फिफा विश्वचषक २०१४

Submitted by उदयन.. on 7 June, 2014 - 06:03

world-cup-2014-600x337.jpg

आयपीएल चा जोर ओसरला ........
आता फुटबॉल विश्वचषक जोश सुरु झाला....

फुटबॉल विश्वचषक २०१४ ला १२ जुन पासुन ब्राझील इथे सुरुवात होत आहे .. यंदा ब्राझील तर्फे रोनाल्डो, रिव्हाल्डो, रिव्हाल्डिनो, रोनाल्डोनो, काका हे नाहीत ... त्यांच्याजागी नेयमार ज्यु., ज्युलियो सीझर, फ्रेड, ऑस्कर, फर्नान्डिन्हो सारखे नव्या दमाचे खेळाडु तयारीत आहे. ब्राझील यंदा यजमान असल्याने घरच्या मैदानावर त्यांची कामगिरी सरसच होईल ही आशा आहे
त्याच बरोबर इंग्लंड चा रुनी, अर्जेंटीनाचा मेस्सी, पोर्तुगाल चा रोनाल्डो यासारखे अनुभवी आणि कर्तबगार खेळाडु देखील असणार आहे.

आठ गृप मधे प्रत्येकी ४ संघ आहे म्हणजे ३२ संघ यात भाग घेतील ...

दर वेळेला कोण ना कोण तरी डार्क हॉर्स संघ म्हणुन पुढे येत असतो यंदा तो मान मिळवण्यास कॅमेरुन , घाना, क्रोशिया सारखे संघ नक्कीच उत्सुक्त असतील..

या वेळेला जो फुटबॉल वापरण्यात येणार आहे तो आतापर्यंतचा अत्यंत आधुनिक आणि प्रचंड टेक्नोलॉजी वापरुन बनवलेला आहे.. मागच्या द. आफ्रीकेच्या स्पर्धेत "जाबुंलानी" या बॉल वर बरीच टिका झालेली ती चुक परत होउ नये म्हणुन यावेळेच्या बॉल वर बरेच कष्ट घेतलेले आहेत . यंदाच्या फुटबॉल चे नाव आहे "ब्राझुका" . यात खास बाब म्हणजे या फुटबॉल मधे ६ कॅमेरे लावलेले आहे ज्यातुन दृश्य घेतली जाउ शकतात. ब्रॉडकास्टिंग मधे जबरदस्त ३डी दृश्य मिळतील .

करुया सुरुवात ..!!!!!!

मॅचेस बर्याच असल्याने ..... इथे वेळापत्रक फार मोठे दिसेल .

http://www.fifa.com/worldcup/matches/index.html

त्यापेक्षा वर लिंक दिलेली आहे .. आणि २-३ दिवसांच्या मॅचेस ची माहीती इथे देत जातो..

Tuesday 24 June

IMG_16726408502143_0.jpeg

फिफा फँटसी लीग : http://en.mcdonalds.fantasy.fifa.com/leagues/my

नाव :- MAAYBOLI
पासवर्ड :- 12345

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

६ मिनिटात ४ गोल... इतक्या पटापट झाले की आधीच्या गोलचे रि-प्ले सुरु आहेत असे वाटले आधी. Wink

<< ब्राझिलच्या दु:खात सहभागी >> दिल्लीच्या एशियाडमधे [१९८२] हॉकीचा अंतिम सामना- भारत वि. पाकिस्तान. खूप प्रयत्न करूनही तिकीट मिळालं नाही म्हणून दिल्लीतच टीव्हीवर सामना पाहिला आम्ही. यजमान भारताला ०-७ गोलनी पराभूत व्हावं लागलं होतं ! ब्राझीलला काय वाटलं असेल काल याची सहज कल्पना करूं शकतो मीं ! Sad

७-१ म्हणजे अगाबौबो!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

<<... वाघाचे नख आता दात काढून त्याला मारले >> ब्राझीलबद्दल आत्यंतिक सहानुभूति आहेच. पण फुटबॉलसारख्या सांघिक खेळात केवळ एक-दोन खेळाडूंच्या भंरवशावरच रहाणं, व तेंहीं जागतिक दर्जाच्या मोठ्या स्पर्धेत, किती घातक ठरूं शकतं याचं हें बोलकं उदाहरण आहे, हाही मुद्दा आहेच !!

अशीच अवस्था आज अर्जेंटीनाची होऊ नये एवढी एकच अपेक्षा आहे.. कारण ते सुद्धा वन मॅन आर्मीच आहेत.. सगळी भिस्त मेस्सीवरच असते..

आणि त्याच्या विरुद्ध हॉलंडची टोटल फूटबॉलची स्ट्रॅटेजी असणार..

काल ब्राझील मॅन टू मॅन मार्कींग करताना कुठेच दिसले नाहीत.. नक्की काय करत होते त्यांनाच माहिती.. डेव्हीडलुईज ऐवजी कॅसिलासला कॅप्टन केले असते तर कदाचित फरक पडला असता...डेव्हीडलुईज हातावत पट्टा आल्यामुळे जास्तच दबावाखाली खेळल्यासारखा वाटला.. आणि ब्राझिलची बेंच स्ट्रेन्थ इतकी वाईट असेल असे चुकूनही वाटले नव्हते..

<< . डेव्हीडलुईज ऐवजी कॅसिलासला कॅप्टन केले असते तर कदाचित फरक पडला असता...>>
जूलिओ सेझार म्हणायचे आहे का ?

बाकी काल खेळाडूंऐवजी चीनच्या पुरातन राजाची ती टेराकोटा आर्मी उभी आहे ब्राझीलच्या बचावफळीत असेच वाटत होते.
सगळे तसेच स्तब्ध उभे होते. समालोचक तर शेवटी म्हणाला की जर्मनीला इतक्या सहजतेने होणार्‍या गोलांबद्दल काहीशी लाजच वाटू लागली आहे का काय!

हो.. सेझार म्हणायचे होते चुकून कॅसिलास आठवला.... कॅसिलास स्पेनचा आहे नाही का? सेझार काय कॅसिलास काय.. दोघांनी गोल स्विकारण्याचा विक्रमच केलाय ह्या वर्षी...

तरी कॅसिलास स्वस्तात सुटला. सेझार मात्र आता रेकॉर्ड बुकात नको त्या गोष्टीसाठी जाऊन बसला.
खरेतर हा वर्ल्ड कप गोलकीपर्सनी गाजवला.नोया, नावास, हॉवर्ड, ओचोआ, परवा अखेरच्या मिनिटाला बदली म्हणून आलेला टीम क्रुल सगळेच हीरो ठरलेत.
कॅसिलास आणि सेझारनी मात्र निराशा केली सगळ्यात जास्त अनुभव असूनही. अर्थात दिव्य बचावफळी असल्यावर गोली तरी काय करणार म्हणा.

हा सिझर चा शेवटचा विश्वचषक ठरला आता चिली विरुध्द हिरो झालेला पण जर्मनीविरुध्द परत खलनायक झाला.. परंतु समोरचा खेळाडु एकटा गोलपोस्ट पर्यंत पोहचु देण्यास बचावफळीच कारणीभुत आहे.. तो एकटा येत असताना त्याला आधीच अडवता आले नाही .. या त्याच्याबरोबर एक दोन खेळाडु देखील असायला हवे अडवायला गोलपोस्ट जवळ ते ही नव्हते

थरारक गोल्सपेक्षां अफलातून 'सेव्ह' अधिक पहायला मिळाले या विश्वचषकात, असं म्हणणं वावगं होणार नाही. अप्रतिम, सुरचित चालींमुळें झालेल्या गोल्सपेक्षां व्यक्तिगत कसब किंवा बचावातील ढीसाळपणामुळे अधिक गोल्स झाले या स्पर्धेत, असंही म्हणतां येईल. पिवळं व लाल कार्डं दाखवण्यापेक्षां गंभीर 'फाउल्स' दुर्लक्षित
करण्याच्याच घटना पंचांकडून या स्पर्धेत अधिक झाल्या, असंही म्हणणं गैर नसावं.

1999: Brazil 4-0 Germany
2002: Brazil 2-0 Germany
2004: Brazil 1-1 Germany
__________________________
2014: Brazil 1-7 Germany. balance sheet tally

पिवळं व लाल कार्डं दाखवण्यापेक्षां गंभीर 'फाउल्स' दुर्लक्षित
करण्याच्याच घटना पंचांकडून या स्पर्धेत अधिक झाल्या, असंही म्हणणं गैर नसावं.

>>> अगदी..

मध्यंतर अर्जेंटिना ० - नेदरलँड ०
पण अजूनपर्यंत तरी अर्जेंटिना जास्त एकसंध संघ वाटतोय आक्रमण आणि बचावात
पाहू काय होतं.

या स्पर्धेतील हीरो गोलकीपरच्या लिस्टमध्ये अजून एकाची भरः अर्जेंटिनाचा रोमेरो.
स्नायडरची पेनल्टी अडवताना जबरदस्त अँटिसिपेशन दाखवले. उपांत्य सामन्याचे दडपण असूनही पेनल्टीजच्या वेळी अर्जेंटिनाचे खेळाडू जास्त संयमी वाटले.
नेदरलँडसाठी आणखी एक हताश करणारा वर्ल्ड कप.

अमेय+++१
सरजीओ रोमेरो.. नवीन हिरो.. पहिली पेनल्टी काय आत्मविश्वासाने अडविली.. आणि अ‍ॅटोमेटीक प्रेशर निर्मान झाले नेदर्लॅड वर.. सेम पुन्हा तिसरी पेनल्टी अड्वली..

<< थरारक गोल्सपेक्षां अफलातून 'सेव्ह' अधिक पहायला मिळाले या विश्वचषकात, असं म्हणणं वावगं होणार नाही.>> आतां तर असं म्हणणंच योग्य होईल ! Wink

काल हॉलंडकरतां पर्सी जोरदार खेळत असला तरी रॉबेन मात्र नेहमीच्या मुसंड्या न मारतां दुखापत टाळायला कांहींसा अंग चोरूनच खेळत होता असं नाहीं वाटलं ?

आज वाचनात आलेलं कालच्या सामन्याचं हें वर्णन यथार्थ असावं -
" But this was as poor a semifinal the World Cup has ever seen, a largely shot-free game between two teams unwilling to really open the match up. Some will argue these types of tight tactical battles are enthralling. They are masochists.

Given that both of these teams had seen Brazil absolutely shredded while trying to play so-called "attacking" football on Tuesday, it's easy to see why both managers erred on the side of caution. "

थरारक गोल्सपेक्षां अफलातून 'सेव्ह' अधिक पहायला मिळाले या विश्वचषकात, असं म्हणणं वावगं होणार नाही.>> आतां तर असं म्हणणंच योग्य होईल>>>>
अगदी बरोबर याच उत्तम उदा.नेमार

थरारक गोल्सपेक्षां अफलातून 'सेव्ह' अधिक पहायला मिळाले या विश्वचषकात, असं म्हणणं वावगं होणार नाही.>> आतां तर असं म्हणणंच योग्य होईल>>>>पिवळं व लाल कार्डं दाखवण्यापेक्षां गंभीर 'फाउल्स' दुर्लक्षित
करण्याच्याच घटना पंचांकडून या स्पर्धेत अधिक झाल्या, असंही म्हणणं गैर नसावं..>>>
अगदी बरोबर याच उत्तम उदा.नेमार

अ‍ॅज एक्सपेक्टेड... जर्मनी विरुद्ध अर्जेंटीना फायनल... कालची मॅच फारच बोर झाली.. दोन्ही टीम्स डिफेन्सीव्हच खेळल्या.. त्याचा फटका नेदरलंडलाच बसला..

Pages