निसर्गाच्या गप्पा (भाग २०)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 5 June, 2014 - 05:56

निसर्गाच्या गप्पांच्या २० व्या भागाबद्दल सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन तसेच पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज पर्यावरण दिनाच्या शुभ मुहुर्तावर पर्यावरणाचे संतुलन राखण्याच्या दृष्टीने आपण आपाअपल्या परीने प्रयत्न करुन ह्या निसर्गाशी जडलेले नाते अजुन वृद्धिगत करुया.

"पा ऊ स" - निव्वळ तीन अक्षरातच त्याच्या कृतीचा भास होतो. "नेमेची येतो मग पावसाळा" असे असले तरी तो प्रत्येकाला हवाहवासा वाटत असतो. ग्रीष्मात "तप्त दिशा झाल्या चारी, भाजतसे सृष्टी सारी" अशी सर्वत्र स्थिती असताना त्याचे आगमन हा एक सुखद अनुभव असतो. तो येतो तेच गारव्याची आणि नवचैतन्याची चाहुल घेऊनच. एरव्ही उजाड वाटणारी धरतीही त्याच्या आगमनाने सुखावते. उन्हाळ्यात ज्या डोंगरावर साधे झुडुपही दिसत नाही तेथे हिरव्यागार झाडाझुडपातून लपंडाव खेळत दुधाच्या सहस्त्र जलधारा वेगाने दरीत झेपावताना दिसू लागतात. "बेरंगसी है बडी जिंदगी, कुछ रंग तो भरो" असे म्हणणार्‍या धरतीला तो आपल्या "हिरव्या" रंगात रंगवून घेतो. बरे या हिरव्या रंगाच्या छटा तरी किती विविध! झाडाझुडपांचा गर्द हिरवा, नवीन पालवीचा कोवळा हिरवा, डोंगर-पठारावर व्यापलेल्या गवताचा पोपटी हिरवा, जीर्ण पानांचा वाळका हिरवा, शेवाळ्याचे भस्म फासलेल्या दगडाचा शेवाळी हिरवा. अगदी "ऋतू हिरवा, ऋतू बरवा" सारखाच. निसर्गाला, कवीमनाला साद देणारा असा हा पावसाळा. ह्याच्या पहिल्या सरींचे तर सगळ्यांना अप्रुप. पहिल्या पावसाच्या आगमनानंतर येणारा मातीचा सुगंध तर कोणत्याही कृत्रिम सुगंधापेक्षा अधिक सुंदर असतो. अगदी "जाई जुईचा गंध मातीला आला" या गीताप्रमाणेच.

आभाळात आले काळे काळे ढग,
धारा कोसळल्या निवे तगमग
धुंद दरवळ धरणीच्या श्वासांत,
आला पाऊस मातीच्या वासात,
मोती गुंफीत मोकळ्या केसांत.

वरील फोटो व त्या खालचा मजकूर जिप्सी कडून.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सायली : तीच्या घरीच्या बागेचे फोटो दे ना.+++ हायला हे मझ्या लक्षातच आलं नाही...
लवकरच टाकते फोटो....

जागु, नविन भाग लवकर येऊ देत..:)

hello...

रानू.. कुंडीत लावलेय का ? माती कमी पडत असेल. पावसाळ्यात एखादे पान दुसर्‍या कुंडीत किंवा जमिनीत खोचा.
नक्कीच जोमाने वाढेल.

आज एका म्यूझियमला भेट दिली.. आणि ते होते साखर या विषयाला वाहिलेले... इथे नजर पोहोचेपर्यंत उसाची शेते आहेत. फोटो तर भरपूर काढलेत... पण अजून बर्‍याच ठिकाणी जायचे आहे.

साधना, जागू, जिप्स्या... १९ तारखेला दुपारी ३ ते ५ भेटूया का ? मला संध्याकाळी ७ वाजता डॉक्टरांना भेटायचे आहे.
१८ तारखेला संध्याकाळी ७ वाजता, दादर, शिवाजी पार्क, जिप्सी जवळ !

आपण कसं थोडा वेळ शिल्लक आहे तर एखादे जवळचे प्रेक्षणीय ठिकाणाला भेट देऊन येतो तसे दिनेशदा एखाद्या देशाला भेट देऊन येतात. Wink

नवीन वाय फाय आणि माझं आय पॅड यांचं काही जमत नाहीये. खूप लिखाण आणि फोटो पेन्डिंग. :रागः

आता इथेच डकवते काही फोटो.
मुपो हलशी...........

भारतीय पुरातत्व खात्याकडे आता हा परिसर आहे. त्यांच्या उत्खननात ही राधा कृष्णाची मूर्ती मिळाली.
गुर्जींच्या हलशी फोटोत हे पाहिल्याचे आठवत नाही Proud

घराचा दर्शनी भाग(ज्या घरात आम्ही गेलो होतो)

मुर्ती अतिशय सुंदर. इतकी वर्षे जमिनीखाली असल्याने अगदी पुर्ण रुपाने उभी आहे Happy

शेवटच्या दरवाज्याची फ्रेमही भारी आहे. जुन्या काळी जेव्हा भिंती तिन तिन फुट जाड असायच्या तेव्हा असायचे असे फ्रेमवाले दरवाजे. माझ्या आजीच्या घरातही एका दरवाज्याला अशीच फ्रेम आहे.

राधाकृष्णाची मुर्ती काय सुंदर आहे!!!

उत्खननात सापडलेल्या मुर्ती नेहमी तुटक्या, खडबडीत असतात असा माझा समज होता आतापर्यंत. ही तर फारच नीटनेटकी राहिलेली आहे! ज्यांची होती त्यांनी जपून ठेवलेली असावी.

सुप्रभात.

हो दिनेशदा १९ ला ३ ते ५ या दरम्यान भेटूया आपण सगळे. जिप्स्या, साधना, पलक, उजू ही नावे नक्की आहेत. अजून कोण येणार आहे वाशीला ?

पुढचा धागा लवकरच काढण्यात येईल. उद्या संकष्टी च्या मुहुर्तावर काढूया का? शोभा ने सांगण्या आधीच मी सांगते Lol

जागु, त्याच्या आधी थोडे भेटलो तर जेवणासाठी भेटता येईल. अर्थात तु, उजु इत्यादी लांब राहणा-या मंडळींच्या सोयीची वेळ निवडुया. मला व जिप्स्याला कुठलीही वेळ चालेल.

सायली, निशीगन्ध लावल्यावर किती दिवसात पहिले फुल येते?
मी लावला आहे. दोन महिने झालेत. पण अजुन दाण्डा नाहि आलाय.
- सुरुचि

सुदुपार,
अच्छा दिनेश दा मॉरिशियस मधे आहात...

मनुषी ताई, राधाकृष्णाची मुर्ती काय रेखीव आहे! आणि ते जुन घर ही खुप छान आहे..
मला आमच्या जुन्या घराची आठवण झाली..

मंजु ताई, तुम्हाला पण नक्की देईन बिया....

सुरुचि, निशीगंधाला पावसाळ्यात जास्त बहर असतो... झाड कीती मोठ आहे त्यावर पण अवलंबुन आहे..

जागु परत गटग.... व्वा!
उद्या पासुन नविन धागा .... छानच.. Happy

सायली, मी आत्ताच लावला आहे. २ महिने झालेत. कन्दातुन पाने आली आहेत वर. पण अजुन दाण्डा नाही आला. त्याला किती वे़ळ लागेल?

Pages