फिफा विश्वचषक २०१४

Submitted by उदयन.. on 7 June, 2014 - 06:03

world-cup-2014-600x337.jpg

आयपीएल चा जोर ओसरला ........
आता फुटबॉल विश्वचषक जोश सुरु झाला....

फुटबॉल विश्वचषक २०१४ ला १२ जुन पासुन ब्राझील इथे सुरुवात होत आहे .. यंदा ब्राझील तर्फे रोनाल्डो, रिव्हाल्डो, रिव्हाल्डिनो, रोनाल्डोनो, काका हे नाहीत ... त्यांच्याजागी नेयमार ज्यु., ज्युलियो सीझर, फ्रेड, ऑस्कर, फर्नान्डिन्हो सारखे नव्या दमाचे खेळाडु तयारीत आहे. ब्राझील यंदा यजमान असल्याने घरच्या मैदानावर त्यांची कामगिरी सरसच होईल ही आशा आहे
त्याच बरोबर इंग्लंड चा रुनी, अर्जेंटीनाचा मेस्सी, पोर्तुगाल चा रोनाल्डो यासारखे अनुभवी आणि कर्तबगार खेळाडु देखील असणार आहे.

आठ गृप मधे प्रत्येकी ४ संघ आहे म्हणजे ३२ संघ यात भाग घेतील ...

दर वेळेला कोण ना कोण तरी डार्क हॉर्स संघ म्हणुन पुढे येत असतो यंदा तो मान मिळवण्यास कॅमेरुन , घाना, क्रोशिया सारखे संघ नक्कीच उत्सुक्त असतील..

या वेळेला जो फुटबॉल वापरण्यात येणार आहे तो आतापर्यंतचा अत्यंत आधुनिक आणि प्रचंड टेक्नोलॉजी वापरुन बनवलेला आहे.. मागच्या द. आफ्रीकेच्या स्पर्धेत "जाबुंलानी" या बॉल वर बरीच टिका झालेली ती चुक परत होउ नये म्हणुन यावेळेच्या बॉल वर बरेच कष्ट घेतलेले आहेत . यंदाच्या फुटबॉल चे नाव आहे "ब्राझुका" . यात खास बाब म्हणजे या फुटबॉल मधे ६ कॅमेरे लावलेले आहे ज्यातुन दृश्य घेतली जाउ शकतात. ब्रॉडकास्टिंग मधे जबरदस्त ३डी दृश्य मिळतील .

करुया सुरुवात ..!!!!!!

मॅचेस बर्याच असल्याने ..... इथे वेळापत्रक फार मोठे दिसेल .

http://www.fifa.com/worldcup/matches/index.html

त्यापेक्षा वर लिंक दिलेली आहे .. आणि २-३ दिवसांच्या मॅचेस ची माहीती इथे देत जातो..

Tuesday 24 June

IMG_16726408502143_0.jpeg

फिफा फँटसी लीग : http://en.mcdonalds.fantasy.fifa.com/leagues/my

नाव :- MAAYBOLI
पासवर्ड :- 12345

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सामना चुरशीचा झाला, दोन्ही संघ आक्रमण व बचाव याचा समतोल राखून प्रत्येक क्षण हेतूपूर्वक खेळत होते व शेवटीं काल कांहींसा सरस असलेला संघच जिंकला . सामना 'पेनल्टी'वर न जातां एका छान 'फिल्ड गोल'ने त्याची सांगता झाली, हेंही योग्यच. जर्मनीचं मनःपूर्वक अभिनंदन.
<< मेसी कमनशिबी ठरलाय अद्याप.>> कदाचित माझं खूप चूकत असेल पण काल मेस्सीचा खेळ पहायला मिळाला नाहीं यापेक्षांही तो कांहींसा तिर्‍हाईतासारखा मैदानात वावरत होता हें अधिक खटकलं. जर्मनीचे म्यूलर, क्लोझ हेच नाही तर त्यांचे व अर्जेंटीनाचे इतर खेळाडू सर्वच प्राण पणाला लावून खेळताना पाहून मेस्सीचं वागणं बुचकळ्यात टाकणारं होतं. 'एक्स्ट्रॉ टाईम'च्या पहिल्या सत्राआधी अर्जेंटीनाचा प्रशिक्षक खेळाडूना एकत्र करून प्रोत्साहीत करत होता, डांवपेच सुचवत होता तेंव्हा त्यां सगळ्यांचं प्रेरणास्थळ असलेला मेस्सी निर्विकार चेहर्‍याने बाहेरच उभा होता. मेस्सीचा चाहता असूनही स्वतःच्या खेळात व संघाला प्रेरीत करण्यात काल तो खूपच कमी पडला असं खेदाने म्हणावं लागतं. माझा हा गैरसमज आहे असं कुणीतरी मला आश्वासकपूर्वक सांगितलं तर मला बरं वाटेल.
हा सामना माझ्या मेमरीमधे बहुतेक अर्जेंटीनाच्या फोल्डरमधे सेव्हच होणार नाही; कारण, त्या फोल्डरला निळ्या, उभ्या पट्ट्यांच्या अर्जेंटीनाच्या पारंपारिक 'कलर्स'चीच ओळख आहे. काल राष्ट्रध्वजाइतकेच अर्जेंटीनासाठी पूज्य असलेले ते कलर्स न वापरतां आल्यानेही त्यांचा खेळ अधिक बहरला नसेल !!! Wink

भाऊ, करेक्ट! काल माझीही मेसीबद्दलची हीच निरिक्षणं होती. खासकरून तो ग्रूपबाहेर उभा होता हे तर फारच विचित्र वाटलं.

मी टीव्ही लावला, तेव्हा जर्मनीचं राष्ट्रगीत सुरू झालेलं होतं. मी आधी दोन्ही संघांचे कलर्स पाहिले. अर्जेंटिना त्यांच्या नेहमीच्या निळ्या-पांढर्‍या रंगांत नव्हते हे पाहिल्यावर जरा चुकचुकलेच.

अर्जेंटीनानी स्वतःच्या हातानी मॅच घालवली... जर्मनी पेक्षा खूप सोप्या संधी गोल करायच्या घालवल्या.. आणि एक नाही तर तीन.. एखादा जरी गोल झाला असता तरी मॅचचा निकाल काही तरी वेगळा लागला असता.. मेस्सी काल अगदीच निष्प्रभ वाटला.. मार्किग करुन ठेवले होते असेही नव्हते.. त्याच्या कडे एकूणच बॉल कमी गेला.. कदाचित मेस्सीवर जास्त मार्किंग असेल असे वाटल्यामुळे बाकीच्या खेळाडूंतर्फेच बराचसा खेळ करायचा असाही प्लॅन असू शकतो. अर्जेंटीनाच्या बचावातला एकच ढिसाळपणा जर्मनीला साथ देऊन गेला.. तो पर्यंत जर्मनीला संधी मिळूनही फार काही करु दिले नाही अर्जेंटीनाच्या बचाव फळीने.

<< तो पर्यंत जर्मनीला संधी मिळूनही फार काही करु दिले नाही अर्जेंटीनाच्या बचाव फळीने.>> अर्जेंटीनाची आघाडीची फळीसुद्धां जर्मनीला तशी हैराण करतच होती. इतक्या चांगल्या सांघिक कामगिरीचं पाठबळ असताना मेस्सीकडून ज्या सार्थ खेळाची रास्त अपेक्षा होती ती अजिबातच पूर्ण झाली नाही. खरं दु:ख हेंच आहे ! Sad

सुरुवातीला जर्मनीने चेंडू ताब्यात ठेवण्यासाठी पासेसचा खेळ अरू लागले तेव्हांच त्यांच्या खेळाचा अंदाज आला. अर्जेंटिनाची फेमस ट्रीक वापरत त्यांनी अनेकदा आश्चर्यकारक हल्ले केले. विशेषतः मेस्सीच्या वेगवान हालचालींमुळे अर्जेंटिनाने जर्मनीचा जो काही प्लान असेल तो उद्ध्वस्त केला. पण मेस्सीच्या आक्रमणांना कुणाची साथ मिळतेय असं दिसलं नव्हतं. त्याचा एक पास घेतलाच नाही तर दुस-या पासवर गोलपासून भरकटलेली किक मारली गेली. अर्थात जर्मनीची बचावफळी अभेद्य होती असं पण म्हणावं लागेल.

सेकंड हाफ मधे जर्मनीचे पास देणे आणि घेणे हे पाहण्यासारखे होते. मेस्सीला त्यांनी अचूक बांधून टाकलं होतं. मेस्सीविनाचा अर्जेंटिनाचा खेळ ब्राझीलप्रमाणेच आक्रमणावर जोर देणारा राहीला, तो प्रेक्षणीय होता. पण बचावफळीत ब्राझिलप्रमाणेच खिंडार होतं. त्यातून ते स्वतःहून चेंडू स्वतःच्या क्षेत्रात ढकलत जर्मनीच्या संघाला बोलावून घेत होते. मेस्सीवर जागता पहारा असतांना समोरच्या जास्तीत जास्त खेळाडूंना बोलावून घ्यायचे आणि गोल करून धक्का द्यायचा ही ट्रीक जर्मनीविरुद्ध वापरणे धोकादायक होते. अर्जेंटिनाचा गोलरक्षक तयारीचा होता म्हणूनच काल निभावले नाहीतर कालचा सामना ४-१ च्या फरकाने संपला असता.

वा वा हा धागा आत्ता वाचून काढायला मजा आली.. !
मी पण फुल टू जर्मनीच्या बाजूने होतो... अर्जेंटीनाची टीम अजिबात आवडत नाही.. त्यामुळे जर्मनी जिंकल्यावर फार्फार आनंद झाला !
ब्राझीलबद्दल मात्र वाईट वाटलं..

<< मेस्सीचा खेळ पहायला मिळाला नाहीं यापेक्षांही तो कांहींसा तिर्‍हाईतासारखा मैदानात वावरत होता हें अधिक खटकलं. >> माझं हें निरीक्षण मीं सहज माझ्या एका फुट्बॉलवेड्या मित्राकडे बोललों. त्याचं म्हणणं असं कीं मेस्सीला खूप जुनं कांहींतरी दुखणं आहे व तें मधेच उसळी खातं. अशावेळीं तो स्वतःला सांवरायला एकटाच बाजूला रहातो व संघ सहकारीही तें समजून घेतात. तसंच कांहींसं आत्यंतिक दबाव असलेल्या अंतिम सामन्यात बहुतेक झालं असावं. तसं असेल तर - व असावंच - मेस्सीचं वागणं समजण्यासारखं आहे. [ मेस्सीच्या व्यक्तीरेखेत त्याच्या कांहीं गंभीर आजारावरचा व त्याला न परवडणारा खर्च बार्सिलोनाने त्याला प्रथम 'साईन' करताना केला होता , असा उल्लेखही आहे !]

Pages