माझं काय चुकलं?

Submitted by लालू on 5 March, 2009 - 12:13

माजं काय चुकलं...?

येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं
म्हनले आय करती तसं करशील का पिठलं?

मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय?
बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं

टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं
आन मग वरुनशान डावभर त्याल घातलं

पाणी आणि बेसनाचं पीठ केलं भज्यावानी
धूर व्हायला लागला तसं भांड्यात वतलं

उकळलं रटारटा, भाकरी केली पटापटा
चटणी, कांद्यासंगं मग पानात वाढलं

जेऊनशान उठल्यावर म्हन्त्यात कसं मला
पिठलं करनार व्हतीस न्हवं, त्याचं काय झालं!? Sad

असा वाया गेला बगा माजा समदा खटाटोप
सांगा आता तुमीच यात माजं काय चुकलं?
सांगा माजं काय चुकलं..

****************

पाककृतींसंबंधी माहिती विचारण्यासाठी हा धागा उघडला आहे. कधी कधी साधारण साहित्य, रेसिपी माहित असते पण तंत्र न जमल्यामुळे, अंदाज चुकल्यामुळे पाककृती बिघडते. किंवा जमत नाही आणि नक्की काय चुकते आहे तेच समजत नाही. असे सगळे प्रश्न इथे विचारावेत. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अदिति, अगदी महत्त्वाचा प्रश्नं विचारलात.
दोन्ही तसेच्या तसेच म्हटल्यावर शंका आलीच.

अहो कुल, भिजवलेले डाळ तांदूळ वेगवेगळे ग्राईंड करून मग ते एकत्र मिसळून आंबायला ठेवलेत ना?

कुलु, संशोधक ना तू... असे प्रयोग करत करतच शिकणार ! ( जमायला लागलं कि सांग. मग मी येतो तूझ्याकडे Happy )

ग्राईण्ड करुनच ठेवले होते ते. काय माहित काय चुकल. आज परत ठेवलेय भिजत. बघु काय होते ते.

दिनेश अरे तु कधिही ये, डोसा सोडुन बरच काही खाणेबल पदार्थ करतो मी अरे Wink

कुलु, डाळ, तांदुळ २४-२८ तास भिजत घातल्यानंतर वाट. मग ते मिश्रण प्लँस्टिकच्या भांड्यात्/वाडग्यात ठेउन त्याला प्लॅस्टिक रॅप लावुन नंतर ते भांड ओव्हन मधे लाईट लावुन रात्रभर ठेव. पिठ स्टिलच्या भांड्यापेक्षा प्लँस्टिकच्या भांड्यात लवकर आंबेल.

सगळ सांगितल्याप्रमाणे केल , पीठ आंबल पण मस्त , तरीही डोसे बिघडलेच. डोसा हा पदार्थ "To Do List" मधुन काढ्न टाकण्यात येत आहे!!!!!!

डोसे चांगले होणं ह्याच नव्व्द टक्के श्रेय तव्याला जातं. चांगला सीझन झालेला तवा असेल तरच डोसे चांगले होतात. निर्लेप तवा जरी वापरला तरी रोजच्या पोळ्यांच्या तव्यावर केले तर डोसे नीट सुटत नाहीत. त्यासाटी डोश्याचा म्हणुन वेगळा तवा ठेवावा. मी बिडाच्या तव्यावर डोसे/ घावन हे पदार्थ करते. तो तवा फक्त साबणाच्या पाण्याने नेहमी मी स्वतः स्वच्छ करते. हॉटेलपेक्षा मस्त डोसे होतात असं घरचे म्हणतात. पण खरं केडिट तव्याला आहे. पण ठीक आहे जाऊ दे. एवढ सगळं करण परदेशी रहाणार्‍या माणसाला खूप कठीण आहे.

मनीमोहोरला अनुमोदन. तव्याचं टेक्निक जमेपर्यंत एक दोन डोशांची आहुती द्यावीच लागते. पहिले एक दोन अगदी तळहातावर मावतील एवढेच घालावेत आणि मग साईझ वाढवावी.

मेथ्यांमुळे पण पीठ छान फुगतं.मेथ्या डाळ-तांदूळाबरोबर भिजवून वाटायच्या किंवा नंतर मेथीपूड पाण्यात भिजवून ते २ चमचे पाणी पीठ आंबवायला ठेवताना घालायचे. न फुगलेल्या पीठावर तर हा उपाय हमखास लागू होतो.

as

सीमा, प्रमाण- २ वाटी तांदुळ (सोना ममसुरी, अर्धि वाटी उडीद, पाव वाटी हरभरा डाळ. मेथ्या घातल्याच पहिजेत क? इक्डे मिळत नाहीत कारण!

आज सुरळीच्या वड्या करणारे. त्या बिघडल्या कि येतोच इथे परत काय चुकलं ते विचरायला!

kulu, पुढच्या वेळी हरभरा डाळ घालू नका. फक्त तांदूळ आणि उडदाची डाळ ३:१ प्रमाणात भिजवून वाटून आंबवून डोसे घाला. (असे माझे मत)
मेथीदाणे नाही घातले तरी चालतात.

कुलू, सुरवातीला अगदी तळहाताएवढे डोसे घाला, किंवा दुसरा पर्याय म्हणजे उतप्पा. मी आधी उतप्पा करायला शिकले, मग डोसा. माझ्या मुलाला अडई डोसे करायला सोपे वाटतात. कारण पीठ आंबवणे वगैरे भानगड नाही.

माझ अडईच प्रमाणः
१ कप तांदुळ
तुर डाळ १/४ कप
१/२ कप हरभर्‍याची डाळ
उडीद +मुगडाळ १/४ कप .

कुलु , मंजुडी बरोबर संगत आहे. हरभरा डाळ नको डोशात. मेथी दाणे असलेच पाहिजेत अस नाही.
ही माझी रेसीपी एक लास्ट ट्राय म्हणून करून पहाल का?
http://www.maayboli.com/node/24512
ह्याच पीठाचे उत्तपे पण घालता येतील.
तरीही नाही जमले तर मग रवा डोसा करून पहा.

कुलु, परदेशात डोसे, सुरळीच्या वड्या असे कठीण पश्न सोडविण्यापेक्षा सरळ वरण , भात, भाजी असे सोपे प्रश्न सोडवा. Happy Happy Happy

स्वाती, मी मिनीचीच रेसीपी वापरते अडईसाठी.
कुलू, उत्तपम डोशासारखे पातळ पसरावे लागत नाही, जाड घालायचे. युट्युब वर सर्च केल्यास बरेच विडीओ आहेत.

अरे वा, तिच्या ब्लॉगवर अडई आणि पेसरट्टूही सापडलं.
मिनीचीही मिळाली रेसिपी.
सर्वांना धन्यवाद.

मनीमोहोर........... Wink रोज रोज वरण भात खाउन कंटाळा येतो. आणि डोसे जमले नाहीत पण सुरळीच्य वड्य जमल्या Wink

are we going to move on?
mi faar bhaktibhavane kaahi paakruti dhage wachte..te ase eka topic war rakhadle ki jevan goad lagat naahi aani ghari navin padarth karayla suchat naahi.;)
aage badho please : diwa: Happy

मनीमोहोर...हो हुरुप आला......पण हुरुप आला म्हणुन काल गुळांबा (गुळ घालुन मुरंबा) करायला गेलो...............गुळासकट काळे झालेले भांडे सिंक मधे भिजत पडले आहे. काय चुकल काय माहित!

Pages