फिफा विश्वचषक २०१४

Submitted by उदयन.. on 7 June, 2014 - 06:03

world-cup-2014-600x337.jpg

आयपीएल चा जोर ओसरला ........
आता फुटबॉल विश्वचषक जोश सुरु झाला....

फुटबॉल विश्वचषक २०१४ ला १२ जुन पासुन ब्राझील इथे सुरुवात होत आहे .. यंदा ब्राझील तर्फे रोनाल्डो, रिव्हाल्डो, रिव्हाल्डिनो, रोनाल्डोनो, काका हे नाहीत ... त्यांच्याजागी नेयमार ज्यु., ज्युलियो सीझर, फ्रेड, ऑस्कर, फर्नान्डिन्हो सारखे नव्या दमाचे खेळाडु तयारीत आहे. ब्राझील यंदा यजमान असल्याने घरच्या मैदानावर त्यांची कामगिरी सरसच होईल ही आशा आहे
त्याच बरोबर इंग्लंड चा रुनी, अर्जेंटीनाचा मेस्सी, पोर्तुगाल चा रोनाल्डो यासारखे अनुभवी आणि कर्तबगार खेळाडु देखील असणार आहे.

आठ गृप मधे प्रत्येकी ४ संघ आहे म्हणजे ३२ संघ यात भाग घेतील ...

दर वेळेला कोण ना कोण तरी डार्क हॉर्स संघ म्हणुन पुढे येत असतो यंदा तो मान मिळवण्यास कॅमेरुन , घाना, क्रोशिया सारखे संघ नक्कीच उत्सुक्त असतील..

या वेळेला जो फुटबॉल वापरण्यात येणार आहे तो आतापर्यंतचा अत्यंत आधुनिक आणि प्रचंड टेक्नोलॉजी वापरुन बनवलेला आहे.. मागच्या द. आफ्रीकेच्या स्पर्धेत "जाबुंलानी" या बॉल वर बरीच टिका झालेली ती चुक परत होउ नये म्हणुन यावेळेच्या बॉल वर बरेच कष्ट घेतलेले आहेत . यंदाच्या फुटबॉल चे नाव आहे "ब्राझुका" . यात खास बाब म्हणजे या फुटबॉल मधे ६ कॅमेरे लावलेले आहे ज्यातुन दृश्य घेतली जाउ शकतात. ब्रॉडकास्टिंग मधे जबरदस्त ३डी दृश्य मिळतील .

करुया सुरुवात ..!!!!!!

मॅचेस बर्याच असल्याने ..... इथे वेळापत्रक फार मोठे दिसेल .

http://www.fifa.com/worldcup/matches/index.html

त्यापेक्षा वर लिंक दिलेली आहे .. आणि २-३ दिवसांच्या मॅचेस ची माहीती इथे देत जातो..

Tuesday 24 June

IMG_16726408502143_0.jpeg

फिफा फँटसी लीग : http://en.mcdonalds.fantasy.fifa.com/leagues/my

नाव :- MAAYBOLI
पासवर्ड :- 12345

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< नेयमार च्य दुखापतीत पेनल्टी का दिली नाही हे कोडेच आहे.. >>फुटबॉल सामन्यात पंचांची कामगिरी करणं खूप कठीण असतं हें मान्य करूनही, हें कोडं मात्र बर्‍याच वेळां पडतं हेंही खरं.
अशी पाळी येऊं नये म्हणजे झालं -

a-referee.JPG

सामना रंगतदार झाला. दि मारिआच्या दुखापतीमुळे अर्जेंटिनावर दबाव असूनही त्यानी १-० आघाडी आक्रमण जारी ठेवून टिकवून ठेवली. बॅड लक, बेल्जियम.

माझ्या मते गेम वन सायडेड झाला. बेल्जियम हरण्याच्याच उद्देशाने आले होते अशी शंका येत होती; ९० मिनीटात केवळ एक प्रयत्न स्कोर करण्याचा?

<< बेल्जियम हरण्याच्याच उद्देशाने आली होती अशी शंका येत होती >> जास्त शक्यता ही आहे कीं अर्जेंटीनाने सुरवातीलाच आघाडी घेवून जोरदार आक्रमण चालूच ठेवल्यामुळे [बेल्जियमच्या गोलीने कांहीं उत्तम 'सेव्ह'ही केले] बेल्जियम प्रथम आघाडी वाढूं न देण्यासाठी बचाव व मगच आक्रमण अशा कात्रीत सांपडला असावा. त्यांतच बेल्जियमच्या फेलानीचे दोन 'हेडर' साफच फसले. अर्जेंटीनाची जोरदार आक्रमण जारी ठेवण्याची चाल यशस्वी ठरली. मेस्सी काल कमालीची मेहनत करताना दिसत होता. अर्जेंटीना या स्पर्धेत खूपच 'मोटिव्हेटेड' वाटते आहे.
कोस्टारिकाशीं गोलशून्य बरोबरीत नेदरलँड पेनल्टी'वर [४-३] सेमिजमधे अर्जेंटीनाशी लढायला दाखल. सेमिज- युरोप विरुद्ध द. अमेरिका !

एल्झेवियरनं विश्वचषकाच्या निमित्ताने सॉकर या खेळामागचं विज्ञान उलगडून दाखवणारे काही रिसर्च पेपर ३० सप्टेंबरपर्यंत फुकट उपलब्ध करून दिले आहेत.

http://www.elsevier.com/connect/the-physics-of-football?utm_content=sf35...

तुम्हांला जर खेळात रुची असेल (किंवा नसेलही), तर हे पेपर वाचायला तुम्हांला नक्की आवडेल.

फायनल पण तशीच होणार.. युरोप विरुद्ध द. अमेरिका..

>>> कदाचीत युरोप विरुद्ध युरोप किंवा द. अमेरिका विरुद्ध द. अमेरिका असेही होउ शकेल. Wink

ब्राझील ची आशा संपुष्टात आली आहे.. तरी इतर खेळाडु जर नेयमार मुळे इर्षेला पेटुन उठले तर जर्मनीची राख होण्यास वेळ लागणार नाही.. मग तर किमान ३ गोल ने तरी ब्राझील जिंकतील

<< तरी इतर खेळाडु जर नेयमार मुळे इर्षेला पेटुन उठले..... >> काल नेयमारने हॉस्पिटलमधून अशी जिद्द तरी व्यक्त केली आहे !
ब्राझीलने जर आपल्या मूळ शैलीनुसार 'शॉर्ट पासींग'चा खेळ केला तर जर्मन बचावफळी कांहींशी बुचकळ्यात पडण्याची व चूका करण्याची शक्यता वाटते. कांहींही असो, नेयमारच्या गैरहजेरीत जर्मनीविरुद्ध कांहीं अनपेक्षित डांवपेंच आंखण्याशिवाय ब्राझीलला पर्यायच नसावा. म्हणूनच ब्राझीलच्या प्रशिक्षकाचीही खरी कसोटी उपांत्य फेरीत लागणार हें निश्चित.

ब्राझील फक्त आणि फक्त आक्रमणच करणार आहे.... त्यांना माहीत आहे की जर्मनीला आक्रमनाची संधी दिली तर स्वतःचा बचाव कमकुमवत आहे. त्यापेक्षा जर्मनीला बचावाच्या कोशात ढकलून त्यांना आक्रमणाचा विचार करायला द्यायचाच नाही

<< ब्राझील फक्त आणि फक्त आक्रमणच करणार आहे.... >> अंतिम सामन्यात प्रवेश करायला आतां हपापलेला जर्मन संघ तगडा आहे. ' फक्त आक्रमण ' हें धोरण त्यांच्याविरुद्ध हाराकिरी ठरूं शकतं कारण जबरदस्त प्रतिहल्ले करून म्यूलर व जर्मनीची भेदक आघाडीची फळी ब्राझीलचा धुव्वा उडवूं शकतात. बचावाकडे दुर्लक्ष न करतां संधी मिळतांच पक्का सराव करून रचलेल्या नेमक्या आक्रमक चाली खुबीने व पूर्ण एकाग्रतेने वापरणं, हेंच ब्राझीलसाठी जर्मनीविरुद्ध परिणामकारक धोरण ठरूं शकतं, असं मला वाटतं. सामन्यापूर्वीं सरावासाठी मिळालेले चार-पांच दिवस नेयमारशिवाय खेळणार्‍या ब्राझीलच्या खेळाडू व कोच यांच्यासाठी म्हणूनच आत्यंतिक महत्वाचे ठरणार आहेत.
[ मीं उगीचच तज्ञ असल्याचा आव आणून इथं मतप्रदर्शन करतोय असं कुणाला वाटलं तर त्यांच्याशी खरंच मीही सहमत आहे ! Wink ]

नेयमार आणि डी मारिया दोघांची अनुपस्थिती त्यांच्या संघांना जाणवणारच. रॉबेन आणि वॅन पर्सी पहिल्या दोन सामन्यांनंतर चमकलेले नाहीत त्यामुळे ते जोरदार खेळ करायचा प्रयत्न करणार. मेस्सीला मदत करण्यासाठी लवेझ्झी आणि पॅलॅशियोला घेतील बहुधा. ब्राझीलमध्ये सिल्वापण यलो कार्डमुळे नसणार. फ्रेड, हल्क आणि ऑस्करला खेळ उंचवावा लागेल.
जर्मनी लकी आहेत. चारो उंगलीया घी में अशीच अवस्था आणि तेही सेमी फायनलमध्ये. त्यांचे सगळेच खेळाडू चांगले खेळत आहेत.

<< जर्मनी लकी आहेत. चारो उंगलीया घी में अशीच अवस्था आणि तेही सेमी फायनलमध्ये. >> यू सेड इट !!!
<< ब्राझीलच जिंकणार आहे... >> यू अँड वुई विश इट ! Wink

ब्राझील वि. कोलंबिया सामन्यात दोन्ही संघांकडून खूपच आडदांडपणा झाला म्हणून जर्मन प्रशिक्षक ब्राझीलने तसाच खेळ आपल्या विरुद्धही करूं अशी जाहीर अपेक्षा करताहेत. सामना सुरुं असताना पंचानीं याबाबत कडक उपाययोजना करायला हवी, असंही सुचवताहेत. दुसरीकडे, ब्राझीलचा कप्तान व नेयमार यांच्या गैरहजेरीच्या धक्क्यातून खेळाडू सांवरले असून नेयमारपासूनच प्रेरणा घेवून ते अधिक जिद्दीने जिंकाण्यासाठी खेळतील, असं ब्राझीलचे प्रशिक्षक विश्वासपूर्वक म्हणताहेत.
प्रत्यक्ष सामन्यापूर्वीचे मैदानाबाहेरचे डांवपेंच सुरुं झालेत !!!

नेयमार आणि सिल्वा नसलेल्या ब्राझिल विरुद्ध जर्मनीला आज जिंकणे तसे वरकरणी सोपे वाटत असले तरी जीवतोड मेहनत करावी लागणार हे नक्की. त्यासाठी पूर्ण संघाने तयारी उत्तम केल्याचे इथली मिडीया सांगत आहे. आज संध्याकाळी कळेलच :). गो जर्मनी Happy

काय होणार?? Proud

१. ब्रझील विरुद्ध अर्जेंटिना

२. ब्रझील विरुद्ध नेदरलँड

३. जर्मनी विरुद्ध अर्जेंटिना

४. जर्मनी विरुद्ध नेदरलँड

जर्मनी वि. नेदरलँड्स ( जर अशी मॅच झाली तर ती खतरा मॅच असेल Proud )

कोण्या एका स्टॅटिशियनने गणितं मांडून ब्राझिल वि. अर्जेंटिना मॅच होईल असं भाकित केलंय Uhoh

आता catch२२ परिस्थिती.. डोक्यानी विचार केला तर एक टीम आणि मनानी विचार केला तर दुसरी टीम.. चारही आवडणार्‍या टीम्स खेळणार.. कोण हारणार कोण जिंकणार..

आजचा आकडा ब्राझील वर.. नेमार आणि थिएगो नाहीयेत त्यामुळे त्यांच्या जागी आलेले खेळाडू स्वतःला सिद्ध करण्याच्या हेतूने खेळणार.. हल्क जबरी खेळतोय.. पण गोल काही होत नाहीयेत. थिएगो नाही म्हणजे डेव्हीडलुईज सेंटरला खेळणार. तो जबरी फॉर्म मध्ये आहे. फ्रेड निष्प्रभ ठरलाय.. त्याला काहीतरी जबरदस्त करायची संधी आहे.

जर्मन टीमची आघाडीची जबाबदारी क्लोस खेळला तर त्याच्यावर नाहीतर म्युलर वर. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्याकडे एकाच क्लब मधून नेहमीच बरोबर खेळणारे खेळाडू असल्यामुळे समन्वय जबरी आहे.

या स्पर्धेत तुल्यबळ संघांतल्या सामन्यांत आतांपर्यंत तरी प्रथम गोल नोंदवणारा संघ आघाडी टिकवून जिंकला आहे असं दिसतं. उद्यां, विरुद्ध संघाला पहिला गोल करायला न देणं किंवा आपण प्रथम गोल करून आघाडी घेणं यापैकीं पूर्वार्धात कशावर अधिक भर दिला जातो, यावर सामन्याचा 'टेंपो' ठरेल असं वाटतंय. जर्मनीच्या खेळात फारसा बदल होण्याची शक्यता नाही पण नेयमार व सिल्वा नसल्याने ब्राझील आपल्या खेळात, डांवपेंचात अनपेक्षित - कदाचित आमूलाग्र - बदल करण्याची शक्यता मात्र जाणवते.
आडदांड खेळ रोखण्याबाबत पंचांच्या कामगिरीवर टीका होत असल्याने उद्यां पंच कडक धोरण अवलंबणार याची दोन्ही संघाना जाणीव असेल. त्यामुळे सामना अटीतटीचा झाला तरीही बराचसा शिस्तबद्ध व्हावा अशी अपेक्षा करायला हरकत नसावी.
अर्जेंटिनाचा डि मारिआ उपांत्य सामन्यात खेळूं शकणार नाही, ही एक वाईट बातमी !

या स्पर्धेत तुल्यबळ संघांतल्या सामन्यांत आतांपर्यंत तरी प्रथम गोल नोंदवणारा संघ आघाडी टिकवून जिंकला आहे असं दिसतं. >> हे फक्त उपांत्य पूर्व सामन्यात प्रकर्षाने झाले आहे.. राउंड रॉबिन मध्ये तसे झाले असते तर स्पेन नक्की पुढे दिसले असते..

ग्रुप ए - ब्राझिल (बी) - जागतिक क्रमांक ३
ग्रुप बी - हॉलंड (एच) - जागतिक क्रमांक १५
ग्रुप एफ - अर्जेंटीना (ए) - जागतिक क्रमांक ५
ग्रुप एच - जर्मनी (जी) - जागतिक क्रमांग २
(हे क्रमांक वर्ल्डकप सुरु होण्याच्या आधीचे आहेत.. आता जबरी फरक पडेल त्यात.. स्पेनचा गेल्या सहा वर्षातला एक नंबर जाणार.)
बरोबर आठ ग्रुप आहेत आणि त्या आठ पैकीच अल्फाबेटनी सुरु होणार्‍या टीम्स सेमी मध्ये आहेत..

जर्मनीचा गोलांचा पाउस, ब्राझील क्लुलेस.... ४-० पहिल्या २५ मिनीटात...
५-०; बहुतेक या रेटने जर्मनीचा प्रत्येक खेळाडु स्कोर करणार... Happy

२९ मिनिटे
जर्मनी ५ - ब्राझील ०
झोपेतून उठवून कुणी सांगितले असते तर स्वप्न वाटले असते.
आणि जर्मन आक्रमण अजून संपलेले नाही.

Pages