
आयपीएल चा जोर ओसरला ........
आता फुटबॉल विश्वचषक जोश सुरु झाला....
फुटबॉल विश्वचषक २०१४ ला १२ जुन पासुन ब्राझील इथे सुरुवात होत आहे .. यंदा ब्राझील तर्फे रोनाल्डो, रिव्हाल्डो, रिव्हाल्डिनो, रोनाल्डोनो, काका हे नाहीत ... त्यांच्याजागी नेयमार ज्यु., ज्युलियो सीझर, फ्रेड, ऑस्कर, फर्नान्डिन्हो सारखे नव्या दमाचे खेळाडु तयारीत आहे. ब्राझील यंदा यजमान असल्याने घरच्या मैदानावर त्यांची कामगिरी सरसच होईल ही आशा आहे
त्याच बरोबर इंग्लंड चा रुनी, अर्जेंटीनाचा मेस्सी, पोर्तुगाल चा रोनाल्डो यासारखे अनुभवी आणि कर्तबगार खेळाडु देखील असणार आहे.
आठ गृप मधे प्रत्येकी ४ संघ आहे म्हणजे ३२ संघ यात भाग घेतील ...
दर वेळेला कोण ना कोण तरी डार्क हॉर्स संघ म्हणुन पुढे येत असतो यंदा तो मान मिळवण्यास कॅमेरुन , घाना, क्रोशिया सारखे संघ नक्कीच उत्सुक्त असतील..
या वेळेला जो फुटबॉल वापरण्यात येणार आहे तो आतापर्यंतचा अत्यंत आधुनिक आणि प्रचंड टेक्नोलॉजी वापरुन बनवलेला आहे.. मागच्या द. आफ्रीकेच्या स्पर्धेत "जाबुंलानी" या बॉल वर बरीच टिका झालेली ती चुक परत होउ नये म्हणुन यावेळेच्या बॉल वर बरेच कष्ट घेतलेले आहेत . यंदाच्या फुटबॉल चे नाव आहे "ब्राझुका" . यात खास बाब म्हणजे या फुटबॉल मधे ६ कॅमेरे लावलेले आहे ज्यातुन दृश्य घेतली जाउ शकतात. ब्रॉडकास्टिंग मधे जबरदस्त ३डी दृश्य मिळतील .
करुया सुरुवात ..!!!!!!
मॅचेस बर्याच असल्याने ..... इथे वेळापत्रक फार मोठे दिसेल .
http://www.fifa.com/worldcup/matches/index.html
त्यापेक्षा वर लिंक दिलेली आहे .. आणि २-३ दिवसांच्या मॅचेस ची माहीती इथे देत जातो..
Tuesday 24 June

फिफा फँटसी लीग : http://en.mcdonalds.fantasy.fifa.com/leagues/my
नाव :- MAAYBOLI
पासवर्ड :- 12345
भाऊ फायनल मॅच बायर्न
भाऊ
फायनल मॅच बायर्न म्युनिच (७) विरुद्ध बार्सिलोना (२) अशी होणार...
काल मेस्सीने तयार केलेल्या
काल मेस्सीने तयार केलेल्या गोलच्या संधी स्ट्रायकर्सना कॅश करता आलेल्या नाहीत ही चिंतेची बाब आहे. तिथे डी मारियाची उणीव भासली. जर्मनीविरुद्ध हे जड जायची शक्यता आहे.
(हे जाम अवघड आहे हे माहित आहे, तरीही)
पण १९९० नंतर तब्बल २४ वर्षांनी परत एकदा दोन संघांमधे अंतिम सामना. त्यावेळी रेफरीने दिलेल्या अकारण कठोर निर्णयांमुळे अर्जेन्टीनाला फार मोठा धक्का बसला होता. यावेळी अर्जेन्टिनाने त्याची परतफेड करावी अशी एक 'मॅरादोना पंखा' म्हणून माझी फार्फार इच्छा आहे
<< . त्यावेळी रेफरीने
<< . त्यावेळी रेफरीने दिलेल्या अकारण कठोर निर्णयांमुळे अर्जेन्टीनाला फार मोठा धक्का बसला होता. यावेळी अर्जेन्टिनाने त्याची परतफेड करावी अशी एक 'मॅरादोना पंखा' म्हणून माझी फार्फार इच्छा आहे >>
माझीही.
मजा म्हणजे त्या दिवशी १९९० ला विंबल्डन फायनलही बेकर आणि एडबर्ग यांच्यात होती. तिथे मी जर्मनीच्या बेकरकडून होतो. अत्यंत चुरशीच्या सामन्यात एडबर्ग जिंकला.
नंतरच्या (पश्चिम) जर्मनी - अर्जेंटिना सामन्यात अर्जेंटिना वादग्रस्त पेनल्टीवर हारल्याने एका दिवसात दोनवेळा निराशा झाली होती.
मी एडबर्गच्या बाजूने होते,
मी एडबर्गच्या बाजूने होते, मला बेकरचा गेम फारसा कधी आवडला नाही. (हो, मी पूर्वग्रहदूषित आहेच
) पण एडबर्ग हा मारादोनाइतका लाडका नसल्याने अर्जेन्टिनावाला हार्टब्रेक जास्त मोठा होता.
डी मारिआ अंतिम सामना खेळणार
डी मारिआ अंतिम सामना खेळणार कीं नाही ? याच्या उत्तराने खूप फरक पडूं शकतो !
बर्यापैकीं समन्वयामुळे सांघिक कामगिरीत जर्मन संघ कांहींसा सरस वाटतोय पण मेस्सीकडून प्रेरणा घेवून अर्जेंटीना अंतिम सामन्यात खेळ उंचावण्याचीही दाट शक्यता आहे. अर्जेंटीनाच्या आघाडीच्या फळीला लय सांपडली तर दोन्ही संघांकडून स्मरणीय गोल्सची अपेक्षा करायला हरकत नसावी. अंतिम सामना असल्याने मेस्सी इतराना 'फीडींग' करण्यापेक्षां थोडा धोका पत्करून स्वतःच मुसंडी मारून गोल्स करण्यावर अधिक भर देईल असंही वाटतंय. पण दोन्ही संघानी अति सावधगिरी बाळगून बचावावरच भर दिला तर मात्र आपण जागरण कां केलं हा प्रश्न आपल्याला कालच्यासारखाच तेंव्हाही भेडसावणारच !
अंतिम सामन्यामुळे 'विश्वचषक- २०१४' संस्मरणीय होवो, अशी प्रार्थना.
परत एकदा जर्मन ब्लिट्झक्रिग
परत एकदा जर्मन ब्लिट्झक्रिग येत्या रविवारी पहायला मिळणार...
आजच्या सामन्यातही हॉलंडनं
आजच्या सामन्यातही हॉलंडनं ब्राझीलची चांगलीच वाट लावली. ब्राझीलचा फोकसच नव्हता सामन्यात असं वाटत होतं. काही सोप्या संधीही घालवल्या.
ब्राझिलचा संघ जिंकला तर
ब्राझिलचा संघ जिंकला तर वर्ल्ड कप नाहीतर काहीच नको.. थोडक्यात.. खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी अश्या मानसिकतेने खेळल्या सारखा वाटला..
नेमार कोणीतरी चुकून केलेल्या दुखापतीने बाहेर पडला.. पण त्या ऐवजी जर स्वतःच्या चुकीने किंवा पाय मुरगळून वगैरे बाहेर पडला असता तरी ब्राझिलची अशीच अवस्था झाली असती का असा विचार करतो आहे.
ब्राझीलचा गेल्या दोन सामन्यात
ब्राझीलचा गेल्या दोन सामन्यात कुठलाही 'गेमप्लॅन' होता असं जाणवलंच नाही. जसं जमेल तसं प्रत्येकजण खेळतोय असं वाटत होतं. अशा अवस्थेत नेमार किंवा सिल्वा असते तरी कितपत फरक पडला असता?
आज मेस्सीची सत्वपरीक्षा - तो कितीही महान असला तरी वर्ल्डकप जिंकल्याशिवाय बिचार्याला पेले, मारादोनाच्या पंक्तीत घेणार नाहीयेत
<< ...मारादोनाच्या पंक्तीत
<< ...मारादोनाच्या पंक्तीत घेणार नाहीयेत >> पण मला वाटतं मॅराडोनाने स्वतःच तर मेस्सी हा आपल्यापेक्षांच नाही तर ' ऑल टाईम ग्रेट' आहे, असं जाहीर विधान केलंय ! अर्थात, स्वतःच्या परमोच्च समाधानासाठी कोणत्याही महान खेळाडूला आपल्या देशासाठी विश्वचषक मिळवून देण्यासारखं साधन नाहीं, हेंहीं खरंच .
मेस्सी जिंकायला हवे.........
मेस्सी जिंकायला हवे......... एक प्लेअर विरुध्द संपुर्ण टीम.........मला सचिन ची आठवण आली...
भाऊ, हो केलंय बहुतेक. आणि
भाऊ, हो केलंय बहुतेक. आणि मेस्सी ग्रेटच आहे नि:संशय. पण तरीही त्याला मारादोनाच्या १९८६विजयाची पुनरावृत्ती करणं भाग आहे
<< पण तरीही त्याला
<< पण तरीही त्याला मारादोनाच्या १९८६विजयाची पुनरावृत्ती करणं भाग आहे >> हें तर आहेच. म्हणूनच मेस्सी आपल्या करिअरची सर्वोत्तम खेळी करण्याच्या जिद्दीनेच आज मैदानात उतरेल, अशी आशा आहे.
<< एक प्लेअर विरुद्ध संपुर्ण टीम >> उदयनजी, अर्जेंटीनाचा हा संघ ब्राझीलच्या संघाइतका एक-खांबी तंबू नक्कीच नाहीय हें तुम्हींही मान्य कराल !
एक खांबी नक्कीच नाही आणि
एक खांबी नक्कीच नाही आणि ब्राझील देखील नाही परंतु ब्राझील ला वाटले असेल की मुद्दामुन आमच्यासोबत धसमुसळा खेळ करुन आमच्या खेळाडुंना दुखापत केली या कार्ड देण्यास परावृत्त केले असेल.. त्यामुळे मुड गेला असेल या खेळायची शक्तीच गायब झाली असेल.. हे कालच्या मॅच मधे देखील दिसुनच आले...
------------------
जसे रोनाल्डो ला अडकवुन ठेवले होते तसाच प्रकार जर्मनी मेस्सीबाबतीत करु शकेल... मेस्सी भले गोल करु शकला नाही तरी तो गोल बनण्याची परिस्थिती मात्र बनवुन देतो.......
<< जसे रोनाल्डो ला अडकवुन
<< जसे रोनाल्डो ला अडकवुन ठेवले होते तसाच प्रकार जर्मनी मेस्सीबाबतीत करु शकेल... >> एका खेळाडूवर अवलंबून रहाण्याइतकंच बचावासाठी विरुद्ध संघाच्या एका खेळाडूवरच लक्ष केंद्रीत करणंहीं घातक ठरूं शकतं. पेलेच्या काळांत ब्राझीलला याचा बराच फायदा झाला होता.
>>आज मेस्सीची सत्वपरीक्षा -
>>आज मेस्सीची सत्वपरीक्षा - तो कितीही महान असला तरी वर्ल्डकप जिंकल्याशिवाय बिचार्याला पेले, मारादोनाच्या पंक्तीत घेणार नाहीयेत
१०० % अनुमोदन !!!
गो मेस्सी !!
सॉरी मुलर अॅन्ड कं., दो यु प्लेड अमेझिन्ग फुटबॉल इन थिस वर्ल्डकप !!
ब्राझिलच्या चुकांविषयी आणखी
ब्राझिलच्या चुकांविषयी आणखी थोडंसं
<< ब्राझिलच्या चुकांविषयि
<< ब्राझिलच्या चुकांविषयि आणखी थोडंसं >> हें सामन्यानंतरचं विश्लेषण आहे; सामन्याआधीं [७ जुलै] केलेलं माझं भाकीत - << अंतिम सामन्यात प्रवेश करायला आतां हपापलेला जर्मन संघ तगडा आहे. ' फक्त आक्रमण ' हें धोरण त्यांच्याविरुद्ध हाराकिरी ठरूं शकतं कारण जबरदस्त प्रतिहल्ले करून म्यूलर व जर्मनीची भेदक आघाडीची फळी ब्राझीलचा धुव्वा उडवूं शकतात .......>>
अर्थात, यांत 'कावळा बसायला व फांदी मोडायला... ' हा महत्वाचा भाग आहेच !!
भाऊ
भाऊ
जर्मनी जिंकावी अशी इच्छा
जर्मनी जिंकावी अशी इच्छा आहे.
पण अर्जेंटिना जिंकेल असं वाटतंय.
गो जर्मनी!!!
गो जर्मनी!!!
बदला घ्यावा जर्मनी कडून
बदला घ्यावा जर्मनी कडून ब्राझीलचा
जर्मनीला खुप खुप
जर्मनीला खुप खुप शुभेच्छा!!!
वरदा, फार मस्त लेख आहे.. मात्र ब्राझीलने हॉलंडसोबतच्या सामन्यातही याच चुका रिपीट केल्या.
<< मात्र ब्राझीलने
<< मात्र ब्राझीलने हॉलंडसोबतच्या सामन्यातही याच चुका रिपीट केल्या. >> 'जर्मनीविरुद्ध आमचं धोरण बरोबरच होतं ' , असं सिद्ध करण्याचा तो बालीश अट्टाहास असावा !
पेनल्टींमधल्या करामतीमुळेच आतांपर्यंत गाजलेला २०१४चा विश्वचषक आजच्या सामन्यातील अप्रतिम खेळाने संस्मरणीय करणारा ठरो, ही मुख्य प्रार्थना. आतांपर्यंत झालेलं झोपेचं खोबरं आज तरी प्रसादाचं गूळ-खोबरं व्हावं ! गुणवत्तेवर जर्मनी जिंकली तर त्याना सलाम. मेस्सीची जादू चालली व अर्जेंटीना जिंकली तर दूधात साखर !!
ऑल द बेस्ट, ऑल द व्ह्यूवर्स !
प्रसादाच्या गूळखोबर्याच्या
प्रसादाच्या गूळखोबर्याच्या आणि भरपूर साखर घातलेल्या दुधाच्या अपेक्षेत आम्हीही
फक्त जर्मनीचा खेळ बघता अजिबातच ग्यारंटी नाही
<< फक्त जर्मनीचा खेळ बघता
<< फक्त जर्मनीचा खेळ बघता अजिबातच ग्यारंटी नाही >> ग्यॅरंटी नसणं हीच तर गंमत आहे; दोघांच्याही खेळाच्या दर्जांत फारसा फरक नसला तरी खेळण्याच्या शैलीत व वृत्तींत जर्मनी व अर्जेंटीना यांच्या मधें प्रशांत महासागर आहेच !!
जर्मनीचा संघ नक्कीच सरस आहे.
जर्मनीचा संघ नक्कीच सरस आहे. पणमेस्सी सारखा स्टार खेळाडु विरोधी संघात
असल्यामुळे त्यांच्यावर मानसिक दबावहीअसेल!! याचा फायदा अर्जेंटिनाला होवू
शकतो!!! —
Spectacular 1st half.
Spectacular 1st half.
अर्ध्यातागत अरजेंटीना ३ आणि
अर्ध्यातागत अरजेंटीना ३ आणि जर्मनी २ संध्या वाया घालवल्या....
जर्मनीचं सुरुवातीचं पासेसचं
जर्मनीचं सुरुवातीचं पासेसचं तंत्र काहीच मिनिटात अर्जेंटिनाने मोडून काढलं. गोल न झालेला गोल चित्तथरारक होता. जर्मनी दबावाखाली येऊन अखिलाडू वर्तन करू लागले. अर्जेंटिनाचा खेळ ब्राझिलईतका नाही तरी धसमुसळाच होता पण अखिलाडू वृत्ती दिसली नाही.
मेसी कमनशिबी ठरलाय अद्याप.
Pages