निसर्गाच्या गप्पांच्या २१ व्या भागाबद्दल सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन.
नि. ग. च्या हया द्विदशकोत्तर धाग्यावर मनोगत व्यक्त करताना खूप खूप आनंद होत आहे. डिसेंबर २०१० मध्ये नि. ग. ला सुरवात झाली आणि आज इतक्या अल्पावधीत वीस भाग झाले ही ह्या धाग्याचे, ही खरं तर आपल्या सगळ्यांच्या
निसर्गावरील प्रेमाचीच पावती आहे. ह्या वर्षी जून महिन्यात पावसानी अढी दिली खरी, पण मागच्या आठवड्यापासून त्याने कम बॅक करुन मस्त बॅटिंग
करायला सुरवात केली आहे. मला असं वाटत की आपल्याकडे पावसाळ्या दरम्यानचा निसर्ग एरवी एवढा बहरलेला नसतो . आता शहरापासून थोड दूर गेलं तर
दिसतील आपल्याला हिरव्या रंगाच्या हर एक छटा, हिरव्या गवतातून हळूच माना उंचावून जग बघणारी इवली इवली गवतफुले, पाणी पिऊन तृप्त झालेली आणि
वार्यावर डोलणारी भातशेती, डोंगरमाथ्यावर विहरणारे ढग, उतारावरून वाहणारे छोटे छोटे निर्झ्रर आणि नशीबाने साथ दिली तर इंद्रधनुष्य ही. सगळेच नजरेला आणि मनाला शांतावणारे. सोनचाफा, सोनटक्का, प्राजक्त, तगर, ब्रम्हकमळ, लिली, अनंत ,
गावढी गुलाब, अशा विविध फुलांच्या बहरण्याचे ही हेच दिवस.
नि .ग. चा धागा म्हणजे माझ्यासकट अनेकांसाठी दिवसभराचा ताण तणाव विसरून एका निखळ आनंदाची अनुभुती मिळवण्याचा एक मार्ग आहे. हा भाग ही नेहमीप्रमाणेच उत्तमोत्तम फोटो, उपयुक्त माहिती, दिलखुलास गप्पा आणि
निखळ निरोगी थट्टा विनोद यानी बहरु दे हीच त्या निसर्ग देवतेच्या चरणी प्रार्थना!!!
वरील मनोगत व फोटो नि.ग. प्रेमी आय.डी. मनीमोहोर चे आहे.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
स्निग्धा, जिप्सी मस्त फोटो.
स्निग्धा, जिप्सी मस्त फोटो.
स्निग्धा, जिप्सी मस्त फोटो.
स्निग्धा, जिप्सी मस्त फोटो. +१
सुप्रभात....
हे कंच हिरवे कबुत्तर मी पहिल्यांदाच बघते आहे....
(फोटो अंतरजालाहुन सभार....)
हे कंच हिरवे कबुत्तर मी
हे कंच हिरवे कबुत्तर मी पहिल्यांदाच बघते आहे....>>>>>Common emerald dove (पाचू कवडा)
पाचू कवडा हा आकाराने साधारणपणे २७ सें. मी. आकाराचा पक्षी आहे. हा पक्षी पाठीकडून तपकिरी-गुलाबी रंगाचा त्यावर पाचू सारखी चमकदार झाक असलेला आहे. याची शेपूट गडद तपकिरी रंगाची असून याच्या डोक्यावर पांढरा-राखाडी रंग असतो. पाचू कवडा उडतांना याच्या पंखाखालचा तांबूस रंग दिसतो. नराच्या डोक्यावर आणि खांद्यावर पांढरा पट्टा असतो. हा फरक सोडून नर-मादी दिसायला सारखेच असतात. हे एकट्याने किंवा लहान थव्याने राहणे पसंत करतात.
अधिक माहिती
विकीवर इथे वाचा.
जिप्सी, मस्त माहिती.
जिप्सी, मस्त माहिती.
सुदुपार. जिप्स्या दिनेशदांनी
सुदुपार.
जिप्स्या दिनेशदांनी 'नीट' हा शब्द वापरल्याने मी पण कोड्यात पडलेय की मी कुठे भांडत आहे?
कबुतर मस्तच.
ऑगस्टच्या माहेर मध्ये माझा लेख आहे सुक्या माश्यांवर. सागरी सुका मेवा.
व्वा जिप्सी छान माहिती पाचु
व्वा जिप्सी छान माहिती पाचु कवडयावर... धन्यवाद...
अरे व्वा अभिनंदन जागु...
जागू, सध्या मुंबईच्या
जागू, सध्या मुंबईच्या एअरपोर्टवर पण सुके मासे असतात विकायला.. अगदी झिंगे, बोंबिल देखील !
अरे व्वा, जागू , अभिनंदन
अरे व्वा, जागू , अभिनंदन
मागे एकदा कर्नाळा पक्षी
मागे एकदा कर्नाळा पक्षी अभयारण्यात बर्ड ट्रेलवर गेले असताना तिथे एक गृहस्थ भलीमोठी बंदुकीसारखी कॅमे-याची नळी लावुन बसलेले. त्यांच्या त्या नळीतुन त्यांनी मला हरियाल हे हिरवे कबुतर दाखवलेले. महाराष्ट्राचा राज्यपक्षी.... (कबुतर आपला राज्यपक्षी....
:डोके आपटणारी बाहुली: )
असो, एका उंच झाडावर घरटे होते आणि जोडीने राखण करणे चालले होते. अजुन पिल्ले अंड्यातच होती. तिथेच खाली शामाही पाहिला. निघताना त्या गृहस्थांचे नाव विचारले - आदेश शिवकर. नेटवर पाहा हा सल्ला दिलेला त्यांनी. पक्षांचे कसले अफलातुन फोटो टाकलेत त्यांनी... अमेझिंग.
परत जायला हवे एकदा पक्षी बघायला.. सध्या जायचे मन होत नाही कारण मला जळवांची किळस वाटते..
व्वा साधना, छान कीस्सा
व्वा साधना, छान कीस्सा सांगीतलास...
धन्यवाद अन्जु..
जिप्सी सोनसकाळ आणि कवितेच्या
जिप्सी सोनसकाळ आणि कवितेच्या दोन ओळी मस्तच.
सायली, पाचुकवडा फोटो आणि जीप्सीची माहिती दोन्ही सुंदर.
साधना छान किस्सा इथे शेअर केलास, मस्त.
जागू अभिनंदन.
काल मायबोलीकर सारीकाने
काल मायबोलीकर सारीकाने त्यांच्याइथे मिळणार्या पावसाळी रानभाजीचा फोटो वॉट्स अॅप वर शेअर केला आहे. लसुण आणि सुक्या मिरचीवर ह्याची पाने कुरकुरीत करतात.
त्यांच्या त्या नळीतुन त्यांनी
त्यांच्या त्या नळीतुन त्यांनी मला हरियाल हे हिरवे कबुतर दाखवलेले.>>>>मला आधी हा वरचा फोटो हरियालचाच वाटलेला. पण नाही, हा पाचू कवडाच आहे.
परत कोकिळेच्या पिल्लाला कावळा
परत कोकिळेच्या पिल्लाला कावळा भरवत असलेला पाहिला. पण फोटो काढता आला नाही.
ही नवी लिंक
ही नवी लिंक पहा
http://www.maayboli.com/node/50233
https://www.flickr.com/photos
https://www.flickr.com/photos/31546851@N08/14648141159/ पावसाळ्यात ह्या गोगलगायी खूप दिसतात त्याचा फोटो इथे कसा अप्लोड करावा सांगा बरं मित्र मैत्रिणींनो
साधना, तूला आठवतेय का..
साधना, तूला आठवतेय का.. वांद्र्याच्या ड्राईव्ह इन च्या मागे आणि समोरही तिवरांचे जंगल होते आणि तो भागही पक्ष्यांचे अभयारण्य म्हणून घोषित झाला होता. आता तिथे पक्ष्याला बसायलाही जागा उरली नाही.
अरेच्या ! खरच हरियाल वेगळा
अरेच्या ! खरच हरियाल वेगळा दिसतोय पाचु कवडा पेक्षा... गूगल मधे एमरांड डव टाईप केल तर हा पाचु
दिसतोय ...
सारिका धन्यवाद...
जागु त्या रान भाजीचे नाव काय? आणि तु एका वाक्यात रेसिपी पण सांगीतलीस की..
वॉव जो, पुढच्या वेळेला फोटो काढायचा प्रयत्न करा..
ह्या मे महिन्यात परत एक गीर
ह्या मे महिन्यात परत एक गीर ट्रीप केली,रॉयल फॅमिलीचीही भेट झाली.
राणी आणि राजपुत्र.
काय तो तोरा राणीसाहेबांचा !
काय तो तोरा राणीसाहेबांचा ! मस्त टिपलाय.
अशुतोष खरच जबरी फोटो... अगदी
अशुतोष खरच जबरी फोटो... अगदी रॉयल
बडोद्याला लक्ष्मी विलास पॅलेसच्या भिंतींवर पण रविवर्मांच्या चित्रांचा खजिना होता.+++ त्यांचे काही फोटो असतील तर वेगळा धागा काढुन पोस्ट करा... प्लीज..
चीं..........................
चीं....................................ब!!!
दिनेश नव्या मुंबईत जे
दिनेश
नव्या मुंबईत जे काही शिल्लक आहे तेही किती काळ राहणार हा प्रश्न आहे.
आशुतोष एकदम ००७ झालाय..
साधना, पक्ष्या प्राण्यांची
साधना, पक्ष्या प्राण्यांची जीवनेच्छा जबरदस्त असेल तर या रेट्यातही ते तगतील. खरं तर जे अॅडजस्ट करू शकतील तेच तगून राहतील. लाजरे मोर, मुंगुस आता शहरात सहज वावरतात. तसेच.
सायली, हे एक चित्र लक्ष्मी
सायली, हे एक चित्र लक्ष्मी विलास पॅलेसच्या बाहेरच्या भिंतीवरचं,
साधना
आशुतोष.. काय संदर चित्र आहे.
आशुतोष.. काय संदर चित्र आहे. उघड्यावर असूनही टिकून राहिलेय, हे नवलच.
वा राणी आणि राजपुत्र मस्त
वा राणी आणि राजपुत्र मस्त आशुतोष.
बडोद्याला लहानपणी दरवर्षी जाऊनही 'लक्ष्मी विलास' बघितला नाही ही खंत वाटते आता, मस्त आहे चित्र.
मी पाचू कवडा पहिल्यांदाच
मी पाचू कवडा पहिल्यांदाच पाहातेय.
धन्यवाद आशुतोष... लगेच इच्छा
धन्यवाद आशुतोष... लगेच इच्छा पुर्ण केलीत... डिसेंबर मधे बडोदया ला असेन एका लग्न समारंभाच्या
निमीत्याने तेव्हा नक्की भेट देईल लक्ष्मी विलास पॅलेसला...
नलिनी हा पीटुकला कुठे दिसला तुला?
सायली, हा पिटूकला नाही.
सायली, हा पिटूकला नाही. निवांत आरामात बसलीय स्वारी. कोलमार्डन झू मधला.
Pages