निसर्गाच्या गप्पांच्या २१ व्या भागाबद्दल सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन.
नि. ग. च्या हया द्विदशकोत्तर धाग्यावर मनोगत व्यक्त करताना खूप खूप आनंद होत आहे. डिसेंबर २०१० मध्ये नि. ग. ला सुरवात झाली आणि आज इतक्या अल्पावधीत वीस भाग झाले ही ह्या धाग्याचे, ही खरं तर आपल्या सगळ्यांच्या
निसर्गावरील प्रेमाचीच पावती आहे. ह्या वर्षी जून महिन्यात पावसानी अढी दिली खरी, पण मागच्या आठवड्यापासून त्याने कम बॅक करुन मस्त बॅटिंग
करायला सुरवात केली आहे. मला असं वाटत की आपल्याकडे पावसाळ्या दरम्यानचा निसर्ग एरवी एवढा बहरलेला नसतो . आता शहरापासून थोड दूर गेलं तर
दिसतील आपल्याला हिरव्या रंगाच्या हर एक छटा, हिरव्या गवतातून हळूच माना उंचावून जग बघणारी इवली इवली गवतफुले, पाणी पिऊन तृप्त झालेली आणि
वार्यावर डोलणारी भातशेती, डोंगरमाथ्यावर विहरणारे ढग, उतारावरून वाहणारे छोटे छोटे निर्झ्रर आणि नशीबाने साथ दिली तर इंद्रधनुष्य ही. सगळेच नजरेला आणि मनाला शांतावणारे. सोनचाफा, सोनटक्का, प्राजक्त, तगर, ब्रम्हकमळ, लिली, अनंत ,
गावढी गुलाब, अशा विविध फुलांच्या बहरण्याचे ही हेच दिवस.
नि .ग. चा धागा म्हणजे माझ्यासकट अनेकांसाठी दिवसभराचा ताण तणाव विसरून एका निखळ आनंदाची अनुभुती मिळवण्याचा एक मार्ग आहे. हा भाग ही नेहमीप्रमाणेच उत्तमोत्तम फोटो, उपयुक्त माहिती, दिलखुलास गप्पा आणि
निखळ निरोगी थट्टा विनोद यानी बहरु दे हीच त्या निसर्ग देवतेच्या चरणी प्रार्थना!!!
वरील मनोगत व फोटो नि.ग. प्रेमी आय.डी. मनीमोहोर चे आहे.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
निगकरांना विचार करायला
निगकरांना विचार करायला लावणारा एक प्रश्न ज्याचे उत्तर मला माहित नाही. मानववंशशास्त्राचा किंवा उत्क्रांती इइ, शास्त्रांचा अभ्यास करणा-यांना हा प्रश्न मुर्खपणाचा वाटणार हे मला माहित आहे, कारण माझा विचार मुर्खपणाचा असावा असा मलाही शक आहे
जितका निसर्गाचा विचार करते, त्याच्याबद्दल माहिती मिळवते तितका मानव त्यात पुर्णपणे विसंगत वाटतो. इतर सर्व पक्षी, प्राणी आणि वनस्पती एकमेकांवर अवलंबुन आहेत, एकामुळे दुस-याचा विकास होतोय. मानवाचे उलटेच. त्याच्यामुळे बाकी सगळ्याचा नाश होतोय. तो एकटाच वेगळा आहे या सर्व सृष्टीत आणि स्रूष्टीच्या कुठल्याही पायरीवर त्याचे स्थान नाही. आता त्याने स्वतःच स्वतःला जीवसाखळीच्य सगळ्यात वरच्या पायरीवर ठेवलेय ही गोष्ट वेगळी पण नैसर्गिक साखळीचा विचार करता तो त्या पायरीखालच्या एकाही पायरीला belong करत नाही.
त्यामुळे मानव इथला नाहीय, मी जशी नको झालेली मांजरे गुपचुप मासळीबाजारात जाऊन सोडुन आले तसच मानवाला कोणीतरी गुपचुप, तो तिथे नको झाला म्हणुन इथे सोडुन गेलेय असा विचार करायला मला भारी म्हणजे भारीच आवडते. या आवडत्या विषयावर आम्ही खुपच "गहन चर्चा" करुन आमचा प्रवासादरम्यान वगैरे मिळालेला रिकामा वेळ सार्थकी लावतो.

मानवाचे नैसर्गिक साखळीतले महत्व कोणी मला सांगितले तर बरे होईल. मला आवडेल ही माहिती जाणुन घ्यायला.
त्यामुळे मानव इथला नाहीय, मी
त्यामुळे मानव इथला नाहीय, मी जशी नको झालेली मांजरे गुपचुप मासळीबाजारात जाऊन सोडुन आले तसच मानवाला कोणीतरी गुपचुप, तो तिथे नको झाला म्हणुन इथे सोडुन गेलेय असा विचार करायला मला भारी म्हणजे भारीच आवडते. >>>>>> जबरी ..... ह ह पु वा .....
(मला कोणीतरी पोत्यातून वा कॅप्सूलमधून इथे पृथ्वीवर सोडलंय असं वाटू लागलंय .... )
सायली त्या भाजीचे नाव
सायली त्या भाजीचे नाव हडसन.
आशुतोष मस्त सफरीतले फोटो.
हे घ्या एक फुल. जिप्सि, दिनेशदा, शशांक, साधना तर नक्कीच ओळखतील.

मला नै बै ओळखता येत. मला
मला नै बै ओळखता येत. मला गुलबक्षी वाटतेय... फुलाचे बाकीचे अवयव कुठेयत??? तु डायरेक्ट आकाशगंगेत जायला लागलीस की काय फोटू काढायला???
म्हणजे ज्या मानवांना इथे गुपचुप मांजरांसारखे सोडुन दिले गेलेय ते सोबत फोटू पण घेऊन येतात असे मानायला वाव आहे असे मानायचे का??????????
जागुताई, सागाचे फुल आहे का?
जागुताई, सागाचे फुल आहे का?
सागाच्या फुलांचा हा मी
सागाच्या फुलांचा हा मी काढलेला फोटो

त्यामुळे मानव इथला नाहीय, मी
त्यामुळे मानव इथला नाहीय, मी जशी नको झालेली मांजरे गुपचुप मासळीबाजारात जाऊन सोडुन आले तसच मानवाला कोणीतरी गुपचुप, तो तिथे नको झाला म्हणुन इथे सोडुन गेलेय असा विचार करायला मला भारी म्हणजे भारीच आवडते. >>>>>> जबरी ..... ह ह पु वा ..... हसून हसून गडबडा लोळण
(मला कोणीतरी पोत्यातून वा कॅप्सूलमधून इथे पृथ्वीवर सोडलंय असं वाटू लागलंय .... )+++ खुपच भारीये...
जागु कसल कोड घातलयस... खरच त्या फुलाचे पान, देठे ,फांदी काहीच नाहीय... एखादा क्लु दे ना!
क्या बात है स्निग्धा! सागाचेच असावे, दोन्ही फुलं सारखीच दिसतायत...
साधना, लवकरच निसर्ग आपली चूक
साधना, लवकरच निसर्ग आपली चूक सुधारेल अशी आशा करू या !
जागू, सागाचेच फुल वाटतेय ते !
त्यामुळे मानव इथला नाहीय, मी
त्यामुळे मानव इथला नाहीय, मी जशी नको झालेली मांजरे गुपचुप मासळीबाजारात जाऊन सोडुन आले तसच मानवाला कोणीतरी गुपचुप, तो तिथे नको झाला म्हणुन इथे सोडुन गेलेय असा विचार करायला मला भारी म्हणजे भारीच आवडते.>>>>>>लई भारी विचार
मला कोणीतरी पोत्यातून वा कॅप्सूलमधून इथे पृथ्वीवर सोडलंय असं वाटू लागलंय ....
कोड्याला पास
निगकर्स, मला एका वनस्पतीचे
निगकर्स, मला एका वनस्पतीचे नाव हवे आहे.
त्याच्या शेंगा बारीक, साधारण अर्धा-एक इंची पूर्ण काळ्या, कडक झाल्या आणि पाण्यात टाकल्या की फाट्कन फुटतात आणि आतल्या बिया सगळीकडे उडतात.
कालच हा प्रयोग करुन झाला. सोसायटीत आहे ही वनस्पती. फोटो टाकते नंतर. तोपर्यंत कुणाला नाव माहित असले तर सांगा.
साधना मस्त पोस्ट. हि पोस्ट
साधना मस्त पोस्ट.
हि पोस्ट वाचून मला आठवतंय, दिनेशदानीपण ह्याच आशयाचं एक वाक्य लिहिलं होतं अगदी परफेक्ट आठवत नाही पण असंच काहीतरी की, निसर्गाचा मानवाला नेहेमीच उपयोग होतो पण निसर्गाला मानवाचा उपयोग किती होतो.
मला नै बै ओळखता येत. मला
मला नै बै ओळखता येत. मला गुलबक्षी वाटतेय... फुलाचे बाकीचे अवयव कुठेयत??? तु डायरेक्ट आकाशगंगेत जायला लागलीस की काय फोटू काढायला??? >>>> आज साधना फुल फॉर्मात दिस्तीये अग्दी ....
साधना - आज तुला आकाशगंगा, पृथ्वीवर सोडलेला माणूस (आणि तो देखील असले फुलाचे फोटो घेऊन आलेला..) हे काय सगळं आठवून राहिलंय - काय खरं नाही ब्वॉ आज - ऐशूने फार पिडलाय का तुला - का पार मोकाट सोडलंय ?????

नमस्कार रणथंबोरचे महाराज
नमस्कार
रणथंबोरचे महाराज !!

रणथंबोरच्या सफारीत महाराजांनी सकाळीच मनसोक्त दर्शन देउन दिवस सार्थकी लावला.
वॉव मस्त आहे, आशुतोष.
वॉव मस्त आहे, आशुतोष.
आशु, तो बोलावतोय तुला पाठीवर
आशु, तो बोलावतोय तुला पाठीवर बसवुन घोडा घोडा करायला.....
शशांक....
गेले दोन आठवडे खुप टेन्स होते.. आता सगळे देवावर सोडुन दिले आणि मी मस्त हुंदडतेय.. 
साधना, लवकरच निसर्ग आपली चूक सुधारेल अशी आशा करू या !
म्हणजे काय करेल?? आगंतुकाना हाकलुन काढेल?? की आगंतुक स्वत्:च आपला नाश करुन घेतील??
कोणालाही पर्यावरणाबद्दल बोलण्याची हुक्की आली की लगेच सेव अर्थ, सेव प्लॅनेट इ.इ. घोषणा चालु करतात. मला इतके हसायला येते या लोकांचे.. सेव अर्थ, सेव प्लॅनेट करण्याची ताकदच नाही मानवाची. त्याने फक्त स्वतःला वाचवले तरी खुप झाले.
पृथ्वीवर इतकी मोठमोठी संकटे आली, ज्यात भयानक मोठे ज्वालामुखी, भुकंप, त्यानंतर आकाशात धुळ उडुन सुर्यकिरणे न पोचल्याने आलेले महाभयानक बर्फ युग.. या सगळ्यातुन पुरुन उरुन पृथ्वी अजुनही गरगर फिरतेय. फक्त त्या त्या काळात असलेले सजिव मात्र तो कालखंड संपल्यावर नष्ट झाले. तसेच आज मानवाने स्वतःच्या मुर्खपणाने वातावरणाचा नाश केला तर तो स्वतःच नाश पावेल. पृथ्वी थोड्याफार फरकाने परत तशीच गरगर फिरायला लागेल. त्यामुळे सेव अर्थ, सेव प्लॅनेट म्हणण्यापेक्षा मानवाने सेव ह्युमन्स अशी हाळी द्यायला हवी. पण त्याला जराशी देखिल अक्कल असती तरी आजची वेळ आलीच नसती.
आशुतोष झक्कास फोटो.. स्मीता
आशुतोष झक्कास फोटो..
स्मीता तळवळकरां बद्द्ल वाचुन वाईट वाटले...
:
शांतता.
शांतता.
साधना... ओये बरीयेस ना
साधना...
ओये बरीयेस ना आता???
आशु. मस्त फोटोज..
सागाच्या फुलाचं नांव पहिल्यांदाच कळलं..
हे अगदी शिंपल्या सारखे वाटते
हे अगदी शिंपल्या सारखे वाटते आहे ना!, अगदी रंग आणि चमक सुद्धा.
आणि हे जरा वेगळ्या आकाराचे...
आणि हे जरा वेगळ्या आकाराचे...

छान आहेत. भूछत्र आहेतना ती.
छान आहेत. भूछत्र आहेतना ती.
मॉरिशियसवरच्या आजच्या भागातही
मॉरिशियसवरच्या आजच्या भागातही जास्वंद आणि तगरीचे फोटो आहेत.
सायली, पाचुकवडा फोटो आणि
सायली, पाचुकवडा फोटो आणि जीप्सीची माहिती दोन्ही सुंदर.>>> +१
आशुतोष, सर्व फोटो मस्तच.
मला फोटो टा़कायला जमत नाहिये
मला फोटो टा़कायला जमत नाहिये
आशुतोष, फोटो एकदम लाईव्ह.
आशुतोष, फोटो एकदम लाईव्ह. मस्त आलेत

अळंबी आहे ना.
साधना, एक फोन करु का तुला? बरी आहेस ना.
सायली अगदी मोती शोधावा असा सुरेख शिंपला वाटतोय तो
धन्यवाद अन्जु, देवकी,
धन्यवाद अन्जु, देवकी, मोनाली..
हो भुछत्रच आहे ती.. अच्छा त्याला अळंबी पण म्हणतात का?
ag maitrininno, mi majet aahe
ag maitrininno, mi majet aahe aataa.. thode tension aalele madhye pan aataa te gele... aataa nehamisarakhich aahe majet
सगळीच माहिती आणि फोटो सुंदर
सगळीच माहिती आणि फोटो सुंदर आहेत.
हे काय आहे.. पावसाळी लिलीच्या पानावर होतं..

सुप्रभात हर हायनेस फ्रॉम गीर
सुप्रभात
हर हायनेस फ्रॉम गीर

साधना, काल तू जो मुद्दा
साधना, काल तू जो मुद्दा मांडलास त्यावर डॉ. अनिल अवचट यांच्या 'शिकविले ज्यांनी' या पुस्तकात महाजन सरांच्या बरोबर झालेल्या याच प्रकारच्या संवादाचा काही भाग मी इथे देतोय...
' निसर्गाची प्रवृत्ती हा समतोल साधण्याची आहे. तुम्ही जंगलं तोडलीत तर प्रदेश वैराण होईल; मग तिथं वैराण प्रदेशाची इकोसिस्टीम तयार होईल. निसर्ग हा इम्पर्सनल आहे. तो काहीच ठरवत नाही. तुम्ही नुकसान केलं आणि पृथ्वीचं वाळवंट केलं तरी इथं वाळवंटाची इकोसिस्टीम येईल. आणि बॅलन्स रिस्टोअर होईल. निसर्गाचं काही बिघडत नाही. बिघडणार आपलं, आपण त्यात जिवंत राहू का हा खरा प्रश्न! निसर्गाचं नुकसान करू नका, निसर्गावर घाला घालू नका, अशी हाकाटी आपण गाजवतो. निसर्गाचं काहीही नुकसान होत नसतं. नुकसान कुणाचं? तर आपलं!!
आपण आपल्या जगण्याला योग्य अशा इकोसिस्टीमचा नाश करतोय आणि तो आतापर्यन्त कधी नव्हता इतक्या वेगानं. अमुक प्राण्याची, किड्याची जात नामशेष झाली म्हणून ओरडा ऐकतो. अरे, अशा कोट्यवधी स्पेसीज पूर्वी नामशेष झाल्याच आहेत; आणि नव्या निर्माणही होत असतात; पण नवीन स्पेसीज निर्माण व्हायला हजारो वर्षांतून एखादा जैविक अपघात व्हावा लागतो आणि इथं आपण ज्या वेगानं जंगलांचा, त्यांतल्या हजारो वनस्पतींच्या स्पेसीजचा; त्यांच्या आसर्यानं राहणार्या प्राण्यांचा संहार करतोय, ते पूर्वी कधी झालं नव्हतं, ही काळजीची बाब आहे.'
Pages