निसर्गाच्या गप्पा (भाग २०)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 5 June, 2014 - 05:56

निसर्गाच्या गप्पांच्या २० व्या भागाबद्दल सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन तसेच पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज पर्यावरण दिनाच्या शुभ मुहुर्तावर पर्यावरणाचे संतुलन राखण्याच्या दृष्टीने आपण आपाअपल्या परीने प्रयत्न करुन ह्या निसर्गाशी जडलेले नाते अजुन वृद्धिगत करुया.

"पा ऊ स" - निव्वळ तीन अक्षरातच त्याच्या कृतीचा भास होतो. "नेमेची येतो मग पावसाळा" असे असले तरी तो प्रत्येकाला हवाहवासा वाटत असतो. ग्रीष्मात "तप्त दिशा झाल्या चारी, भाजतसे सृष्टी सारी" अशी सर्वत्र स्थिती असताना त्याचे आगमन हा एक सुखद अनुभव असतो. तो येतो तेच गारव्याची आणि नवचैतन्याची चाहुल घेऊनच. एरव्ही उजाड वाटणारी धरतीही त्याच्या आगमनाने सुखावते. उन्हाळ्यात ज्या डोंगरावर साधे झुडुपही दिसत नाही तेथे हिरव्यागार झाडाझुडपातून लपंडाव खेळत दुधाच्या सहस्त्र जलधारा वेगाने दरीत झेपावताना दिसू लागतात. "बेरंगसी है बडी जिंदगी, कुछ रंग तो भरो" असे म्हणणार्‍या धरतीला तो आपल्या "हिरव्या" रंगात रंगवून घेतो. बरे या हिरव्या रंगाच्या छटा तरी किती विविध! झाडाझुडपांचा गर्द हिरवा, नवीन पालवीचा कोवळा हिरवा, डोंगर-पठारावर व्यापलेल्या गवताचा पोपटी हिरवा, जीर्ण पानांचा वाळका हिरवा, शेवाळ्याचे भस्म फासलेल्या दगडाचा शेवाळी हिरवा. अगदी "ऋतू हिरवा, ऋतू बरवा" सारखाच. निसर्गाला, कवीमनाला साद देणारा असा हा पावसाळा. ह्याच्या पहिल्या सरींचे तर सगळ्यांना अप्रुप. पहिल्या पावसाच्या आगमनानंतर येणारा मातीचा सुगंध तर कोणत्याही कृत्रिम सुगंधापेक्षा अधिक सुंदर असतो. अगदी "जाई जुईचा गंध मातीला आला" या गीताप्रमाणेच.

आभाळात आले काळे काळे ढग,
धारा कोसळल्या निवे तगमग
धुंद दरवळ धरणीच्या श्वासांत,
आला पाऊस मातीच्या वासात,
मोती गुंफीत मोकळ्या केसांत.

वरील फोटो व त्या खालचा मजकूर जिप्सी कडून.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व फोटो, माहिती, चर्चा छान Happy (इतक्या पोस्ट वाचल्यानंतर इतकंच लिहु शकतो. Wink )

मानुषीताई सांगली आणि हलशीचा वेगळा धागा काढुन त्यात फोटो आणि माहिती पोस्ट करा ना. छान आलेत फोटोज.

सुरुची, मला पुसटस आठवत आहे की ६, ८ महिन्यात माझ्या कडे फुलं आली होती... नेट वर ही अशीच माहिती आहे की कंद लावल्यावर साधारण ८महिन्यात पहिला बहर येतो...
तुला किमान ६ महिने अजुन वाट पाहावी लागेल Sad :-

हेमा ताई, लाल जास्वंद छानच...

वेलकम ब्याक जिप्सी... ट्रीप कशी झाली? फोटो + लेखा च्या प्रतिक्षेत...

लवकरच देशील सायली का मी येऊ घ्यायला. जिप्सी लडाखला गेला होता ना ? वेलकम ब्याक जिप्सी... ट्रीप कशी झाली? फोटो + लेखा च्या प्रतिक्षेत... दोन वर्षापुर्वी गेले होते आठवणी ताज्या होतील.

ट्रिप एकदम झक्कास झाली Happy नऊ दिवसात तीनही ऋतु (पावसाळा, उन्हाळा आणि हिवाळा) अनुभवला. Happy अगदी बर्फातही खेळलो. Wink
पण थोडासा मूड ऑफ झाला कारण चांद्रताल लेकला जाणारा रस्ता बंद झाल्याने जाता आले नाही. Sad

फोटो+लेखसाठी थोडा वेळ लागेल.

जिप्सी लडाखला गेला होता ना >>>>>मंजु, लडाखला गेल्यावर्षी गेलो होतो. यावर्षी लाहौल-स्पिती + किन्नौर (हिमाचल प्रदेश) करून आलो. Happy

Pages