फिफा विश्वचषक २०१४

Submitted by उदयन.. on 7 June, 2014 - 06:03

world-cup-2014-600x337.jpg

आयपीएल चा जोर ओसरला ........
आता फुटबॉल विश्वचषक जोश सुरु झाला....

फुटबॉल विश्वचषक २०१४ ला १२ जुन पासुन ब्राझील इथे सुरुवात होत आहे .. यंदा ब्राझील तर्फे रोनाल्डो, रिव्हाल्डो, रिव्हाल्डिनो, रोनाल्डोनो, काका हे नाहीत ... त्यांच्याजागी नेयमार ज्यु., ज्युलियो सीझर, फ्रेड, ऑस्कर, फर्नान्डिन्हो सारखे नव्या दमाचे खेळाडु तयारीत आहे. ब्राझील यंदा यजमान असल्याने घरच्या मैदानावर त्यांची कामगिरी सरसच होईल ही आशा आहे
त्याच बरोबर इंग्लंड चा रुनी, अर्जेंटीनाचा मेस्सी, पोर्तुगाल चा रोनाल्डो यासारखे अनुभवी आणि कर्तबगार खेळाडु देखील असणार आहे.

आठ गृप मधे प्रत्येकी ४ संघ आहे म्हणजे ३२ संघ यात भाग घेतील ...

दर वेळेला कोण ना कोण तरी डार्क हॉर्स संघ म्हणुन पुढे येत असतो यंदा तो मान मिळवण्यास कॅमेरुन , घाना, क्रोशिया सारखे संघ नक्कीच उत्सुक्त असतील..

या वेळेला जो फुटबॉल वापरण्यात येणार आहे तो आतापर्यंतचा अत्यंत आधुनिक आणि प्रचंड टेक्नोलॉजी वापरुन बनवलेला आहे.. मागच्या द. आफ्रीकेच्या स्पर्धेत "जाबुंलानी" या बॉल वर बरीच टिका झालेली ती चुक परत होउ नये म्हणुन यावेळेच्या बॉल वर बरेच कष्ट घेतलेले आहेत . यंदाच्या फुटबॉल चे नाव आहे "ब्राझुका" . यात खास बाब म्हणजे या फुटबॉल मधे ६ कॅमेरे लावलेले आहे ज्यातुन दृश्य घेतली जाउ शकतात. ब्रॉडकास्टिंग मधे जबरदस्त ३डी दृश्य मिळतील .

करुया सुरुवात ..!!!!!!

मॅचेस बर्याच असल्याने ..... इथे वेळापत्रक फार मोठे दिसेल .

http://www.fifa.com/worldcup/matches/index.html

त्यापेक्षा वर लिंक दिलेली आहे .. आणि २-३ दिवसांच्या मॅचेस ची माहीती इथे देत जातो..

Tuesday 24 June

IMG_16726408502143_0.jpeg

फिफा फँटसी लीग : http://en.mcdonalds.fantasy.fifa.com/leagues/my

नाव :- MAAYBOLI
पासवर्ड :- 12345

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेल्जियमची टीम पण चांगली आहे. काही धक्के देउ शकते बेल्जियम. इथं वर्ल्ड कप साठी मस्त वातावरण आहे सध्या.. सगळीकडे ऑफर्स, डील्स. मोठ्या चौकात, बार्स-पब्जमधून पडद्यावर लाइव्ह टेलिकास्ट दाखवणार आहेत. फुटबॉल बरोबरच बीयर आणि संगीताची रेलचेल Happy

गो.... बेल्जियम Happy

मी आधीपासुन १९९४ पासुन ब्राझील ला सपोर्ट .. जेव्हा पेनल्टी शुटआउट मधे ब्राझील जिंकलेली ...
नंतर ९८ ला ऐनवेळॅला रोनाल्डो आजारी पडला फायनल ला.. आनि झिदान ने मॅच फिरवली आणि फ्रान्स जिंकला Happy

यावेळेला नेयमार ज्यु. रोनाल्डो आणि रिव्हाल्डिन्हो ची उणिव भरुन काढेल Happy

या धाग्याबद्दल खास धन्यवाद.
<< मी आधीपासुन १९९४ पासुन ब्राझील ला सपोर्ट .. >> ब्राझीलच्या खेळाची शैली भारतीय उपखंडातील क्रिडारसिकाना आकर्षित करणारीच आहे. पण आतां ब्राझीलचे बरेच खेळाडू युरोपमधेच फुटबॉल खेळत असल्याने पूर्वीसारखी त्यांची अशी खास शैली आतां राहिली नसल्याचंही जाणवतं. आपल्या हॉकीसारखीच त्यांच्या फुटबॉलची अवस्था झाली असावी ! तरी पण, ब्राझील इज ब्राझील; आणि त्यांच्याच मायभूमीतल्या विश्वचषकात त्यांचा खेळ न बहरला तरच नवल !
रात्रीचा दिवस करून सामने पहायचे, ही अडचण मात्र जाणवणार आहेच !
[ फुटबॉलमधे कॅमेरे ! पुढच्या विश्वचषकात बहुतेक 'पेनल्टी कीक' घेणार्‍या खेळाडूच्या डोक्यात नेमकं काय आहे, हें गोलरक्षकाला दिसणारं उपकरण शोधून नाहीं काढलं मग मिळवलं !! Wink ]

रोनाल्डो. , रिव्हाल्डो, आणि रोनाल्डिन्हो. काका डिनो, रॉबर्टो कार्लोस ( याने मारलेली फ्री किक जी ७०अंश कोनात वळुन गोलपोस्ट मधे गेलेली.. ते अजुन आश्चर्य आहे )...... यांचा खेळ जबरदस्तच होता...सांघिक कामगिरी मधेच ४-५ रोनाल्डो सारखे खेळाडु असल्याने त्यांचा खेळ त्यांचे पासेस बघायला मजा यायची....आता बहुदा प्रत्येक संघात एखादा दुसरा खेळाडुच त्या दर्जाचा आहे .. रोनाल्डो, मेस्सी, नेयमार, असे काहीकाही जणांच्या खांद्यावरच भार आहे आता

>> याने मारलेली फ्री किक जी ७०अंश कोनात वळुन गोलपोस्ट मधे गेलेली.. ते अजुन आश्चर्य आहे <<
ती बनॅना कीक, सर्रास मारली जाते. खरं कौशल्य बायसिकल कीक मध्ये आहे; एस्केप टु वीक्टरी मध्ये पेलेने मारली आहे : http://m.youtube.com/watch?v=mCJBXfKtOiM&feature=kp

राज ती किक सुंदर आहेच पण चित्रपटातली आहे.. लाइव्ह मॅच मधे पेले ने यापेक्षा कितीतरी सुंदर गोल केलेले आहे..
आणि कार्लोस ची बनाना की आता सर्रास मारली जाते... त्यावेळेला ते आश्चर्यच होते.. फ्रांस चा गोलकी २-३ मिनिट तरी पुतळा झालेला काय घडले हे म्हणुन Happy .. त्यानंतर बॅकहॅम ने देखील बर्याच वेळेला फ्री किक तशी मारलेली आहे...

काही महत्त्वाचे खेळाडू जायबंदी झालेत.
फ्रँक रायबरी हा फ्रान्सचा स्ट्रायकर पाठदुखीमुळे स्पर्धेबाहेर जाणे हा आतापर्यंतचा मोठा धक्का आहे.
क्रीस्टीआनो रोनाल्दो दुखण्यातून बरा होण्यासाठी धडपडतोय. त्याच्यावर पोर्तुगालची मदार आहे. स्पेनच्या ला लिगामध्ये शेवटच्या मॅचपर्यंत चुरस असल्याने आणि रिअल माद्रीद चँपिअन्स लीगच्या अंतिम स्पर्धेत खेळल्याने त्याला विश्रांती मिळू शकली नाही. पूर्ण भरात असलेला हा खेळाडू खेळू शकला नाही तर फार विरस होईल.
उरुग्वेचा स्ट्रायकर लुईस सुआरेजही जखमी आहे.
रोनाल्दो, रायबरी, मेस्सी आणि सुआरेज यावर्षीचे चार सर्वोत्कृष्ट खेळाडू होते आपापल्या टीमसाठी.

गेल्यावेळचे फायनलिस्ट यावेळी पहिल्याच मॅचमध्ये पुन्हा भिडणार. स्पेनला हरवण्यासाठी नेदरलँड नक्कीच उत्सुक असेल. रॉबिन वॅन पर्सीवर त्यांची भिस्त आहे.

उदयन.. वेळापत्रकाबद्द्ल धन्यवाद. देशांच्या नावात खालील काही बदल करणार का? Happy

कोटे डि वायरो >> आयवरी कोस्ट
बोस्निया - हेरंज्गोविना >> बोस्निया - हर्झगोविना
क्रोशिया >> क्रोएशिया
स्विजर्लँड >> स्वित्झर्लंड (किंवा नुसताच स्विस)

धन्यवाद
ती नावे वेबसाइट वर होती
मी पण विचार करत होतो कोटे डी वायरो नामक कोणता नविन देश निर्माण झाला
उद्या बदलतो

जुलिओ सीझर करा केस्सरचं. अतिशय टॅलेन्टेड गोलकीपर. वयस्क झाल्याने मुख्य धारेतून बाहेर गेलाय, कॅनडात खेळतो, पण इटलीत इंटरमिलानकडून खेळताना खूप चांगली कामगिरी होती. ब्राझीलसाठीही उत्कृष्ट खेळला आहे.

अरे वा मी वाटच पाहत होतो या धाग्याची....
मी जर्मनीचा हार्डकोअर फॅन आहे.....अगदी १९९० पासून...तेव्हा मी शाळेत होतो आणि वर्तमानपत्राची कात्रणे जपून ठेवायचो एका वहीत चिकटवून...अजूनही त्या वह्या आहेत माझ्याकडे...त्यानंतर २००६ मध्ये मीच वृत्तपत्रात कॉलम लिहीत होतो...पण माहीती नाही माझे कॉलम कुणी जपून ठेवलेत का...:)

बाकी जर्मनीबद्दल....
मिरास्लाव क्लोज हा माझा अत्यंत आवडता खेळाडू असला तरी प्रशिक्षक जोकीम लो नी फक्त त्याच्या खांद्यावर सगळा भार दिल्यामुळे मला जाम साशंकता वाटत आहे. क्लोजचा हा शेवटचा विश्वचषक...मागच्या वेळी देखील तो पूर्ण क्षमतेने सगळे सामने खेळला नव्हता. त्यामुळे यंदा काय होतेय ते बघुया....
जर्मनीच्या ग्रुपमध्ये पोर्तुगाल, घाना आणि अमेरिका असल्यामुळे हाच ग्रुप ऑफ डेथ ठरला आहे.
बाकी मात्तबर संघाना पुढच्या फेरीत प्रवेश करायला फार अडचणी येणार नाहीत असे वाटते.
जर्मनीखालोखाल अर्जेंटिना आणि स्पेन
क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया आणि फुटबॉलमध्ये ब्राझील यांना कधीच मी चिअर करू शकलो नाही. त्यांच्या गुणवत्तेबद्दल प्रचंड कौतुक असले तरी मी त्यांचा फॅन कधीच नव्हतो आणि नसेनही. मी काय प्रतिस्पर्धी संघालाच चिअर करणार...
अर्थात घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा असल्याने यंदा तेच बाजी मारतील असे वाटत आहे.
ब्राझीलची सर्वसामान्य जनता फुटबॉलवेडी असली तरी नागरी सुविधांऐवजी कोट्यावधींचा खर्च आयोजनावर करण्यात आल्याने प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे विश्वचषक उंचावण्याचे जबरदस्त दडपण ब्राझीलच्या संघावर असेल.

<< त्यानंतर बॅकहॅम ने देखील बर्याच वेळेला फ्री किक तशी मारलेली आहे...>> मुंबईच्या 'कूपरेज'वर नाडकर्णी कप, रोव्हर्स कप इत्यादींमधे अप्रतिम बनाना किक, बायसिकल किक मारलेल्या मीं पाहिल्या आहेत व त्या थरारक वाटतातच. पण विश्वचषकाच्या वेगवान खेळात व जागतिक दर्जाच्या बचावफळीला भेदून असे शॉट्स यशस्वीपणे मारणं म्हणजे कौशल्य, आत्मविश्वास व धाडसाची उच्चतम कमालच !!

H

आत्तांच 'जय महा.' चॅनेलवर भारतीय प्रशिक्षक परेरा यांची मुलाखत दाखवली. त्यानी अधोरेखीत केलेले कांहीं मुद्दे-
१]रोनाल्डो हा अत्यंत मेहनती व तंदुरूस्तीवर अविरत लक्ष ठेवणारा, शरीरसौष्ठव जपणारा खेळाडू आहे तर मेस्सी हा एक 'नॅचरल' खेळाडू आहे;
२] 'बचाव फळी' हा ब्राझीलचा पारंपारिक कच्चा दुवा आहे पण त्यांचा सध्याचा प्रशिक्षक म्हणूनच तिकडे अधिक लक्ष पुरवतो आहे. विखरलेले ब्राझीलचे खेळाडू यावेळीं बराच काळ संघ म्हणून एकत्र सराव करत आहेत व याचा फरक जाणवेलच;
३] जर्मनीचा संघ कधींच प्रसिद्धिच्या मागे न लागता आपली जय्यत तयारी बिनबोभाट करत असतो व जिंकणं हा त्यांचं एकमेव लक्ष्य असतं. कोणत्याही मोठ्या स्पर्धेत म्हणूनच तो संघ संभाव्य विजेते असतोच.

मॅन्युएल नोया (Manuel Neuer) हा फर्स्ट चॉईस गोलकीपर आहे जर्मनीचा. बायर्न म्युनिच क्लबसाठी खेळणार्‍या या गोलकीपरला मागचा साऊथ आफ्रिकन वर्ल्ड कप तोंडावर आला असताना झालेल्या रॉबर्ट एन्का या गोलकीपरच्या अकाली मृत्यूमुळे संघात जागा मिळाली. युवा संघातून उमेदवारी केलेल्या नोयाने संधीचे सोने केले. तेव्हापासून खंदा गोलकीपर म्हणून ओळखला जातो. अतिशय कमी गोल होऊ देतो, केवळ रोनाल्दोच्या रिअल माद्रीदने चँपिअन्स लीगच्या उपान्त्य सामन्यात गतविजेत्या बायर्नला चार गोल्सनी धुतले, हाच काय त्याच्या कारकीर्दीवर थोडासा बट्टा म्हणता येईल.

गो जर्मनी गो !!!
नोयार , लाम , श्वाएनस्टायगेर , मुल्लर , क्रूस .........................
क्लोस आणी पोडोल्स्की बद्द्ल फारसा विश्वास नाही आताशा

अशीच माहिती देत रहा इथं, प्लीज. हल्लीं जागतिक फुटबॉलचा मागोवा घेत रहाणं नाही जमत. तितकंच अप-डेटींग होईल तुमच्यामुळे !

लिओनेल मेस्सी फॉर्मात आला. अर्जेंटिनाच्या शेवटच्या वॉर्म अप आंतरराष्ट्रीय सामन्यात कलात्मक गोल नोंदवल्याने चाहत्यांना नक्कीच बरे वाटले असणार. बार्सिलोना क्लबसाठी गोल रतीब घालणार्‍या मेस्सीचा देशासाठी मागच्या सप्टेंबरनंतर पहिलाच गोल होता. २००६ ला कोचने ज्यादा संधी न दिल्याने आणि २०१० ला इतर खेळाडूंकडून भरीव मदत न मिळाल्याने मेस्सीची जादू चालली नव्हती. या स्पर्धेत पूर्ण देश त्याच्यासाठी देव पाण्यात घालून बसलाय. सुदैवाने दुखापतमुक्तही आहे. अ‍ॅग्वेरो (माराडोनाचा जावई - अतिशय गुणी, चपळ स्ट्रायकर), दी मारिआ आणि हिग्वेनची साथ मिळाली तर अर्जेंटिनाला थोपवणे अवघड जाईल.

जर्मनी, ब्राझील, नेदरलँड आणि अर्जेंटीना.. जर काही धावपळ झाली नाही तर हे चार उपांत्य फेरीत एकमेकांविरुद्ध खेळू शकतील.. स्पेन, पोर्तुगाल, इटली आणि फ्रान्स उपउपांत्य पर्यंत जाऊ शकतील.. अर्थात आशियाई किंवा आफ्रिकन देशांपैकी कोणी ह्यांना धक्के दिले तर अवघड आहे..
वर्ल्ड कप असल्यामुळे प्रत्येक खेळाडू हा पेटूनच खेळतो.. त्यामुळे कुठल्या दिवशी कोण कुठे खेळेल आणि गोल मारेल ह्याचा काही नेम नसतो पण..

बरेचसे संघ वन मॅन आर्मी टाईप आहेत. जे खरतर रिस्की आहे.. पण त्याच बरोबर त्यांचे बाकीचे खेळाडू फार प्रसिद्धी झोतात नसल्यामुळे त्यांना जास्त संधी मिळतात.. त्याचा फायदा जर त्यांनी उठवला तर मग धमाल येते कारण अजिबातच प्रसिद्धी नसलेला खेळाडू एकदम प्रसिद्धी झोतात येतो आणि सगळा गेमच फिरतो..

<< बरेचसे संघ वन मॅन आर्मी टाईप आहेत. .. पण त्याच बरोबर त्यांचे बाकीचे खेळाडू फार प्रसिद्धी झोतात नसल्यामुळे त्यांना जास्त संधी मिळतात.. >> खरंय व अगदीं पेलेपासून हें चालत आलंय. नंतर नंतर तर पेलेने विरुद्ध संघाची बचावफळी आपल्याकडे खेंचून घ्यायची व ब्राझीलच्या इतरानी गोल करायचे असा पायंडाच पडला होता. अर्थात, आतां सर्वच संघांचे प्रशिक्षक पक्के व्यावसायिक [प्रोफेशनल] असतात व डांवपेंच आखताना असं होणार नाही याची दक्षता घेतातच. दुसरीही शक्यता आहे कीं सर्वच देशातील उत्तम खेळाडू आतां बाहेरच्या क्लब्समधून वेगवेगळ्या स्पर्धा खेळत असल्याने त्याना रोनाल्डो, मेस्सी इत्यादींबरोबर किंवा विरुद्ध खेळायची संधी मिळालेली असते. त्यामुळे अशा महान खेळाडूंविरुद्ध देशाच्या संघातून खेळताना त्यांच्यावरचा मानसिक दबाव खूपच कमी असेल. पण सांघिक खेळात 'वम मॅन आर्मी' हें अर्थात घातकच !

मॅचेस कोणत्या चॅनलवर दिसणार आहेत?

वेळेतला फरक पाहता लाईव्ह पाहता येणं कठीणच आहे. पण दुसर्‍या दिवशी रिपीट तर बघणारच. (निकाल माहिती नसेल, तर ते लाईव्ह पाहण्यासारखंच. Happy )

कॅमेरे बसवलेला बॉल हे भारी आहे यावेळी !!

सर्वच 32 संघ सक्षम असले तरी ग्रुप स्टेजमध्ये काही सामने जास्त चुरशीचे होणार यात शंका नाही. प्रक्षेपणवेळा भारतासाठी सोयीच्या नसल्या आणि रोजचे जागरण झेपत नसले तरी हे खालील सामने चुकवायचे नाहीत असे म्हणतोय. सर्व भारतीय वेळेनुसार :

1. 13 जून पहाटे 0130
ब्राझील वि. क्रोएशिया

2. 14 जून पहाटे 0030 (शनिवार सुट्टी असेल तर बघाच)
स्पेन वि नेदर्लंड (मागील स्पर्धेचे विजेते- उपविजेते यावेळी पहिल्याच ग्रुप सामन्यात भिडणार!)

3. 15 जून पहाटे 0330 (पुढे रविवार सुट्टी आहे) इंग्लंड वि. इटली

4. 16 जून 2130 जर्मनी वि. पोर्तुगाल

5. 20 जून पहाटे 0030 उरुग्वे वि. इंग्लंड

6. 21 जून 2130 अर्जेंटीना वि. इराण (मेस्सीसाठी, जागरणही नाही)

7. 24 जून 2130 इटली वि. उरुग्वे
2130 इंग्लंड वि. कोस्टारिका
(कठीण ग्रुपमधील हे दोन अखेरचे सामने इंग्लंड, इटली आणि उरुग्वे तिघांसाठी जीवनमरणाचे असणार आहेत)

8. 25 जून 2130 अर्जेंटीना वि. नायजेरिया
(मेस्सीसाठी, जागरणही नाही)

9. 26 जून 2130 जर्मनी वि. अमेरिका
2130 पोर्तुगाल वि. घाना
(आणखी एका चुरशीच्या ग्रुपमधील अखेरचे सामने)
--------–--------------------
पुढच्या बाद फेरीपासून प्रत्येक सामना महत्त्वाचाच, त्यामुळे बघायलाच हवा)

अमेय, निवडक सामने सुचवल्याबद्दल धन्यवाद. मला स्वतःला आफ्रिकन संघांचे सामने बघायलाही आवडेल . कारण त्यांच्या खेळात अजूनही उत्स्फुर्तता व खेळाचा आनंद घेण्याची वृत्ती प्रकर्षाने जाणवते. बाकी ब्राझीलसारख्या स्वतःची वेगळी शैली असलेल्या देशांच्या खेळावरही आतां युरोपियन फुटबॉलचाच पगडा अधिक जाणवतो !
पुनःप्रक्षेपण किंवा हायलाईटस इथं दिवसां पहाता येतील अशी सोय असेलच ना !

Pages