पावसाळा आला आहे. आता कोणत्याही क्षणी भारतात मॉन्सून, व सर्वत्र पावसाच्या कविता सुरू होतील. आम्हाला पावसाबद्दलच्या कवितांचा काही प्रॉब्लेम नाही. मात्र त्याला दिल्या जाणार्या त्याच त्याच उपमांना घाबरून आम्ही वैचारिक छत्री मे महिन्यापासून उघडून बसलो आहो. हा प्रॉब्लेम पावसापुरता मर्यादित नाही. उपमांपासून भले भले सुटलेले नाहीत. "प्रेमाला उपमा नाही, हे देवाघरचे लेणे". असे कोणीतरी गाण्यात म्ह्णताना उपमा नाही करत करत पुलंच्या रावसाहेबांच्या शिवीप्रमाणे पुढच्याच ओळीत एक निसटली आहे हे त्यांच्याही लक्षात आलेले नसावे. तसेच उपमांप्रमाणेच ठोकळेबाज वाक्ये व घटनांचाही सध्या कथांमधे प्रादुर्भाव झाला आहे. कथांमधल्या ठराविक घटनांमधे लोक स्वतंत्र विचार न करता आधीच्या तसल्या(१) कथा वाचून तशीच वाक्ये पुन्हा बोलतात. त्यालाही वेळीच आवर घालणे आवश्यक आहे. त्यामुळे त्याचाही येथे समावेश करण्यात आलेला आहे.
तर एकूण या उपमा(२) व ठोकळेबाजपणापासून समाजाला वाचवणे गरजेचे आहे. परत परत येणार्या त्याच त्याच उपमा म्हणजे जणू परत परत येणारी...<येथे आम्ही उपमा देण्यापासून स्वतःला आवरले आहे. Be the change you want to see in the world असे एक थोर माणून म्हणून गेला आहे>.
तर यानिमित्ताने मराठी साहित्यात वादळाप्रमाणे तुफान बोकाळलेल्या काही उपमांवर व ठोकळेबाजपणावर काही काळाकरिता तरी बंदी घालावी अशी मागणी आम्ही मराठी पद्य व गद्य लेखन परिषदेस करत आहो. काही ठळक उदाहरणे. वाचकांनी अजून द्यावीत ही विनंती:
१. "आज एक माणूस रागावलंय हं!" हे वाक्य कोणीही कोणालाही उद्देशून म्हणायला कोणत्याही माध्यमात बंदी हवी. पुढच्या शतकात मराठीची स्टाईल बदलेपर्यंत. लेखकांना योग्य पर्याय सापडला नाही तर ती रागावलेली व्यक्ती तशीच रागावलेली राहूदेत.
२. "अगं वेडाबाई.." ने चालू होणारी वाक्ये नवर्याने बायकोला किंवा प्रियकराने प्रेयसीला म्हणायला बंदी. विशेषतः आख्खी कथा तिने त्याच्याबद्दल काहीतरी 'लेम' गैरसमज करून घेतल्यामुळे घडल्यावर खुलासा करताना.
३. सध्याच्या सीझन मधे हा मुद्दा तर फारच लौकर तुंबलेल्या पाण्याच्या पाईप्स प्रमाणे साफ करायला हवा:
- पावसाला प्रियकराची उपमा द्यायला पुढची काही वर्षे बंदी. "जस्ट फ्रेण्ड" नावाची म्हंटले तर चालू, म्हंटले तर निरूपद्रवी उपमा काही दिवस चालेल. उलट पुढची काही वर्षे पावसाला प्रेयसीची उपमा देणे बंधनकारक राहू द्यावे.
- मी/ती धरित्री, तो आकाश/पाऊस्/ढग या उपमेला त्याहीपेक्षा जास्त वर्षे बंदी.
- ध्ररतीला हिरवा शालू वगैरे नेसवायला मनाई आहे. तिला मॉडर्न होउ दे जरा. पाचू, मोती वगैरे वैचारिक बँकेच्या लॉकर मधेच राहूदेत काही दिवस.
४. "कॉलेजची ती रंगीबेरंगी वर्षे फुलपाखरासारखी" उडून जायला बंदी. एवढी त्या सृष्टीची हौस असेल तर कोष, सुरवंट वगैरे दुर्लक्षित उपमा वापराव्यात.
५. कथेचा नायक, नायिका कॉलेजमधे असेल तर त्याला कमाल एकाच विषयात प्रावीण्य देता येइल. ते नक्की कोणत्या विषयात प्रावीण्य द्यायचे आहे ते ठरवावे. कोणत्यही विषयातील नोट्स वगैरे एकमेकांना द्यायला सक्त मनाई.
६. कोणावरही 'मनोमन' प्रेम करायला बंदी.
७. "मी स्वप्नात तर नाही ना?" असे कोणीही कोणालाही विचारायला बंदी.
८. भारतातली बरीचशी जनता चहा पीत असताना नायक व नायिका जरा भिजले की तिने "तो फ्रेश हो, मी तोवर छानपैकी कॉफी करते" असे म्हणणे टाळावे.
९. ती मनस्वी, स्वच्छंद, तर तो प्रॅक्टिकल असेल, तर दोघांना वेळीच सावध करून जस्ट फ्रेण्डच राहू द्यावे
१०. "तिने निळ्या रंगाची झिरझिरीत...." पासून सुरू होणारे वाक्य पुढे कितीही संस्कृतीप्रधान असले तरी टाळावे.
११. कथेत कोणत्याही प्रसंगात एका वेळी एकालाच "स्वर्गसुखात नाहता" येइल. या सर्व प्रसंगांमधे पाहिजे तर पुढची काही वर्षे "तेथे दोन फुले एकमेकांवर आपटली" हे दुसर्या एका उपमासृष्टीतील वाक्य वापरावे.
असो. इतर अनेक लिस्ट वाल्या कायद्यांतील तरतूदींप्रमाणे ही लिस्ट "एक्झ्हॉस्टिव्ह" नाही. पण येथील वाचक सहकार्य करून ती जास्तीत जास्त वाढवतील अशी आशा आहे.
(१) तसल्या म्हणजे तसा प्रसंग असलेल्या इतर कथा. "तसल्या" म्हंटल्यावर जे डोळ्यासमोर येते तसल्या नाहीत.
(२) खाण्याच्या उपम्याबद्दल आम्हाला काही राग नाही. मात्र तो ही ठोकळेबाज नसावा.
फारएण्डा, इथल्या सर्व
फारएण्डा,
इथल्या सर्व सूचनांना
सूसंगतपणे एका एक्सेल फाईलमध्ये
संकलीत करून
ती छापून घेऊन
तो नवनीत मार्गदर्शक समोर ठेऊन
तमाम लेखक लिहू लागतील...
... आणि मग
काही कालावधीनंतर
तुझा आणखी एक
लेख मायबोलीवर छापून येईल
उपमाविरहीत नीरस लेखनाविरुद्ध चळवळः भूमिका!
गजानन -
गजानन -
क्लिशे नावाचा ठोकळा - Cliché
क्लिशे नावाचा ठोकळा -
Cliché या शब्दाचा उगमही रोचक आहे -
The word cliché is drawn from the French language. In printing, a cliché was a printing plate cast from movable type. This is also called a stereotype. When letters were set one at a time, it made sense to cast a phrase used repeatedly, as a single slug of metal. "Cliché" came to mean such a ready-made phrase.
Many authorities say that the French word "cliché" comes from the sound made when the molten stereotyping metal is poured onto the matrix to make a printing plate, including the statement that it is a variant of cliquer, "to click" though some authorities express doubt.
(येथून - en.wikipedia.org/wiki/Cliché)
अवांतर - या पार्श्वभूमीवर लेले आडनावाच्या व्यक्ती आपल्या नावाचा शिक्का केवळ 'ले' एवढाच बनवून दोनदा वापरतात, हा विनोदही आता शब्दशः क्लिशे म्हणावा लागेल
शब्दशः क्लिशे म्हणावा लागेल
शब्दशः क्लिशे म्हणावा लागेल <<< अक्षरशः ही म्हणता येईल.
@गजानन - अगदी अगदी
@गजानन - अगदी अगदी
सॉरी पण मला लिंटी काय लिहितात
सॉरी पण मला लिंटी काय लिहितात ते कळतच नाही कधीकधी नव्हे बर्याच्दा.
>> तुम्हाला कळत नाही? अहो त्यांन्ना ही कळत नाही आपण काय लिहितोय ते तर तुम्ही किस झाडकी पत्ती ! ::फिदी:
वर्दातै, लिंबू त्याहून
वर्दातै, लिंबू त्याहून प्राचीन आहे... तुझ्या संशोधनात उपयोगी होईल इतका प्राचीन कदाचित
>>>
लिम्ब्या प्राचीन , त्याची मते तर अतिप्राचीन ....::फिदी:
धमाल धागा आहे हा बोटाशी
बोटाशी चाळा करणे, आल्या आल्या फ्रेश होणे, ( सोफ्यावर) अंग टाकणे- -- बॅन
किरमिजी रंगा चा /ची शालू, पैठ णी, बनारसी --- बॅन
ट्रेनने स्टेशन सोडणे, विमानाने आकाशात झेप घेणे... बॅन
एकीकडे कुकर लावणे आणि दुसरी कडे पोळ्या कराणे , कुकरच्या शिट्टीने / फोनच्या रिंग ने / दारावरच्या बेल ने भानावर येणे -- बॅन
विकु!! नंदन
विकु!!
नंदन
फाईव्ह स्टार हॉटेलात रुबाबात
फाईव्ह स्टार हॉटेलात रुबाबात ऑर्डर....>> रंगीला मधला अमीर आठवला!!
<<< झकासराव | 30 June, 2014 -
<<<
झकासराव | 30 June, 2014 - 02:11
लेख शेर आहे आणि प्रतिसादानी त्यात अजुन पावशेर मजा आणली आहे. स्मित
>>>
काही प्रतिसाद पावशेर घेऊन लिहिल्यासारखेच वाटताहेत
किरमिजी रंगा चा /ची शालू, पैठ
किरमिजी रंगा चा /ची शालू, पैठ णी, बनारसी --- बॅन>>>>
किरमिजी रंगाचं काय पण बॅन केलं तर माचूपिचूवरचा देव रागावेल ना?
>> कुकरच्या शिट्टीने /
>> कुकरच्या शिट्टीने / फोनच्या रिंग ने / दारावरच्या बेल ने भानावर येणे -- बॅन
हो हो!
तोंडावर आलेले केस मागे
तोंडावर आलेले केस मागे सारताना हाताची कणिक केसांना, गालाला लागलेली दाखवणेही बाद.
नंदिनी, मला तर किरमिजी रंग
नंदिनी, मला तर किरमिजी रंग प्रत्यक्षात कसा दिसतो तेच माहित नाहिये :फिदि:
माचूपिचूच्या देवाला हरणाचा
माचूपिचूच्या देवाला हरणाचा नैवेद्य दाखवलेल्यांना किरमिजी रंग दिसतो बाकीच्यांना नाही. कळ्ळं?
सूर्योदय, सूर्यास्ताची वर्णनं
सूर्योदय, सूर्यास्ताची वर्णनं पण घाला वरच्या यादीत.
वरदा, म्हणजे तो सहस्ररश्मी
वरदा, म्हणजे तो सहस्ररश्मी हिरवीगार शाल पांघरलेल्या धरतीचा निरोप घेताना विरहाने व्याकुळ .... वगैरे का? पण सध्या सूर्योदय व सूर्यास्त वाल्यांनी दीर्घ उकार वापरला तरी समाधान मानावे अशी परिस्थिती आहे
हे ठराविक उपमा आणि
हे ठराविक उपमा आणि ठोकळेबाजपणाविरूद्ध आपली बुद्धिमत्ता पणाला लावणार्या माबोकरांनो,
हे सग्ळं सग्ळं सोडायचे आहे तर नविन उपम्याची रेसिपी आणि अठोकळेबाज वाक्यरचना शोधून काढायला हवी.
कोण बरे हा नवौपमाखंड लिहायला सहाय्य करिल? कोणबरे मायमराठीची माबोकरांच्या आक्षेपांमुळे रिती झालेली झोळीभरून देईल?
या, असे पुढे या आणि लेखातल्या पहिल्या ठोकळ्या आणि पहिल्या उपमांपासूनची नवी रेसिपी लिहा.
१. आज एक माणूस रागावलंय हं- ?
२. अगं वेडाबाई- ?
चला तर मग!
आज एक माणूस रागावलंय हं-
आज एक माणूस रागावलंय हं- ?>>>> ए उगाच नाटकं करु नकोस (हे हसत हसत म्हणणे).
अगं वेडाबाई- ? >>>> माठच आहेस (हे टपलीत मारुन म्हणावे)
नायिकेला थोरलं करू नका, केलंच
नायिकेला थोरलं करू नका, केलंच तर बाप मारू नका, मारलाच तर भावंड नकोत, त्यांची जबाबदारी नको. मग ती लग्न न करता कुटूंबासाठी त्याग नको... उलटणारी भावंड नकोत. एकटे पणा नको. तिच्यासाठी खपणारा तिचा प्रियकर ( लग्न न करता) वाट पाहणारा (आयुष्यभर) नकोच नको.
हिरॉईन गोड गाणारी नको. डॅन्स करणारी चालेल. गजरे माळणे नको नको. उतम स्वयंपाकी नको. उच्च अभिरूची संपन्न नको, सामान्यच दाखवा... उगिच कर्णाचा किंवा कृष्णाचा अवतार नको.
सहस्ररश्मी हिरवीगार शाल
सहस्ररश्मी हिरवीगार शाल पांघरलेल्या धरतीचा >>> हिरव्या शालूची शाल झाली का आता?
आज एक माणूस रागावलंय हं- ?>>>> या ऐवजी काही म्हणायची गरज नाही. वर दुसर्या माणसाने पण रागवावं म्हणजे फिट्टंफाट!
अगं वेडाबाई- ? >>>> माठच / बावळटच आहेस (हे टपलीत न मारता म्हणावे)
आज एक माणूस रागावलंय हं-
आज एक माणूस रागावलंय हं- ?>>>> या ऐवजी "आज अर्ध (वट) माणुस रागावल्य ह"
अर्ध अगं वेडाबाई- ? मंद (हे
अर्ध
अगं वेडाबाई- ? मंद (हे ऐकून आणि वापरून पण झालंय प्रत्यक्ष...उगाच नाही पुरावा आहे ;))
सिमन्तिनी
सिमन्तिनी
साती, १. आज एक माणूस रागावलंय
साती,
१. आज एक माणूस रागावलंय हं- ? = घुम्यासारखी काय बसलीयेस? बाप मेला का तुझा! (बिगरी ते म्याट्रिकमधून साभार)
२. अगं वेडाबाई- ? = हाड तिच्यायला! (हे मात्र माझंच)
आ.न.,
-गा.पै.
अरे दुष्टऽऽ जालकर्यांनो,
अरे दुष्टऽऽ जालकर्यांनो, छापील माध्यमात लिहिणार्यांच्या क्लिशांची चेष्टा करता होय! बिचारे काहीबाही लिहून पोट जाळत असतात, त्यांच्या पोटावरच पाय आणायला निघालात काय? मग तुमच्या ठराविक उपमा आणि ठोकळेबाज प्रतिक्रियांचं काय? आँ?... आँ?... तुम्हाला पण एक लिष्ट लिहून देऊ काय? घ्याच तर मग!...
***
इंग्रजी वाक्प्रचारांचे सहीसही भाषांतर करून पाडलेल्या नवीन शब्दांवर बंदी आली पाहिजे. 'रच्याकने' वगैरे शब्द वापरणार्याच्या श्रीमुख, पाठ किंवा इतर कुठल्याही संवेदनशील अवयवावर एकच 'कच्याकने' देण्यात यावी. 'दिवे घ्या' लिहिणार्याला चौदा दिवस वनवासात जावे लागेल. 'ह. घ्या' लिहिल्यास चौदा दिवस वनवास आणि एक दिवस अज्ञातवासात जावे लागेल.
कुठलीही पाककृती 'तोंपासु' असण्यावर सक्त मनाई आहे. खालून चौथ्या फोटोतल्या तर्रीच्या लालभडक तवंगाला 'जानलेवा' असण्याची मनाई आहे. 'चिंगीटले तुझ्याकडे आलं पाहिजे एकदा जेवायला' असे ठोकळेबाज प्रतिसाद टाकल्यास त्या व्यक्तिवर संपूर्ण मायबोलीला माबोजेवण देण्याची जबाबदारी येऊन पडेल.
+१, +२, +३, +१११, -१७६० असले गणिती प्रतिसाद देणार्यांना क्ष*(३.१४+१२(य-४.२०)*३) = झ*९.११ तर क्ष = किती?, या प्रश्नाचे तोंडी उत्तर द्यावे लागेल. उत्तर चुकल्यास जेवढ्या अंकानी उत्तर चुकले आहे तेवढेच फटके त्या व्यक्तिच्या तळहातावर मारण्यात यावेत.
वयाची तीस वर्षे पूर्ण झालेल्या कुठल्याही पुरुषास 'या'कारान्त शाळकरी आयडी घेऊन येण्याची मनाई आहे (नंद्या/मंद्या/चिन्या वगैरे). तसेच पंचवीशी उलटलेल्या आणि/किंवा दीडदोन अपत्यांची माता बनलेल्या कुठल्याही स्त्री सदस्येला 'ऊ'कारान्त आयडी घेता येणार नाही (छबू/मनू/चिकू ई.) तसे केल्यास अशा सर्व स्त्रियांना 'सत्यभामाताई' अशी कॉमन आयडी देण्यात येईल. तसेच त्यांना आपल्या वयाच्या दाखल्याची प्रत स्कॅन करून अपलोड करावी लागेल.
याखेरीज कुठल्याही विनोदी लेखकास उद्देशून 'कहर आहेस/साष्टांग नमस्कार्/लोल/_/\_/कसं सुचतं रे' वगैरे लिहिल्यास एक हात पाठीमागे घेऊन १०८ साष्टांग नमस्कार घालण्याची शिक्षा देण्यात येईल.
सेंटिमेंटि कथा/कविता वाचून नि:शब्द होण्यावर/हूरहूर लागण्यावर तातडीची बंदी लागू केली आहे.
सध्या इतकेच. आणखी कल्ला करत राहिलात तर अजून नियम देईन
(इथे मास्तरांनी टेबलावर खाडखाडखाड पट्टी आपटल्याचा आवाज कल्पावा)
किर्मिजी म्हणजे मायबोलीचा
किर्मिजी म्हणजे मायबोलीचा यावर्षीचा लेडीज टीशर्ट चा रंग , थोडा मरुन च्या आसपास जाणारा असा माझा समज आहे , ज्यांना करेक्ट शेड माहितेय त्यांनी शेड टाका
किर्मिजी म्हणजे इंग्रजी
किर्मिजी म्हणजे इंग्रजी मधल्या Crimson रंगावरून आलाय का?
किरमिजी म्हणजे इंग्रजीत
किरमिजी म्हणजे इंग्रजीत Crimson.
कृमि-ज (संस्कृत) - अरेबिक qermez/तुर्की kırmızı (पहा - पामुकचे 'माय नेम इज रेड' = benim adim kirmizi) - स्पॅनिश Carmesí - इंग्रजी Crimson असा एकंदरीत प्रवास असावा.
Pages