निसर्गाच्या गप्पा (भाग २०)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 5 June, 2014 - 05:56

निसर्गाच्या गप्पांच्या २० व्या भागाबद्दल सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन तसेच पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज पर्यावरण दिनाच्या शुभ मुहुर्तावर पर्यावरणाचे संतुलन राखण्याच्या दृष्टीने आपण आपाअपल्या परीने प्रयत्न करुन ह्या निसर्गाशी जडलेले नाते अजुन वृद्धिगत करुया.

"पा ऊ स" - निव्वळ तीन अक्षरातच त्याच्या कृतीचा भास होतो. "नेमेची येतो मग पावसाळा" असे असले तरी तो प्रत्येकाला हवाहवासा वाटत असतो. ग्रीष्मात "तप्त दिशा झाल्या चारी, भाजतसे सृष्टी सारी" अशी सर्वत्र स्थिती असताना त्याचे आगमन हा एक सुखद अनुभव असतो. तो येतो तेच गारव्याची आणि नवचैतन्याची चाहुल घेऊनच. एरव्ही उजाड वाटणारी धरतीही त्याच्या आगमनाने सुखावते. उन्हाळ्यात ज्या डोंगरावर साधे झुडुपही दिसत नाही तेथे हिरव्यागार झाडाझुडपातून लपंडाव खेळत दुधाच्या सहस्त्र जलधारा वेगाने दरीत झेपावताना दिसू लागतात. "बेरंगसी है बडी जिंदगी, कुछ रंग तो भरो" असे म्हणणार्‍या धरतीला तो आपल्या "हिरव्या" रंगात रंगवून घेतो. बरे या हिरव्या रंगाच्या छटा तरी किती विविध! झाडाझुडपांचा गर्द हिरवा, नवीन पालवीचा कोवळा हिरवा, डोंगर-पठारावर व्यापलेल्या गवताचा पोपटी हिरवा, जीर्ण पानांचा वाळका हिरवा, शेवाळ्याचे भस्म फासलेल्या दगडाचा शेवाळी हिरवा. अगदी "ऋतू हिरवा, ऋतू बरवा" सारखाच. निसर्गाला, कवीमनाला साद देणारा असा हा पावसाळा. ह्याच्या पहिल्या सरींचे तर सगळ्यांना अप्रुप. पहिल्या पावसाच्या आगमनानंतर येणारा मातीचा सुगंध तर कोणत्याही कृत्रिम सुगंधापेक्षा अधिक सुंदर असतो. अगदी "जाई जुईचा गंध मातीला आला" या गीताप्रमाणेच.

आभाळात आले काळे काळे ढग,
धारा कोसळल्या निवे तगमग
धुंद दरवळ धरणीच्या श्वासांत,
आला पाऊस मातीच्या वासात,
मोती गुंफीत मोकळ्या केसांत.

वरील फोटो व त्या खालचा मजकूर जिप्सी कडून.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागु............ सोनचाफा................. माझ्या मर्मावर बोट ठेवलस ग! खुप खुप खुप सुंदर.... Happy

ब्रम्हदंडी चे सगळीच माहिती नवीन!
सोनचाफा खरंच अहाहा!

असे प्रतिसाद वॉट्स अ‍ॅप वर स्माईली सकट द्यायचे इथे प्रतिबंध आहे>>>>>>>>>>> :स्मितः

जागु , सोनचाफा सुंदर. कलम आहे ग ?

सायली , पिवळी लिली डॅफोडिल्स सारखी दिसतेय.

निशिगंध म्हणजे चांदण्याच जणुं .

सुदुपार.

सायली तुला मेल पाठवलाय.

सायली माझ्याकडे डबलची गुलछडी आहे.

साधना Angry मला तरी द्यायचीस ती पिवळी लिलि फेकलीस कशाला?

प्रिती, साधना धन्यवाद....
हेमा ताई कीती छान उपमा दिल्यात.. Happy
नितीन जी ????

जागु, कालचा मेल वाचला.. मी उत्तर पण दिलं.. आज पण पाठवलायस का?

डब्ब्लची गुलछडी... वाव... काय सही दिसत असेल ना?

सायलीजी अहो १००० प्रतिसाद पुर्ण झाले.

सर्वांचे सुगंधी प्रचि सुंदर, गुलछडीचा पण कांदा असतो का ?

रिया... अग कीत्ती दिवसांनी आलीस, मला वाटल की तु पण गटग ला गेली होतीस...
पण आम्ही तुझ्याशी दो आहे.. Happy

सायलीजी अहो १००० प्रतिसाद पुर्ण झाले. +++ अच्छा..
हो कंद च असतात..

जागू, तुला पिवळी लिली सायली पाठवणार आहे म्हणालीये तिच्याकडुन नाहीच मिळाली तर मी देईन. बिया काढुन ठेवल्या आहेतच.

आभाळ भरून आले की निशिगंध अधिकच बहरतो. +++ अच्छा हे समीकरण माहिती नव्हते...
प्र.ची खुप फ्रेश आहे...

माझी ऑफीसची जिवलग मैत्रीण, माधुरी.....

रोज मी यायच्या आधी, मझ्या केबीन मधे कधी क्रुष्णकमळ तर कधी मोगरा, कधी गुलाब, तर कधी चमेली
आणि आज काल जाई... अशा सुंदर फुलांनी तुडुंब भरलेली बोल ठेवते....

सोबतच गजरा, आणि हल्ली जाईच्या कळ्या सुध्द्दा आणु लागली आहे....

सकाळी घरच सगळ आवरुन ऑफीस मधे यायला कोणत्या दिव्यातुन जाव लागत हे आपल्या सगळ्यांनाच
ठाउक आहे..... पण सकाळी सकाळी अशी सुगंधीत भेट जर कोणी आपल्याला देत असेल तर सगळी मरगळ
निघुन जाते आणि मन प्रसन्न राहातो.... दिवस छान जातो.....

JAI.jpg

अशी मैत्रीण खरच... सगळ्यांना मीळो... Happy

Pages