राजकीय आणि वैयक्तिक शेरेबाजीबाबत सूचना

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

मायबोलीवर सातत्यानं राजकीय चर्चांना चुकीचं वळण लागण्याच्या घटना घडत आहेत. शिवराळ भाषेचा वापर केला जात आहे. असे प्रतिसाद शक्यतोवर काढून टाकण्यात आले आहेत किंवा ते धागे वाहते केले आहेत.

मायबोलीच्या वावराच्या नियमांमध्ये भाषेच्या वापराबद्दल स्पष्ट सूचना केलेल्या आहेत. कुठल्याही जाती / धर्म / वंश / वर्ण यांच्याबद्दल कुठल्याही सदस्याचे अवमानकारक / बदनामीकारक लेखन आढळल्यास त्या सदस्याचे खाते गोठवण्यात येईल, हे वारंवार स्पष्ट करूनही काही मायबोलीकर सतत अयोग्य भाषेत लिहिताना दिसत आहेत. मायबोलीवरचं वातावरण यामुळे गढूळ होत आहे.

मायबोलीवर राजकीय चर्चांना बंदी नाही. मात्र या चर्चांमध्ये शेलकी विशेषणं वापरणं, एकमेकांची उणीदुणी काढणं, वैयक्तिक शेरेबाजी करणं हेच प्रकार अधिक घडताना दिसतात. मुद्द्यांवर आधारित चर्चा होताना दिसत नाही. चर्चांना लागलेल्या या वळणांमुळे बहुतेक मायबोलीकर या धाग्यांपासून दूर झालेले दिसतात.

यापुढे कोणीही कोणत्याही बाफवर अथवा विचारपुशीतून अयोग्य भाषेत चर्चा केल्यास, वैयक्तिक दोषारोप केल्यास, मुद्दाम खिजवण्यासाठी धागे काढल्यास तसेच विषयाशी संबंधित नसलेले अवांतर प्रतिसाद दिल्यास कुठलीही पूर्वसूचना न देता त्या सदस्याचं सदस्यत्व ताबडतोब रद्द करण्यात येईल. हे आत्ताच का, अशी शंका घेण्याचं कारण नाही कारण जेव्हा जेव्हा असे प्रतिसाद वाढतात, तेव्हा सूचना देऊन कार्यवाही केली आहे.

विषय: 
प्रकार: 

अ‍ॅडमिन, निर्णय स्तुत्य आहे, पण सदस्यत्व रद्द केल्यास पुन्हा दुसरे आयडी घेऊन तेच लोक परत येतात आणि दुप्पट जोमानं चिखलेफेक करतात. अशा आयडींचं काय? तेच चक्र कायम चालू राहतं.

धन्यवाद अ‍ॅडमिन Happy

मात्र या चर्चांमध्ये शेलकी विशेषणं वापरणं, एकमेकांची उणीदुणी काढणं, वैयक्तिक शेरेबाजी करणं हेच प्रकार अधिक घडताना दिसतात. >>> ह्यात सामिल असणारे काही आयडी आश्चर्यकारकरित्या अजूनही शाबूत आहेत.

पण सदस्यत्व रद्द केल्यास पुन्हा दुसरे आयडी घेऊन तेच लोक परत येतात आणि दुप्पट जोमानं चिखलेफेक करतात. अशा आयडींचं काय? तेच चक्र कायम चालू राहतं.>>> हे आयडी सुशिक्षितपणा आणि सुसंस्कृतपणा ह्या दोन्हींचा एकमेकांशी काही संबंध नाही हे पटवून देतात.

आजच एक बातमी वाचनात आली :-

जीमेल, याहू अकाऊंट ओपन करताना मोबाईल फोनचा नंबर यापुढे कंपल्सरी करण्यात आला आहे. त्या नंबरवर आलेला व्हॅलीडेशन कोड टाकल्यावरच ई-मेल अ‍ॅड्रेस वापरता येऊ शकेल.

हीच टेक्नॉलॉजी मायबोलीने वापरल्यास एकाच व्यक्तीने अनेक आयडी काढण्याचं प्रमाण खूपच कमी होईल.

हीच टेक्नॉलॉजी मायबोलीने वापरल्यास एकाच व्यक्तीने अनेक आयडी काढण्याचं प्रमाण खूपच कमी होईल.>> अनुमोदन.

धन्यवाद अ‍ॅडमिन, सगळ्या राजकीय सामाजिक धाग्यांचा चाललेला बट्ट्याबोळ थांबावा अशी अपेक्षा.

केश्वी +१

धन्यवाद...खूपच चांगला निर्णय....
वरती मोबाईल नंबर वरून व्हेरीफाय करण्याचा पर्याय सुचवला आहे त्याला अनुमोदन....

उत्तम निर्णय, अ‍ॅडमिन.

अ‍ॅडमिन, निर्णय स्तुत्य आहे, पण सदस्यत्व रद्द केल्यास पुन्हा दुसरे आयडी घेऊन तेच लोक परत येतात आणि दुप्पट जोमानं चिखलेफेक करतात. अशा आयडींचं काय? तेच चक्र कायम चालू राहतं.

>>> नंदिनी, आता सदस्यत्व घेणं सोपं नाहीये बहुतेक. व्हेरिफिकेशन करतात आणि मगच सदस्यत्व मिळतं.

वरती मोबाईल नंबर वरून व्हेरीफाय करण्याचा पर्याय सुचवला आहे त्याला अनुमोदन....>>>>>>>>>>आशु, पण हल्ली एकाच व्यक्तीकडे २-३ नंबरचे मोबाईल असू शकतात ना? म्हणजे त्या वरून वेगवेगळे आयडी घेता येतील की.

वाहवा, धन्यवाद, आपण म्हणता ते प्रमाण फार म्हणजे फारच वाढले आहे अलिकडे, त्यामुळे अशी जरब हवीच होती.
व्हेरिफिकेशनसाठी कोणतेही आयकार्ड स्कॅन करून पाठविणे, फोन नंबर, फोटो पाठविणे, इ. खरेच कंपलसरी करावे.
खुद्द येणे गरजेचे असल्यास त्याला देखील माझी तयारी आहे. Happy
पाहिजे तर येईल त्याला स्कॅन करून टाका, आय मिन फोटो काढा व्होटर आयडी प्रमाणे. Happy

धन्यवाद!!
सभासदत्वावर व धाग्यांवर कारवाई करायची असल्यास सर्वांना समान न्याय लावावा ही विनंती>> अनुमोदन.
आशु, पण हल्ली एकाच व्यक्तीकडे २-३ नंबरचे मोबाईल असू शकतात ना? म्हणजे त्या वरून वेगवेगळे आयडी घेता येतील की.>>
तरी पण बर्‍यापैकी आळा बसेल.

अतिशय उत्तम निर्णय. आत्ता पर्यंत आपण वरती लिहीलेल्या कारणांमुळे भरकटलेल्या धाग्यांची संख्या पाहता, देर आये, दुरुस्त आये...म्हटल्या शिवाय रहावत नाही. मोबाइल नंबर व्हेरीफिकेशनला अनुमोदन.

चांगला निर्णय.
हीच टेक्नॉलॉजी मायबोलीने वापरल्यास एकाच व्यक्तीने अनेक आयडी काढण्याचं प्रमाण खूपच कमी होईल.>> ह्यावर अजयशी त्यांच्या भारतवारीत चर्चा करायचा योग आला होता. त्यांचा मुद्दा पटलेला त्यावेळी.
पण अजय काहितरी वेगळे का असेना, सोल्युशन काढाच.

अ‍ॅडमिनसाहेब....

खाली प्रतिसाद देतोय, त्यावर काय कार्यवाही केलीत ते जरा सांगाल का ? अजून दिसतोय हो, म्हणून विचारतोय.

OCD.jpg

जरा वेगळा प्रतिसाद देतोय म्हणून, बाकीच्या सभासदांनी क्षमा करावी, कारण मायबोलीवर बर्‍याच वेळा पक्षपातीपणा केला जातो असे अनुभवलेय. त्याबाबतही धोरण जाहीर व्हावे ही अपेक्षा.

ती उपरोधाची भाषा काही वेळेस विरोधात बदलते, आणी मग काही आय डी शाब्दिक द्न्गा/ दन्गल/ शेरेबाजी/ वै. रोख/ अक्कल काढणे असे सुरु करतात.

त्यामुळे अ‍ॅडमीन टिम ने हा निर्णय घेतलाय.

मा. अ‍ॅडमिन
धन्यवाद.

सावित्रीबाई फुले नामकरणाबद्दल अभिनंदनाचा धागा वाहता होण्याचं कारण जी कमेण्ट होती ती लगेच उडाली असती तर अभिनंदनाच्या पोस्ट्स आल्या असत्या. काही सदस्यांच्या काड्या करण्याच्या तंत्राला वेसण घालण्यात यावी ही विनंती. अभिनंदनाचा समयोचित धागा काडी करण्यासाठी कसा असू शकतो ? इतरही अभिनंदनाचे धागे आहेत की

त्या धाग्यावर एका जबाबदार सदस्याने आता हेच नाव रेकॉर्डवर राहणार याबद्दल खंत व्यक्त केली होती. नाव देणे आणि कारभार सुधारणे यांचा एकमेकांशी परपस्परसंबंध असतो हे आताच कळाले. जर सावित्रीबाईंचं कार्य या निमित्ताने जागतिक पातळीवर गेलं तर कुणाचं काय बिघडणार आहे ?

इब्लिस या नावाच्या आयडी चे आत्तापर्यंतचे सर्व प्रतिसाद तपासुन कारवाई केली जावी. इतके वेळा अ‍ॅडमीनला सांगुन काय उपयोग झाला ?

प्रत्येक धाग्यावर वैयक्तिक आरोप करणारे, धिंगाणा घालणारे आणि पध्दतशीरपणे चर्चा भरकटवणारे अद्याप इथे कॉमेंट करण्यास आलेले दिसत नाहीत. यातच सगळं आलं.

मोबाईल व्ह्रेरिफिकेशनमधून पळवाट काढण्यासाठी अनेक मोबाईल नंबर बाळगणे वाटतं तितकं सोपं नाही. एकदा आयडी काढून सिम कार्ड फेकून देण्याचा प्रयत्न होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यावर उपाय म्हणून काही विशीष्ट कालावधीनंतर (दोन-तीन महिने) पुन्हा व्हेरिफीकेशन कोड पाठवण्यात यावा.

सर्वात सोपा उपाय म्हणजे मायबोलीचे सदस्यत्व हे फुकट न राहता, त्यासाठी पैसे आकारले जावेत. मासिक वर्गणी जरी आकारली गेली नाही, तरी लिहीलेल्या प्रत्येक शब्दासाठी (डेटा युसेज प्रमाणे) पैसे आकारण्यात यावेत. त्यासाठी मेंबरशिप घेताना क्रेडीट कार्ड नंबर नोंदवून घ्यावा. जे आयडी फक्तं वाचन करतील त्यांना कोणताही चार्ज आकारू नये.

खिशाला पैशाचा फटका बसतो हे पाहील्यावर कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे उगवणारे डुप्लीकेट आयडी ९०% तरी कमी होतील.

अॅडमिन फारच योग्य निर्णय...
शिवाय ज्यांच्या नावावर मोबाईल सिम कार्ड आहे ते नाव आपोआप अवलोकन मधे आल्यास, अनेक आयडींची आपोआप ओळख देखील पटेल, होऊ शकेल का असे?

Pages