निसर्गाच्या गप्पा (भाग २०)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 5 June, 2014 - 05:56

निसर्गाच्या गप्पांच्या २० व्या भागाबद्दल सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन तसेच पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज पर्यावरण दिनाच्या शुभ मुहुर्तावर पर्यावरणाचे संतुलन राखण्याच्या दृष्टीने आपण आपाअपल्या परीने प्रयत्न करुन ह्या निसर्गाशी जडलेले नाते अजुन वृद्धिगत करुया.

"पा ऊ स" - निव्वळ तीन अक्षरातच त्याच्या कृतीचा भास होतो. "नेमेची येतो मग पावसाळा" असे असले तरी तो प्रत्येकाला हवाहवासा वाटत असतो. ग्रीष्मात "तप्त दिशा झाल्या चारी, भाजतसे सृष्टी सारी" अशी सर्वत्र स्थिती असताना त्याचे आगमन हा एक सुखद अनुभव असतो. तो येतो तेच गारव्याची आणि नवचैतन्याची चाहुल घेऊनच. एरव्ही उजाड वाटणारी धरतीही त्याच्या आगमनाने सुखावते. उन्हाळ्यात ज्या डोंगरावर साधे झुडुपही दिसत नाही तेथे हिरव्यागार झाडाझुडपातून लपंडाव खेळत दुधाच्या सहस्त्र जलधारा वेगाने दरीत झेपावताना दिसू लागतात. "बेरंगसी है बडी जिंदगी, कुछ रंग तो भरो" असे म्हणणार्‍या धरतीला तो आपल्या "हिरव्या" रंगात रंगवून घेतो. बरे या हिरव्या रंगाच्या छटा तरी किती विविध! झाडाझुडपांचा गर्द हिरवा, नवीन पालवीचा कोवळा हिरवा, डोंगर-पठारावर व्यापलेल्या गवताचा पोपटी हिरवा, जीर्ण पानांचा वाळका हिरवा, शेवाळ्याचे भस्म फासलेल्या दगडाचा शेवाळी हिरवा. अगदी "ऋतू हिरवा, ऋतू बरवा" सारखाच. निसर्गाला, कवीमनाला साद देणारा असा हा पावसाळा. ह्याच्या पहिल्या सरींचे तर सगळ्यांना अप्रुप. पहिल्या पावसाच्या आगमनानंतर येणारा मातीचा सुगंध तर कोणत्याही कृत्रिम सुगंधापेक्षा अधिक सुंदर असतो. अगदी "जाई जुईचा गंध मातीला आला" या गीताप्रमाणेच.

आभाळात आले काळे काळे ढग,
धारा कोसळल्या निवे तगमग
धुंद दरवळ धरणीच्या श्वासांत,
आला पाऊस मातीच्या वासात,
मोती गुंफीत मोकळ्या केसांत.

वरील फोटो व त्या खालचा मजकूर जिप्सी कडून.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जराशी आंबट तर कधी मस्त गोड लागते. पिटूकली स्ट्रॉबेरी जिभेवर ठेवताच विरघळते. चव बराच वेळ जिभेवर रेंगाळत राहते. गंध तर काय वर्णावा?

जागूचं इन्सुलिन प्लान्ट अद्भुत. मराठी नावं मस्त! आणि रातराणीही!
नलिनी तू कुठे आहेस सध्या....जंगलात वगैरे गेली होतीस म्हणून विचारते.
सांगलीत या वेळी मुद्दाम विष्णू घाट, सरकारी घाट आणि माई घाट इथे जाऊन आले. पण कृष्णामाईची दुरवस्था बघून गलबलले!
इथून खाली उतरून नदीत पोहायला जात होतो. विष्णू घाट.

इथे मध्यभागी जी जमीन दिसतीये तिथे पोहोताना पायाला कधीच तळ लागला नाही ...आता ही अवस्था...

हे खूप वृद्ध वृक्ष

हा सरकारी घाट.
इथे शनिवारी गुरांचा बाजार भरतो! फार इन्टरेस्टिन्ग दृश्य असते!

हा आयर्विन पूल ब्रिटिशंनी बांधलेला. भक्कम. याच्या खालून (अर्थातच पाण्यातून पोहत) असंख्य वेळा ये जा केली.
आता जेव्हा याच्यावरून जाते तेव्हा खाली पाहिलं की वाटतं ..........................

हा माई घाट...........इथे पडायचे(पोहोण्यातली भाषा) आणि सर्वात शेवटच्या विष्णू घाटावर निघायचे.

आणि हो................अगणित वेळा संपूर्ण पात्रही क्रॉस करत असू. पण आता पात्र रुंदावलंय आणि पाणी कमी झालंय!

पुलाखालच्या या "छज्जां"मधून पट्टीचे पोहोणारे महापुरात उड्या मारायचे.

अश्या खूप आठवणी जाग्या झाल्या. अजूनही इथे पोहोणार्‍यांचे स्त्रिया व पुरुषांचे ग्रुप्स आहेत. पण मी इथे पोहू शकेन असं वाटत नाही. कारण फक्त घाण हेच.

maanuShI, kitI masta g.. mI ajun kadhi vaahatyaa paanyaat pohale naahiy.. swimingpul madhalya dabakyatac pohaley.. aamachyaa gaavi nadi khup lahaan aahe.

मानुषी मस्तच ग.
नलिनी स्ट्रॉबेरीज मस्तच ग. आणि सळसळणार्‍या मित्रांची आधी चाहूल घेत जा.

आमच्याकडे बाहेर साळूंख्यांचा कर्कश्य ओरडण्याचा आवाज येऊ लागला की हल्ली राधाही सगळ्यांना सांगते साप आला साप मोठठा साप. Happy

मनुषी ताई, काय छान फोटोज आहेत.. अणि डायरेक्ट नदीत पोहण आणि अ़ख्खं पात्र क्रोस करण काय थ्रिलिंग
असेल नाही! खुप धाडसी आहात तुम्ही. Happy

नलिनी स्ट्रोबेरीज मस्तच...
हल्ली राधाही सगळ्यांना सांगते साप आला साप मोठठा साप. स्मित ++ कीत्ती गोड ..:)

मनुषी ताई, काय छान फोटोज आहेत.. अणि डायरेक्ट नदीत पोहण आणि अ़ख्खं पात्र क्रोस करण काय थ्रिलिंग
असेल नाही! खुप धाडसी आहात तुम्ही. Happy

नलिनी स्ट्रोबेरीज मस्तच...
हल्ली राधाही सगळ्यांना सांगते साप आला साप मोठठा साप. स्मित ++ कीत्ती गोड .. :)>>>> मम Wink

नलिनी स्टाॅबेरीज मस्त! महाब लेश्वरला गेलो होतो पण स्ट्राॅबेरीज सीजन संपलाय म्हणाले. मानुषी फोटो छान आहेत. भाजीबाग लावायची आहे क्रुपया तद्नानी मार्गदर्शन करावे. कुलरचा ३बाय ५ फुटी कुलरचा टँक माठ व कुंड्या आहेत गच्चीत. कुठल्या मोसमी भाज्या लावाव्या? अजून पाऊस नाही.

मंजु ताई, कुलरच्या टाकीत, लाल भोपळा/ दुधी/ दोडके / कारले लावु शकता.. तसेच कुंडीत, मिरची, टमाटे, कांदे (पाती साठी) आलं,हळद,ओवा, मेथी, कोथींबीर,वांगी, कढीपत्ता इ.लावु शकता....

विडयाचा (खायची पानं) वेल हवा असल्यास तो आहे मझ्या कडे...

नलिनी ताई.. स्टाॅबेरीज मस्तच.

मानुषीताई.. फोटो छान आहेत..

केशर - मावा या किडीवर तंबाखुच पाणी फवारणे हा एक उपाय आहे. मला वाटतं दिनेशदा किंवा शशांकदा यांनी हा उपाय सांगीतला आहे. मी माझ्या जास्वंदीच्या झाडावर हा उपाय केला आहे.

देवकी, नलिनी, गौराम्मा धन्यवाद प्रतीसादाबद्दल !

देवकी खुप किड लागली आहे त्या फांद्या कापुन टाकते. पुर्णपणे कापायला जीवावर आलेय. नुकतेच रोपटे मस्त वाढु लागले होते. पाऊस चालु झाला आणि ऊन नाही म्हणुन ही किड येते. गेल्या वर्षी पण किडीने त्रास दिला होता.

नलिनी स्ट्रॉबेरी , हरीण, ससे (हेअर), हेजहॉग ..मस्तच !
पांढरी किड आहे व बरोबरीने केशरी अंडी व तपकिरी किटक पण आहेत. बघते कडुनिंबाचे पाणी वापरुन.

गौराम्मा तंबाखुच पाण्याने अपाय नाही का होणार झाडाला?

जागु रातराणी छानच ... इन्सुलिन प्लांट आमच्याकडे पण लावलेय. भरभर वाढत जाते. फुल सुंदर दिसतेय. मी पण वाट बघतेय फुल यायची.

मानुषीताई छान फोटोज.

केशर
माझ्याकडच्या कढीलिंबावर असा मावा पडला होता, त्यावेळी हळदीचे पाणी फवारून उपयोग नव्हता झाला.शेवटी तळापर्यंत फांद्या कापल्या.नंतर चांगली पाने आली.महिनाभरआधी त्याच्या पानांवर काळे ठिपके पडून पाने चुरडल्यासारखी झाली होती.एकही पान मी वापरू शकत नव्हते.पण यावेळी मी दुर्लक्ष केले.नंतर पाहते तो काय
मस्त पाने आली आहेत.तंबाखूचे पाणी लक्षात ठेवायला हवे.
माझ्याकडच्या मिरच्यांना,टॉमेटोला फुले येऊन गळून चालली आहेत.काय करावे लागेल?

मानुषी, आपण भेटलो होतो तेव्हा तुम्ही घाटाबद्द्ल, पोहण्याबद्दल सांगितलं होतं. फोटो पहाताना आपल्या गप्पा आठवल्या आणि जरावेळ वाटले की मी नगरमधेच आहे.
गौराम्मा, नलिनीच म्हणा. Happy

पावसाळी लिली...
नावच पावसाळी लिली असल्यामुळे ८-९ महीने फक्त तीची निगा राखायची आणी एकदा का पाऊस सुरु झाला की असं भरभरुन दान आपल्या पदरात टाकते....

६/७/२०१४
rain lily1.jpgrain lily2.jpg

७/७/२०१४
rain lily4_1.jpg

८/७/२०१४
rain lily8.jpg

गौराम्मा, खुपच सुंदर प्रची
रच्याकने तंबाखुच्या पाण्याने अपाय होत नाही. हवे तर रोज थोडे थोडे माईल्ड रुपात शिंपडा.

काल मी गेले होते गटगला. मी, सई, शोभा, गीरी वगैरे आले होते. मला लवकर घरी येणे गरजेचे होते म्हणून लवकर निघावे लागले. पण खूप छान गप्पा मारता आल्या. लगेच १० च्या गाडीने दिनेशदांना कोल्यापुर ला जायचे होते. आज देवरूख, रत्नागिरि आणि परत....... बापरे कसलं बिझी शेड्युल असतं त्यांच.

गौराम्मा - पावसाळी लिली अस> नाव आहे का या फुलांचं? मस्तच, मी पाहिली आहेत पण नाव माहित नव्हते.

जागू- मध भारी आहे, पोळेसुद्धा

काल १६ कॅकटसच्या प्रकारातली ब्रह्मकमळ नावाने ओळखणारी फुले फुलली होती. मस्त मंद सुगंध दरवळत होता.
१)

२) राधा हे कळे पाहून चिंबोरा म्हणत होती. Lol

३)

४)

५)

६)

७)

८)

९)

सगळे फोटो मोबाईल वरून काढले आहेत.

ए पण फोटो लै भारी आहेत हा..

आणि तु मला दिलेल्या ब्रम्हकमळाच्या दोन्ही पानांना मस्त फुटवे आलेले, छान वाढत होते व्.व. आणि मग एके दिवशी मी सगळ्या कुंड्या काढुन त्या नीट करत बसले आणि मी तयार करत असलेला कचरा बाई टाकत बसली त्यात तिने ती दोन्ही पानेही टाकली. दुस-या दिवशी परत एकदा कुंड्यादर्शन करत अस्ताना माझे ब्रम्हकमळ कुठे गेले म्हणुन शोधाशोध केली तेव्हा लक्षात आले.. आता परत पान शोधणे आले

Pages