पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

Submitted by admin on 22 April, 2013 - 23:08

या अगोदरचे धागे
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

इथे काही महीन्यांपुर्वी खीमा बाॅलस् ची पाककृती टाचली होती, पण मला सापडत नाहीये. कुणी टाकली आहे हे ही आठवत नाहीये. कुणीतरी लिंक द्या ना, प्लिज

व्हेज स्टॉक क्युब म्हणजे डीहायड्रेटेड बुयॉन. गरम पाण्यात घातले की स्टॉक तयार होतो. तो सूप बेस म्हणून वापरायचा. मग त्यात आवडीप्रमाणे भाज्या, भात/पास्ता/नुडल्स्/कॉर्न , गरजेप्रमाणे मीरेपूड आणि ताजी किंवा सुकवलेली herbs घालायची. थोडासाच स्टॉक हवा असेल तर ठीक पण इतर वेळी ताजा स्टॉक मस्त! प्रेशर कुकरमधे छान होतो. स्टॉक क्युब वापरणारच असाल तर लो-सॉल्ट वाले घ्या. ग्रॅन्युल्स पण मिळतात. knorr , maggi वगैरे ब्रॅन्ड आहेत.

ब्लॅक ऑलिव्ह्ज - सॅलड मध्ये घालता येतील. काकडी, ऑलिव्ह्ज व पुदिना पाने / चेरी टोमॅटोज व ब्लॅक ऑलिव्ह्ज कांदा सॅलड इत्यादी.

लगो, भारतात मॅगीचे मिळतात.
तसेच मोठ्या स्टोअर्समध्ये दुबई वैगेरेमधून आयात केलेले व्हेज्/चिकन स्टॉक क्यूब्ज मिळतात.

लगो, भारतात मॅगीचे मिळतात.>>> त्यामध्ये अतिमीठ आणी अजिनोमोटो वगैरे घातलेलं अस्तं. त्यापेक्षा आठवड्यातून एकदा भाज्या आणल्या की स्टॉक करून घेणे जास्त हेल्दी.

मला चिकनच्या थोड्या पाककृती हव्या आहेत. कमी तेल आणि नो मसाला-तिखट-मिरची-मिरपूड वगैरे. ग्रिल्ड चिकन बर्‍याचदा केलं जातंय. अजून काही रेसिपी असतील तर लिंका द्या.

मला चिकनच्या थोड्या पाककृती हव्या आहेत. कमी तेल आणि नो मसाला-तिखट-मिरची-मिरपूड वगैरे. ग्रिल्ड चिकन बर्‍याचदा केलं जातंय. अजून काही रेसिपी असतील तर लिंका द्या.>>> मी लेमन चिकन ची रेसेपी लिहिली आहे. त्यात भरपूर बटर वापरलंय. पण आम्ही ती रेसेपी कमी बटरमध्ये, बटरऐवजी थोड्याश्या ऑलिव्ह ऑइलमध्ये करून बघितलीये.

एक शेपू+ चिकन पण केली होती एकदा त्यातही मसाले कमी होते.

चिरलेल्या भाज्या (गाजर, बीन्स, फ्लॉवर, मटर, पत्ताकोबी, कॉर्न्स इ.इ.) त्याच्या तिनपट की चौपट पाणी घेवून, थोडंसं मीठ घालून शिजवत ठेवायचं. भाज्यामधला सगळा अर्क पाण्यात उतरला पाहिजे.
हे पाणी म्हणजेच व्हेज स्टॉक.

भाज्यांपेक्षा देठं. किंवा कमी कोवळा पार्ट. चांगलं गळेपर्यंत शिजवायचं. ४ कपाचं १/२-१ कप पाणी होई पर्यंत मंद ग्यासवर.
नॉनव्हेज स्टॉकसाठी फारसे खाणेबल नसलेले कट्स, उदा. फिश हेड्स, टेल्स इ. उकळायचे.

मी शीरखुर्मा केला होता.

१. अर्धा लिटर दुधात एक वाटी ड्रायफ्रूटचे तुकडे मन्द शिजवुन घेतले. अर्धा तास. हे बाजुला ठेवा.

२ मग अर्धी वाटी शेवया दोन चमचे तुपात परता.

३. दुध ड्रायफुट मिश्रण पुन्हा उकळायला घ्या. त्यात उरलेले अर्धा लिटर दूध व अर्धी वाटी साखर घालुन उकळा.

४. शेवटी शेवया घालुन उकळा. दूध अगदी आटु नये म्हणुन अधुन मधुन पाणी घाला.

लगो रेसेपी मस्त. पण ड्रायफ्रुटस आधी तुपात थोडे परतले तर मस्त होतात अशी आमच्या पूर्वीच्या मुस्लिम शेजार्‍यान्ची टिप.

खिरीत दूध जास्त, शेवया कमी, सुकामेवा शेवयांहून कमी आणि फक्त केशर वेलचीचा स्वाद, तर शीर्खुर्म्यात शेवया, सुकामेवा जेवढ्यास तेवढ्या प्रमाणात, दुधाचं प्रमाण शेवयांहून कमी आणि स्वादासाठी बरेच पर्याय उपलब्ध असा मामला असतोय.
शिवाय शीरखुर्म्यासाठी खास अश्या भाजलेल्या शेवया मिळतात, ज्या थेट दुधात उकळता येतात. खिरीसारखं तुपावर परतून घेणं वगैरे प्रकार करावे लागत नाहीत.

रच्याकने, 'शीर्खुर्मा शेवया(वर्मिसेली/ सेवईयां) व्हिडियो' असं काही शोधल्यास शेवया बनवण्याचे खूप छान छान व्हिडियो सापडतील.

इन्ना फरक नाहीच दिसत. फक्त नावान्चाच दिसतोय. पण साधारण पणे शीरकुर्मा मध्ये साजूक तुप आणी सुकामेव्याचा सढळ हाताने वापर करतात.

मंजू +१. शीरकुरम्यामध्ये अगदी प्रत्येक घासाला जाणवण्याइतपत सुकामेवा असतो. खरंच सढळ हातानी लोटलेला. शीरकुरमा शेवयांच्या खिरीसारखा पातळ खचितच नसतो. शेवयाही बारीक असतात. पण सुतरफेण्यांएवढ्या बारीकही नसतात. अन जेव्हा जेव्हा मी खाल्लाय तेव्हा छान साजूक तुपाचा तवंग पाहिलाय. Happy

Pages