
आयपीएल चा जोर ओसरला ........
आता फुटबॉल विश्वचषक जोश सुरु झाला....
फुटबॉल विश्वचषक २०१४ ला १२ जुन पासुन ब्राझील इथे सुरुवात होत आहे .. यंदा ब्राझील तर्फे रोनाल्डो, रिव्हाल्डो, रिव्हाल्डिनो, रोनाल्डोनो, काका हे नाहीत ... त्यांच्याजागी नेयमार ज्यु., ज्युलियो सीझर, फ्रेड, ऑस्कर, फर्नान्डिन्हो सारखे नव्या दमाचे खेळाडु तयारीत आहे. ब्राझील यंदा यजमान असल्याने घरच्या मैदानावर त्यांची कामगिरी सरसच होईल ही आशा आहे
त्याच बरोबर इंग्लंड चा रुनी, अर्जेंटीनाचा मेस्सी, पोर्तुगाल चा रोनाल्डो यासारखे अनुभवी आणि कर्तबगार खेळाडु देखील असणार आहे.
आठ गृप मधे प्रत्येकी ४ संघ आहे म्हणजे ३२ संघ यात भाग घेतील ...
दर वेळेला कोण ना कोण तरी डार्क हॉर्स संघ म्हणुन पुढे येत असतो यंदा तो मान मिळवण्यास कॅमेरुन , घाना, क्रोशिया सारखे संघ नक्कीच उत्सुक्त असतील..
या वेळेला जो फुटबॉल वापरण्यात येणार आहे तो आतापर्यंतचा अत्यंत आधुनिक आणि प्रचंड टेक्नोलॉजी वापरुन बनवलेला आहे.. मागच्या द. आफ्रीकेच्या स्पर्धेत "जाबुंलानी" या बॉल वर बरीच टिका झालेली ती चुक परत होउ नये म्हणुन यावेळेच्या बॉल वर बरेच कष्ट घेतलेले आहेत . यंदाच्या फुटबॉल चे नाव आहे "ब्राझुका" . यात खास बाब म्हणजे या फुटबॉल मधे ६ कॅमेरे लावलेले आहे ज्यातुन दृश्य घेतली जाउ शकतात. ब्रॉडकास्टिंग मधे जबरदस्त ३डी दृश्य मिळतील .
करुया सुरुवात ..!!!!!!
मॅचेस बर्याच असल्याने ..... इथे वेळापत्रक फार मोठे दिसेल .
http://www.fifa.com/worldcup/matches/index.html
त्यापेक्षा वर लिंक दिलेली आहे .. आणि २-३ दिवसांच्या मॅचेस ची माहीती इथे देत जातो..
Tuesday 24 June

फिफा फँटसी लीग : http://en.mcdonalds.fantasy.fifa.com/leagues/my
नाव :- MAAYBOLI
पासवर्ड :- 12345
ब्राझील थोड्क्यात बचावले.
ब्राझील थोड्क्यात बचावले. चिलीच्या खेळाडूंनी थोडा बुजरेपणा दाखवला पेनल्टीज घेताना. पण पुढचा रस्ता सोपा नाही एवढी जाणिव तरी ब्राझीलला नक्की करून दिली आहे चिलीने.
आक्रमणातला वेग व समन्वय,
आक्रमणातला वेग व समन्वय, 'इंटरसेप्शन व टॅक्लींग', याबाबतींत चिलीचा संघ आज तरी ब्राझीलपेक्षां सरसच वाटला. नेमारपेक्षां चिलीचा सांचेझही भेदक वाटला. गोलरक्षक व प्रेक्षकांच्या शुभेच्छा यामुळे आज ब्राझील जिंकला ! बॅड लक अँड वेल्-प्लेड, चिली !!
नेयमार ने शेवटची पेनल्टी
नेयमार ने शेवटची पेनल्टी गोलपोस्टात मारली आणि सामना फिरवला...
शेवटची पेनल्टी जोरा ने जरा जास्तच जोरात मारली आणि चिली को मिर्ची लगी
<< नेयमार ने शेवटची पेनल्टी
<< नेयमार ने शेवटची पेनल्टी गोलपोस्टात मारली आणि सामना फिरवला...>> शेवटच्या पेनल्टीपर्यंत चिलीने ब्राझीलला लढवलं/ रडवलं हेंही तितकंच महत्वाचंच !!!
जबरदस्त शेवट नेदरलँड -
जबरदस्त शेवट नेदरलँड - मेक्सिको. २-१.
काल ब्राझील आज नेदरलँड, थोडक्यात बचावलेत.
मेक्सिको दोन मिनिटे दूर होतं विजयापासून. स्नायडरने अफलातून गोल मारून बरोबरी केली. एक्स्ट्रा टाईममध्ये मेक्सिकोने मात्र पेनल्टी अक्षरशः फुकटात दिली. मार्केझला फाऊल करायची काही गरज नव्हती. बॉल आणि रॉबेन दोघेही गोलपासून दूर चालले होते आणि अनेक मेक्सिकन खेळाडू बचावाला हजर होते.
हार्टब्रेक फॉर मेक्सिको
पहिले तिन्ही निकाल
पहिले तिन्ही निकाल अपेक्षेनुसार लागले.. आजची दुसरी मॅच बघायची आता.. ग्रीस नेहमीप्रमाणे रटाळ खेळखेळून जिंकतात की कोस्टारिका त्यांचा धडाका चालू ठेवतात.
<< पहिले तिन्ही निकाल
<< पहिले तिन्ही निकाल अपेक्षेनुसार लागले.. >> पेनल्टीवर कां होईना पण कोस्टारिकाही पुढच्या फेरीत.
आज फ्रान्स वि. नायजेरिया ! नायजेरियाला दुखापतींनी हैराण केलं असलं तरी मुसा आणि कं. फ्रान्सला सहजासहजीं मात्र जिंकू देणार नाहीत, हें नक्की. प्रेक्षणीय व्हावी ही मॅच अशी अपेक्षा आहे. बघूं.
राजाचा रंक कसा होतो याचे
राजाचा रंक कसा होतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे मॅक्सिको......संपुर्ण खेळात ८८ मिनिट मॅक्सिको चे वर्चस्व होते..त्यांच्या गोलकि ने सुध्दा उत्तम बचाव केलेला परंतु शेवटचे २ मिनिट ढिलाई प्रचंड महागात पडली...
..
..
पुढचे तीन निकाल पण अपेक्षित
पुढचे तीन निकाल पण अपेक्षित आले.. फ्रान्स अगदी शेवटी जोरात खेळून जिंकले.. तिथे नायजेरियाचा बचाव थोडासा ढिला पडला आणि मॅच फिरली.. एक्स्ट्रॉ टाइम मधे गेली असती तर निकाल उलटा लागला असता..नायजेरियाच्या गोलकिपरने सुरेख कामगिरी केली पण जो पहिला गोल झाला तिथे त्याचीच चूक होती. गोल सोडून किती पुढे आला होता.. आणि बॉल पण पूर्ण क्लियर करता आला नाही त्याला.. आणि दुसरा गोल तर स्वयं गोलच झाला..
आज बघायचे आता.. क्लिन्समनची
आज बघायचे आता.. क्लिन्समनची अमेरिका बेल्जियमला हारवते की नाही ते.. नाहीतर युरोप आणि दक्षिण अमेरिका अश्या खंडातच उपांत्य पूर्व सामने होणार..
काल नायजेरिया चेंडूचा ताबा
काल नायजेरिया चेंडूचा ताबा स्वतःकडे ठेवण्यात यशस्वी होत असले तरीही फ्रान्स आक्रमणाच्या बाबतीत खूपच अधिक भेदक वाटत होते. नायजेरियाच्या अफलातून गोलरक्षणामुळे त्यानी दोन गोल वाचवले. शिवाय, फ्रान्सचा एक चेंडू गोलपोस्टला लागून अगदीं गोल लाईनच्या किंचित बाहेर पडला व एक सुंदर 'लाँग शॉट' तर गोलपोस्टला आपटून परतला. काल फ्रान्स नक्कीच सरस संघ वाटला व नायजेरियाच्या खेळात त्यानी अर्जेंटीना विरुद्ध दाखवलेला जोष, समन्वय व जिद्द याची कमतरता जाणवली.
थोडक्यांत, कालही फ्रान्स व जर्मनी [ अल्जेरिया विरुद्ध २-१ ने विजयी] या अपेक्षित संघानीच आगेकूच केलंय.
काल नायजेरीया फ्रान्स मस्त
काल नायजेरीया फ्रान्स मस्त मॅच झाली.
शेवटी शेवटी आक्रमणास धार चढलेली.
नायजेरिया अनपेक्षित निकाल लावतेय काय असं काही वेळा वाटण्याची परिस्थिती होती.
आताशा, ढकलाढकली जास्त वाढली आहे.
नायजेरियाचा सुरुवातीचा गोल जर
नायजेरियाचा सुरुवातीचा गोल जर ऑफसाईड ठरला नसता तर.......... फ्रांस ला फारच घाम काढावा लागला असता...
जर्मनी-अल्जिरिया मॅच पण छान
जर्मनी-अल्जिरिया मॅच पण छान झाली असावी. (आता हायलाईटस पाहिल्या त्यावरून वाटलं.)
अल्जिरियाने बर्यापैकी अटॅक केलं जर्मनीला. पण जर्मनीचा दुसरा गोल झक्कास होता.
आता पर्यंत झालेल्या प्री
आता पर्यंत झालेल्या प्री क्वार्टर फायनल च्या जवळपास सगळ्याच मॅचेस अटीअटीच्या झालेल्या आहे.. छोट्या छोट्या संघाने देखील कडवी टक्कर दिलेली आहे त्यांना नशिब आणि अनुभवाची जर साथ असती तर काही अव्वल संघ नक्किच लवकर स्पर्धे बाहेर गेलेले दिसले असते..
काल जर नायजेरियाचा ऑफसाईड गोल हा गोल ठरला असता तर फ्रांस नक्किच बाहेर होती
<< काल जर नायजेरियाचा ऑफसाईड
<< काल जर नायजेरियाचा ऑफसाईड गोल हा गोल ठरला असता तर फ्रांस नक्किच बाहेर होती >> नायजेरियाचं कौतुक वाटत असूनही असं सांगणं मात्र कठीण आहे. कारण, फ्रान्सचे नायजेरियाच्या गोलवरचे हल्ले खूपच सुरचित व प्रभावी होते आणि केवळ नायजेरियाच्या गोलीमुळे फक्त दोन गोलवर फ्रान्सला समाधान मानावं लागलं.
कालची जर्मनी - अल्जिरिया मॅच
कालची जर्मनी - अल्जिरिया मॅच अटीतटीची झाली. पहिल्या ४५ मिनिटांत जर्मन्स अगदीच दिशाहीन खेळत होते. काही स्ट्रॅटेजीच नव्हती असे वाटत होते. अल्जिरिया मॅच जिंकणार वाटत असतानाच श्यूर्लंने गोल केला आणि जर्मन टीमला जरा सूर गवसला. ओझिलवर कॉमेंटेटर्स सुद्दा टीका करत होते पण त्याने १२०व्या मिनिटाला गोल केल्याने टीका कमी झाली. नॉयर बराच पुढे येऊन बॉल अडवत होता, काही एक्सपर्ट्सना ही हाराकिरी वाटली. पण योगी ल्योव नॉयरच्या कामगिरीबद्दल बराच समाधानी होता. जर्मन टीमचा पहिल्या भागातला खेळ हा आत्तापर्यंतच्या विश्वचषकांतील मॅचेसमधला सर्वात वाईट खेळ असल्याचे सर्वत्र बोलले जात होते. शुक्रवारी जर्मनी फ्रान्सविरुद्ध खेळणार आहे.
युएसए टीम होम फाॅर फोर्थ.
युएसए टीम होम फाॅर फोर्थ. पथॅटीक प्ले; थकेले लग रहे थे.
काल स्वित्झ्ररलंडने
काल स्वित्झ्ररलंडने अर्जेंटीनाला पराभवाच्या उंबरठ्यापर्यंत नेलं होतं. जादा वेळांत गोल झाला म्हणून अर्जेंटीना पुढच्या फेरीत जिथें सामने अधिकच अटीतटीचे होणार हें नक्की !
फक्त शेवटच्या सामन्यातला
फक्त शेवटच्या सामन्यातला अंदाज चुकला... अमेरिका बाहेर गेले..
उपांत्य फेरीत पुढचे चार संघ जाण्याची शक्यता आहे..
ब्राझील - कोलंबिया, नेदरलंड - कोस्टारिका, फ्रान्स - जर्मनी, अजेंटीना - बेल्जियम
कोलंबिया ब्राझिलला झुंजवणार हे नक्की... जर्मनीचा कालचा खेळ बघता फ्रान्स त्यांना हरवण्याचीच शक्यता जास्त आहे.. नेदरलँड सहज पुढे जाणार.. आणि अर्जेंटिनासाठी आक्रमक नीट खेळले तर सोप्पी लढत..
अर्जेंटिना थोडक्यात निभावली.
अर्जेंटिना थोडक्यात निभावली. स्विस खेळाडूंनी मेस्सीला जखडले होते. पण डी मारिआ एकटाच बराच प्रयत्न करत राहिला. अखेर मॅच पेनल्टींवर जायला दोन मिनिटे राहिली असताना मेस्सी मोकळा सुटला आणि डी मारिआने मिळालेला पास फुकट जाऊ दिला नाही.
डी मारिआने चँपियन्स लीग फायनलमध्ये रीअल माद्रीदचे आक्रमण असेच पिछाडीवर पडूनही जिवंत ठेवले होते, आणि रीअल जिंकले शेवटी. उत्तम फिटनेस असणारा गुणी खेळाडू. ११८ मिनिटांनंतरही जबरदस्त स्प्रिंट्स मारत होता. मेस्सी काहीसा थकला पण हा नाही. शेवटी मात्र मेस्सीने बचावपटूंना मस्त हूल दिली आणि जबरदस्त पास.
बेल्जियमही जिंकले. अमेरिकन गोलकीपर टीम हॉवर्ड (एकेकाळी मॅन्चेस्टर युनायटेडसाठी खेळे) मस्त खेळला.
सर्व आठ ग्रुप्सचे विजेते राऊन्ड ऑफ १६ मध्ये जिंकले.
माऊथवॉटरींग क्वार्टरफायनल्स. फ्रांस - जर्मनी सर्वात कठीण. बाकीच्याही एकसे एक पण हे दोन संघ जास्त तुल्यबळ.
प्रेक्षक म्हणून आपण
प्रेक्षक म्हणून आपण अटीतटीच्या सामन्यांतील नामांकीत बलाढ्य संघाचा खेळ त्यांच्या किर्तीला साजेसा झाला नाही, असं सहज बोलतों व कधी कधीं नाकही मुरडतों. जर्मनी वि. अल्जेरिया सामन्यानंतर माध्यमांच्या अशाच प्रश्नाला जर्मनीच्या कप्तानाने व प्रशिक्षकाने पोटतिडीकेने दिलेल्या उत्तरामुळें आतां असं करण्यापूर्वीं याबद्दल विचार करणं भाग आहे; ' आम्ही जिंकण्यासाठी जिवाचं रान करून दोन तास मेहनत करतों व शेवटीं हिंमतीने विजय मिळवतों; नुसता प्रेक्षणीय खेळ करून मनोरंजन करणारे काय विदूषक आहोत आम्ही ?' व ' मोठ्या स्पर्धेमधे 'टफ' विरोध होणारा सामना असतोच व असावाही लागतो' अशा आशयाचीं त्यांचीं विधानं आहेत व त्यांत तथ्यही असावं.
अर्जेन्टिनाच्या संघात काल
अर्जेन्टिनाच्या संघात काल मिडफील्डमधे मेस्सी सोडून फारसं कुणी दमदार खेळत नव्हतं, को-ऑर्डिनेशन फारसं नीट होत नव्हतं. मेस्सी एकटा किती ठिकाणी पुरे पडणार? अगेरा अजूनही इन्ज्युर्ड म्हणून बाहेर आहे, नाहीतर दोघं मिळून केमिस्ट्री मस्त जमतेय. मेस्सीला इतके जण मार्क करत होते की त्यालाही झडझडून खेळता येत नव्हतं.
मिडफील्डवर कुणीतरी आणखी 'गेम क्रीएटर' हवा, मग मेस्सीला पासेस क्रीएट करून नैसर्गिकरीत्या खेळता येईल...
कोलंबिया ब्राझीलला नक्कीच झुंजवणार.
' आम्ही जिंकण्यासाठी जिवाचं
' आम्ही जिंकण्यासाठी जिवाचं रान .............. त्यांचीं विधानं आहेत व त्यांत तथ्यही असावं.
नशीब २०-२० क्रिकेट बघणारे लोक नाहीत तिथे! नाहीतर - 'क्काय हे, पाच मिनिटे झाली, स्कोअर तोच अजून!!
असे म्हणाले असते. म्हणूनच या लोकांना मिलियन डॉलर देऊन प्रिटी झिंटा किंवा दुसरी कुणि नटी विकत घेत नाही!!
<< मेस्सी एकटा किती ठिकाणी
<< मेस्सी एकटा किती ठिकाणी पुरे पडणार? >> खरंय. मेस्सीकडे चेंडू असला कीं सहजच फुटबॉलचं मर्म उमजून येतं. शैलीदार, सहजसुंदर खेळ आहे त्याचा !
जर्मनी १, फ्रान्स ०; ब्राझील
जर्मनी १, फ्रान्स ०; ब्राझील २, कोलम्बो १ !
जर्मनीने सुरवातीलाच गोल करून व 'मिडफील्ड'मधे प्रभाव राखून फ्रान्सला दडपणाखाली ठेवलं. फ्रान्सचे जिकीरीचे प्रयत्न जर्मन गोलीने विफल केले. काल जर्मन सरस वाटले हें नक्की.
दूसरी मॅच नाही पाहूं शकलो. पुनःप्रक्षेपण पहायचंय . यजमान संघ सेमिपर्यंत पोचला हें बरं झालं.
काल जर्मनीच्या गोलीने भारी
काल जर्मनीच्या गोलीने भारी बचाव केला.
ऑलमोस्ट झालेले दोन गोल वाचवलेत त्याने.
हॅट्स ऑफ.
फ्रान्सचे प्रयत्न जबरदस्त होते. शेवटच्या मिनिटापर्यंत देखील.
जिंकता येत नाही म्हणुन नेयमार
जिंकता येत नाही म्हणुन नेयमार ला जखमी केले......:राग:
नेयमार स्पर्धे मधुन बाहेर
ब्राझील चा कणाच मोडला
ब्राझील चा कणाच मोडला गेला.......:(
नेयमार बाहेर तर सिल्वाला दोनदा पिवळे कार्ड मिळाल्याने पुढच्या उपांत्य फेरीत खेळु शकणार नाही महत्त्वाच्या लढतीत हे दोन स्टार खेळाडु नसल्याने ब्राझीलची बाजु दुबळी झाली .....
नेयमार च्य दुखापतीत पेनल्टी का दिली नाही हे कोडेच आहे..
Pages