतोय, त्याचं काय करू ह्याची तयारी करून वाचत होतो.

अमितव,
अमितव,
शन्कर् पाळ्यचे पिठ पातळ भिजले
शन्कर् पाळ्यचे पिठ पातळ भिजले गेले आहे. आता काय करु?
त्यात कणिक/मैदा घाल. गोडी कमी
त्यात कणिक/मैदा घाल. गोडी कमी होईल मात्र
घट्ट भिजेल एतपत घालु का? पन
घट्ट भिजेल एतपत घालु का? पन आता एकदम घट्ट होइल का? का किन्चिन सैलच राहिल?
थन्यु मन्जुदि
थोडा थोडा मैदा मिसळून लगोलग
थोडा थोडा मैदा मिसळून लगोलग मळून घेत जा.
Pages